Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 46

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 46


अनिकेत बॅग खांद्यावर टाकून अनघाच्या घरी आला.
दार उघडताच अनघा समोरच उभी होती बॅग भरून, डोळ्यांत नवी उमेद घेऊन.

अनिकेतला पाहताच तिच्या चेहऱ्यावर अलगद हसू उमटलं.
त्या हसण्यात भीती नव्हती… फक्त विश्वास होता.

अनिकेत तिच्या शेजारी येऊन बसला.

“अनघा, बॅग भरली ना? फाईल, गोळ्या सगळं घेतलंस ना?”
तो काळजीने विचारत म्हणाला.

“हो, सगळं घेतलं आहे,”
अनघा शांतपणे म्हणाली. “काहीच राहिलं नाही.”

आरती आतून पाणी घेऊन आल्या.
“अनिकेत, पाणी घे.”

अनिकेतने पाणी घेतलं. त्या एका घोटातच जणू सगळा थकवा उतरला.

“आता जेवण करून जा,”  आरती मायेने म्हणाल्या.

अनघाने लगेच त्याच्याकडे पाहिलं.  “ऐकलंस ना, जेवण करूनच जाऊ.”

तेवढ्यात शुभमही आला.
“अहो, जेवण तयार आहे. या, सगळे बसूया.”

संजय घरातच होते.
अनघा जाणार आहे हे माहीत असल्यामुळे ते सारखे तिकडेच लक्ष ठेवून होते.

टेबलाभोवती सगळे बसले.
जेवण साधं होतं… पण वातावरणात एक वेगळंच समाधान होतं.

अनघा निघणार होती
पण आज ती पळून नव्हती जात.
ती स्वतःच्या घराकडे, स्वतःच्या आयुष्याकडे परत चालली होती.

अनिकेत तिच्या शेजारी बसून हे सगळं पाहत होता.
मनात एकच विचार
आता काहीही झालं, तरी मी तिला एकटी पडू देणार नाही.


जेवण झाल्यावर सगळे उठले.
आरतीने अनघाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.
संजय काही बोलले नाहीत… पण त्यांच्या डोळ्यांत काळजी आणि विश्वास दोन्ही होतं.

अनघाने आई-बाबांना नमस्कार केला.
“लवकर येईन,”  तुम्ही पण  या, ती हळूच म्हणाली.

अनिकेतनेही नमस्कार केला.
त्या नमस्कार केला …

दाराबाहेर येताच अनघाने एक क्षण घराकडे मागे वळून पाहिलं.
हे माहेर होतं, जिथे तिला पुन्हा उभं राहायची ताकद मिळाली होती.

अनिकेतने तिचा हात हलकेच पकडला.
“चल,” तो शांतपणे म्हणाला.

दोघं गाडीत बसले.  गाडी पुढे निघाली…
पण आता हा प्रवास भीतीचा नव्हता,  तो होता नव्या सुरुवातीचा
एकत्र, समजुतीने, विश्वासाने.

---

अनिकेत खरंच निघून गेला…

अनिकेत खरंच निघून गेला.  ललिताच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली.

तृप्तीला अनिकेत आवडत असेल का? तिच्याशी बोलून बघू का?
जर तिला अनिकेत आवडत असेल, तर ती मला मदत करेल…
आणि मग मी अनिकेत आणि तृप्तीचं लग्न लावून देईन.
अनघाला कायमचं अनिकेतच्या आयुष्यातून काढून टाकेन…

ललिता मनातल्या मनात कट रचत होती.

तेवढ्यात अशोक घरात आले.
ते थेट अनिकेतच्या रूमकडे गेले.  दार उघडून पाहिलं…
पण रूम रिकामी होती.

“अनिकेत कुठे गेला असेल?”  अशोक मनात विचार करू लागले.

तेवढ्यात त्यांना तृप्ती दिसली.    ती समोरच होती… पण पूर्णपणे तिच्या विचारांत हरवलेली.
अशोक जवळ आले तरी तिला कळलंच नाही.

अशोकांनी तिला आवाज दिला.

“तृप्ती…”

ती भानावर आली.
“ओह… मामा!”
ती पटकन उठून त्यांच्या जवळ गेली.
“बोला ना मामा, काय म्हणत होतात?” ती म्हणाली.

“कसल्या विचारात होतीस?”
“मी आलो, अनिकेतच्या रूममध्ये जाऊन आलो, तरी तुला कळलंच नाही,”
अशोक थोड्या काळजीने म्हणाले.

तृप्तीने मान खाली घातली.  तिने लगेच पाणी आणून अशोकांना दिलं.

“मामा… आत्यांचं काय चालू आहे?”
“अनिकेतचं लग्न झालं तरी त्या माझ्या मागे लागल्या आहेत.”
“आज आत्या अनिकेतला म्हणाल्या
अनघाला सोड आणि तृप्तीसोबत लग्न कर…”

तृप्तीचा आवाज भरून आला.

“तो खूप चिडला…
आणि अनघाला घेऊन थेट त्यांच्या घरी निघून गेला.”
“मीही आता माझ्या घरी जाणार आहे.”  “बाबांना बोलवून घेईन.”  “उद्या अनघाला बघून घेईन,”
तृप्ती शांतपणे म्हणाली.

अशोकांनी दीर्घ श्वास घेतला.

“मी ललिताला कितीही समजावलं तरी तिला काही समजत नाही.”, " किती पण  समजवा,  तिच्या डोक्यात काही  जात नाही.
“अनिकेत निघून गेला आहे.”
“ललितामुळेच तो आता इथे राहणार नाही.”
“तिला काही कळत नाही… आणि शेवटी ती एकटीच पडेल.”

थोडा थांबून अशोक पुढे म्हणाले, “मीसुद्धा अनिकेतच्या घरी  येईल.”

“उद्या जाऊ,” तृप्ती म्हणाली.
“अनघाला अजून नीट जेवण बनवता येणार नाही.”
“तिला त्रास होईल.”

“हो… चालेल,”
अशोक शांतपणे म्हणाले.

घरात पुन्हा एकदा शांतता पसरली…
पण त्या शांततेखाली  आग अजूनही धगधगत होती.

---

अनिकेत आणी अनघा घरी  पोहचले,
घराजवळ  गेले.  दार उघडताच अनघा थोडा थांबली.
घरात पाऊल टाकताना तिच्या डोळ्यांत भीतीपेक्षा जास्त जबाबदारी दिसत होती.

अनिकेत हळूच म्हणाला,
“ये… हे आपलंच घर आहे.”

अनघाने आजूबाजूला पाहिलं.
“काही वेगळं वाटतंय… पण छानही वाटतंय,” ती म्हणाली.

“घाबरू नकोस,” अनिकेत तिच्या जवळ येत म्हणाला,
“मी आहे ना… काहीच तुला एकटीला करायला लावणार नाही.”

अनघा थोडी शांत झाली.
“मला माहिती आहे,” “पण आतून अजून थोडी भीती वाटते,” ती प्रामाणिकपणे म्हणाली.

अनिकेतने तिचा हात हातात घेतला.
“ती भीती नॉर्मल आहे,” “पण ती भीती तुला हरवू देणार नाही,”
“आपण दोघं मिळून सगळं निभावून नेऊ.”

अनघाच्या डोळ्यांत पाणी आलं.
“तू माझ्या सोबत नसतास ना… तर कदाचित मी इतकी स्ट्रॉंग राहिलेच नसते,” ती म्हणाली.

“आणि तू माझ्या सोबत नसतीस,”
“तर मीसुद्धा इतका टिकून राहिलो नसतो,” अनिकेत हलकेच हसत म्हणाला.

अनघा थोडी हसली.
“मला उद्यापासून थोडं थोडं काम सुरू करायचं आहे,”
“ओव्हर नको… पण बसून राहायचंही नाही.”

“बिलकुल,” अनिकेत म्हणाला,
“पण तुझी तब्येत पहिल्यांदा.” “डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं फॉलो करायचं.”

“हो,” अनघा मान हलवत म्हणाली,
“आणि तू पण स्वतःकडे लक्ष दे.” “तू खूप थकलाय.”

अनिकेत थोडा शांत झाला.
“आज इथे आलोय… आणि पहिल्यांदा मला शांत वाटतंय,” तो म्हणाला.

अनघा त्याच्या जवळ बसली. “ते घर पुन्हा आपलं होईल,”
“हळूहळू… पण नक्की.”

अनिकेतने तिच्या कपाळावर हलकेच हात ठेवला.
“आता आपण फक्त पुढे बघायचं,”
“मागे काय झालं… ते विसरायचं नाही, पण त्यात अडकायचंही नाही.”

अनघा शांतपणे म्हणाली,
“तू माझा आधार आहेस… आणि तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे.”

दोघेही काही क्षण शांत बसले.
घरात शब्द नव्हते…
पण विश्वास भरपूर होता.


---

आजोबांना अनिकेतच्या घराचं दार उघडं दिसलं.
ते क्षणभर थांबले.
“कोणी आहे का?” अशी हलकी हाक त्यांनी मारली.

घरात शांतता होती…
पण ती शांतता ओळखीची वाटत नव्हती.

आजोबा आत आले.
डोळे घरभर फिरले. “अनघा…?” त्यांनी पुन्हा हाक मारली.

तेवढ्यात अनघा किचनमधून बाहेर आली.
आजोबांना पाहताच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही उमटले.

“आजोबा! तुम्ही?”
ती पटकन त्यांच्या जवळ आली.

“दार उघडं दिसलं,” “म्हटलं बघावं… अनघा कशी आहे,”
आजोबा काळजीने म्हणाले.

“मी ठीक आहे,” अनघा हलकेच हसली,
“आता बरी वाटतेय.”

आजोबांनी तिच्याकडे नीट पाहिलं. “चेहरा थोडा उतरलेला दिसतोय,” “आता तब्येतीकडे जास्त लक्ष दे.”

“हो आजोबा,” “डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं करतेय,”
ती नम्रपणे म्हणाली.

तेवढ्यात अनिकेत बाहेर आला.“आजोबा, या ना… आत बसा,”
तो म्हणाला.

आजोबा सोफ्यावर बसले.
“तू तिला इकडे घेऊन आलास, ते खूप चांगलं केलंस,”
ते अनिकेतला म्हणाले.

“इथे तिला जास्त सुरक्षित वाटतं,” अनिकेत शांतपणे म्हणाला.

आजोबांनी अनघाच्या डोक्यावरून हात फिरवला.
“तू मजबूत आहेस,” “पण मजबूत असलीस तरी थकायला परवानगी आहे,”
ते प्रेमाने म्हणाले.

अनघाचे डोळे पाणावले. “तुम्ही आहात म्हणूनच,”
“मला पुन्हा उभं राहायची हिंमत मिळते,” ती म्हणाली.

“बस्स,”
“आता हसत राहा,” “घरात आनंद राहिला पाहिजे,” आजोबा हसत म्हणाले.

घरात पुन्हा थोडा गोड गारवा पसरला.
दार उघडंच होतं… पण आता त्या घरात काळजी आणि आपुलकी भरलेली होती.





क्रमश

तृप्ती तिच्या मनातले अशोकला सांगेल का?  तिचे  आणी विक्रमचे  लग्नजुळे का?.....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all