Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 47

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 47




मोनिका घरी आली.
तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण घरात पाऊल टाकताच तिला वेगळंच शांत वातावरण जाणवलं.
अनिकेत घरी नसेल, याची तिला कल्पनाच नव्हती.

तृप्ती तिच्या जवळ आली.
“मोनिका… अनिकेत अनघाला सोडून निघून गेला,”
ती हळू आवाजात म्हणाली.

मोनिकाला क्षणभर काहीच बोलता आलं नाही.
ललिताचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला.
मनात राग उसळला… पण तो बाहेर आला नाही.
ती फक्त खोल श्वास घेऊन शांत राहिली.

“खूप चुकीचं वागतेय आई ,”
मनातल्या मनात ती म्हणाली, पण घरात पुन्हा वाद नको म्हणून ती गप्प राहिली.

थोड्या वेळाने मोनिका म्हणाली,
“तृप्ती, आपण उद्या त्यांच्या घरी जाऊया.”
“अनघाला पण बघता येईल… आणि आजोबांनाही भेटता येईल.”

“हो, आपण उद्या जाऊ,”
तृप्ती लगेच म्हणाली.

पण तृप्तीच्या मनात वेगळेच विचार चालू होते.
मला अनिकेतला माझ्या आणि विक्रमबद्दल सांगायला हवं…
तो काहीतरी निर्णय घेईल…
किमान सत्य तरी समजेल,
ती मनात विचार करत होती.

तृप्ती बाहेरून शांत होती…
पण आत कुठेतरी तिला जाणवत होतं
आता गप्प बसून चालणार नव्हतं.

---

ललितासोबत आता घरात कोणीच बोलत नव्हते.
मोनिकाही शांत होती.
तृप्ती आपापल्या कामात गुंतलेली होती.

घरात एक वेगळंच अंतर जाणवत होतं…
ललिता असूनही ती एकटीच होती.

अशोक, मोनिका आणि तृप्ती
अनिकेतकडे जाण्याची तयारी करत होते.

अनघाला त्रास होऊ नये म्हणून
तृप्ती सगळ्यांचं जेवण बनवत होती.
मोनिका तिला शांतपणे मदत करत होती.

अशोक तयार होऊन बाहेर आले.
“मोनिका, तृप्ती… झालं का? आपल्याला निघायचं आहे,”
अशोक म्हणाले.

तृप्तीने सगळं जेवण नीट पॅक केलं.
मोनिकाने ते काळजीपूर्वक पिशवीत ठेवले.
अशोकांनी पिशवी घेतली
आणि तयारीसाठी आत गेले.

हे सगळं ललिता दूर उभी राहून पाहत होती.

मला कोणीच काही विचारत नाही…
कुठे जात आहेत, का जात आहेत—काहीच नाही…
आज कोणी माझ्याशी बोललंही नाही…

तिच्या मनात विचार येत होते.

अनिकेतसुद्धा इथून निघून गेला…
आता या घरात माझं स्थान काय उरलं आहे?

पहिल्यांदाच
ललिताला स्वतःच्या वागण्याची
हलकिशी जाणीव टोचू लागली…
पण अहंकार अजूनही तिला गप्प बसू देत होता.


---

अनिकेत ऑफिसला निघत होता.
जाताना तो अनघाकडे वळला.

“जास्त काम करू नकोस…
तुझी काळजी घे.
काही त्रास झाला तर लगेच मला फोन कर,”
अनिकेत काळजीने म्हणाला.

अनघा फक्त हलकंसं हसली आणि मान हलवली.

अनिकेत आजोबांकडे वळला.
“आजोबा, मी निघतो,”
म्हणत त्याने त्यांच्या पायांना हात लावला.

“जा रे, नीट जा…
आणि अनघाची काळजी करू नको,”
आजोबा प्रेमाने म्हणाले.

अनिकेत बाहेर पडायला वळलाच होता,
तेवढ्यात दारातच
अशोक, तृप्ती आणि मोनिका दिसले.

अनिकेत थबकला.
अचानक त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि समाधान दोन्हीही दिसत होतं…

ते सगळे घरात आले.

अशोक अनघाकडे पाहत थोड्या काळजीच्या सुरात म्हणाले,
“आता तुला काही त्रास तर होत नाही ना, बाळ?”

अनघाने हलकेच स्माईल केलं.
“नाही बाबा, आता बरं वाटतंय. डॉक्टरांनी सांगितलेली काळजी घेत आहे. अनिकेतही सतत लक्ष ठेवतो,”
ती शांतपणे म्हणाली.

अशोकांनी समाधानाने मान हलवली. “छान… स्वतःची काळजी घे.
तुझी तब्येत सगळ्यात महत्त्वाची आहे,” ते म्हणाले.

तेवढ्यात तृप्तीही जवळ उभी राहिली होती.
अशोक तिच्याकडे वळले आणि पुढे आजोबांकडे पाहत म्हणाले,
“अनघा, हे कोण आजोबा आहे?.”

हे आजोबा यांचा आम्हांला. खूप आधार आहे. शेजारी राहतात. अनघा म्हणाली..

मग अनघा तृप्तीकडे पाहत ती म्हणाली,
“आणि आजोबा, ही तृप्ती….”

आजोबांनी दोघांकडे प्रेमाने पाहिलं.
“या बाळांनो, देव तुमचं भलं करो,”
ते म्हणाले.

मोनिका आणि तृप्ती दोघींनीही आदराने नमस्कार केला.
त्या क्षणी वातावरणात एक शांत, आपुलकीची उब पसरली होती…
जणू तुटलेली नाती हळूहळू पुन्हा जोडली जात होती.


---

अनिकेत ऑफिसला निघायची तयारी करत होता.
तो सगळ्यांकडे एक नजर टाकून अनघाजवळ आला.

“मी निघतोय. जास्त काम करू नकोस, आराम कर,”
तो हळूच म्हणाला.

अनघाने मान हलवली. “तू काळजी करू नकोस.
नीट जा,” ती म्हणाली.

अनिकेतने आजोबांना नमस्कार केला,
अशोक, मोनिका आणि तृप्तीकडे पाहून हलकेच स्माईल केलं
आणि अशोकला बाय करू ऑफिसला निघून गेला.

अनिकेत गेल्यावर घरात शांतता पसरली, पण ती शांतता जड नव्हती… ती आपुलकीची होती.

आजोबा खुर्चीत बसत म्हणाले,
“अनिकेत खूप समजूतदार आहे.
अनघा, त्याने तुझी चांगली साथ दिली आहे.”

अनघाने हलकंसं हसून मान हलवली.
“हो आजोबा, तो माझा खूप आधार आहे.”

अशोक म्हणाले,
“आता तू फक्त स्वतःकडे लक्ष दे.
सगळं हळूहळू नीट होईल.”

मोनिकाने अनघाचा हात धरत म्हटलं,
“आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. एकटी नाहीस तू.”

तृप्तीही म्हणाली,
“आपण थोडं हसूया, गप्पा मारूया. मन हलकं होतं.”

आजोबांनी हसत सांगितलं,
“घरात हसू परत यायला हवं,
तेच खरी औषधं आहे.”

अनघाच्या डोळ्यांत समाधान होतं…
या सगळ्या गप्पांमध्ये तिला पुन्हा एकदा आपुलकीची, सुरक्षिततेची जाणीव होत होती.


---

तृप्तीने घरून बनवलेलं जेवण नीट डब्यात भरून आणलं होतं.
तिने ते अनघाच्या हातात दिलं.

“हे घरचं जेवण आहे,
नीट खा,” तृप्ती हळूच म्हणाली.

अनघाने तिच्याकडे पाहून हलकंसं हसलं.
“थँक यू तृप्ती,” ती म्हणाली.

तृप्तीला अनघाशी मनमोकळं बोलायचं होतं,
पण अशोक आजोबांसोबत गप्पा चालू होत्या.
त्यामुळे तिला तिथे काही बोलता येईना.

थोडा वेळ झाला तशी तृप्ती म्हणाली,
“अनघा, चल ना…
किचनमध्ये ठेवायला मदत कर.”

अनघाला लगेच समजलं.
ती उठली आणि तृप्तीसोबत किचनमध्ये गेली.

किचनमध्ये आल्यावर तृप्तीने दार हलकेच लावलं.
क्षणभर शांतता पसरली.

तृप्तीने अनघाकडे पाहिलं आणि म्हणाली,
“तू कशी आहेस खरंच? मनाने… तब्येतीने?”

अनघाचे डोळे क्षणभर भरून आले.
“आता थोडं बरं वाटतंय,
पण मन… अजून जड आहे,” ती हळू आवाजात म्हणाली.

तृप्तीने तिचा हात धरला. “तुला स्ट्रॉंग दिसायची गरज नाही.
रडावंसं वाटत असेल तर रड. आम्ही आहोत तुझ्यासोबत.”

अनघाने खोल श्वास घेतला.
“मला भीती वाटते… पुन्हा सगळं नॉर्मल होईल का?”

“होईल,” तृप्ती ठामपणे म्हणाली. “हळूहळू… पण नक्की होईल. आणि अनिकेत तुझ्यासोबत आहे,
हे सगळ्यात मोठं आहे.”

अनघाच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान आलं.
“आज तुझ्याशी बोलून बरं वाटलं,”
ती म्हणाली.

तृप्ती हसली. “मग पुन्हा बोलू.
तू एकटी नाहीस, अनघा.”

किचनमधून बाहेर येताना
अनघाच्या पावलांत थोडा आत्मविश्वास परत आला होता…

तृप्तीने अनघाला थांबवले.

तृप्ती थोडी घाबरल्यासारखी अनघाकडे पाहत म्हणाली,
“मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे… आणि अनिकेतसोबत पण बोलायचं आहे.”

अनघाने तिच्याकडे शांतपणे पाहिलं.
“बोल ना,” ती म्हणाली.

तृप्तीने क्षणभर थांबून विचार केला, मग हळू आवाजात म्हणाली,
“मी आज इथे थांबू का?”

अनघा थोडी आश्चर्याने हसली. “अगं, विचारतेस काय?”
ती म्हणाली.
“राहा ना… मला पण बरे वाटेल.”

तृप्तीच्या चेहऱ्यावर हलकासा दिलासा उमटला.
“थँक यू अनघा…
मला तुझ्याशी आणि अनिकेतशी नीट बोलायचं आहे.”

अनघाने तिचा हात धरत म्हणाली,
“आपण सगळे बोलू…
घाई नको. आजचा दिवस आपलाच आहे.”

त्या दोघींच्या मध्ये एक शांत समजूत निर्माण झाली होती…
आणि त्या क्षणी अनघाच्या घरात फक्त नात्यांची उब भरून राहिली होती.

अशोक आणि आजोबा मस्त गप्पा मारत होते.
जुने किस्से, शेतीच्या आठवणी, गावातले लोक… हसत-खेळत वेळ कसा गेला कळलंच नाही.

किचनमध्ये मात्र तृप्ती शांत उभी होती.
अनघाने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,
“काय झालं तृप्ती? काही तरी मनात आहे असं दिसतंय.”

तृप्ती थोडा वेळ गप्प राहिली.
मग हळूच म्हणाली,
“अनघा… अनिकेतबद्दल बोलायचं आहे मला. आज नाही बोलले तर कदाचित पुन्हा धैर्य येणार नाही.”

अनघाने तिचा हात हातात घेतला.
“आज तू इथेच थांबतेस. संध्याकाळी अनिकेत आला की सगळे मिळून शांतपणे बोलूया.”

तृप्तीच्या डोळ्यांत पाणी तरळलं…
पण त्या पाण्यात भीतीपेक्षा आता थोडीशी आशाही होती.


क्रमश

अशोक तृप्तीला राहू देतील का?  मोनिका पण  थांबेल. का?  ललिता काही करेल का?  तृप्ती अनिकेत सोबत  बोलणे होईल का?...

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all