Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 48

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं   भाग - 48


केव्हाच गेले आहे… अजून आलेला नाही.
सांगूनही जात नाही…

ललिताच्या मनात विचारांचा काहूर माजला होता.
मला तर सगळ्यांनी वाळीत टाकलंय. अनघानेही मला एकटी पाडली आहे.
डोळ्यांसमोर सतत तोच प्रश्न घोळत होता   माझं कुणी ऐकणार आहे का?

पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात अजूनही एक आशेची ठिणगी जिवंत होती.  कधी तरी अनिकेत माझं ऐकेल…
आई आहे मी… तो पूर्णपणे दूर जाऊ शकत नाही.

ललिताने स्वतःलाच धीर दिला.
तृप्तीलाही मी परत माझ्याकडे वळवेन.
अनिकेतसोबत तिचं लग्न लावून देईन… तेच सगळ्यांसाठी योग्य आहे.

तिच्या चेहऱ्यावर क्षणभर कठोरपणा आला,
पण डोळ्यांत मात्र असहाय वेदना दाटल्या होत्या.
बाहेर सगळं शांत होतं…
पण ललिताच्या मनात मात्र वादळ उठलेलं होतं.

.....

अनघा थोडी आश्चर्याने मोनिकाकडे पाहत राहिली.
पण लगेच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

“अगदी चालेल… तुम्ही दोघीही इथे राहा,” अनघा म्हणाली.
“मला पण बरं वाटेल.”

अशोक थोडा वेळ विचारात पडले होते.
ललिताचा चेहरा डोळ्यांसमोर आला…  तिला काहीही न सांगता आलोय…
पण तरीही परिस्थिती समजून घेत त्यांनी मान डोलावली.

“ठीक आहे,” अशोक म्हणाले,
“पण सकाळी लवकर निघा. आणि अनघा… तू स्वतःची नीट काळजी घे.”

“हो बाबा,” अनघा म्हणाली.

मोनिका आणि तृप्तीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
एकमेकांकडे पाहून त्या हसल्या.

अशोक निघून गेले…  दार बंद झालं…
घरात पुन्हा शांतता पसरली.

पण त्या शांततेतही,  कुठेतरी ललिताच्या मनात चाललेला खोल कट  हळूच आकार घेतच होता…

.....

अशोक घरी आले.
घरात पाऊल टाकताच त्यांची नजर आजूबाजूला फिरली.

“मोनिका… तृप्ती…”  कोणाचाच आवाज नाही.
ललिता लगेच समोर आल्या.  त्यांनीही इकडे-तिकडे पाहिलं.

“मोनिका आणि तृप्ती कुठे आहेत?”
ललिताने थोड्या कडक आवाजात विचारलं.

अशोक क्षणभर गप्प राहिले.
“त्या… आज अनघाकडे थांबल्या आहेत,” ते शांतपणे म्हणाले.

ललिताचा चेहरा क्षणात बदलला.
“काय? तिथेच का? मला काहीच सांगितल नाही!”

म्हणजे आता सगळेच तिच्याकडे…  ललिताच्या मनात विचार उसळले.

ती बाहेरून मात्र शांत राहण्याचा प्रयत्न करत होती.
“ठीक आहे,” म्हणत ती वळली…
पण तिच्या मनात जळजळ पेटली होती.

सगळे माझ्यापासून लांब जातायत…
हे असंच चालू राहिलं तर माझं काहीच उरणार नाही… मी  एकटी  तर पडणार नाही.  ललिता मनात म्हणाल्या.


......

आजोबा हळू हसत अनघाकडे पाहिले, “बरं मग, मी निघतो. सावध राहा,” त्यांनी सांगितलं आणि घरातून बाहेर पडले.

दरवाजा बंद झाल्यावर, अनघा, तृप्ती आणि मोनिका सोफ्यावर बसल्या.

अनघा हलक्या हसून म्हणाली, “आजोबा गेले, आता एक थोडा आराम मिळेल वाटतं.”

तृप्ती हसून म्हणाली, “हो, थोडं शांत वातावरण आहे, नाहीतर सतत कुणी तरी येतच राहायचं.”

मोनिका हलक्या आवाजात म्हणाली, “सगळं व्यवस्थित आहे ना? अनिकेतची काळजी घ्यायला त्याला वेळ मिळतोय का?”

अनघा हळू हसली, “हो, आता तो ऑफिसला गेला आहे, पण सतत मला विचारतो, मी ठीक आहे ना, आराम करतोय ना.”

तीनही एकत्र बसून हलकेच गप्पा मारत होत्या, आठवणींवर हसत आणि भावनिक क्षण अनुभवत.
गप्पा शांत, पण मनाला आराम देणाऱ्या वातावरणात सुरू होत्या.

अनिकेत घरात जवळ आला होता,  दरवाजा हळू उघडतो, की अनघा, तृप्ती आणि मोनिका अजूनही गप्पा मारत बसल्या होत्या.

अनिकेतला पाहताच, अनघा हलके हसते, “तू आलास… किती वेळ झाला?”

अनिकेत हळू हसतो, “ऑफिसनंतर लगेच आलो. तुला त्रास झाला नाही ना?”

तृप्ती आणि मोनिकाने थोडा हलका हसका केला. तृप्ती मनात विचार करते, ‘तो आता शांत वाटतोय, काहीतरी बोलायचं आहे का?’

अनिकेत बॅग ठेवतो आणि अनघाजवळ बसतो, “तुला आराम करायला द्यायला हवं होतं, पण मी तुला सोडून जाऊ शकत नव्हतो.”

अनघा डोळे हलके भरून येतात, पण हसत म्हणते, “तू असं म्हणत असल्यास बरं वाटतं.”

तृप्ती आणि मोनिकाने त्यांना काहीसे गोडशा नजरेने पाहिले, घरात एक शांत पण प्रेमळ वातावरण तयार झाले.

तृप्ती आणि मोनिकाने हलके हसत चहा ठेवला. कपांवर वाफ उडत होती, आणि घरात थोडा उबदार गंध पसरला.

“आजोबा, चहा तयार आहे,” मोनिकाने हळूच हाक मारली.

आजोबा हसत उठले, “छान, चला तर मग!”

आजोबा आणी मोनिका  आले.

ते हळू हळू सगळ्यांनी  चहा घेऊन बसले, आणि अनघा, अनिकेत, तृप्ती आणि मोनिकाच्या गप्पा ऐकत होते. घरात हलकी शांतता होती, पण एक हलकी उबदार आनंदाची भावना देखील पसरली होती.


---

अनिकेत फ्रेश होण्यासाठी आत गेला.
अनघा हळूच त्यांच्या मागे गेली.

अनघा  म्हणाली.
खूप थकला दिसतोयस.

अनिकेत  म्हणाला,
हो… पण घरी आलो की सगळा थकवा उतरतो.

अनघा  म्हणाली,
आज सगळे आले होते, तुला बरं वाटलं ना?

अनिकेत म्हणाला,
हो… पण आईचा राग अजून गेलेला नाही, ते मनाला लागलं. ती आली असती तर,  अजून  चांगले झाले  असते.

अनघा  म्हणाली,
वेळ दे. सगळं हळूहळू ठीक होईल.

अनिकेत म्हणाला,
तू माझ्यासोबत आहेस, एवढंच माझ्यासाठी खूप आहे.
अनघा फक्त हसली… तिच्या डोळ्यांत आधाराची चमक होती.
अनिकेतला छान  वाटले..


---

किचनमध्ये तृप्ती अनघाला म्हणाली,
तृप्ती  म्हणाली,
आज आपण दोघी मिळून जेवण बनवू. तुला पूर्ण काहीच करू देणार नाही.

अनघा   म्हणाली,
अगं नाही, मी करेन थोडंफार. जास्त नाही करू शकणार,

तृप्ती  म्हणाली,
नाही म्हणजे नाही. आज फक्त तू बसायचं.

तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली.
मोनिकाने दरवाजा उघडला. शुभम उभा होता.

मोनिका (हसत) म्हणाली,
अरे वा! आता अजून मजा येणार.

शुभम म्हणाला
मी लगेच निघणार आहे. माझी एक्साम आहे. ताईला बोलव ना.

मोनिकाने अनघाला आवाज दिला,
अनघा...

अनघा बाहेर आली.
अनघा म्हणाली,
तुझी तर एक्साम होती ना?

शुभम म्हणाला,
हो. आईने डब्बा दिला आहे. हा घे. मी निघतो.

इतकं बोलून शुभम लगेच निघून गेला.

शुभम गेल्यावर मोनिका थोड्या चिडलेल्या स्वरात म्हणाली,

मोनिका म्हणाली,
तू त्यांना का बनवायला सांगितलंस? आपण बनवलं असतं ना.

अनघा शांतपणे म्हणाली,
अनघा म्हणाली,
मी नाही सांगितलं. दुपारी तिचा कॉल आला होता. तुमचा आवाज तिला गेला असेल. म्हणून तिने बनवून पाठवला असेल,

तृप्ती सहज म्हणाली,
तृप्ती म्हणाली,
आई अशीच असते.

ते शब्द ऐकून मोनिका लगेच विचारात पडली.
अनघाच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

तृप्तीला ते दिसलं आणि तिचं मन चुटपुटलं.
मी उगाच बोलून गेले…
असं वाटत तृप्ती मनात विचार करत होती.

घरात पुन्हा शांतता पसरली…
पण त्या शांततेत न बोललेल्या भावना दाटून आल्या होत्या.


---


अनिकेत फ्रेश होऊन बाहेर आला.
हॉलमध्ये नजर टाकत तो म्हणाला

अनिकेत म्हणाला,
काय गं… कोण आले होते?

अनघाने शांतपणे उत्तर दिलं,
अनघा म्हणाला, शुभम आला होता.

अनिकेत म्हणाला,
शुभम कशासाठी आला होता?, लगेच निघून गेला.

अनघा म्हणाली
त्याची एक्साम चालू आहे. आईने डब्बा दिला होता… तो देऊन लगेच निघून गेला.

अनिकेत थोडा थांबला.
अनिकेत म्हणाला.,
बरं… आला आणि गेला तर.

अनघाने मान खाली घातली,
अनघा म्हणाली,
हो… काही वेळच होता. मी पण त्याला थांबायला सांगू शकले नाही.

अनिकेतने तिच्याकडे पाहिलं.
अनिकेत (मऊ आवाजात) म्हणाला,
ठीक आहे. तू स्वतःला जास्त त्रास देऊ नकोस.

अनघा फक्त हलकंसं हसली…
पण त्या हास्यामागे तिच्या डोळ्यांत खूप काही दडलेलं होतं.


क्रमश
विक्रम पण अनिकेतकडे येईल का? तृप्ती आणी विक्रम अनिकेतला सांगतील का? ....



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all