Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 49

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 49



अनघा, तृप्ती आणि मोनिका सोबत अनिकेत बसला होता.
सगळे शांतपणे बसले होते, पण तृप्तीच्या डोळ्यात काहीतरी गंभीरता होती.

तृप्ती म्हणाली, (थोड्या धैर्याने) मला बोलायचं आहे.

तिच्याकडे सगळे बघायला लागले.
अनिकेत थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणाला,
हो बोल ना.

तृप्तीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली

तृप्ती म्हणाला,
अनिकेत… मला विक्रम आवडतो. मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे.

हे ऐकून अनिकेतच्या चेहऱ्यावर थोडासा आश्चर्याचा थर उमटला.
पण तो शांतपणे म्हणाला

अनिकेत म्हणाला,  मला माहिती आहे. लग्न करायचं आहे. ते कसं करायचं आहे? आमच्या सारखं की, मामाला सांगायचं?

तृप्तीचा चेहरा थोडा हलकासा थरथरला.
ती म्हणाली

तृप्ती  म्हणाली,
मला तेच समजत नाहीये. तू सांग… मी काय करू? विक्रमची आई तयार होणार का?

अनिकेतने थोडा वेळ विचार करून उत्तर दिलं

अनिकेत म्हणाला,
मावशी लगेच तयार होईल. तू फक्त मामाला कसं सांगायचं ते बघ.

त्याच वेळी मोनिका सगळ्यांच्या तोंडाकडे बघत होती.
तिला अजून काहीच माहिती नव्हती.
ती मनातल्या मनात विचार करत होती “हे सगळं काय चाललंय?”

तृप्तीने पुन्हा बोललं

तृप्ती  म्हणाली,
विक्रमला इथे बोलवणार का? आम्ही त्याला बोलवून बोलू. मी उद्या बाबांना कॉल करून इथे बोलणार आहे. तुझे आणि आत्या (आत्याचे) बोलणे मी ऐकले होते.

अनिकेतने तिला थांबवायचा प्रयत्न करत म्हणाला

अनिकेत म्हणाला,
तृप्ती, माझ्या मनात तसं काही नव्हतं. म्हणून मी अनघा इथे घेऊन आलो.

तृप्तीने अनिकेतकडे बघून पुन्हा विचारलं

तृप्ती म्हणाली, 
मला माहिती आहे. ते जाऊ दे. पण विक्रमला बोलवणार का?

अनिकेतने ठामपणे उत्तर दिलं

अनिकेत  म्हणाला,
हो… उद्या बोलवतो.

“आता खूप गप्पा झाल्या,” अनिकेत हसत म्हणाला.
“तुम्ही तिघी बेडरूममध्ये झोपा. मी बाहेर हॉलमध्ये झोपतो.”

हे बोलून तो थेट बाहेर हॉलमध्ये निघून गेला.

अनिकेत बाहेर जाताच मोनिकाचा चेहरा बदलला.
ती तृप्तीच्या जवळ आली आणि चिडून म्हणाली,

मोनिका म्हणाली, 
माझ्यापासून काय काय लपवून ठेवलं आहेस गं?
इतकं सगळं कधी झालं आणि मला काहीच माहिती नाही?

हे बोलत बोलत मोनिका तृप्तीला हलकंसं मारू लागली.

तृप्ती हसतच पळू लागली.
“अगं थांब ना… मी सांगणारच होते!”
ती रूममध्ये इकडून तिकडे पळत होती, आणि मोनिका तिच्या मागे.

दोघींचा हा गोंधळ बघून अनघा बेडवर बसून हसत होती.
क्षणभर तरी घरातला सगळा ताण विसरला गेला होता.

त्या हशात, त्या गोंधळात, घर पुन्हा एकदा जिवंत झालं होतं…


---


अनघा दोघींना हसत  पाहत होती…
पण त्या हास्यामागे तिच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता.

किती दिवसांनी घरात हसू ऐकू येतंय…
माझ्यामुळे सगळे तणावात होते, हे मला माहिती आहे…
पण आज तरी कोणी दुखावलेलं नाही, हे पाहून बरं वाटतंय.

तिची नजर क्षणभर दरवाज्याकडे गेली…
अनिकेत बाहेर हॉलमध्ये झोपायला गेला होता.

तो माझ्यासाठी किती बदलला आहे…
स्वतःचा त्रास लपवून, माझा विचार करतोय.
मी लवकर बरी व्हायला हवी… त्याच्यासाठी, आपल्यासाठी.

तृप्तीकडे पाहून तिच्या मनात एक हलकं समाधान आलं.

तृप्तीचं मन किती स्वच्छ आहे…
तिला अनिकेतबद्दल गैरसमज नाही, उलट ती स्वतःच्या प्रेमासाठी उभी राहतेय.  देव करो, तिला तिचं प्रेम मिळो.

मोनिकाकडे पाहून अनघा हळूच हसली.

मोनिका तशीच आहे… थेट, मनमोकळी.
तिच्यासोबत असलं की घर घरासारखं वाटतं.

अनघाने डोळे मिटले.  मनात एक शांत भावना उतरली.

कदाचित सगळं लगेच नीट होणार नाही…
पण आता मी कमजोर नाही.
माझ्या माणसांसाठी मला मजबूत व्हायचं आहे.

हसत-खेळत सुरू असलेल्या त्या  क्षणात अनघा  गुंतली होती.

....


सकाळची वेळ होती…  घरात अजून शांतता होती.

विक्रम अनिकेतच्या घरी आला.
दार उघडताना त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू होतं, पण मनात थोडी धाकधूकही होती.
अनिकेत बोलावतो म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असणार… तो मनात म्हणाला.

दार उघडताच त्याला अनिकेत दिसला.

“ये विक्रम,” अनिकेत म्हणाला.

विक्रम आत आला…
आणि अचानक त्याची नजर समोर गेली.

हॉलमध्ये तृप्ती उभी होती.

एक क्षण तो थांबला. त्याला काहीच कळेना.

तृप्ती इथे? ती इथे का आहे?
अनिकेतच्या घरी?

तृप्तीही त्याला पाहून गोंधळली.
तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, लाज आणि थोडी भीती एकत्र दिसत होती.

“विक्रम…” ती हळूच म्हणाली.

विक्रमने स्वतःला सावरलं.
“तू… इथे?” तो नकळत विचारून गेला.

अनिकेत पुढे आला.
“बस आधी. आपल्याला बोलायचं आहे,” तो शांत आवाजात म्हणाला.

विक्रम सोफ्यावर बसला, पण मन मात्र अजूनही धावत होतं.

तृप्तीने अनिकेतला सगळे सांगितले वाटते,

विक्रमने तिच्याकडे पाहिलं.
पहिल्यांदाच त्याच्या नजरेत प्रश्न नव्हते…
तर अपेक्षा होती.

“तू ठीक आहेस ना?” तो फक्त एवढंच म्हणाला.

तृप्तीच्या डोळ्यात पाणी आलं.
ती मान हलवून होकार देत म्हणाली,
“आता ठीक आहे.”

तो क्षण साधा होता,
पण त्या क्षणातच दोन मनांमधला न बोललेला संवाद सुरू झाला होता…

आणि अनिकेत दूर उभा राहून ते सगळं पाहत होता
मनात एकच विचार…

आज काही तरी योग्य दिशेने जाणार आहे…

विक्रम थोडा थांबला…
नंतर अनिकेतकडे पाहत शांत आवाजात म्हणाला

“अनिकेत, मला तृप्ती सोबत थोडं बोलायचं आहे.
आम्ही दोघ गार्डनमध्ये जाऊ का?”

अनिकेतने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं.
त्याच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, उलट समजूतदारपणा होता.

“हो, नक्की जा,” अनिकेत म्हणाला.
“तुम्ही दोघं शांतपणे बोला.”

तृप्ती थोडी गोंधळली.
तिने अनिकेतकडे पाहिलं…
त्याने डोळ्यांनीच जा असं सांगितलं.

विक्रम पुढे चालू लागला.
“चल तृप्ती,” तो हळूच म्हणाला.

दोघं गार्डनमध्ये आले.
हिरवळीवर सकाळचं ऊन पसरलं होतं.
पण दोघांच्या मनात मात्र अनेक प्रश्न होते.

विक्रम थांबला.
“तृप्ती… तू काल अनिकेतला बोललीस, ते ऐकून मला धक्का बसला…
पण आनंदही झाला.”

तृप्तीने मान खाली घातली.
“मला तुला आधी सांगायला हवं होतं…
पण परिस्थितीच तशी होती.”

“मला समजतं,” विक्रम म्हणाला.
“पण एक गोष्ट स्पष्ट सांग
तू हे सगळं कोणाच्या दबावाखाली तर नाही ना करत?”

तृप्तीने लगेच मान हलवली.
“नाही विक्रम.
हा माझा निर्णय आहे.
माझ्या मनात तूच आहेस. मला आता लवकर लग्न करायचे आहे” तृप्ती म्हणाली

विक्रमच्या डोळ्यांत चमक आली.
“मग बाकी काहीच महत्वाचं नाही. मी तुझ्या सोबत आहे… पूर्णपणे.”

तृप्तीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते आनंदाचं होतं.

दूर उभा असलेला अनिकेत सगळं पाहत होता.
त्याच्या मनात एक समाधान दाटून आलं

विक्रम आणि तृप्ती गार्डनमध्ये मनमोकळं बोलून घेतात.
दोघांच्याही चेहऱ्यावर हलकं समाधान दिसत होतं.
गेल्या कित्येक दिवसांचा ताण आज पहिल्यांदाच कमी झाला होता.

“चला,” विक्रम म्हणाला,
“आता घरी जाऊया.”

दोघे परत अनिकेतच्या घरी आले.
अनिकेत हॉलमध्येच थांबलेला होता.
त्यांना पाहताच त्याच्या नजरेत प्रश्न होता.

“सगळं ठीक आहे ना?” अनिकेतने विचारलं.

तृप्तीने हलकंसं हसून मान हलवली.
विक्रम पुढे आला.

“अनिकेत,” तो ठामपणे म्हणाला,
“आता पुढचं आपण नीट आणि सरळ करूया.
तू मामांशी बोलून घे.”

अनिकेतने मान हलवली.
“हो, मी आजच मामा म्हणजे तृप्तीच्या बाबा बोलवून घेईल.”

विक्रम थोडा थांबला, मग पुढे म्हणाला,
“आणि मी आज आई सोबत बोलेन.
ती तयार होईल, मला खात्री आहे.”

अनिकेतच्या चेहऱ्यावर हलकं समाधान आलं.
“ठीक आहे,” तो म्हणाला,
“आपण सगळे मिळून हे नीट करूया.”

तृप्ती शांतपणे उभी होती.
तिच्या मनात भीतीही होती, पण त्याहून जास्त विश्वास होता
विक्रमवर, अनिकेतवर…
आणि स्वतःच्या निर्णयावर.

त्या घरात आज पहिल्यांदाच
आशेचं वातावरण पसरलं होतं.


क्रमश

तृप्ती आणी विक्रमचे लग्न  जमेल का.?....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all