Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 51

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 51


आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.

अशोक म्हणाले,
आता सगळं ठरलेलं आहे तर,  अनिकेत, गुरुजींना बोलव.
आपण मुहूर्त काढून घेऊ.

हे ऐकताच मामा थोडे गोंधळले.

मामा  म्हणाले,
अशोकराव… पण ताईला काहीच सांगितलेलं नाही आहे.
तिला कसं कळणार?

अशोक हसत म्हणाले.

अशोक म्हणाले,
अरे, त्यात काय आहे! तू तिला फोन करून सांगून दे.

(खोडकरपणे)
“तृप्तीचं लग्न जमलं आहे,
आम्ही सगळे अनिकेतकडे जमलो आहोत.
तू येतेस का?”

हे बोलताच अशोक हसू लागले.  थोडा वेळ घरात हशा पसरला.

पण लगेचच सगळ्यांना आठवलं  घरातली गोष्ट घरातच राहिली पाहिजे.

सगळे शांत झाले.

मामा मात्र विचारात पडले.

मामा (मनात) म्हणाले,
ताईने काहीतरी केलं असेल का? तिला काही कल्पना असेल का? तिला न सांगता हे सगळं ठरवणं बरोबर आहे का?

ते थोडे अस्वस्थ झाले.

मामा म्हणाले,
तिला सांगावंच लागेल… नाहीतर नंतर गोंधळ होईल.

(थोडा थांबून)
आत्ताच तिला कॉल करून सांगू का?

सगळ्यांचे लक्ष मामांकडे गेलं.
घरात परत एकदा शांतता पसरली…
आणि पुढे काय होणार, याची उत्सुकता सगळ्यांच्या मनात निर्माण करणारा असेल,

मामांनी फोन हातात घेतला. थोडा वेळ नंबर पाहतच राहिले…
नंतर खोल श्वास घेऊन कॉल लावला.

फोन वाजला…

ललिता म्हणाल्या,
हॅलो… काय झालं? इतक्या वेळाने कॉल केलास?

मामांचा आवाज थोडा अडखळला.

मामा म्हणाले,
अगं… तुला एक बातमी द्यायची होती.

ललिता (संशयाने) म्हणाल्या
काय बातमी? अनिकेतबद्दल काही आहे का?

मामा क्षणभर थांबले.

मामा म्हणाले,
तृप्तीचं… तृप्तीचं लग्न ठरत आहे.

पलीकडे एकदम शांतता पसरली.

ललिता म्हणाल्या

काय?

मामा म्हणाले,
हो… मुलगा चांगला आहे.
घरचं वातावरणही छान आहे. आम्ही सगळे आत्ता अनिकेतकडेच आहोत.

ललिता (आवाज थरथरत) म्हणाल्या,
अनिकेतकडे? आणि मला काहीच सांगितलं नाही?

मामा  म्हणाले
अगं, सगळं अचानक झालं.  आता तुला सांगतोय ना…

ललिताचा आवाज अचानक बदलतो.

ललिता म्हणाल्या,
अचानक?
माझ्या भाची लग्न आणि मला अचानक कळतंय?

मामा काही बोलले नाही

ललिताच्या चेहऱ्यावर आधी अविश्वास…
आणि मग संताप दोघे पण  होते.

तिने फोन हातातून परत कानाला लावला,

ललिता (कडाडून) म्हणाले
थांबा जरा! हे काय चाललं आहे?

मामा म्हणाले
ललिता…  ताई

ललिता म्हणाल्या,
नको मला समजावणं!  माझ्या घरात बसून
माझ्या नाकावर टिच्चून तृप्तीचं लग्न ठरवताय?

मामा म्हणाले
ललिता ताई, शांत हो...

ललिता म्हणाल्या,
शांत? मी शांत कशी राहू?
अनिकेतने मला सोडून दिलं,  आता तृप्तीही हातातून जाणार?


मामा म्हणाले
ललिता ताई,  हे तुझ्याविरुद्ध नाही

ललिता (जोरात) म्हणाल्या
सगळं माझ्याविरुद्धच आहे! अनिकेतला माझ्या घरातून काढलं,
आता तृप्तीचं लग्न लावून तिलाही दूर करणार!

तिचा आवाज रडण्यात मिसळतो.

ललिता म्हणाल्या,
मला कुणीच विचारत नाही. माझं काहीच महत्त्व नाही!
फोन बंद पडतो.


---


मामा फोन हातात घेऊन स्तब्ध उभे राहतात.
ललिता मात्र अजूनही संतापात आहे.

ललिता (मनात) म्हणाली
हे एवढ्यावर थांबणार नाही… मी अजून शांत बसणार नाही.

घरात पुन्हा एकदा वादळाची चाहूल लागते…
मी अनिकेतकडे जाते.

---
ललिता अनिकेतकडे येते

दारावर जोरात बेल वाजते.

अनघा दार उघडायला जाते.

दार उघडताच समोर ललिता उभी असते. डोळे लाल झालेले, चेहरा रागाने ताठ झालेला होता.

अनघा (थोडी घाबरत) म्हणाली
आई… या ना.

ललिता एक शब्दही न बोलता आत शिरते.

हॉलमध्ये सगळेच स्तब्ध होतात.
अशोक, मामा, विक्रमची आई, तृप्ती…
सगळ्यांच्या नजरा ललितावर खिळतात.

ललिता (थेट अनिकेतकडे बघत) म्हणाल्या
काय चाललंय इथे?

अनिकेत पुढे येतो.

अनिकेत (शांत पण ठाम) म्हणाल्या,
आई, बस. आपण नीट बोलू.

ललिता (उपहासाने हसत) म्हणाल्या
नीट? माझ्या मागे सगळं ठरवून
आता मला नीट बोलायला सांगतोस?

ती सगळ्यांकडे एक नजर टाकते.

ललिता म्हणाल्या,
तृप्तीचं लग्न ठरत आहे म्हणे? आणि मला शेवटी कळतंय?

मामा (संयमाने) म्हणाले,
ललिता ताई, हे सगळ्यांच्या संमतीने ठरले आहे.

ललिता (चिडून) म्हणाल्या,
माझी संमती कुठे आहे? मी घरची नाही का?

ती थेट तृप्तीजवळ जाते.

ललिता म्हणाल्या
तू पण…
तुझ्या  आत्याला न विचारता लग्न ठरवतेस?

तृप्ती डोळे खाली घालते.

तृप्ती (हळू आवाजात) म्हणाली
आत्या, मी सांगणारच होते....

ललिता म्हणाल्या,
नको बोलू! तू नेहमीच दुसऱ्यांचं ऐकतेस.

ललिता मग अनघाकडे वळते.

ललिता (कडवटपणे) म्हणाल्या,
आणि तू… सगळ्यांचं घर फोडून  आता समाधानी आहेस का?

अनघाचे डोळे भरतात.

अनिकेत (जोरात) म्हणाला.
आई, थांब! अनघाला काही बोलायचं नाही.

ललिता म्हणाल्या,
का? ती तुझी बायको आहे म्हणून?

अनिकेत म्हणाला,
हो. आणि म्हणूनच  मी तिचा अपमान सहन करणार नाही.

हॉलमध्ये एकदम शांतता पसरते.

अशोक (कडक आवाजात) म्हणाले,
ललिता, आता पुरे. आज तृप्तीचा विषय आहे.

ललिता (डोळ्यांत पाणी) म्हणाल्या,
माझ्यासाठी काहीच नाही ना? माझं अस्तित्वच संपलंय आहे,

अनिकेत (थोडा भावूक) म्हणाला,
आई,
तू माझी आई आहेस… पण चुकीचं असेल तर  मी ते साथ देणार नाही.

ललिता थांबते.
तिचा राग हळूहळू वेदनेत बदलतो.

ती थकून खुर्चीवर बसते.

ललिता (हळू आवाजात) म्हणाल्या,
मला सगळ्यांनी एकटं केलं आहे…

अनघा पुढे येते.

अनघा म्हणाली,
आई, आम्ही तुम्हाला दूर करत नाही.
फक्त… चुकीचं थांबवायचं आहे.

ललिता तिच्याकडे बघते.
उत्तर देत नाही.


---


ललिता खुर्चीवर बसलेली असते.
एक क्षण शांततेचा…
आणि अचानक ती उभी राहते.

ललिता (कडक आवाजात) म्हणाल्या,
सगळं काही तूच केलंस ना?

सगळे चकित होऊन तिच्याकडे पाहतात.

अनघा (घाबरून) म्हणाली,  आई… काय म्हणताय?

ललिता म्हणाल्या,
माझा मुलगा माझ्यापासून तोडायचं काम तूच केलंस.

ती थेट अनघासमोर उभी राहते.

ललिता म्हणाल्या,
अनिकेत आधी माझं ऐकायचा. आज तो माझ्या डोळ्यांत डोळे घालून बोलतो. हे सगळं कोणामुळे?

अनघा (डोळ्यांत पाणी) म्हणाली,
मी काहीच केले नाही.

ललिता (थांबवून)  म्हणाल्या
नको स्पष्टीकरण!  तू आजारी असल्याचं नाटक,
आजोबांची सहानुभूती, आणि हळूहळू सगळ्यांना तुझ्या बाजूने वळवलंस.

हॉलमध्ये जड शांतता.

मोनिका (हळू आवाजात) म्हणाली,
आई, हे खूप चुकीचं आहे

ललिता (ओरडून) म्हणाल्या,
गप्प बस! माझ्या घरात मला बोलू दे.

ती परत अनघाकडे बोट दाखवते.

ललिता म्हणाल्या,
तुला काय हवं होतं? घर, नाव, माझा मुलगा?

अनघा थरथर कापते.

अनघा म्हणाली
मला फक्त माझं कुटुंब हवं होतं…

ललिता (उपहासाने) म्हणाल्या,
मग माझं काय? मी या घरात परकी आहे का?

अनिकेत पुढे येतो.

अनिकेत (ठाम) म्हणाला,
आई, थांब. अनघाने काहीच केलं नाही.

ललिता  म्हणाल्या,
तू पण तिच्या बाजूने बोलतोस? म्हणजे माझे सगळे आरोप खरेच आहेत.

अनघाचे अश्रू गालावर ओघळतात.

अनघा (कापऱ्या आवाजात) म्हणाली,
आई, मी कधीच तुम्हाला दुखवायचं ठरवलं नाही.
मी फक्त निभावायचा प्रयत्न करतेय.

ललिता म्हणाल्या
निभावणं?  तू मला हळूहळू घराबाहेर काढतेयस.

आजोबा काठी टेकत उभे राहतात.

आजोबा (ठाम आवाजात)  म्हणाले,
बस ललिता. अनघा दोषी नाही.

ललिता (कटू हसत) म्हणाल्या,
आजोबा पण तिच्याच बाजूने…  म्हणजे माझं खरंच काही उरलेलं नाही.

ती डोळे पुसते, पण चेहऱ्यावर अजूनही राग  होता.


---


आई, आता गप बस… सगळे इथेच आहेत.

अनिकेत ठाम आवाजात बोलला.
त्याची नजर थेट विक्रम आणि त्यांच्या आईकडे गेली.

अनिकेत म्हणाला,
आता गुरुजी येतील. आपण सगळं शांतपणे करूया.

हॉलमध्ये अजूनही तणाव होता.
कोणीच काही बोलत नव्हतं.

मोनिकाने अनघाच्या हाताला हलकेच धरलं.

मोनिका (हळू आवाजात) म्हणाली,
चल अनघा, आपण रूममध्ये जाऊ.

अनघा काही न बोलता उठली.
डोळ्यांत पाणी होतं, पण तिने स्वतःला सावरलं.
दोघी रूममध्ये निघून गेल्या.

हॉलमध्ये उरलेले सगळे जण अजूनही तापलेलेच होते.

तेवढ्यात अशोक पुढे आले.

अशोक (कडक पण संयमी आवाजात) म्हणाले,
ललिता, आता गप बस. मी आधीच बोललो आहे…
आपण हे सगळं नंतर बोलू.

ललिताने काही बोलायचा प्रयत्न केला, पण अशोक थांबवतो.

अशोक म्हणाले
तृप्ती तुझी भाची आहे.
तिची आई व्हायला जाऊ नकोस.

ते थोड  थांबता आणि पुढे म्हणतात,

अशोक म्हणाले, 
तिचे सख्खे वडील इथे आहेत.  ते बघत आहेत… समजत आहेत.

हॉलमध्ये शांतता पसरली.

ललिताचा राग हळूहळू ओसरत गेला.
ती खाली मान घालून बसली.

कोणाच्याही तोंडातून शब्द निघत नव्हता,
पण वातावरण थोडंसं निवळलं होतं.

आता सगळे गुरुजी येण्याची वाट पाहत होते…


---




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all