Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 52

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 52


तेवढ्यात बाहेर दारावरची बेल वाजली.

हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांचे लक्ष एकाच वेळी दाराकडे गेले.

अनिकेत म्हणाला,
मी बघतो.

अनिकेत उठून दार उघडतो.

अनिकेत म्हणाला
या गुरुजी… नमस्कार.

गुरुजी आत आले.
साधा पेहराव, शांत चेहरा आणि डोळ्यांत अनुभवाचं तेज.

सगळे उभे राहिले.

सगळे म्हणाले,
नमस्कार गुरुजी.

गुरुजींनी हसत हात जोडले.

गुरुजी म्हणाले
नमस्कार… सगळे बसा बसा.

अनघा आणि मोनिका रूममधून बाहेर येतात.
अनघा गुरुजींच्या पाया पडते.

गुरुजी (आशीर्वाद देत) म्हणाले,
सुखी राहा बाळा.

तृप्ती थोडी घाबरत पुढे येते.
तीही गुरुजींच्या पाया पडते.

गुरुजी म्हणाले,
देव तुझं भलं करो.

सगळे पुन्हा बसतात.

अशोक म्हणाले,
गुरुजी, आपण आज खास एका कामासाठी तुम्हाला बोलावलं आहे.

गुरुजी म्हणाले
हो, मला अनिकेतने थोडं सांगितलं आहे.
तृप्ती आणि विक्रम यांचा विषय आहे ना?

तृप्तीची नजर खाली जाते. विक्रम शांतपणे बसलेला.

गुरुजी म्हणाले,
मुलं एकमेकांना पसंत आहेत का?

विक्रम (ठामपणे) म्हणाला
हो गुरुजी.

तृप्ती (हळू आवाजात) म्हणाला
हो.

गुरुजी मान डोलावतात.

गुरुजी म्हणाले
मग आधी कुंडल्या पाहू.

ते आपली वही उघडतात.
थोडावेळ शांतता.

सगळे श्वास रोखून बसलेले.

ललिता अस्वस्थ होऊन हालचाल करते,
पण अशोक तिच्याकडे पाहताच ती गप्प बसते.

गुरुजी (हसत) म्हणाले,
कुंडल्या जुळत आहेत. छान योग आहे.

हॉलमध्ये हलकासा दिलासा पसरतो.

गुरुजी म्हणाले,
लग्नाचा मुहूर्तही लवकर आहे. घरात शुभ कार्य घडणार आहे.

तृप्तीच्या डोळ्यांत पाणी तरळतं.
विक्रमने हलकेच तिच्याकडे पाहिलं.

गुरुजी म्हणाले,
मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवा… घरात एकमत असेल, तरच सुख टिकतं.

गुरुजींची नजर थोडी वेळ ललितावर थांबते.

ललिता काही न बोलता खाली पाहते.

गुरुजी म्हणाले,
मग सांगा, मुहूर्त काढू का?

सगळे एकमेकांकडे पाहतात.

अशोक म्हणाले,
हो गुरुजी.

अनिकेत हलकासा श्वास सोडतो.
आज एक मोठा टप्पा पार पडलेला असतो.


---


गुरुजींनी वहीत थोडा वेळ पाहिलं.
तारीख, वेळ, ग्रहस्थिती नीट तपासली.
हॉलमध्ये पूर्ण शांतता होती.
जणू प्रत्येकाचा श्वासही थांबलेला.

गुरुजी म्हणाले,
एक शुभ मुहूर्त आला आहे…

सगळे कान देऊन ऐकू लागले.

गुरुजी म्हणाले,
येणाऱ्या पुढच्या महिन्यातील शुक्ल पक्षात, गुरुवारी
दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपासून १ वाजून १५ मिनिटांपर्यंत
हा लग्नाचा उत्तम मुहूर्त आहे.

तृप्तीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकत्र दिसतो.

गुरुजी म्हणाले,
हा मुहूर्त स्थैर्याचा आहे. एकमेकांना समजून घेण्याची, साथ देण्याची शक्ती देतो.

विक्रमने हळूच मान हलवली.

गुरुजी म्हणाले,
मुलीच्या आयुष्यात नवं पर्व सुरू होईल. सासर-माहेर दोन्हीकडून आधार मिळेल.

अशोक समाधानाने म्हणाले

अशोक म्हणाले
खूप छान गुरुजी.

गुरुजी म्हणाले,
लग्नाआधी फार उशीर नको. साधं, पण मनापासून करा.

गुरुजींनी वही बंद केली.

गुरुजी म्हणाले,
देवाची कृपा आहे. घरात वाद नको, शब्द जपा…
मग सगळं छान होईल.

गुरुजी उठले.

सगळे उभे राहिले.

तृप्ती पुन्हा एकदा गुरुजींच्या पाया पडते.

तृप्ती म्हणाले,
आशीर्वाद द्या गुरुजी.

गुरुजी (हसत) म्हणाले,
सुखी राहा बाळा.

त्या क्षणी
घरातल्या तणावाच्या जागी
हळूहळू नव्या सुरुवातीची हवा पसरायला लागते…


---


सगळं ठरल्यावर
अशोक ललिताला सोबत घेऊन घरी गेले. विक्रम आणि त्यांची आईही निघून गेले. आजोबाही त्यांच्या घरी परतले.

घरात आता शांतता होती…
पण ती शांतता प्रश्नांनी भरलेली होती.

हॉलमध्ये
तृप्ती, मामा, अनघा आणि मोनिका बसले होते.
अनिकेतही तिथेच होता.

थोडा वेळ गेला…
मामांनी अस्वस्थपणे श्वास घेतला.

“अनिकेत…”
ते गोंधळलेल्या आवाजात म्हणाले,
“ललिता ताई अशी का वागत आहे? काय झालं आहे नक्की?
कोण चूक, कोण बरोबर… मला काहीच समजत नाहीये.”

अनिकेत थोडा वेळ शांत राहिला. मग हळूच बोलायला सुरुवात केली.

“मामा…
आई अनघासोबत जसं वागली, ते चुकीचं होतं.”

सगळ्यांचं लक्ष अनिकेतकडे गेलं.

“अनघा गरोदर होती…
आणि त्या काळात आईने तिच्याकडून काम करून घेतलं.
तिला आराम दिला नाही.
तिला बोलणं, टोमणे… सगळं सहन करायला लागलं.”

मामांचा चेहरा उतरला.

“आणि त्यात…”
अनिकेतचा आवाज थोडा भरून आला,
“आपलं बाळ गेलं.”

क्षणभर पूर्ण शांतता.

मामा हळूच मान हलवत म्हणाले

“अजूनही आई अनघालाच दोष देते…
ऐकून घेत नाही, समजून घेत नाही.
आता ती मला माझी आई वाटत नाही.”

अनिकेत गंभीरपणे म्हणाला

“अनघाने आईची मनापासून सेवा केली.
आई काहीही बोलली, टोचून बोलली…nतरीही अनघा गप्प राहिली. एक शब्दही उलट बोलली नाही.”

मामांनी खोल उसासा घेतला.

“हो ना…”
ते हळू आवाजात म्हणाले,
“हे ऐकून मन खूप दुखतं.”

अनघा खाली मान घालून बसली होती.
मोनिकाने तिच्या हातावर हात ठेवला.
तृप्तीच्या डोळ्यात पाणी होतं.

त्या क्षणी
घरात एकच भावना होती

दुखावलेलं नातं…
आणि उशिरा उमगलेली सत्याची जाणीव.


---


मामा काही क्षण शांत बसले होते.
सगळ्यांचे बोलणे ऐकून त्यांचा चेहरा कठोर झाला होता.
डोळ्यात वेदना होत्या… पण आवाजात आता ठामपणा होता.

ते हळूच उभे राहिले.

“बस… आता पुरे.”
ते शांत पण ठाम आवाजात म्हणाले.

सगळे त्यांच्याकडे पाहू लागले.

“मी आजवर गप्प बसलो,
कारण मला वाटत होतं की घरातल्या गोष्टी घरातच मिटतील.
पण आज समजलं…
गप्प बसणं हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती.”

मामानी अनघाकडे पाहिलं.
क्षणभर थांबले.

“अनघा,
तू माझी मुलगी आहेस. आणि माझ्या मुलीवर अन्याय होत असेल आणि मी फक्त बघत बसलो,
तर मी मामा नाही.”

अनघाचे डोळे भरून आले.

मामा पुढे म्हणाले

“आजपासून एक गोष्ट स्पष्ट आहे
अनघावर कोणीही अन्याय करणार नाही.
शब्दानेसुद्धा नाही.”

त्यांनी अनिकेतकडे पाहिलं.

“अनिकेत,
तू तुझ्या बायकोसोबत ठाम उभा राहिलास, त्यासाठी मी तुझा आदर करतो. पण आता जबाबदारी फक्त तुझी नाही…
ती माझीही आहे.”

मग ते तृप्तीकडे वळले.

“तृप्तीचं लग्न ठरलं आहे,
आणि ते सन्मानानेच होणार. कोणाचं कटकारस्थान,
कोणाचं स्वार्थी मन या घरात चालणार नाही.”

मोनिकाने नकळत मान हलवली.

मामांचा आवाज अधिक ठाम झाला

“ललिता ताईला हे स्पष्ट सांगतो
अनघा दोषी नाही.
तिच्यावर बोट दाखवणं थांबवलं नाही, तर मी स्वतः उभा राहीन.”
ते थांबले.
गंभीर नजरेने सगळ्यांकडे पाहिलं.

“नाती टिकवायची असतील,
तर त्यात माणुसकी हवी.
नाहीतर रक्ताचं नातंसुद्धा तुटतं.”

घरात शांतता होती…
पण ही शांतता वेदनेची नव्हती.

ही होती
निर्णयाची.


---


अनिकेत हळूच मान खाली घालून बसला,

“बोलून काहीच फायदा नाही आहे मामा…”
त्यांचा आवाज थरथरत होता.

“आईला अनघा आवडतच नाही.
आणि म्हणूनच ती तिच्या मागे लागली आहे.”

ते खोल श्वास घेत म्हणाले

“माझ्या आयुष्यातून अनघाला काढून टाकायचं,
हेच आईच्या डोक्यात आहे.
तिचं सुख, तिचं दुःख,
तिचं अस्तित्व… कशाचाच विचार नाही.”

मामा स्तब्ध झाला.

अनिकेत पुढे म्हणाले

“मी समजावलं, विनवण्या केल्या,
कधी रागावलोही… पण आई बदलायला तयार नाही.”

त्यांचे डोळे पाणावले.

“आज मला सगळ्यात जास्त वेदना या गोष्टीची आहे
की माझ्याच आईमुळे माझ्या बायकोचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.”

अनघा काही बोलणार, तोच अनिकेत हात उचलून थांबवतात.

“नको बोलूस अनघा… तू खूप सहन केलंस.
आता सहन करायची वेळ नाही.”

ते सरळ उभे राहिले.

आवाजात आता हतबलता नव्हती…
तो निर्णयाचा आवाज होता.

“जर आईला अनघा मान्य नसेल, तर आता मला ठरवावं लागेल
आईची चूक झाकायची की बायकोचं आयुष्य वाचवायचं.”

क्षणभर शांतता.

मग ठामपणे

“आणि आज मी ठरवलं आहे.
अनघा माझ्या आयुष्यातून कुठेही जाणार नाही.
कोणी तिला बाहेर काढायचा प्रयत्न केला,
तर मी स्वतः पुढे उभा राहीन.”

अनिकेतच्या डोळ्यांत आदर दाटून आला.

अनघा पहिल्यांदाच मनापासून रडली
भीतीने नाही… आधार मिळाल्यामुळे.


---




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all