तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 53
“मामा, जाऊ दे ते आता… आज इथेच थांबा.
सगळे बोलून घेऊ,” अनिकेत शांतपणे म्हणाला.
मामा क्षणभर थांबले… मग मान हलवली.
“हों, चालेल,”
आवाजात थकवा होता, पण दिलासा ही होता.
आवाजात थकवा होता, पण दिलासा ही होता.
.....
अनघा स्वयंपाकघराकडे जात होती.
मामा हळूच तिच्यामागे आले.
मामा हळूच तिच्यामागे आले.
“अनघा…”
ती थांबली.
डोळ्यांत पाणी, पण चेहऱ्यावर नेहमीचं संयम होता.
डोळ्यांत पाणी, पण चेहऱ्यावर नेहमीचं संयम होता.
“आजपर्यंत तू जे सहन केलंस ना…”
मामांचा आवाज भरून आला,
“ते माझ्या नजरेआड गेलं, याची मला खूप लाज वाटते.”
मामांचा आवाज भरून आला,
“ते माझ्या नजरेआड गेलं, याची मला खूप लाज वाटते.”
अनघा पटकन म्हणाली
“नका मामा… तुमची चूक नाही आहे.”
“नाही,”
ते ठामपणे म्हणाले,
“मी गप्प बसलो, हीच माझी चूक आहे.”
ते ठामपणे म्हणाले,
“मी गप्प बसलो, हीच माझी चूक आहे.”
ते पुढे म्हणाले
“तुझं दुःख, तुझं बाळ… सगळं सहन करत राहिलीस.
कधी तक्रार नाही, कधी दोष नाही.”
कधी तक्रार नाही, कधी दोष नाही.”
अनघाचे अश्रू ओघळले.
“मला फक्त घरात शांतता हवी होती,”
ती हळूच म्हणाली,
“कोणी आपलंच आहे, हे वाटावं म्हणून…”
ती हळूच म्हणाली,
“कोणी आपलंच आहे, हे वाटावं म्हणून…”
मामा तिच्या डोक्यावर हात ठेवतात.
“आजपासून तू एकटी नाही आहेस.
मी आहे.
आणि आता मी गप्प बसणार नाही.”
मी आहे.
आणि आता मी गप्प बसणार नाही.”
अनघाने पहिल्यांदाच त्या हाताला घट्ट धरलं.
.....
थोड्यावेळाने तृप्ती आणि मोनिका बाहेर येतात.
“वहिनी, चला… आज तरी चेहरा हसवायचा,”
तृप्ती म्हणाली.
तृप्ती म्हणाली.
मोनिका खोडकर हसत म्हणाली
“हो, इतकं रडून चालणार नाही. आता आम्ही आलो आहोत ना!”
तीनही जणी सोफ्यावर बसल्या.
तृप्ती म्हणाली
“अनघा, आज सगळं इतकं गडबडीत झालं…
पण मला खात्री आहे, आता सगळं नीट होईल.”
पण मला खात्री आहे, आता सगळं नीट होईल.”
मोनिका लगेच
“आणि लग्नाच्या तयारीत तुम्ही दोघी माझ्या सोबत शॉपिंगला यायचं हे आधीच ठरलेलं आहे!”
अनघाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं.
“खूप दिवसांनी असं वाटतंय,” ती म्हणाली, “आपण खरंच कुटुंब आहोत.”
तृप्तीने तिचा हात धरला.
“हो वहिनी…
आणि कुटुंब एकमेकांसाठी उभं राहतं.”
आणि कुटुंब एकमेकांसाठी उभं राहतं.”
मोनिका मिश्कीलपणे म्हणाली
“आणि कधी कधी एकमेकांना हसायलाही लावते!”
तीनही जणी हसल्या.
आणि त्या हशामध्ये अनघाच्या मनावरचं ओझं थोडंसं हलकं झालं होते.
---
घरात पाऊल टाकताच ललिताने पाय आपटले.
“आधीच सांगितलं होतं मी!” ती चिडून म्हणाली,
“माझ्या डोक्यावरून सगळं ठरवायचं आणि मला फक्त कळवायचं!”
“माझ्या डोक्यावरून सगळं ठरवायचं आणि मला फक्त कळवायचं!”
अशोक शांतपणे दरवाजा बंद करतात.
“ललिता, आवाज कमी ठेव. शेजारी ऐकतील.” अशोक म्हणाले
“ऐकू दे!” ती खवळली,
“सगळ्यांना कळू दे. माझ्या घरात मला विचारायची गरजच नाही उरली!”
“सगळ्यांना कळू दे. माझ्या घरात मला विचारायची गरजच नाही उरली!”
ती हॉलमध्ये इकडून तिकडे फिरत होती.
“ती अनघा…”
नाव घेताच आवाज धारदार झाला, “ती माझ्या आयुष्यात आली आणि सगळं बिघडलं.”
नाव घेताच आवाज धारदार झाला, “ती माझ्या आयुष्यात आली आणि सगळं बिघडलं.”
अशोक थोडा कठोर झाले.
“थांब.
अनघाचं नाव घेऊ नको.”
अनघाचं नाव घेऊ नको.”
ललिता थबकली. क्षणभर शांत झाली.
पण पुढच्याच क्षणी तिच्या मनात विचारांची गर्दी झाली.
माझं ऐकणार कोण? माझी जागा कुठे आहे? सगळे तिच्या बाजूने… आणि मीच चुकीची?
ती खुर्चीवर बसली. हात थरथरत होते.
माझं ऐकणार कोण? माझी जागा कुठे आहे? सगळे तिच्या बाजूने… आणि मीच चुकीची?
ती खुर्चीवर बसली. हात थरथरत होते.
“अशोक…”
आवाज थोडासा मोडलेला, “माझं काही उरलेलं नाही का?”
आवाज थोडासा मोडलेला, “माझं काही उरलेलं नाही का?”
अशोक तिच्या समोर बसले.
“उरलेलं आहे,”
ते शांतपणे म्हणाले, “पण चुकीचं धरून बसलंस तर
सगळंच निसटेल.”
ते शांतपणे म्हणाले, “पण चुकीचं धरून बसलंस तर
सगळंच निसटेल.”
ललिता डोळे पुसते.
“मी आई आहे…” ती स्वतःलाच समजावत म्हणाली,
“माझं वाईट कसं असू शकतं?”
“माझं वाईट कसं असू शकतं?”
अशोक हळूच म्हणाले,
“आई असणं म्हणजे जखम देणं नाही. आधार देणं असतं.”
“आई असणं म्हणजे जखम देणं नाही. आधार देणं असतं.”
ललिता काहीच बोलत नाही.
हॉलमध्ये शांतता.
फक्त घड्याळाचा टिक-टिक आवाज.
फक्त घड्याळाचा टिक-टिक आवाज.
पण तिच्या मनात मात्र येत होते,
मी हरले आहे का?
की अजून काही बाकी आहे?
मी हरले आहे का?
की अजून काही बाकी आहे?
ती खिडकीतून बाहेर बघते.
अंधार दाटलेला.
अंधार दाटलेला.
आणि त्या अंधारात ललिताचं मन अजूनच अस्वस्थ होते…
---
घरात सगळे दिवे बंद. फक्त हॉलमध्ये छोटासा दिवा लुकलुकत होता.
भिंतीवर घड्याळाचं टिक… टिक… तेवढाच आवाज होता.
स्वयंपाकघरात भांडी ठेवलेली, जणू दिवसभराचा गोंधळ
तिथेच थांबलेला.
तिथेच थांबलेला.
अशोक बेडवर आडवे पडले होते. डोळे मिटलेले… पण झोप नाही.
ललिता खिडकीजवळ उभी. बाहेर रस्ता बघत होत्या..
वार्याने पडदा हलतो, आणि तिच्या मनात प्रश्न
सगळे माझ्याविरुद्ध का झाले?
मीच इतकी चुकीची आहे का?
मीच इतकी चुकीची आहे का?
ती हळूच बेडवर बसते.
अशोक काही बोलत नाहीत.
अशोक काही बोलत नाहीत.
त्या न बोललेल्या शांततेतच
खूप काही दडलेलं होते.
खूप काही दडलेलं होते.
ललिता उशी सरकवते.
डोळे मिटते… पण मन जागंच.
डोळे मिटते… पण मन जागंच.
तिच्या कानात अजूनही अनिकेतचे शब्द,
अशोकचा रोखठोक सूर,
आणि सगळ्यांचे शांत चेहरे होते…
अशोकचा रोखठोक सूर,
आणि सगळ्यांचे शांत चेहरे होते…
घर झोपलेलं होतं.
पण दोन मनं अजूनही अस्वस्थ जागी.
पण दोन मनं अजूनही अस्वस्थ जागी.
आणि त्या शांत रात्रीत घर शांत नव्हतं…
फक्त शब्द झोपले होते.
---
पहाटेचं कोवळं ऊन घरात अलगद शिरलं.
पडद्यामधून येणारा प्रकाश कालच्या रात्रीच्या
जड शांततेवर हळूच पांघरूण घालत होता.
जड शांततेवर हळूच पांघरूण घालत होता.
स्वयंपाकघरातून चहाचा मंद सुगंध पसरला.
भांड्यात उकळणाऱ्या चहासोबत
घरात पुन्हा एकदा जिवंतपणा आला.
भांड्यात उकळणाऱ्या चहासोबत
घरात पुन्हा एकदा जिवंतपणा आला.
अनघा लवकर उठली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता,
पण डोळ्यांत मात्र शांत समाधान.
पण डोळ्यांत मात्र शांत समाधान.
ती देवघरात दिवा लावते. जोडून हात…
डोळे मिटून फक्त एकच प्रार्थना करत होती..
डोळे मिटून फक्त एकच प्रार्थना करत होती..
आज सगळं नीट जावं…
तृप्ती आणि मोनिका हसत हसत बाहेर येतात.
कालच्या गोंधळाची सावली आजच्या सकाळी थोडी फिकी पडलेली होती.
कालच्या गोंधळाची सावली आजच्या सकाळी थोडी फिकी पडलेली होती.
“आज चहा खूप छान वास येतोय,”
मोनिका म्हणते.
मोनिका म्हणते.
तृप्ती हसते.
“आज सकाळच छान आहे ग… वाटतंय.”
“आज सकाळच छान आहे ग… वाटतंय.”
टेबलवर सगळे बसतात. बोलणं कमी,
पण हसणं जास्त होते.
पण हसणं जास्त होते.
अनिकेत पेपर हातात घेतो. वर न पाहताच म्हणतो,
“आज घर… जरा हलकं वाटतंय.”
“आज घर… जरा हलकं वाटतंय.”
अनघा काही बोलत नाही. फक्त हळूच हसते.
कधी कधी सगळ्या उत्तरांची गरज नसते…
कधी फक्त प्रसन्न सकाळ पुरेशी असते.
बरोबर बोलली, मामा कुठे गेले., अनिकेत म्हणाला..
आजोबांसोबत गार्डनमध्ये असतील, अनघा म्हणाली..
ओके..
---
सकाळची चाहूल घरात पसरली होती.
स्वयंपाकघरातून पोह्यांचा खमंग वास येत होता.
चहा उकळत होता…
आणि घरातली शांतता आता आपुलकीत बदलत होती.
तेवढ्यात दारावर हलकं टकटक झाली.
“मी बघते,”
मोनिका म्हणत दाराकडे गेली.
मोनिका म्हणत दाराकडे गेली.
दार उघडताच आजोबा, मामा आणि तृप्ती उभे होते.
“अरे वा! थेट नाश्त्यालाच आलात वाटतं,”
मोनिका हसत म्हणाली.
मोनिका हसत म्हणाली.
“हं… सुगंध इतका छान येत होता
की थांबवेना,”
आजोबा मिश्किलपणे म्हणाले.
की थांबवेना,”
आजोबा मिश्किलपणे म्हणाले.
अनघा पुढे आली.
“या ना, आत या… नाश्ता तयारच आहे.”
“या ना, आत या… नाश्ता तयारच आहे.”
मामा तिच्याकडे पाहून हसले.
“तुझ्या हातचा नाश्ता चुकवायचा नाही,
म्हणूनच आलो लवकर”
“तुझ्या हातचा नाश्ता चुकवायचा नाही,
म्हणूनच आलो लवकर”
अनघा थोडी लाजली.
तृप्ती अनघाच्या जवळ आली. “आज खूप हलकं वाटतंय ग…
कालचा दिवस जड होता.”
कालचा दिवस जड होता.”
“हो,”
अनघा हळूच म्हणाली, “पण आजची सकाळ छान आहे.”
अनघा हळूच म्हणाली, “पण आजची सकाळ छान आहे.”
सगळे टेबलाभोवती बसले.
अनिकेत प्लेट वाढत म्हणाला,
“आज नाश्त्याला फक्त पदार्थ नाहीत… आज घरात समाधान आहे.”
“आज नाश्त्याला फक्त पदार्थ नाहीत… आज घरात समाधान आहे.”
आजोबा मान हलवत म्हणाले,
“घर असं भरलेलं असलं की देवही खूश असतो.”
“घर असं भरलेलं असलं की देवही खूश असतो.”
हसणं, हलकं बोलणं, कपात उडणारी वाफ…
कालचा तणाव आजच्या नाश्त्यात
हळूहळू विरघळत होता.
हळूहळू विरघळत होता.
---
अशोक सकाळीच अनिकेतकडे आले. ललिताला त्यांनी काही विचारले नाही…
ना सांगितले, ना थांबवले. काल जे घडलं, त्यानंतर
काही प्रश्नांना शब्दांची गरज नव्हती.
घरात पाऊल टाकताच नाश्त्याचा वास येत होता.
पण अशोकच्या मनात आज नाश्ता नव्हता. आज पुढे काय होईल ते होते,
पण अशोकच्या मनात आज नाश्ता नव्हता. आज पुढे काय होईल ते होते,
मामा आज घरी निघून जातील, हे अशोकांना माहीत होतं.
म्हणूनच ते सकाळी आले होते.
सगळं अर्धवट ठेवून कोणी जावं, असं त्यांना नव्हतं.
म्हणूनच ते सकाळी आले होते.
सगळं अर्धवट ठेवून कोणी जावं, असं त्यांना नव्हतं.
अनिकेत पुढे आला. “बाबा… लवकर आलात?”
“हं,”
अशोक म्हणाले,
“काल गोंधळात काहीच नीट बोलता आलं नाही. आज बोलून घेऊया.”
अशोक म्हणाले,
“काल गोंधळात काहीच नीट बोलता आलं नाही. आज बोलून घेऊया.”
मामा उठून उभे राहिले. “मी आज निघणारच होतो…”
“नाही,”
अशोक ठामपणे म्हणाले,
“आधी पुढचं ठरवूया. तृप्तीचा विषय आहे… अर्धवट ठेवायचा नाही.”
अशोक ठामपणे म्हणाले,
“आधी पुढचं ठरवूया. तृप्तीचा विषय आहे… अर्धवट ठेवायचा नाही.”
मामा थोडे शांत झाले. त्यांनी मान हलवली.
अशोक पुढे म्हणाले, “विक्रमच्या आईला भेटायचं आहे.
काल सगळेच गोंधळलेलो होतो. आज शांतपणे बोलायला हवं.”
काल सगळेच गोंधळलेलो होतो. आज शांतपणे बोलायला हवं.”
अनघा बाजूला उभी होती.
ती काही बोलली नाही. पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी आशा दिसत होती.
ती काही बोलली नाही. पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी आशा दिसत होती.
तृप्तीने हळूच विचारले, “आजच भेटणार का?”
“हो,”
अशोक म्हणाले,
“आजच. नाती जेव्हा जुळतात,
तेव्हा विलंब नको.”
अशोक म्हणाले,
“आजच. नाती जेव्हा जुळतात,
तेव्हा विलंब नको.”
घरात पुन्हा एकदा
निर्णयांची हवा भरली. कालचा गोंधळ मागे पडत होता…
आणि आजचा दिवस नव्या सुरुवातीची दिशा घेत होता.
निर्णयांची हवा भरली. कालचा गोंधळ मागे पडत होता…
आणि आजचा दिवस नव्या सुरुवातीची दिशा घेत होता.
---
क्रमश
ललिता काय विचार करत असतील, अजून काही नवीन गोधळ घालतील का?....
ललिता काय विचार करत असतील, अजून काही नवीन गोधळ घालतील का?....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा