Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 57

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 57



लग्नाची खरेदी मस्त रंगात चालू होती.  दुकानात साड्यांचे ढीग,
कपड्यांचे रंग, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता.

तृप्ती साड्या बघत होती,
अनघा बाजूला उभी राहून सगळ्यांना मदत करत होती.

“अनघा, ही साडी घे,”
मामा म्हणाले आणि थेट दुकानदाराला दाखवली.

“आहो मामा, माझ्याकडे खूप आहेत,” अनघा हसत म्हणाली.

“नको काही नको. आज नकार नाही चालणार,”
मामा ठामपणे म्हणाले.

अनघा काही बोलायच्या आतच साडी पॅक झाली.

तेवढ्यात अशोक पुढे आले.
“ही पण बघ… अनघासाठीच योग्य आहे.”

अनघा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली.
“तुम्ही पण?”

अशोक हसले.
“लग्न घरात आहे, माझ्या सुनेचा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.”

अनघाच्या डोळ्यांत आनंद होता.

तिने लगेच अनिकेतकडे पाहिलं.
“एक काम करशील?”

“सांग,”
अनिकेत म्हणाला.

“आईसाठी पण साडी घे. त्यांना आवडेल अशी.” अनघा म्हणाली.

अनिकेत क्षणभर थांबला,
मग मान हलवली. “हो… घेऊ.”

त्या एका होकारात अनघाचं मन थोडं हलकं झालं.

अनिकेतने ललितासाठी साडी घेतली..

यानंतर
कपडे, दागिने… एकामागोमाग एक खरेदी पूर्ण होत गेली.
हातात पिशव्या वाढत होत्या आणि चेहऱ्यावर हसूही होते.

खरेदी आटोपल्यावर सगळे मस्त हॉस्टेलमध्ये जेवायला गेले.

गरम जेवण, हलकी गप्पा, हसणं-खिदळणं…

आज कुणालाच घाई नव्हती.

“आजचा दिवस लक्षात राहील,” मोनिका म्हणाली.

“लग्नाच्या आधी असे क्षणच खरे असतात,”
मामा शांतपणे म्हणाले.

संध्याकाळी सगळे समाधानाने घरी निघाले.

हातात पिशव्या होत्या, मनात आनंद होता
आणि घरात येणाऱ्या नव्या नात्यांची गोड चाहूल सगळ्यांना जाणवत होती.


---

रात्री उशिरा सगळे घरी परतले. दिवसभराच्या धावपळीनंतर
घरात शांतता पसरली होती.

अनघाने पिशव्या टेबलावर ठेवल्या आणि सगळ्यांसाठी पाणी आणलं.

मामा खुर्चीत बसत म्हणाले, “आजचा दिवस चांगलाच गेला ना?”

अशोक मान हलवत म्हणाले,
“हो… सगळं छान झालं. खरेदी पण व्यवस्थित झाली.”

मोनिका हसत म्हणाली,
“तृप्ती तर खूप खुश दिसत होती.”

तृप्ती थोडी लाजत म्हणाली,
“सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं… मला काहीच कमी वाटत नाही.”

आजोबा तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाल्या,
“हे तर सुरुवात आहे बाळा. आता सगळे छान होणार.”

तृप्तीचे डोळे ओलावले. ती काही बोलू शकली नाही,
फक्त हळूच मान झुकवली.

अनघा शांतपणे सगळं ऐकत होती.
मामा तिच्याकडे पाहून म्हणाले,
“अनघा, आज तुला साडी जबरदस्तीने घेतली, राग नाही ना?”

अनघा हसत म्हणाली,
“राग कसला मामा? आज तुमचं प्रेम जास्त वाटलं.”

अशोक म्हणाले,
“हे असेच दिवस पुन्हा पुन्हा येऊ देत.”

अनिकेत तेवढ्यात म्हणाला,
“उद्या जरा आराम करूया. सगळेच दमलो आहोत.”

मोनिका उठत म्हणाली,
“हो, चला मग. सकाळी पुन्हा नवीन सुरुवात.”

एकेक करून सगळे रूममध्ये निघून गेले.

घर शांत झालं होतं, पण त्या शांततेत आनंद, अपेक्षा आणि येणाऱ्या नव्या आयुष्याच गोड चाहूल भरलेली होती.


---

तृप्ती हळूच आपल्या खोलीतून बाहेर आली. हातात एक छोटी पिशवी होती.

ती आजोबांच्या खोलीपाशी थांबली. दार हलकेच ठोठावलं.

“या बाळ,” आजोबांचा शांत आवाज आला.

तृप्ती आत गेली.
थोडीशी संकोचलेली… पण डोळ्यांत प्रेम होतं.

“आजोबा…”
ती म्हणाली आणि पिशवी पुढे केली.

आजोबांनी आश्चर्याने पाहिलं. “हे काय आहे?”

तृप्ती हसत म्हणाली,
“आज मार्केटमध्ये गेले होते ना…
मला वाटलं… तुमच्यासाठी पण काहीतरी घ्यावं.” " तेव्हा तुम्ही आले, तेव्हा आपण गप्पा मारत होतो. म्हणून देता आले नाही. "

आजोबांनी पिशवी उघडली. आत नीट घडी घातलेले कपडे होते.

क्षणभर ते गप्प झाले.

“बाळ… माझ्यासाठी?” त्यांचा आवाज थोडा भरून आला.

तृप्ती मान हलवत म्हणाली,
“हो आजोबा.
तुम्ही सगळ्यांसाठी इतकं करता… माझं लग्न… माझं स्वप्न…
मला वाटलं, तुमच्यासाठी काहीतरी असायलाच हवं.”

आजोबांनी तिला जवळ घेतलं. डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

“तू या घरात आलीस, हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे,” ते म्हणाले.

तृप्तीचे डोळे ओलावले. ती काहीच बोलू शकली नाही.

बाहेर उभी असलेली अनघा हे सगळं पाहत होती.
तिच्या ओठांवर हसू आलं आणि डोळ्यांत अभिमान होता.

त्या क्षणी नात्यांना नाव न देता फक्त मनाने स्वीकारलं गेलं होतं.


---

आजोबा खुर्चीत बसून कपडे हातात धरून पाहत होते. डोळ्यांत वेगळंच समाधान होतं.

तेवढ्यात अनघा दारात उभी होती. ती आत आली.

“काय पाहताय एवढं लक्ष देऊन?” ती हसत विचारते.

आजोबा हळूच म्हणाले, “आज तृप्तीने मला कपडे दिले.”

अनघा थोडी आश्चर्यचकित झाली. “खरंच? तुमच्यासाठी?”

आजोबा मान हलवत म्हणाले,
“हो गं…
माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणी माझा विचार करून काही घेतलं.”

अनघा त्यांच्या शेजारी बसली. “ती खूप प्रेमळ आहे आजोबा.”

आजोबांचा आवाज थोडा भरून आला.
“प्रेमळ नाही गं… ती समजूतदार आहे. नातं निभावायला शिकलेली.”

अनघा हळूच म्हणाली,
“मला भीती वाटत होती आजोबा… तृप्ती कशी असेल, ती खूप छान आहे."


आजोबा तिच्याकडे पाहत म्हणाले,
“अनघा, घरात माणसं मोठी नसतात…
मन मोठं असलं की घर चालतं.”

अनघाचे डोळे ओलावले.

“आज तृप्तीने ते सिद्ध केलं,” आजोबा म्हणाले.

अनघाने आजोबांचा हात धरला. “मग माझी भीती आज संपली,” ती हसत म्हणाली.

आजोबा हसले. “आमच्या सगळ्यांचीच.”

खोलीत शांतता होती… पण त्या शांततेत नात्यांचा गोड आवाज होता.


---

अनघा तृप्तीच्या खोलीच्या दारात उभी होती. तृप्ती कपडे ठेवत होती.

“तृप्ती…” अनघाने हळूच आवाज दिला.

तृप्ती वळून हसली. “या ना वहिनी.”

अनघा आत आली. क्षणभर शांतता होती.

“आजोबांसाठी कपडे घेतलेस… ते खूप भावले त्यांना,” अनघा म्हणाली.

तृप्ती थोडी गोंधळली.
“अगं त्यात काय आहे… ते घरातले आहेत.”

अनघा तिच्याकडे नीट पाहत म्हणाली,
“पण प्रत्येकाला ‘घरातलं’ म्हणायला
मन मोठं लागतं.”

तृप्ती खाली पाहत म्हणाली,
“मी या घरात आलेय ना… मग सगळ्यांना माझं मानलं पाहिजे.
बाबा जसं शिकवले…”

अनघाचा गळा थोडा भरून आला. “मला भीती वाटत होती तृप्ती… आपलं नातं कसं असेल, तू मला समजून घेशील का…”

तृप्ती लगेच पुढे आली. तिने अनघाचा हात धरला.

“वहिनी, तुम्ही मला स्वीकारलंय हेच माझ्यासाठी खूप आहे.
मी कधीही तुमच्याशी परकी राहू शकत नाही.”

अनघाच्या डोळ्यात पाणी आलं.
“आज मला नणंद नाही… बहीण मिळाली.”

तृप्ती हसली. “आणि मला छान वहिनी मिळाली.”

दोघी एकमेकींच्या मिठीत गेल्या.

खोलीत कुणी काही बोललं नाही…
पण त्या मिठीत नातं घट्ट झालं होतं.


---


“आता खूप उशीर झाला आहे. सगळे झोपून घ्या,” अशोक शांत आवाजात म्हणाले. ( उशीर झाला म्हणून ते अनिकेतकडे राहून गेले )

“दिवसभर फिरून दमले असाल. आराम करा. मी पण आता झोपतो.”

सगळेच त्यांच्या आवाजाकडे पाहत होते.
त्या बोलण्यात काळजी होती… आणि आपुलकीही.

“गुडनाईट ,” एकामागून एक सगळ्यांनी म्हटलं.

अशोकनी हलकेच हसत मान हलवली.
“गुडनाईट… नीट झोपा.”

---


आजोबा घरी आले. घरात दिवा मंद प्रकाश देत होता.
आजूबाजूला शांतता… जणू दिवसाचा सगळा गोंगाट दाराबाहेरच राहिला होता.

काठी एका बाजूला ठेवत ते हळूच खुर्चीत बसले.

डोळे मिटले.

आजचा दिवस डोळ्यांसमोर आला… घरभरची लगबग,
हसरे चेहरे, लहानसहान भांडणं आणि त्याहून जास्त आपुलकी.

“सगळे किती चांगले आहेत…” आजोबा हळूच स्वतःशीच पुटपुटले.

त्या शब्दांत तक्रार नव्हती, अपेक्षा नव्हत्या… फक्त समाधान होतं.

त्यांनी देवापुढे हात जोडले. “देवा, असंच सगळ्यांना एकत्र ठेव.
सुखात ठेव.”

दिवा बंद केला. पलंगावर आडवे झाले.

ओठांवर हलकं हसू होतं… मन शांत होतं. आणि झोप हळूच त्यांच्यावर अलगद उतरली.


---



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all