Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 60

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 60


आजोबा ऑफिसमध्ये शिरल्यापासून सगळं बारकाईने पाहत होते.
कर्मचाऱ्यांची लगबग, फाईल्सचा आवाज, फोनची रिंग… सगळीकडे कामाचं वातावरण होते

तेवढ्यात रोनकची नजर आजोबांवर गेली.

तो लगेच त्यांच्या दिशेने आला.

“अरे आजोबा! कसे आहात? तुम्ही खूप दिवसांनी ऑफिसला आलात.” त्याच्या आवाजात आपुलकी होती.

आजोबा हलकंसं हसले.
“हो रे… म्हटलं जरा पाहावं, सगळं कसं चाललंय ते.”

मग अनघाकडे वळून म्हणाले,
“ही अनघा… असिस्टंट मॅनेजर. मी तुला मागे बोललो होतो ना तिच्याबद्दल.”

रोनकने मान डोलावली.
“हो, आठवतंय मला… ”

अनघा थोडी लाजली.

“चला, केबिनमध्ये जाऊन बोलू,” रोनक म्हणाला.

तिघेही त्याच्या केबिनमध्ये गेले.
रोनकने आदराने खुर्ची पुढे करत आजोबांना बसवलं.

“तुम्ही बसा आधी.”

आजोबा बसले, आणि दोघांकडे पाहत म्हणाले,
“तुम्हा दोघांना एकत्र काम करताना बघून बरं  वाटेल, ऑफिसपेक्षा घरच्यासारखं वाटतंय इथे.”

क्षणभर सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.
तो क्षण फक्त कामाचा नव्हता… विश्वासाचा, नात्याचा आणि नव्या सुरुवातीचा होता.


---


“आजोबा, आधी बसा आरामात,” तो काळजीने म्हणाला.

रोनक त्यांच्या शेजारी बसला.
“खरंच… तुम्ही खूप दिवसांनी आलात. तब्येत ठीक आहे ना? आम्ही सगळे विचारत होतो.”, " तुम्ही घरी पण  येत नाही.  आई बाबा पण  तुमची आठवण काढतात. "

आजोबांनी खोल श्वास घेतला.
“वय झालं रे… थोडं बरं नव्हतं. पण घरी बसून कंटाळा आला. ऑफिसला येऊन  बघून, … इथली माणसं म्हणजे माझं दुसरं कुटुंबच.”,  अनघाला घेऊन यायचे होते.  आजोबा म्हणाले.

रोनकच्या डोळ्यांत आपुलकी चमकली.
“तुमच्याशिवाय ऑफिस रिकामं वाटत होतं.”

क्षणभर शांतता पसरली.

आजोबा अनघाकडे वळले.
“रोनक खूप हट्टी आहे कामाच्या बाबतीत. पण मनाने खूप चांगला आहे. म्हणूनच तुला सांगितलं होतं त्याच्याबद्दल.”

अनघा हलकंसं हसली.
“मला आधीच कळलंय आजोबा… सगळ्यांची काळजी  घेताना दिसलें.”

नंतर ते थोडं बोलतात.. 

रोनकने फाईल्सचा एक छोटासा ढीग टेबलावर ठेवला.

“अनघा, आधी रिलॅक्स… घाई काहीच नाही. हळूहळू सगळं समजून घे. आज फक्त ओव्हरव्ह्यू देतो,” तो शांत आवाजात म्हणाला.

अनघा थोडी टेन्शनमध्ये होती.
नवीन जागा… नवीन लोक… पण मनात एक उत्सुकताही होती.  काही तरी नवीन  करायला मिळेल.

“हो… चालेल,” ती हलकंसं हसली.

रोनक कॉम्प्युटर स्क्रीन तिच्याकडे वळवत म्हणाला,
“हे बघ, आपलं डेली रिपोर्टिंग इथून होतं. हा क्लायंट डेटा, हा स्टाफ शेड्यूल… आणि काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट मला कॉल कर. ‘सर’ वगैरे काही नाही, फक्त रोनक.”

“ठीक आहे… रोनक,” ती म्हणाली. नाव घेताना तिलाच थोडं वेगळं वाटलं.

तो हसला. “बस्स! आता जमेल.”

आजोबा कोपऱ्यातल्या खुर्चीत बसून सगळं पाहत होते.
दोघं कसं शांतपणे बोलत होते, एकमेकांना समजून घेत होते… त्यांना मनातून बरं वाटलं.

“ रोनक खूप समजूतदार आहे,” त्यांनी मनात म्हटलं.

थोड्या वेळाने रोनक उठला.
“चल, तुला तुझी केबिन दाखवतो.”

“माझी… केबिन?” अनघा आश्चर्याने.

“हो मॅडम,” तो हसत म्हणाला, “असिस्टंट मॅनेजर आहेस तू. टेबल-खुर्चीवर कसं चालेल?”

ती त्याच्या मागे गेली.

काचेतली छोटी पण छान केबिन. टेबल, कॉम्प्युटर, फाईल्स, खिडकीतून येणारा उजेड… अगदी व्यवस्थित अशी होती 

“ही तुझी जागा,” रोनक म्हणाला.

अनघाने हळूच टेबलला हात लावला.
जणू काही स्वप्नच होतं.

“थँक यू… खरंच,” तिच्या डोळ्यांत हलकंसं पाणी दाटलं.

“अरे, इतकं इमोशनल होऊ नकोस. पहिल्याच दिवशी रडलीस तर उद्या काय करशील?” तो चिडवत म्हणाला.

ती हसली.
“रडत नाहीये… फक्त… खूप दिवसांनी स्वतःसाठी काहीतरी करतेय असं वाटतंय.”

बाहेरून आजोबा हे सगळं पाहत होते.
त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू.

“माझी मुलगी परत उभी राहतेय…” त्यांनी मनात म्हटलं.

ते शांतपणे देवाला हात जोडतात.
“आता तिचं आयुष्य असंच आनंदात जावो…”

ऑफिसचा पहिला दिवस…
पण अनघासाठी तो एका नवीन सुरुवातीचा दिवस होता.


आजोबा खुर्चीत शांतपणे बसले होते.
अनघा थोडी संकोचून त्यांच्या समोर उभी होती.

आजोबा हलकंसं हसले.
“बस ना ग, एवढी का घाबरतेस? मी काही बॉस नाही तुझा.”

अनघा लाजत बसली.
“नाही आजोबा… पहिलाच दिवस आहे ना… थोडं टेन्शन येतंय.”

“टेन्शन?” आजोबा हसले.
“कामाला घाबरायचं नसतं. काम आपलं मित्र असतं. मन लावून केलंस की तेच तुला पुढे नेतं.”

अनघा मान हलवत म्हणाली,
“मी प्रयत्न करेन… तुमचा विश्वास कमी पडू देणार नाही.”

आजोबा तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले,
“विश्वास तर आधीच आहे म्हणून तुला इथे आणलं. नाहीतर मी कुणासाठी शब्द टाकत नाही.”

अनघाच्या डोळ्यांत चमक आली.
“खरंच…?”

“हो ग. रोनक चांगला मुलगा आहे. पण त्याला साथ देणारी माणसं हवीत. तू त्याची ताकद बन. ऑफिस म्हणजे फक्त काम नाही… कुटुंब असतं.”

ती हसली.
“मग तुम्ही माझे ऑफिसचे आजोबा… चालेल ना?”

आजोबा हसत म्हणाले,
“नक्की! आणि काही अडचण आली की थेट माझ्याकडे ये. एकटी पडू देणार नाही तुला.”

अनघाच्या मनातला सगळा ताण गेला.
तिला वाटलं…
आज ऑफिसमध्ये जॉब नाही, एक आधार मिळाला आहे.


---

अनघा शांतपणे तिच्या टेबलावर बसली आणि कामाला लागली.
फाईल्स उघडून एकेक कागद तपासत होती…
कधी कॉम्प्युटरवर टायपिंग, कधी फोनवर स्टाफशी बोलणं…

तिच्या चेहऱ्यावर एकाग्रता स्पष्ट दिसत होती.

आजोबा मात्र समोरच्या खुर्चीत बसून तिला निरखून बघत होते.

त्यांच्या नजरेत अभिमान होता… आणि मायेची ओलही.

मनातल्या मनात ते म्हणाले

"ही मुलगी खरंच सोनं आहे…
घर इतकं छान सांभाळते… सगळ्यांची काळजी घेते…
आता ऑफिसची जबाबदारीसुद्धा तितक्याच मनापासून पार पाडतेय…

देवा, हिला आता कोणताच त्रास नको…
तिच्या आयुष्यात फक्त आनंद असू दे…
ती नेहमी अशीच हसत राहो…"

अनघाने वर पाहिलं तर आजोबा तिच्याकडे प्रेमाने बघताना दिसले.

ती हलकंसं हसली.

त्या एका हास्यातच आजोबांना समाधान मिळालं…

जणू त्यांचं मन म्हणालं
"माझी नात मजबूत आहे… आणि खुश आहे… बस, मला आणखी काय हवं?"


---
आज अनघाने दिवसभर मन लावून काम केलं होतं.
फाईल्स, मेल्स, मीटिंग्स… सगळं ती इतक्या जबाबदारीने सांभाळत होती की जणू ती इथे खूप वर्षांपासून काम करतेय असं वाटत होतं.

रोनक अधूनमधून तिच्याकडे पाहत होता.
त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं.

“खरंच आजोबांनी योग्य व्यक्ती निवडली आहे…” तो मनात म्हणाला.

हळूहळू संध्याकाळ झाली.
घड्याळाने ऑफिस सुटायची वेळ दाखवली.

अनघाने शेवटची फाईल सेव केली…
लॅपटॉप शांतपणे बंद केला…
टेबल नीट लावलं.

तेवढ्यात रोनक केबिनच्या दाराशी आला.

“काय अनघा, पहिला दिवस कसा गेला?” तो हसत म्हणाला.

अनघा हलकंसं हसली.
“खूप छान… थोडी टेन्शन होती, पण तुम्ही सगळं नीट समजावलं… त्यामुळे सोपं वाटलं.”

“गुड. असंच काम करत रहा. मला खात्री आहे तू खूप पुढे जाशील.”

“थँक यू, सर.”

आजोबा दूरून सगळं बघत होते.
त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता.

ते जवळ आले.

“चल ग बाळा… घरी जाऊया. खूप काम केलंस आज.”

अनघा प्रेमाने म्हणाली,
“हो आजोबा… चला.”

तिघांनी ऑफिस केबिन बंद केली. रोनकने हात हलवत बाय केलं.

बाहेर हलकीशी संध्याकाळची हवा वाहत होती.
आजोबा आणि अनघा शांतपणे एकत्र चालत होते…

आजोबांच्या मनात फक्त एकच विचार
‘माझी अनघा किती मजबूत आहे… देव तिला नेहमी आनंदी ठेव.’


---


क्रमश


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all