तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 61
अनघा आणि आजोबा घरी आले.
दिवसभराच्या कामामुळे दोघेही थोडे दमलेले होते, पण चेहऱ्यावर समाधान होतं.
दिवसभराच्या कामामुळे दोघेही थोडे दमलेले होते, पण चेहऱ्यावर समाधान होतं.
आजोबा हसत म्हणाले,
“अनघा, मी जरा फ्रेश होऊन येतो बरं का…”
“अनघा, मी जरा फ्रेश होऊन येतो बरं का…”
“हो आजोबा…” ती हलकंसं हसत म्हणाली.
आजोबा त्यांच्या खोलीत गेले.
अनघा तिच्या रूममध्ये गेली.
केस मोकळे केले… चेहऱ्यावर पाणी मारलं… कपडे बदलले.
थोडावेळ बेडवर बसली आणि खोल श्वास घेतला.
केस मोकळे केले… चेहऱ्यावर पाणी मारलं… कपडे बदलले.
थोडावेळ बेडवर बसली आणि खोल श्वास घेतला.
“पहिला दिवस… आणि काम नवीन…” ती मनातच म्हणाली.
तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली.
अनिकेत ऑफिसमधून आला होता.
तो आत येताच सरळ तिच्याजवळ आला.
त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती.
त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती.
“काय मॅडम… आजचा पहिला दिवस कसा गेला?”
तो चिडवत म्हणाला.
“काम करायला मजा आली का? आणि आजोबांचा पुतण्या… तो भेटला का?”
तो चिडवत म्हणाला.
“काम करायला मजा आली का? आणि आजोबांचा पुतण्या… तो भेटला का?”
अनघा हसली.
“ऑफिस खूप छान आहे… सगळं व्यवस्थित आहे.
आणि हो… तो भेटला. रोनक… खूप चांगला आहे.
काम खूप नीट समजावून सांगितलं त्याने.” ती म्हणाली.
आणि हो… तो भेटला. रोनक… खूप चांगला आहे.
काम खूप नीट समजावून सांगितलं त्याने.” ती म्हणाली.
“ओह्हो… म्हणजे impress झालीस वाटतं,” अनिकेत मिश्किलपणे म्हणाला.
“असं काही नाही रे…” ती त्याला हलकासा धक्का देत म्हणाली.
“फक्त व्यावसायिक आहे तो.” " अनिकेत तू काय बोलत आहे?, तिथे काम करायला जाणार आहे. "
“फक्त व्यावसायिक आहे तो.” " अनिकेत तू काय बोलत आहे?, तिथे काम करायला जाणार आहे. "
अनिकेत पुन्हा हसला.
“तुला आवडलं ना सगळं? आजोबा दिवसभर तुझ्याजवळच होते ना?”
“तुला आवडलं ना सगळं? आजोबा दिवसभर तुझ्याजवळच होते ना?”
“हो… होते ना,” ती प्रेमाने म्हणाली,
“मला इतकं comfortable वाटलं… जसं घरीच आहे.”
“मला इतकं comfortable वाटलं… जसं घरीच आहे.”
अनिकेत तिच्याकडे बघत म्हणाला,
“मला माहिती होतं… तू कुठेही गेलीस ना, तिथे सगळं perfect करून टाकशील.”
“मला माहिती होतं… तू कुठेही गेलीस ना, तिथे सगळं perfect करून टाकशील.”
अनघाच्या चेहऱ्यावर हलकीशी लाजरी स्माईल उमटली.
त्या संध्याकाळी घरात एक वेगळीच शांतता आणि समाधान होतं…
अनघाच्या आयुष्यातला एक नवीन अध्याय छानपणे सुरू झाला होता.
अनघाच्या आयुष्यातला एक नवीन अध्याय छानपणे सुरू झाला होता.
---
अनघा आणि अनिकेत बोलत बसले होते.
दोघंही हसत-गप्पा मारत होते.
दोघंही हसत-गप्पा मारत होते.
तेवढ्यात दरवाज्यावर हलकासा ठोका पडला.
टक…टक…
“येतोय…” अनिकेत म्हणाला.
दरवाजा उघडला तर आजोबा उभे होते.
फ्रेश होऊन आलेले… चेहऱ्यावर नेहमीसारखंच शांत हसू.
फ्रेश होऊन आलेले… चेहऱ्यावर नेहमीसारखंच शांत हसू.
“काय चाललंय इथे? माझ्याशिवाय गप्पा?”
आजोबा मुद्दाम रागावल्यासारखे म्हणाले.
आजोबा मुद्दाम रागावल्यासारखे म्हणाले.
अनघा लगेच उठली.
“अहो आजोबा, या ना… बस ना इथे.”
“अहो आजोबा, या ना… बस ना इथे.”
ती त्यांच्या जवळ जागा करून देत म्हणाली.
आजोबा खुर्चीत बसले आणि अनघाकडे प्रेमाने पाहत म्हणाले,
“काय मग मॅडम… आजचा पहिला दिवस कसा गेला? दमलीस ना थोडी?”
“काय मग मॅडम… आजचा पहिला दिवस कसा गेला? दमलीस ना थोडी?”
अनघा हसली.
“थोडी… पण खूप छान गेला आजोबा. मला खूप आवडलं ऑफिस.”
“थोडी… पण खूप छान गेला आजोबा. मला खूप आवडलं ऑफिस.”
“हं… दिसतंय चेहऱ्यावर,” आजोबा म्हणाले.
“काम समजलं ना नीट?”
“काम समजलं ना नीट?”
“हो… रोनकने सगळं नीट समजावलं. खूप छान समजावून सांगितलं.”
आजोबा हलकंसं मान हलवून म्हणाले,
“तो मुलगा तसाच आहे. जबाबदार आहे. मला माहित होतं तुला comfortable वाटेल.”
“तो मुलगा तसाच आहे. जबाबदार आहे. मला माहित होतं तुला comfortable वाटेल.”
अनिकेत लगेच मध्ये पडला,
“आजोबा, तुम्ही तर दिवसभर तिच्यावर नजर ठेवली असेल ना?”
“आजोबा, तुम्ही तर दिवसभर तिच्यावर नजर ठेवली असेल ना?”
आजोबा हसले.
“अरे… पहिला दिवस होता तिचा. माझी नात आहे ती. काळजी तर घेणारच ना!”
“अरे… पहिला दिवस होता तिचा. माझी नात आहे ती. काळजी तर घेणारच ना!”
अनघाच्या डोळ्यांत पाणी दाटलं.
ती हळूच म्हणाली,
“थँक्यू आजोबा… तुम्ही होता म्हणून मला अजिबात भीती वाटली नाही.”
“थँक्यू आजोबा… तुम्ही होता म्हणून मला अजिबात भीती वाटली नाही.”
आजोबांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला.
“नेहमी लक्षात ठेव… तू एकटी नाहीस. आम्ही दोघं कायम तुझ्या पाठीशी आहोत.”
“नेहमी लक्षात ठेव… तू एकटी नाहीस. आम्ही दोघं कायम तुझ्या पाठीशी आहोत.”
क्षणभर तिघेही शांत झाले…
त्या छोट्याशा हॉलमध्ये खूप मोठं प्रेम भरून राहिलं होतं.
घर… खरंच घरासारखं वाटत होतं.
घर… खरंच घरासारखं वाटत होतं.
---
संध्याकाळची वेळ…
हलकीशी थंड हवा वाहत होती.
हलकीशी थंड हवा वाहत होती.
रस्त्याच्या कोपऱ्यावरचं छोटंसं कॅफे… बाहेर पिवळे लाईट्स लागलेले…
आजूबाजूला लोकांची हलकी गडबड… पण तरीही शांत वाटत होतं.
आजूबाजूला लोकांची हलकी गडबड… पण तरीही शांत वाटत होतं.
तृप्ती आधीच येऊन बसली होती.
हातात मोबाईल… पण लक्ष मात्र वारंवार दरवाज्याकडे.
हातात मोबाईल… पण लक्ष मात्र वारंवार दरवाज्याकडे.
“कुठे आहे हा… नेहमी उशीरच…” ती स्वतःशीच पुटपुटली.
तेवढ्यात मागून आवाज आला
“मॅडम माझी वाट बघतायत का?”
“मॅडम माझी वाट बघतायत का?”
तृप्ती दचकली.
मागे वळून बघितलं तर विक्रम हसत उभा.
“अरे! घाबरवलंस ना मला!” ती रागावल्यासारखी म्हणाली.
“सॉरी… पण तुझा तो cute घाबरलेला चेहरा बघायला मजा येते,” विक्रम हसत म्हणाला.
“खूपच मजा येते हो तुम्हाला!” तृप्तीने नकली राग केला.
दोघं समोरासमोर बसले.
वेटरने कॉफी आणून ठेवली.
क्षणभर शांतता…
विक्रम तिच्याकडे बघतच राहिला.
“काय बघतोयस?” तृप्ती लाजत म्हणाली.
“आज खूप सुंदर दिसतेयस…?”
तिच्या गालावर हलकीशी लाली चढली.
“हं… स्पेशल काही नाही.”
“हं… स्पेशल काही नाही.”
“माझ्यासाठी स्पेशल आहे,” विक्रम हळू आवाजात म्हणाला.
तृप्तीचं हसू थांबतच नव्हतं.
“आज अचानक भेटायला का बोलावलंस?” ती विचारते.
विक्रम थोडा गंभीर झाला.
“तुझ्याशी बोलायचं होतं… दिवसभर काम, घर… पण तू स्वतःसाठी वेळच देत नाहीस.
म्हणून वाटलं… आज फक्त आपण… दोन मिनिटं शांत बसू.”
म्हणून वाटलं… आज फक्त आपण… दोन मिनिटं शांत बसू.”
तृप्ती त्याच्याकडे बघत राहिली.
“तू आहेस ना… म्हणून सगळं सोपं वाटतं,” ती हळूच म्हणाली.
विक्रमने तिच्या हातावर हात ठेवला.
“नेहमी असेच भेटत राहू… कितीही busy असलो तरी.”
दोघांच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं…
कॅफेच्या लाईट्सखाली… दोन मनं शांतपणे जवळ येत होती…
---
कॉफी संपली होती… दोघं अजूनही गप्पांमध्ये हरवले होते.
“चल, आता निघूया?” तृप्ती म्हणाली.
“हं… पण आधी दोन मिनिटं ये ना माझ्यासोबत,” विक्रम म्हणाला.
“कुठे?”
“बस… ये ना… ट्रस्ट मी.”
तृप्ती त्याच्यामागे चालत गेली.
कॅफेच्या मागे छोटंसं गार्डन होतं.
हलकीशी लाईट्स… फुलांचा सुगंध… शांत वातावरण.
हलकीशी लाईट्स… फुलांचा सुगंध… शांत वातावरण.
“इथे का आणलं मला?” ती गोंधळून म्हणाली.
विक्रम तिच्यासमोर उभा राहिला.
क्षणभर काहीच बोलला नाही.
तृप्ती “अरे बोल ना… घाबरवतोयस का?”
तो हसला…
हळूच खिशातून छोटंसं गिफ्ट पॅक काढलं.
हळूच खिशातून छोटंसं गिफ्ट पॅक काढलं.
“हे तुझ्यासाठी.”
“माझ्यासाठी? कशासाठी?”
“असं काही कारण लागतं का?”
तृप्तीने हळूच गिफ्ट उघडलं.
आत एक छोटंसं सिल्वरचं पेंडंट…
त्यावर छोटंसं हृदय… आणि त्यात ‘T, V’ कोरलेलं.
त्यावर छोटंसं हृदय… आणि त्यात ‘T, V’ कोरलेलं.
तिचे डोळे मोठे झाले.
“विक्रम… हे…?”
"आपले लग्न ठरले, तू माझी होणार, आता पर्यत मी तुला काहीच दिले नाही आहे. म्हणून आणले, नाही म्हणून नको," विक्रम म्हणाला.
तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं.
“इतकं का करतो रे माझ्यासाठी…”
“इतकं का करतो रे माझ्यासाठी…”
“मी आहे ना… कायम.”
तो हलकेच तिच्या गळ्यात पेंडंट घालतो.
तो हलकेच तिच्या गळ्यात पेंडंट घालतो.
तृप्तीचे हात थरथरत होते.
“थँक यू…” ती कुजबुजली.
“थँक यू नको… फक्त असंच हसत राहा.”
ती अचानक त्याला मिठी मारते.
विक्रम हसत म्हणतो
“अरे वा… सरप्राईज यशस्वी झालं दिसतंय.”
“खूपच…” ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली.
त्या शांत रात्री… लाईट्सच्या उजेडात…
दोन मनं अजून थोडी जवळ आली…
दोन मनं अजून थोडी जवळ आली…
---
तृप्ती आणि विक्रम दोघंही घरी आले.
दरवाजा उघडताच घरातून चहाचा सुगंध आला.
“आत्या… आलो आम्ही…” तृप्तीने आवाज दिला.
किचनमधून ललिता बाहेर आल्या.
“अरे वा… दोघं एकत्रच! या या… हात-पाय धुवा आधी.” त्या म्हणाल्या
“अरे वा… दोघं एकत्रच! या या… हात-पाय धुवा आधी.” त्या म्हणाल्या
विक्रम नम्रपणे म्हणाला,
“नमस्कार मावशी.”
“नमस्कार मावशी.”
“नमस्कार काय रे… किती वेळा सांगितलं, ‘ मावशी’ नको म्हणूस… घरचाच आहेस तू,” ललिता हसत म्हणाल्या.
तृप्ती हलकेच हसली.
थोड्याच वेळात ललिताने ट्रेमध्ये गरम चहा, पोहे आणि बिस्किटं आणली.
“विक्रम, गरम आहे बरं… हळू प्या,” त्या काळजीने म्हणाल्या.
“वा मावशी… म्हणजे आत्या… तुमच्या हातचा चहा म्हणजे भन्नाट,” तो हसत म्हणाला.
“असं का? मग रोज ये बरं,” त्या मायेने म्हणाल्या.
तृप्ती “आत्या, तू ना… लगेच लाड करता त्याचे.”
“अगं, मुलगा किती समजूतदार आहे. नेहमी तुझी काळजी घेतो. आम्हाला अजून काय पाहिजे?”
विक्रम थोडा लाजला.
“आत्या … तृप्ती खूप मेहनत करते. मी फक्त सोबत असतो.”
ललिताने त्याच्याकडे समाधानाने पाहिलं.
“मुलीच्या आयुष्यात असा सोबत असणारा माणूस मिळणं, हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे.”
क्षणभर घरात शांतता पसरली… ती शांतता खूप गोड होती.
तृप्ती दोघांकडे बघत हसली.
“तुम्ही दोघं माझ्याबद्दल इतकं बोलता, जणू मी इथेच नाहीये!”
तिघेही हसले.
ललिता म्हणाल्या,
“चला, आता गप्पा मारा… मी जेवणाची तयारी करते.”
“चला, आता गप्पा मारा… मी जेवणाची तयारी करते.”
विक्रम चहा घेत म्हणाला,
“खरंच… या घरात आलं की खूप छान वाटतं.”
“खरंच… या घरात आलं की खूप छान वाटतं.”
तृप्ती हळूच म्हणाली,
“कारण हे घर आहे… आणि तूही आता त्याचाच भाग आहेस.”
“कारण हे घर आहे… आणि तूही आता त्याचाच भाग आहेस.”
विक्रम तिच्याकडे पाहून हसला… डोळ्यांत नकळत प्रेम चमकत होतं
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा