तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 62
दरवाज्याची बेल वाजली.
“मी बघते…” तृप्ती म्हणाली.
दरवाजा उघडला तर समोर मोनिका उभी.
“काय मॅडम… आज खूप खुश दिसताय? कुणासोबत फिरून आलात काय?” ती मिश्कील हसत म्हणाली.
तृप्ती लगेच लाजली.
“चल आत आधी… काहीही बोलतेस.”
“चल आत आधी… काहीही बोलतेस.”
मोनिका आत आली आणि थेट हॉलमध्ये बसलेल्या विक्रमकडे पाहिलं.
“अरे वा… पाहुणे तर आधीच आलेत!” मोनिका म्हणाली.
विक्रम हसत म्हणाला,
“हाय मोनिका. मी पाहुणा नाही आहे. आता मी तुझा दादा राहिला नाही का?”
“हाय मोनिका. मी पाहुणा नाही आहे. आता मी तुझा दादा राहिला नाही का?”
“हाय काय… जीजू म्हणू का आता?” ती डोळा मारत म्हणाली.
“अगं वेडी आहेस का!” तृप्तीने तिच्या हातावर हलकंसं मारलं.
विक्रम थोडा लाजला. “अहो, तुम्ही पण ना…”
मोनिका थांबायचं नावच घेत नव्हती.
“ताई, हा बघ कसा लाजतोय… म्हणजे काहीतरी serious आहे बरं का!” मोनिका म्हणाली..
सगळे हसू लागले.
ललिता किचनमधून म्हणाल्या,
“मोनिका आलीस का? ये ग… जरा तृप्तीला मदत कर.”
“मोनिका आलीस का? ये ग… जरा तृप्तीला मदत कर.”
“हो आई ,” म्हणत मोनिका किचनमध्ये गेली.
तृप्ती भाजी चिरत होती.
“काय गं, किती छान मुलगा आहे तुझा विक्रम… आई तर आधीच खुश दिसतेय,” मोनिका हळूच म्हणाली.
तृप्ती हलकेच हसली.
“हो… खूप समजूतदार आहे.”
“हो… खूप समजूतदार आहे.”
दोघींच्या गप्पा, हशा, किचनमधली लगबग… घरात छान ऊब पसरली होती.
हॉलमध्ये विक्रम एकटाच बसला होता.
मोनिका बाहेर येत मोठ्याने म्हणाली,
“अहो विक्रम साहेब… फक्त मोबाईल बघत बसू नका… जेवायला या!”
“अहो विक्रम साहेब… फक्त मोबाईल बघत बसू नका… जेवायला या!”
“हो हो… येतो,” तो हसत उठला.
ललिता प्रेमाने म्हणाल्या,
“ये बाळा… गरम आहे जेवण. आधी तू बस.”
“ये बाळा… गरम आहे जेवण. आधी तू बस.”
“मावशी, सगळे एकत्र बसूया ना,” विक्रम म्हणाला.
ललिता मनातून खुश झाल्या.
“वा… बघ तृप्ती, किती छान संस्कार आहेत मुलाचे.”
तृप्तीने नकळत विक्रमकडे पाहिलं…
त्याच्या चेहऱ्यावरचं ते साधं, गोड हसू पाहून तिच्या मनात शांत समाधान दाटलं.
तिला वाटलं
‘हेच खरं घर… आणि हाच माझा माणूस…’
‘हेच खरं घर… आणि हाच माझा माणूस…’
---
अनघा फ्रेश होऊन बेडवर बसली होती.
दिवसभराचा थकवा होता… पण चेहऱ्यावर समाधान झळकत होतं.
तिने मोबाईल हातात घेतला…
थोडा वेळ आरतीचा नंबर बघत हसली.
थोडा वेळ आरतीचा नंबर बघत हसली.
“पहिल्यांदा तिलाच सांगते…” ती मनात म्हणाली.
कॉल लावला.
“हॅलो… अनघा!” आरतीने लगेच उचलला.
“हाय आई…” अनघा म्हणाली
“काय ग… आज आवाजच वेगळा वाटतोय. खुश आहेस खूप!” आरती म्हणाल्या.
अनघा हसली.
“हो गं… आज मी जॉबला गेले. पहिलाच दिवस होता. ” अनघा म्हणाली.
“कायऽऽऽ? खरंच??” आरती जवळजवळ ओरडलीच.
“हो… आज पहिला दिवस होता ऑफिसमध्ये.” अनघा म्हणाली.
“अगं वा! ही तर खूपच मोठी बातमी आहे. आणि मला आत्ताच सांगतेस?” आरती म्हणाल्या.
“सगळं settle झालं की तुला सांगावं म्हणून थांबले होते.” अनघा म्हणाली.
“कसं गेलं मग? थकलीस का? जमलं ना सगळं?” आरती काळजीने म्हणाल्या
अनघा शांतपणे म्हणाली,
“खूप छान गेलं… खरंच. सुरुवातीला थोडं nervous होते… पण आजोबा माझ्यासोबत होते ना… मग धीर आला. सगळ्यांनी खूप चांगलं वागवलं.”
“खूप छान गेलं… खरंच. सुरुवातीला थोडं nervous होते… पण आजोबा माझ्यासोबत होते ना… मग धीर आला. सगळ्यांनी खूप चांगलं वागवलं.”
“मला माहित होतं… तू सगळं छान सांभाळशील,” आरती प्रेमाने म्हणाली.
अनघाचा आवाज थोडा भरून आला.
“घरात बसून खूप बोर होत होतं गं… आज वाटलं… पुन्हा स्वतःसाठी काहीतरी करतेय.”
“आणि तेच महत्त्वाचं आहे. तू खुश असलीस ना… बस!” आरती म्हणाल्या
क्षणभर दोघी शांत झाल्या.
मग आरती मिश्कीलपणे म्हणाली,
“चल मग… पहिल्या पगाराची ट्रीट माझी पक्की!”
“चल मग… पहिल्या पगाराची ट्रीट माझी पक्की!”
अनघा हसली.
“हो हो… आधी पगार येऊ दे!”
“हो हो… आधी पगार येऊ दे!”
दोघींचा हसण्याचा आवाज फोनमधून घुमला.
कॉल ठेवताना आरती म्हणाली,
“प्राऊड ऑफ यू, अनघा… खरंच.”
“प्राऊड ऑफ यू, अनघा… खरंच.”
अनघाने हलकेच डोळे मिटले…
मनात एकच भावना
‘मी पुन्हा उभी राहतेय…’
‘मी पुन्हा उभी राहतेय…’
---
अनघाने आरतीसोबतचा कॉल ठेवला.
फोन बाजूला ठेवून ती अजूनही हलकेच हसत होती.
फोन बाजूला ठेवून ती अजूनही हलकेच हसत होती.
चेहऱ्यावर वेगळाच आनंद…
डोळ्यात चमक होती…
डोळ्यात चमक होती…
तेवढ्यात दरवाज्याजवळ उभा असलेला अनिकेत तिच्याकडे बघत होता.
काही क्षण तो फक्त तिला बघत राहिला…
“ही अशी हसली की घरच उजळतं…” तो मनात म्हणाला.
तो हळूच तिच्या जवळ आला.
“मॅडम…” तो मिश्कीलपणे म्हणाला.
अनघा दचकली. “अरे! कधी आलास?”
“ते सोड… आधी सांग… एवढं काय हसत होतीस?” अनिकेत म्हणाला.
“काही नाही…” अनघा म्हणाली
“असं ‘काही नाही’ हसू नसतं बरं का… नक्की काहीतरी आहे.”
तो तिच्या बाजूला बसला.
तो तिच्या बाजूला बसला.
“ आईला फोन केला होता… आज ऑफिसचा पहिला दिवस सांगितला.” अनघा म्हणाली
“ओह्ह… मग?” अनिकेत म्हणाला.
“ती खूप खुश झाली… म्हणाली, ‘माझी अनघा परत strong झाली.’”
अनघाच्या डोळ्यात हलकीशी चमक आली.
अनिकेत तिच्याकडे बघतच राहिला.
“तीच काय… मला पण खूप अभिमान वाटतो तुझा,” तो हळू आवाजात म्हणाला.
“खरंच?” अनघा विचारते.
“हं… तू घर सांभाळतेस, आजोबांची काळजी घेतेस… आणि आता ऑफिसही. माझी बायको सुपरवुमन आहे.”
“बस रे… जास्त कौतुक करू नकोस,” ती लाजत म्हणाली.
अनिकेत हसला.
“पण एक सांगू?” अनिकेत म्हणाला.
“काय?” अनघा म्हणाली
तो तिच्या कपाळावर हलकं टपली मारत म्हणाला,
“अशीच नेहमी हसत राहा… तुझं हसू बघितलं की माझा सगळा दिवस चांगला जातो.”
“अशीच नेहमी हसत राहा… तुझं हसू बघितलं की माझा सगळा दिवस चांगला जातो.”
अनघा हलकेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते.
दोघं काही क्षण शांत…
घरात फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज…
आणि त्या क्षणातलं छोटंसं, पण खूप मोठं सुख…
आणि त्या क्षणातलं छोटंसं, पण खूप मोठं सुख…
---
अनघा हलकेच अनिकेतच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती.
दोघंही शांत…
दिवसभराचा थकवा…
पण मन मात्र अगदी शांत आणि आनंदी…
पण मन मात्र अगदी शांत आणि आनंदी…
अनिकेत तिच्या केसांवरून हात फिरवत होता.
“आज तू खूप खुश दिसतेयस…” तो हळूच म्हणाला.
“हं… खूप दिवसांनी स्वतःसाठी काहीतरी केल्यासारखं वाटतंय…” अनघा म्हणाली
“मग रोज असंच हसायचं, ऑर्डर आहे माझी.” अनिकेत म्हणाला
“अहो साहेब…” ती हसली.
तेवढ्यात बाहेरून आवाज आला
“अहोsss… घरात कोणी आहे का… की सगळे रोमॅन्समध्ये busy आहेत?” आजोबा म्हणाले
दोघंही दचकले.
“आजोबा!” अनघा पटकन सरळ बसली.
आजोबा आत आले… चेहऱ्यावर मिश्कील हसू.
“काय रे अनिकेत… मी दोनदा हाक मारली… पण तुम्हाला ऐकूच नाही गेलं बहुतेक.” आजोबा म्हणाले
अनिकेत थोडा लाजत,
“नाही तसं काही नाही आजोबा…”
“नाही तसं काही नाही आजोबा…”
“हं हं… मला सगळं कळतं बरं का. आम्ही पण तरुण होतो कधी काळी.”
अनघा हसू आवरत म्हणाली,
“आजोबा… तुम्ही पण ना…”
“आजोबा… तुम्ही पण ना…”
आजोबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले,
“आज खूप खुश दिसतेस गं… ऑफिस आवडलं ना?”
“आज खूप खुश दिसतेस गं… ऑफिस आवडलं ना?”
“हो आजोबा… खूप छान वाटलं.” अनघा म्हणाली
“बस्स! मग मला काही नको. तू आनंदी असलीस की घर आनंदी राहतं.” आजोबा म्हणाले
अनिकेत म्हणाला,
“आजोबा, उद्यापासून रोज तिची चौकशी करायची आहे तुम्ही.”
“आजोबा, उद्यापासून रोज तिची चौकशी करायची आहे तुम्ही.”
“अरे, माझी नात आहे ती… काळजी तर घेणारच.” आजोबा म्हणाले
तीघंही हसले.
त्या छोट्या घरात
हसू, माया, आणि आपलेपणा भरून राहिला…
हसू, माया, आणि आपलेपणा भरून राहिला…
अनघा मनात म्हणाली
“खरंच… हेच तर खरं सुख आहे… आपली माणसं सोबत असणं…”
“खरंच… हेच तर खरं सुख आहे… आपली माणसं सोबत असणं…”
---
अनघा किचनमध्ये गेली आणि जेवण वाढायला लागली.
भाजीचा सुगंध, फुलक्यांची वाफ…
संपूर्ण घरात एक उबदारपणा पसरला होता.
संपूर्ण घरात एक उबदारपणा पसरला होता.
“या… जेवायला…” ती हळूच म्हणाली.
सगळ्यांनी मिळून शांतपणे जेवण केलं.
गप्पा, हलकंसं हसू… दिवसाचा थकवा जणू नाहीसा झाला होता.
गप्पा, हलकंसं हसू… दिवसाचा थकवा जणू नाहीसा झाला होता.
जेवण झाल्यावर अनघाने पटकन सगळं आवरायला घेतलं.
भांडी ठेवली, किचन स्वच्छ केलं, उद्याचा डबा काय करायचा तेही मनात ठरवलं…
भांडी ठेवली, किचन स्वच्छ केलं, उद्याचा डबा काय करायचा तेही मनात ठरवलं…
कारण उद्या…
उद्या तिला पहिल्यांदाच एकटीने ऑफिसला जायचं होतं.
मनात थोडी धाकधूक… पण त्याहून जास्त उत्सुकता होती.
तीने रात्रीच कपडे काढून ठेवले, बॅग तयार केली, फाईल्स नीट लावल्या.
आजोबा बाहेरून म्हणाले,
“अनघा… मी झोपतो गं. गुडनाईट.”
“अनघा… मी झोपतो गं. गुडनाईट.”
“गुडनाईट आजोबा…” ती हसत म्हणाली.
आजोबा तिच्याकडे प्रेमाने बघत त्यांच्या खोलीत गेले.
अनघा रूममध्ये आली.
अनिकेत बेडवर टेकून तिची वाट बघत होता.
“झालं का सगळं?” तो विचारत म्हणाला.
“हं… उद्याची तयारी पण झाली.” अनघा म्हणाली
“टेंशन आहे का?” अनिकेत म्हणाला
ती हलकेच हसली, “थोडंसं… पण तू आहेस ना.”
अनिकेतने तिचा हात हातात घेतला,
“तू काहीही करू शकतेस अनघा. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.”
“तू काहीही करू शकतेस अनघा. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.”
त्या शब्दांनी तिच्या मनात एक वेगळीच ताकद आली.
ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली.
दोघं थोडावेळ गप्पा मारत राहिले…
हसत, चिडवत, उद्याचे प्लॅन करत…
हसत, चिडवत, उद्याचे प्लॅन करत…
आणि नकळत…
दोघांनाही गोड झोप लागली.
बाहेर चंद्रप्रकाश होता…
घरात शांतता…
आणि त्या शांततेत समाधानाची एक सुंदर रात्र विसावली होती…
घरात शांतता…
आणि त्या शांततेत समाधानाची एक सुंदर रात्र विसावली होती…
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा