तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 64
अनघा केबिनमध्ये बसून फाईल्स बघत होती…
नवीन सिस्टम… नवीन लोकं… पण ती मन लावून सगळं समजून घेत होती.
तेवढ्यात इंटरकॉम वाजला.
ट्रिंग… ट्रिंग…
“हॅलो…” अनघा म्हणाली.
“अनघा मॅम, रोनक बोलतोय. 10 मिनिटांनी कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग आहे. तुमची पण उपस्थिती हवी आहे.”
तिचं हृदय धडधडायला लागलं.
“माझी…?” ती थोडी गोंधळली.
“हो. आजपासून तुम्ही team handle करणार आहात. So you must join.”
“ओके… मी येते.”
फोन ठेवताच तिने खोल श्वास घेतला.
“पहिल्याच दिवशी मीटिंग…” ती स्वतःशीच पुटपुटली.
थोडं पाणी प्यायली. फाईल, नोटपॅड घेतलं.
आरशात स्वतःकडे बघितलं.
“तू करू शकतेस अनघा…” ती स्वतःलाच म्हणाली.
---
कॉन्फरन्स रूममध्ये सगळे आधीच बसले होते.
रोनक, सीमा, करिष्मा आणि बाकी स्टाफ.
अनघा आत गेली.
रोनकने हसून खुर्ची दाखवली.
“Come… please sit.”
मीटिंग सुरू झाली.
रोनक प्रोजेक्ट समजावत होता.
“हा नवीन क्लायंट आहे. पुढचे दोन महिने खूप important आहेत. Planning strong पाहिजे.”
तो अचानक अनघाकडे वळला.
“अनघा, तुम्ही reports handle कराल का? तुमचा experience आहे ना management मध्ये?”
सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
क्षणभर तिला टेन्शन आलं…
पण लगेच आजोबांचे शब्द आठवले…
“माझी नात काही कमी नाही…”
ती आत्मविश्वासाने म्हणाली,
“हो… मी handle करेन. उद्यापासून daily update देईल.”
“हो… मी handle करेन. उद्यापासून daily update देईल.”
रोनक खुश झाला.
“Great. That’s the spirit!”
“Great. That’s the spirit!”
सीमा हळूच म्हणाली,
“पहिल्या दिवशीच big responsibility… wow.”
“पहिल्या दिवशीच big responsibility… wow.”
करिष्मा हसत म्हणाली,
“Boss impress झाले वाटतं.”
“Boss impress झाले वाटतं.”
सगळे हसले.
अनघालाही हसू आलं.
मीटिंग संपली.
रोनक म्हणाला,
“Good start, अनघा. मला खात्री आहे तुम्ही खूप छान काम कराल.”
“Good start, अनघा. मला खात्री आहे तुम्ही खूप छान काम कराल.”
“Thank you,” ती नम्रपणे म्हणाली.
---
केबिनमध्ये परत आल्यावर ती खुर्चीत बसली.
मनात एक वेगळाच आनंद होता.
घरी बसून जी रिकामेपणाची भावना यायची…
ती आता नाहीशी झाली होती.
“हो… मला हेच हवं होतं…” ती स्वतःशीच म्हणाली.
लॅपटॉप उघडला…
आणि पहिलं काम सुरू केलं…
आणि पहिलं काम सुरू केलं…
नव्या सुरुवातीचा पहिला पाऊल
---
लंच ब्रेकची बेल झाली…
ऑफिसमध्ये थोडी गडबड वाढली.
सगळे आपापले डबे घेऊन कॅन्टीनकडे निघाले.
अनघा अजूनही तिच्या केबिनमध्ये बसून फाईल बघत होती.
“पहिलाच दिवस आहे… आधी काम संपवू…” ती मनात म्हणाली.
तेवढ्यात दरवाज्यावर टकटक झाली.
“मॅम… येऊ का?” सीमा हसत म्हणाली.
“अरे मॅम नको… अनघा म्हणा ना,” ती लगेच म्हणाली.
करिष्मा हसली,
“मग चला अनघा… लंच टाइम झाला. काम पळून जाणार नाही.”
“मग चला अनघा… लंच टाइम झाला. काम पळून जाणार नाही.”
अनघा थोडी संकोचली,
“तुम्ही जा… मी येते थोड्या वेळात.”
“तुम्ही जा… मी येते थोड्या वेळात.”
सीमा लगेच म्हणाली,
“नाही… पहिल्या दिवशी एकटी नाही बसायचं. आमच्यासोबत या. नियम आहे हा.”
“नाही… पहिल्या दिवशी एकटी नाही बसायचं. आमच्यासोबत या. नियम आहे हा.”
तिघीही हसल्या.
अनघाने डब्बा घेतला आणि त्यांच्यासोबत कॅन्टीनमध्ये गेली.
---
कॅन्टीनमध्ये सगळीकडे गप्पा, हशा, चहाचा सुगंध…
तिघी एका टेबलवर बसल्या.
करिष्माने डब्बा उघडला,
“आज माझ्या आईने पनीर बनवलंय… share करणार सगळ्यांनी.”
“आज माझ्या आईने पनीर बनवलंय… share करणार सगळ्यांनी.”
सीमा म्हणाली,
“माझ्याकडे पराठे आहेत.”
“माझ्याकडे पराठे आहेत.”
अनघाने तिचा डबा उघडला.
“मी साधी भाजी-पोळी आणली आहे…”
सीमा लगेच म्हणाली,
“अगं साधी काय… घरचं जेवण म्हणजे best!”
“अगं साधी काय… घरचं जेवण म्हणजे best!”
करिष्मा तिच्या डब्यातून भाजी घेऊन म्हणाली,
“वा… खूप छान वास येतोय.”
“वा… खूप छान वास येतोय.”
अनघा हसली.
“मी सकाळी लवकर उठून बनवलं.”
“मी सकाळी लवकर उठून बनवलं.”
“इतक्या लवकर? मग घर + ऑफिस दोन्ही manage करता?” सीमा विचारते.
“हो… सवय आहे. घरचं सगळं आवरूनच निघते,” अनघा शांतपणे म्हणाली.
करिष्मा थक्क झाली,
“Superwoman आहेस तू तर!”
“Superwoman आहेस तू तर!”
तिघीही हसल्या.
---
गप्पा रंगल्या…
“लग्न झालंय ना तुमचं?” सीमा विचारते.
“हो…” अनघाच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज आली.
“Love marriage की arrange?” करिष्मा चिडवत म्हणाली.
“love marriage …” ती हसत म्हणाली.
“वा… मग treat पाहिजे आम्हाला!” सीमा म्हणाली.
“हो हो… नक्की,” अनघा म्हणाली.
बर्याच दिवसांनी ती इतकी मनमोकळं हसत होती.
तिला जाणवलं…
ऑफिस फक्त कामाची जागा नाही… इथे माणसंही मिळतात…
---
लंच संपल्यावर सीमा म्हणाली,
“काही लागलं तर आम्हाला लगेच सांग. तू नवीन आहेस पण आता आमच्या team चीच आहेस.”
“काही लागलं तर आम्हाला लगेच सांग. तू नवीन आहेस पण आता आमच्या team चीच आहेस.”
करिष्मा म्हणाली,
“हो… tension नको घेऊ. आम्ही आहोत ना.”
“हो… tension नको घेऊ. आम्ही आहोत ना.”
अनघाच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं.
“Thank you… खरंच खूप बरं वाटलं तुमच्यासोबत.”
ती मनात म्हणाली
“आजोबा बरोबर होते… ऑफिसला येणं हा best decision होता…”
“आजोबा बरोबर होते… ऑफिसला येणं हा best decision होता…”
ती नव्या उर्जेने परत केबिनमध्ये गेली… कामासाठी तयार होती.
---
लंच ब्रेक संपल्यानंतर…
अनघा तिच्या केबिनमध्ये आली.
खुर्चीत बसली…
समोर लॅपटॉप… फाईल्स… टेबल नीट लावलेलं…
समोर लॅपटॉप… फाईल्स… टेबल नीट लावलेलं…
पण तिच्या चेहऱ्यावर मात्र मोठ्ठं स्माईल होतं.
“आजचा दिवस खरंच छान चाललाय…” ती मनात म्हणाली.
तिने मोबाईल हातात घेतला.
थोडा विचार केला…
आणि लगेच अनिकेतचा नंबर डायल केला.
“हॅलो…”
अनिकेतने कॉल उचलला.
“हॅलो…” अनघाचा आवाज अगदी उत्साही.
अनिकेत लगेच ओळखतो,
“काय मॅडम… आवाजावरून वाटतंय पहिला दिवस भारी गेला.”
“काय मॅडम… आवाजावरून वाटतंय पहिला दिवस भारी गेला.”
अनघा हसली,
“अरे हो ना… खूपच छान!”
“अरे हो ना… खूपच छान!”
“सांग सांग… काय झालं?” तो उत्सुकतेने म्हणाला.
ती एकदम सुरू झाली
“ऑफिस खूप मोठं आहे… माझी स्वतःची केबिन दिली आहे… रोनकने सगळ्यांशी ओळख करून दिली… सीमा आणि करिष्मा नावाच्या दोन मुली आहेत… खूप गोड आहेत… माझ्यासोबतच लंच केला त्यांनी… डबा पण share केला…”
ती एका दमात सगळं सांगत होती.
अनिकेत शांतपणे ऐकत होता… चेहऱ्यावर नकळत हसू आलं.
“वा… म्हणजे पहिल्याच दिवशी मैत्रिणी मिळाल्या तर,” तो म्हणाला.
“हो… मला वाटलं होतं थोडं awkward वाटेल… पण अजिबात नाही वाटलं… खूप comfortable वाटलं.”
“Good… मला हेच हवं होतं,” अनिकेत हलक्या आवाजात म्हणाला.
“काय?” अनघा विचारते.
“तू आनंदी राहावी… बस्स.”
क्षणभर दोघंही शांत.
त्या शांततेतही खूप प्रेम होतं.
---
अनघा हळूच म्हणाली,
“Thank you हं…”
“Thank you हं…”
“कशासाठी?”
“मला जॉब करायला हो म्हणालास म्हणून… नाहीतर मी अजून घरीच बोर होत बसले असते.”
अनिकेत हसला,
“अगं पागल… तू खुश म्हणजे मी खुश.”
“अगं पागल… तू खुश म्हणजे मी खुश.”
“संध्याकाळी लवकर ये… अजून खूप सांगायचं आहे,” ती म्हणाली.
“हो मॅडम… आज लवकर येतो. Celebrate करूया पहिला दिवस.”
“पक्का?”
“पक्का.”
---
कॉल ठेवला.
अनघा मोबाईलकडे बघतच हसत राहिली.
मनात एक वेगळीच उब आली…
घर + ऑफिस + साथ देणारा नवरा…
आयुष्य हळूहळू परत सुंदर होत होतं…
आयुष्य हळूहळू परत सुंदर होत होतं…
ती पुन्हा कामाला लागली…
पण आता तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता
पण आता तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता
---
दुपार सरत आली होती…
घरात शांतता होती.
ललिता स्वयंपाकघरात निवांत भाजी चिरत बसल्या होत्या…
पण मन मात्र कुठेतरी भटकत होतं.
पण मन मात्र कुठेतरी भटकत होतं.
तेवढ्यात दरवाज्याची कडी हलकेच वाजली.
मोनिका आत आली.
नेहमीसारखी “आई आली…” असं न बोलता
ती शांतपणे चप्पल काढून आत गेली.
ती शांतपणे चप्पल काढून आत गेली.
चेहरा उतरलेला…
डोळ्यातली चमक गायब…
डोळ्यातली चमक गायब…
बॅग तिने सोफ्यावर टाकली आणि थेट खुर्चीत बसली.
ललिताने दूरूनच तिच्याकडे पाहिलं…
आईचं मन ना…
एक नजरेत सगळं ओळखतं.
एक नजरेत सगळं ओळखतं.
त्या हळूच तिच्याजवळ आल्या.
“काय ग… इंटरव्यू कसा गेला?” त्यांनी अलगद विचारलं.
मोनिका जबरदस्ती हसली,
“ठीक होता…”
“ठीक होता…”
“लागला का जॉब?”
क्षणभर ती गप्प…
नंतर मान खाली घालून म्हणाली,
“नाही आई… परत नाही लागला…”
“नाही आई… परत नाही लागला…”
आवाज थरथरत होता.
“किती ट्राय करतेय… पण काहीच होत नाही…
माझ्यातच काहीतरी कमी आहे बहुतेक…”
माझ्यातच काहीतरी कमी आहे बहुतेक…”
तिच्या डोळ्यात पाणी आलं.
---
ललिताचं मन चिरलं.
त्या तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या,
“अगं वेडी आहेस का… असं काही नसतं… वेळ लागतो… लागेल तुला नक्की.”
मोनिका त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून बसली.
लहानपणीसारखी.
लहानपणीसारखी.
---
ललिता तिचे केस कुरवाळत होत्या…
पण मनात विचारांची गर्दी…
अनघा रोज ऑफिसला जाते…
तिथे सगळ्यांना ओळखते… ती जर बोलली तर…
मोनिकाला पण काम मिळेल कदाचित…
तिथे सगळ्यांना ओळखते… ती जर बोलली तर…
मोनिकाला पण काम मिळेल कदाचित…
क्षणभर त्यांच्या मनात अनघाचं नाव आलं…
पण लगेच दुसरा विचार आला
मी तिला कसं बोलू?
आतापर्यंत नीट बोललेही नाही…
आणि आता कामासाठी सांगायला जावं?
आतापर्यंत नीट बोललेही नाही…
आणि आता कामासाठी सांगायला जावं?
अहंकार… प्रेम… काळजी… सगळं एकत्र गुंतलं होतं.
---
त्या मनातच पुटपुटल्या,
“अनघाला बोलू का…
मोनिकाला पण तुझ्यासोबत घेऊन जा… जॉब लावून दे म्हणून सांगू का…?”
मोनिकाला पण तुझ्यासोबत घेऊन जा… जॉब लावून दे म्हणून सांगू का…?”
पण शब्द ओठांवर आले नाहीत.
फक्त त्यांनी मोनिकाला घट्ट जवळ घेतलं.
“काळजी करू नको… माझी मुलगी आहेस तू…
तुला नक्की चांगली नोकरी मिळेल.”
तुला नक्की चांगली नोकरी मिळेल.”
मोनिका हलकंसं हसली…
पण डोळ्यांतलं पाणी अजून होतंच.
---
खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यासोबत…
घरात एक शांत, थोडासा उदास क्षण पसरला…
एका बाजूला अनघाचा नवीन आनंद…
आणि दुसऱ्या बाजूला मोनिकाची अपूर्ण स्वप्नं…
आणि दुसऱ्या बाजूला मोनिकाची अपूर्ण स्वप्नं…
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा