तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 65
संध्याकाळ झाली होती…
अनघा ऑफिसमधून थकलेली पण खुशीत घरी आली.
हातात बॅग… चेहऱ्यावर हलकंसं हसू होते.…
आजचा दिवस छान गेला होता.
ती दरवाजा उघडून आत आली…
तेवढ्यात मागून गाडीचा आवाज आला.
आजचा दिवस छान गेला होता.
ती दरवाजा उघडून आत आली…
तेवढ्यात मागून गाडीचा आवाज आला.
अनिकेत पण तिच्या मागोमागच आला.
“ए अनघा… थांब जरा…” तो हसत म्हणाला.
“ए अनघा… थांब जरा…” तो हसत म्हणाला.
ती वळली.
“काय?” ती म्हणाली.
“काय?” ती म्हणाली.
अनिकेत तिच्याजवळ येत म्हणाला
“चल… आज आपण डिनरला जाऊ बाहेर.”
अनघाच्या डोळे मोठे झाले.
“खरंचss?” अनघा म्हणाली.
“हो… मॅडमचा ऑफिसचा पहिला दिवस स्पेशल… सेलिब्रेशन तर बनतं ना.”
ती नकळत हसली.
“वा… मस्त! मला पण जायचंच होतं.” अनघा म्हणाली.
“मग ठरलं. आजोबांना सांगून ये… मी फ्रेश होऊन येतो.”
असं म्हणत तो बाथरूममध्ये गेला.
असं म्हणत तो बाथरूममध्ये गेला.
---
अनघाचं मन अगदी हलकं झालं.
ती पटकन केस नीट करत, ओढणी सावरत आजोबांच्या घराकडे गेली.
आजोबा खुर्चीत बसून पेपर वाचत होते.
“आजोबा…”
“हो बाळा, आलीस? कसा गेला दिवस?”
ती त्यांच्या जवळ बसली.
ती त्यांच्या जवळ बसली.
“छान गेला… आणि… आज आम्ही दोघं बाहेर डिनरला जाणार आहोत.”
आजोबांनी चष्म्याच्या वरून तिच्याकडे पाहिलं… हलकंसं हसले.
“वा! फारच छान… जा की. थोडा वेळ स्वतःसाठी पण हवा असतो.”
“तुमच्यासाठी जेवण वाढून ठेवते.”
“अगं नको… मी करून घेईन. तुम्ही मजा करून या. रोज कुठे जाता?”
त्यांच्या आवाजात प्रेम होतं.
क्षणभर ते म्हणाले
“अनघा… अशीच हसत राहा ग. घरात तुझ्या हसण्यानेच रौनक येते.”
अनघाच्या डोळ्यांत पाणी आलं.
ती हलकं हसत म्हणाली,
“लवकर येऊ आम्ही.”
“लवकर येऊ आम्ही.”
“हं… आणि आईस्क्रीम खाऊन ये बरं का!” आजोबा मिश्कीलपणे म्हणाले.
“नक्की!” ती हसली.
---
बाहेरून अनिकेतचा आवाज आला
“मॅडम, रेडी का? उशीर होतोय!”
“येते!”
ती लहान मुलीसारखी धावतच बाहेर गेली…
ती लहान मुलीसारखी धावतच बाहेर गेली…
.....
अनघा आजोबांच्या घरातून परत आली.
घरात शांतता होती…
बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता.
अनिकेत फ्रेश होत होता.
ती हळूच कपाट उघडते.
अनिकेत फ्रेश होत होता.
ती हळूच कपाट उघडते.
“काय घालू आता…?” ती स्वतःशीच पुटपुटली.
हातात एक साधा कुर्ता… मग एक साडी… मग पुन्हा ड्रेस…
“उफ्फ… काहीच समजत नाही…”
तेवढ्यात मागून आवाज आला
“इतका विचार कशाला चालू आहे मॅडम?” अनिकेत म्हणाला.
अनघा दचकली.
“अरे! कधी आलास?” ती म्हणाली.
अनिकेत टॉवेलने केस पुसत उभा होता… चेहऱ्यावर खट्याळ हसू होते.
“मी बराच वेळ बघतोय… पाच मिनिटांत तीन कपडे बदललेस.”
“काही नाही… साधं बाहेर जायचं आहे… पण छान दिसायला पाहिजे ना…” अनघा म्हणाली
“तू काहीही घाल… छानच दिसतेस.” अनिकेत म्हणाला
अनघा लाजली.
“बस्स… गोड बोलून काम काढायचं आहे ना तुला.”
ती शेवटी हलकीशी पेस्टल रंगाची साडी काढते.
“ही घालू?” अनघा म्हणाली
“ही घालू?” अनघा म्हणाली
अनिकेत तिच्याकडे दोन सेकंद बघतच राहिला.
“हो… हीच… खूप सुंदर दिसशील.”
“हो… हीच… खूप सुंदर दिसशील.”
थोड्या वेळाने…
अनघा तयार होऊन बाहेर आली.
हलकी साडी… मोकळे केस… छोटंसं बिंदी… कानात छोटे झुमके… हातात बांगड्या, चेहऱ्यावर हसू होते.
अनिकेत तिला बघून थांबला.
“काय झालं? एवढं का बघतोस?” ती हसत म्हणाली.
तो हळूच तिच्याजवळ आला.
“सांगू…?” अनिकेत म्हणाला.
“काय?” अनघा म्हणाली
“दरवेळी वाटतं… माझी बायको इतकी सुंदर कशी काय आहे?” अनिकेत म्हणाला
ती हलकंसं त्याला ढकलते.
“नाटकं करू नको… उशीर होईल.”
“नाटकं करू नको… उशीर होईल.”
तो तिचा हात पकडतो.
“दोन मिनिटं थांब…”
आणि तिला हलकंसं मिठीत घेतो.
“आज खूप खुश दिसतेस.”
“दोन मिनिटं थांब…”
आणि तिला हलकंसं मिठीत घेतो.
“आज खूप खुश दिसतेस.”
“हों… ऑफिसमुळे, आजोबांमुळे… आणि तू आहेस ना…” ती म्हणाली.
क्षणभर दोघं शांत…
फक्त एकमेकांच्या जवळ…
“चल आता खरंच जाऊया नाहीतर रेस्टॉरंट बंद होईल,” अनघा हसत म्हणाली.
“हं… पण आज बिल तू देणार.” अनिकेत म्हणाला.
“का?” अनघा म्हणाला.
“कारण आज तू ऑफिसला जॉईन झाली आहेस… पहिला पगार आधीच अॅडव्हान्समध्ये!” तो डोळा मारत म्हणाला.
“अनिकेत!” ती हसत त्याच्या मागे धावली.
घरभर त्यांच्या हसण्याचा आवाज पसरला…
---
अनिकेत तयार होऊन बाहेर आला.
लाइट ब्लू शर्ट… जीन्स… केस नीट सेट केलेले…
अनघा आधीच तयार होऊन उभी होती.
दोघांचे डोळे एकमेकांवरच थांबले.
“चलूया?” अनिकेत म्हणाला.
“हं… आजोबांना सांगून आले आहे… ते म्हणाले मजा करून या,” अनघा हसत म्हणाली.
दोघांनी घराचं दार लॉक केलं.
रात्रीची थंड हवा वाहत होती…
रस्त्यावर लाईट्स चमकत होत्या…
अनिकेतने कारचं दार उघडून दिलं.
रस्त्यावर लाईट्स चमकत होत्या…
अनिकेतने कारचं दार उघडून दिलं.
“मॅडम, प्लीज…” तो थोडा वाकून म्हणाला.
“वा! आज तर खूप जेंटलमन झालात,” अनघा चिडवत म्हणाली.
“आज डेट आहे ना… इंप्रेशन मारायचं आहे.”
ती हसत कारमध्ये बसली.
“आज डेट आहे ना… इंप्रेशन मारायचं आहे.”
ती हसत कारमध्ये बसली.
गाडी सुरू झाली…
हलकीशी गाणी चालू होती.
काही वेळ शांतता…
फक्त दोघं आणि रात्रीचं सुंदर वातावरण होते…
अनिकेत हळूच तिच्याकडे बघत होता.
“काय झालं? रस्ता बघ… माझ्याकडे नको,” अनघा म्हणाली.
“रस्त्यापेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस…” अनिकेत म्हणाला.
“बस्सss… आता फ्लर्टिंग बंद कर.” अनघा म्हणाली
“अगं खरंच सांगतो… आज तू खूप खुश दिसतेस.” अनिकेत म्हणाला
“हों… खूप दिवसांनी असं वाटतंय… सगळं ठीक चाललं आहे… ऑफिस, घर… तू… आजोबा… सगळं.” अनघा म्हणाली..
अनिकेतने तिचा हात हलकेच हातात घेतला.
“नेहमी अशीच हसत राहा… मला काहीच नको… फक्त तू आनंदी असलीस की झालं.” अनिकेत म्हणाला.
अनघाच्या डोळ्यात पाणी तरळलं.
“ए… रडायचं नाही हं… आज फक्त मजा करायची.” अनिकेत म्हणाला.
“हों… पक्का!” अनघा म्हणाली.
थोड्या वेळात गाडी एका सुंदर रेस्टॉरंटसमोर थांबली.
लाईट्स… फुलांची सजावट… हलकं म्युझिक…
अनघा आश्चर्याने म्हणाली
“वा… इतकं छान ठिकाण?”
“वा… इतकं छान ठिकाण?”
“माझ्या बायकोसाठी स्पेशल.” अनिकेत म्हणाला
ती त्याच्याकडे बघून हसली.
दोघं हातात हात घेऊन आत गेले…
आजचा वेळ फक्त त्यांच्यासाठी होता…
दोघं हातात हात घेऊन आत गेले…
आजचा वेळ फक्त त्यांच्यासाठी होता…
---
दोघेही रेस्टॉरंटमध्ये आत गेले…
काचेचं मोठं दार उघडताच
हलकीशी थंड हवा…
मंद म्युझिक…
फुलांचा सौम्य सुगंध…
हलकीशी थंड हवा…
मंद म्युझिक…
फुलांचा सौम्य सुगंध…
संपूर्ण वातावरण खूप शांत आणि सुंदर होतं.
लाईट्स थोड्या डिम…
टेबलवर छोट्या मेणबत्त्या…
लोक हळू आवाजात बोलत होते…
टेबलवर छोट्या मेणबत्त्या…
लोक हळू आवाजात बोलत होते…
अनघा थोडी थांबलीच.
“खूप छान आहे इथे…” ती हळू आवाजात म्हणाली.
“तुला आवडेल म्हणूनच निवडलं,” अनिकेत हसला.
वेटर त्यांना एका कोपऱ्यातल्या टेबलवर घेऊन गेला.
थोडंसं प्रायव्हेट… खिडकीजवळ…
बाहेर शहराचे लाईट्स चमकत होते.
अनिकेतने खुर्ची मागे ओढून दिली.
“बस मॅडम.” अनिकेत म्हणाला
“आज काय झालंय तुम्हाला? खूप सर्व्हिस देताय,” ती चिडवत म्हणाली.
“आज माझी बायको ऑफिसला जॉईन झाली… सेलिब्रेशन तर बनता है.”
ती गालातल्या गालात हसली.
दोघे समोरासमोर बसले.
क्षणभर दोघं फक्त एकमेकांकडे बघत होते.
“काय बघतोयस?” अनघा लाजत म्हणाली.
“ऑफिसमधली असिस्टंट मॅनेजर नाही… माझी छोटीशी अनघा दिसतेय.”
“छोटीशी म्हणजे?” अनघा म्हणाली
“जी पहिल्यांदा घरी आली होती ना… घाबरलेली… शांत… ती.” अनिकेत म्हणाला
अनघा थोडी भावूक झाली.
“खूप बदललं ना सगळं…”
“हों… पण एक गोष्ट बदलली नाही…” अनिकेत म्हणाला
“काय?” अनघा म्हणाली
“माझं तुझ्यावरचं प्रेम.” अनिकेत म्हणाला
तिचे डोळे भरून आले.
“ए… पब्लिक प्लेस आहे… रडू नकोस,” तो हसत म्हणाला.
ती हळूच म्हणाली
“थँक यू… माझ्यासोबत इतकं उभा राहिलास म्हणून…”
“थँक यू… माझ्यासोबत इतकं उभा राहिलास म्हणून…”
अनिकेतने टेबलवरून तिचा हात हातात घेतला.
“नेहमी राहीन.”
वेटर आला.
“सर, ऑर्डर?”
दोघे मेनू बघायला लागले.
“आज तू ऑर्डर कर… मला काहीही चालेल,” अनघा म्हणाली.
“पक्का? मग मी स्पायसी घेणार.” अनिकेत म्हणाला
“नकोss… मला तिखट नाही चालत.” अनघा म्हणाली
“मग काय चालेल मॅडमला?” अनिकेत म्हणाला
“जे तुम्ही खाऊ घालाल ते.” अनघा म्हणाली
दोघे हसायला लागले.
बराच वेळ फक्त हसणं, बोलणं, आठवणी…
आजचा वेळ फक्त त्यांच्यासाठी होता…
जगात बाकी कोणीच नव्हतं…
जगात बाकी कोणीच नव्हतं…
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा