तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 66
जेवण संपलं…
दोघे निवांत बसले होते.
रेस्टॉरंटमध्ये अचानक लाईट्स अजून मंद झाल्या…
आणि हलकंसं जुनं रोमॅन्टिक गाणं वाजायला लागलं…
मंद… गोड… मनात उतरणारं…
काही कपल्स उठून डान्स फ्लोअरवर गेले.
अनघा शांतपणे बघत होती.
तिच्या चेहऱ्यावर हसू होतं… पण डोळ्यांत थोडी इच्छा लपलेली.
अनिकेतने ते लगेच ओळखलं.
तो उठला.
तिच्यासमोर हात पुढे केला.
“मॅडम… डान्स कराल का माझ्यासोबत?” तो म्हणाला.
अनिकेतने ते लगेच ओळखलं.
तो उठला.
तिच्यासमोर हात पुढे केला.
“मॅडम… डान्स कराल का माझ्यासोबत?” तो म्हणाला.
अनघा दचकली.
“मी? मला नाही येत डान्स वगैरे…” अनया म्हणाली
“मलाही नाही येत… पण तुझ्यासोबत उभं राहणं येतं.” अनिकेत म्हणाला.
ती हसली.
“लोक बघतील…” अनघा म्हणाली
“बघू दे… माझी बायको आहेस तू.” अनिकेत म्हणाला.
ती लाजली.
हळूच त्याचा हात हातात दिला.
दोघे फ्लोअरवर गेले.
गाणं मंद होतं…
अनिकेतने अलगद तिच्या कमरेवर हात ठेवला.
अनघाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
पहिल्यांदा थोडी अवघडली…
“अनिकेत… पडले तर?”
“मी पकडेन.”
“खरंच?”
अनिकेतने अलगद तिच्या कमरेवर हात ठेवला.
अनघाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
पहिल्यांदा थोडी अवघडली…
“अनिकेत… पडले तर?”
“मी पकडेन.”
“खरंच?”
“नेहमी.”
दोघे हळूहळू हलायला लागले…
स्टेप्स नव्हत्या…
फक्त एकमेकांच्या तालात चालणं…
फक्त एकमेकांच्या तालात चालणं…
कधी तो तिच्याकडे बघत होता…
कधी ती नजरा चुकवत होती…
कधी ती नजरा चुकवत होती…
तिचे केस हलकेच त्याच्या चेहऱ्यावर आले.
तो कुजबुजला
“आज खूप सुंदर दिसतेस.”
“आज खूप सुंदर दिसतेस.”
“रोजच दिसते…” ती चिडवत म्हणाली.
“हों… पण आज माझी अनघा पुन्हा हसताना दिसतेय… ते जास्त सुंदर आहे.” अनिकेत म्हणाला
ती थोडी भावूक झाली.
त्याच्या छातीवर डोकं टेकवलं.
त्याच्या छातीवर डोकं टेकवलं.
दोघे अगदी शांतपणे डोलत राहिले…
जग थांबल्यासारखं…
गाणं संपलं…
पण ते हलतच राहिले.
“गाणं संपलं,” ती हळूच म्हणाली.
“आपला डान्स नाही.” अनिकेत म्हणाला.
“लोक बघतायत…” अनघा म्हणाली
“बघू दे… मला फक्त तू दिसतेस.” अनिकेत म्हणाला.
ती हलकेच हसली.
त्या क्षणी
ना ऑफिस… ना घरचे प्रश्न…
ना ललिताचा राग…
ना ऑफिस… ना घरचे प्रश्न…
ना ललिताचा राग…
फक्त
अनिकेत अनघा
अनिकेत अनघा
एक छोटंसं, सुखी जग.
---
डिनर करून दोघे बाहेर आले.
रात्रीची थंड हवा…
रस्त्यावर लाईट्स चमकत होत्या…
रस्त्यावर लाईट्स चमकत होत्या…
अनिकेतने बाईक काढली.
“चल मॅडम, घरी जाऊ,” तो हसत म्हणाला.
“चल मॅडम, घरी जाऊ,” तो हसत म्हणाला.
अनघा मागे बसली… हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
बाईक सुरु झाली…
तेवढ्यात आकाशात विज चमकली…
आणि अचानक…
बाईक सुरु झाली…
तेवढ्यात आकाशात विज चमकली…
आणि अचानक…
टपटप… टपटप…
पाऊस सुरू झाला.
“अरे वा!” अनघा खुश झाली.
“अरे अरे… पाऊस आला… भिजशील,” अनिकेत म्हणाला.
“भिजू दे ना… किती छान वाटतंय!” अनघा म्हणाली
क्षणात पाऊस वाढला.
गार वारा… थेंब चेहऱ्यावर पडत होते…
अनघा हात बाहेर काढून पावसाचे थेंब पकडत होती.
लहान मुलीसारखी हसत होती.
“अनिकेत… स्लो चालव… मला मजा घ्यायची आहे!” अनघा म्हणाली
गार वारा… थेंब चेहऱ्यावर पडत होते…
अनघा हात बाहेर काढून पावसाचे थेंब पकडत होती.
लहान मुलीसारखी हसत होती.
“अनिकेत… स्लो चालव… मला मजा घ्यायची आहे!” अनघा म्हणाली
“तू ना… अगदी वेडी आहेस.” अनिकेत म्हणाला
“हो… तुझ्यासाठीच वेडी.” अनघा म्हणाली
तो हसला.
अचानक अनघाने हातातलं पाणी उचलून
त्याच्या अंगावर उडवलं.
त्याच्या अंगावर उडवलं.
“ए अनघा!” अनिकेत म्हणाला
“हाहाहा… पकड ना मला!” अनघा म्हणाली
ती पुन्हा पाणी उडवते.
“थांब… आता तुला दाखवतो!” अनिकेत म्हणाला
तो मुद्दाम बाईक थोडी पाण्याच्या डबक्यातून चालवतो…
छपाक्क!!
सगळं पाणी तिच्यावर.
“अरे…!” ती किंचाळली.
दोघेही जोरात हसायला लागले.
पाऊस वाढतच होता.
अनघा आता पूर्ण भिजली होती…
केस चेहऱ्यावर चिकटलेले…
डोळ्यांत चमक…
केस चेहऱ्यावर चिकटलेले…
डोळ्यांत चमक…
अनिकेत आरशातून तिच्याकडे बघत होता.
“काय बघतोयस?” अनघा म्हणाली
“खूप सुंदर दिसतेस… अशी भिजलेली… आणि हसताना.” अनिकेत म्हणाला
ती हलकेच त्याच्या पाठीला बिलगली.
त्याच्या कंबरेभोवती हात घट्ट केले.
“थंडी वाजतेय…” ती हळूच म्हणाली.
त्याच्या कंबरेभोवती हात घट्ट केले.
“थंडी वाजतेय…” ती हळूच म्हणाली.
“मग घट्ट पकड मला.” अनिकेत म्हणाला..
ती अजून जवळ आली.
त्या क्षणी
रस्ता… पाऊस… वारा…
सगळं सिनेमासारखं वाटत होतं…
रस्ता… पाऊस… वारा…
सगळं सिनेमासारखं वाटत होतं…
अनिकेत मनात म्हणाला
देवा… ही अशीच हसत राहो आयुष्यभर…
देवा… ही अशीच हसत राहो आयुष्यभर…
घर जवळ आलं.
बाईक थांबली.
दोघे पूर्ण भिजलेले.
एकमेकांकडे बघून पुन्हा हसू फुटलं.
बाईक थांबली.
दोघे पूर्ण भिजलेले.
एकमेकांकडे बघून पुन्हा हसू फुटलं.
“आजचा दिवस बेस्ट होता,” अनघा म्हणाली.
“हों… कारण तू खुश होतीस.” अनिकेत म्हणाला.
ती हळूच म्हणाली
“तू आहेस ना… म्हणून.”
“तू आहेस ना… म्हणून.”
पाऊस अजूनही हलकासा पडत होता…
रस्त्यावर पाण्याचे छोटे छोटे डबके…
बाईकचा स्पीड कमी करत अनिकेत म्हणाला,
“अनघा… थंडी वाजतेय ना? पुढे एक टपरी आहे… चहा घेऊया का?”
“अनघा… थंडी वाजतेय ना? पुढे एक टपरी आहे… चहा घेऊया का?”
अनघाच्या डोळ्यांत चमक आली.
“हो ना… खूप दिवसांनी टपरीवरचा चहा पिऊया!”
“हो ना… खूप दिवसांनी टपरीवरचा चहा पिऊया!”
बाईक बाजूला लावली.
छोटीशी टपरी…
टिनचं छप्पर…
त्यावर पडणाऱ्या पावसाचा टपटप आवाज…
शेजारी वाफाळता चहाचा वास…
टिनचं छप्पर…
त्यावर पडणाऱ्या पावसाचा टपटप आवाज…
शेजारी वाफाळता चहाचा वास…
सगळं किती शांत… किती सुंदर…
दोघेही पूर्ण भिजलेले.
अनघा केस पिळत उभी.
दोघेही पूर्ण भिजलेले.
अनघा केस पिळत उभी.
चहावाला म्हणाला,
“दोन कटिंग?”
“दोन कटिंग?”
अनिकेत हसत म्हणाला,
“हो काका… दोन गरमागरम.”
“हो काका… दोन गरमागरम.”
क्षणात हातात काचेचे छोटे ग्लास आले.
चहातून वाफ निघत होती.
अनघाने दोन्ही हातांनी ग्लास धरला.
“आह्ह… किती छान उब मिळतेय…”
“आह्ह… किती छान उब मिळतेय…”
अनिकेत तिच्याकडे बघतच राहिला.
“काय बघतोयस?” अनघा म्हणाली
“तुला…” अनिकेत म्हणाला
“अरे चहा प्या साहेब,” ती हसली.
तो जवळ आला.
तिच्या गालावरचा पावसाचा थेंब हलकेच पुसला.
“आज तू खूप खुश दिसतेस.”
तिच्या गालावरचा पावसाचा थेंब हलकेच पुसला.
“आज तू खूप खुश दिसतेस.”
“हों… कारण आज खूप दिवसांनी मी मनमोकळं हसले…” अनघा म्हणाली
“आणि?”
ती त्याच्याकडे बघत म्हणाली,
“आणि तू माझ्यासोबत आहेस…”
“आणि तू माझ्यासोबत आहेस…”
क्षणभर दोघं शांत…
फक्त पावसाचा आवाज…
गरम चहा… आणि दोघांचे नजरेतलं प्रेम…
गरम चहा… आणि दोघांचे नजरेतलं प्रेम…
अनिकेतने मुद्दाम तिच्या ग्लासमधला एक घोट घेतला.
“ए… माझा चहा! अनघा म्हणाली
“आपला आहे…” अनिकेत म्हणाला
“खूपच हक्क दाखवतोयस!” अनघा म्हणाली
“तुझ्यावरच तर आहे.” अनिकेत म्हणाला
ती लाजली… हलकेच त्याच्या खांद्यावर मारलं.
दोघे हसत हसत चहा संपवतात.
निघताना चहावाला म्हणाला,
“भिजू नका जास्त… सर्दी होईल.”
“भिजू नका जास्त… सर्दी होईल.”
अनघा म्हणाली,
“काका, आज सर्दी झाली तरी चालेल… पण हा पाऊस मिस करायचा नाही.”
“काका, आज सर्दी झाली तरी चालेल… पण हा पाऊस मिस करायचा नाही.”
अनिकेत हसला,
“ही अशीच आहे… वेडी.”
“ही अशीच आहे… वेडी.”
“तुझी वेडी.” अनघा म्हणाली
तो बाईक सुरु करतो.
ती मागे बसून पुन्हा त्याला बिलगते…
हात घट्ट धरते…
गरम चहाची उब + पावसाची थंडी + प्रेमाची मिठी…
आणि दोघं पुन्हा घरी निघतात…
---
पाऊस अजूनही रिमझिम पडत होता…
अनिकेतने बाईक हळूच घरासमोर थांबवली.
दोघेही पूर्ण भिजलेले…
केस ओले… कपडे ओले…
पण चेहऱ्यावर मात्र मोठ्ठं हसू.
पण चेहऱ्यावर मात्र मोठ्ठं हसू.
अनघा खाली उतरली.
“अरे देवा… किती भिजलो आपण!” ती हसत म्हणाली.
“तूच पाणी उडवत होतीस माझ्यावर…” अनिकेत खोटा राग करत म्हणाला.
“मी? तूच आधी सुरुवात केली होतीस!” अनघा म्हणाली
दोघे पुन्हा लहान मुलांसारखे भांडायला लागले.
इतक्यात दरवाजा उघडला.
आजोबा उभे होते.
दोघांकडे बघून थक्क झाले.
“अरे बापरे! तुम्ही दोघं पावसात आंघोळ करून आलात का?”
अनघा हसत म्हणाली,
“आजोबा… पाऊस खूप छान होता… थांबवलंच नाही स्वतःला.”
“आजोबा… पाऊस खूप छान होता… थांबवलंच नाही स्वतःला.”
“छान आहे गं… पण आधी आत जा. सर्दी झाली तर माझ्याकडे येऊ नका रडत!” आजोबा म्हणाले
अनिकेत म्हणाला,
“हो हो डॉक्टर साहेब!”
“हो हो डॉक्टर साहेब!”
आजोबा टॉवेल घेऊन आले.
“हे घ्या… आधी डोकं पुसा दोघांनी.”
अनघाने टॉवेल घेतला.
अनिकेतचे केस पुसायला लागली.
अनिकेतचे केस पुसायला लागली.
“अरे मी करतो ना…” अनिकेत म्हणाला
“गप बस… सर्दी झाली तर मला औषध द्यावं लागेल.” अनघा म्हणाली
आजोबा ते दोघं बघत हसत होते.
“काय जोडी आहे रे तुमची…”
“काय जोडी आहे रे तुमची…”
अनिकेत म्हणाला,
“आजोबा, टपरीवरचा चहा पण पिऊन आलो.”
“आजोबा, टपरीवरचा चहा पण पिऊन आलो.”
“वा! मग तर पूर्ण मजा केलीत तुम्ही.” आजोबा म्हणाले
घरात एक वेगळीच उब आली होती.
ओल्या कपड्यांचा वास, गरम घर, आजोबांचं प्रेम…
अनघा म्हणाली,
“मी पटकन फ्रेश होऊन येते.”
“मी पटकन फ्रेश होऊन येते.”
“मी पण,” अनिकेत म्हणाला.
दोघं रूममध्ये गेले.
मनात मात्र एकच भावना…
आजचा दिवस खूप सुंदर होता.
आणि एकत्र असल्यामुळे अजून सुंदर झाला…
मनात मात्र एकच भावना…
आजचा दिवस खूप सुंदर होता.
आणि एकत्र असल्यामुळे अजून सुंदर झाला…
---
अनघा फ्रेश होऊन बाहेर आली.
केस अजून थोडे ओले…
साधा नाईट ड्रेस…
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक…
साधा नाईट ड्रेस…
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक…
अनिकेत आधीच बेडवर टेकून बसला होता.
ती त्याच्या शेजारी येऊन बसली.
दोघं काही क्षण काहीच बोलले नाहीत…
फक्त शांतता…
आणि खिडकीबाहेर पडणारा हलका पाऊस…
अनिकेत हळूच म्हणाला,
“अनघा…”
“अनघा…”
“हं…”
“आजची संध्याकाळ खूप छान गेली ना…”
ती हलकंसं हसली.
“खूपच… किती दिवसांनी असं मोकळं वाटलं.”
“खूपच… किती दिवसांनी असं मोकळं वाटलं.”
“ऑफिसचा पहिला दिवस… मग डिनर… पाऊस… चहा…”
“आणि तू,” ती मध्येच म्हणाली.
अनिकेत तिच्याकडे बघत हसला.
“मी तर रोज असतो.”
“मी तर रोज असतो.”
“नाही… आज तू जरा जास्त स्पेशल होतास.” ती म्हणाली
“का बरं?” अनिकेत म्हणाला
“माहित नाही… पण आज पुन्हा असं वाटलं… आपण नव्याने प्रेमात पडलोय.”
तो तिचा हात हातात घेतो.
“तू खुश असतेस ना… ते बघून मला सगळं मिळाल्यासारखं वाटतं.”
अनघा थोडी भावुक झाली.
“तुला माहिती आहे… आज ऑफिसमध्ये काम करताना मला वाटलं… मी पुन्हा स्वतःला शोधतेय…” अनघा म्हणाली
“आणि मी नेहमी तुझ्यासोबत आहे… काहीही झालं तरी.” अनिकेत म्हणाला
ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते.
“थँक यू… माझ्यासाठी इतकं सगळं केल्याबद्दल.” अनघा म्हणाली
“थँक यू नको… फक्त असंच हसत रहा.” अनिकेत म्हणाला
क्षणभर दोघं शांत…
फक्त एकमेकांच्या जवळ…
अनिकेत हळूच म्हणाला,
“चल आता झोपूया… नाहीतर उद्या ऑफिसला उशीर होईल मॅडम.”
“चल आता झोपूया… नाहीतर उद्या ऑफिसला उशीर होईल मॅडम.”
ती हसली.
“हो साहेब…”
“हो साहेब…”
लाईट बंद झाला…
खिडकीबाहेर पाऊस…
आत मात्र प्रेमाची उब…
आणि दोघं शांत झोपी गेले…
खिडकीबाहेर पाऊस…
आत मात्र प्रेमाची उब…
आणि दोघं शांत झोपी गेले…
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा