Login

तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 68

ही कथा आहे अनिकेत आणि अनघा यांच्या संसाराची प्रेम, संघर्ष आणि विश्वासावर उभ्या असलेल्या नात्याची.लग्नानंतर त्यांना अनेक अडचणी, गैरसमज, संसाराचे ताण आणि जबाबदाऱ्या सामोऱ्या येतात.पण परिस्थिती कशीही असो, दोघं एकमेकांच्या सोबत उभे राहतात.त्यांचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाईल, कोणते वळण देईल
तुझ्या माझ्या संसाराला आणखी  काय  हवं  भाग - 68



सकाळपासूनच अनघा शांत होती

हाताने सगळं काम करत होती…  पण मनात कालचे शब्द फिरत होते.

“मोनिकाला घेऊन कशाला जाशील…”
ते वाक्य अजून टोचत होतं.

अनिकेत तिला बघत होता.

ती हसण्याचा प्रयत्न करत होती… पण डोळ्यात थोडी उदासी दिसत होती.

अनिकेत मनातच म्हणाला

“ही मुलगी किती समजूतदार आहे…
आईला किती समजवू मी… खरंच आता कंटाळा आलाय…”

तो तिच्या जवळ आला.

“टेंशन घेऊ नकोस… कामावर लक्ष दे. बाकी मी बघतो.”

अनघा हलकंसं हसली.
“हों…”


---

ऑफिसमध्ये पोहोचताच… ती सरळ तिच्या केबिनमध्ये गेली.
लॅपटॉप उघडला… फाईल्स उघडल्या…
काम सुरू केलं. अनघाची एक सवय होती कामात पडली की सगळं विसरायची.
मन लावून, नीट, शांतपणे काम करत होती.

तेवढ्यात…

रोनकच्या केबिनमधून मोठा आवाज आला.
“हे काय आहे? किती वेळा सांगितलंय मी!!”

अनघा दचकली.
ती पटकन उठून तिकडे गेली.

“रोनक… काय झालं? एवढं का ओरडत आहेस?” अनघा म्हणाली.

रोनक चिडलेला.

“स्टाफ नीट कामच करत नाही. सगळीकडे मलाच बघावं लागतंय. कुणावर विश्वास ठेवू कळत नाही.”

तो खरंच निराश दिसत होता.

अनघा शांतपणे ऐकत होती.

तिच्या डोक्यात अचानक विचार चमकला.
“मोनिका इथे आली तर?
ती मेहनती आहे… शिकेल पटकन… घरातलंही सगळं शांत होईल…”

तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं.

“काय विचार करतेयस?” रोनकने विचारलं.

अनघा थोडी संकोचली… पण बोलली

“माझी एक फ्रेंड आहे… खूप प्रामाणिक आहे… काम छान करते…
आपण तिला कंपनीत जॉईन करून घेऊ का?”

रोनक थोडा विचारात पडला.

“हं… आधी इंटरव्यू घेईन. जर इंटरव्यू चांगला दिला… तर लगेच जॉईन.”

अनघाच्या चेहऱ्यावर आनंद चमकला.
“खरंच? थँक्यू! मी उद्याच तिला बोलावते.” अनघा म्हणाली..

“Done,” रोनक हसत म्हणाला.


---

अनघा बाहेर आली…
मन हलकं झालं होतं.
“आई… आता तरी रागावणार नाहीत…” ती मनातच हसली.

पहिल्यांदाच तिला वाटलं आज ऑफिसला येणं किती योग्य ठरलं


---


ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये उभी राहून अनघाने मोबाईल काढला.

मोनिकाचा नंबर डायल केला.
फोन वाजत होता…
दोन रिंग… तीन रिंग…

“हॅलो…”
मोनिकाचा आवाज थोडा थकलेला, उदास.

अनघाला लगेच कळलं अजूनही ती नाराज आहे.

“काय करतेयस?” अनघा हळू आवाजात म्हणाली.

“काही नाही… घरीच आहे… जॉब नाही लागला ना आज पण…” ती जबरदस्ती हसली.

अनघाचं मन भरून आलं.

“मोनिका… उदास होऊ नको गं.” अनघा म्हणाली.

“हम्म… सवय झालीये आता.” मोनिका म्हणाली

क्षणभर शांतता.

अनघा अचानक उत्साहात म्हणाली

“ऐक! उद्या इंटरव्ह्यूला येशील का?” अनघा म्हणाली.

“कुठे?” मोनिका दचकली.

“आमच्या कंपनीत.” अनघा म्हणाली.

“काय? खरंच??” मोनिका म्हणाली.

“हो. मी रोनक सरांशी बोलले.
स्टाफ हवा आहे त्यांना. तू ये… इंटरव्ह्यू दे… बाकी मी आहे ना.”

फोनच्या दुसऱ्या बाजूला काही सेकंद शांतता…

मग हलकासा रडका आवाज

“अनघा … खरंच बोलतेयस?” मोनिका म्हणाली.

“अगं वेडी… खोटं कशाला बोलेन?” अनघा म्हणाली.

“मला वाटलं… कुणाला माझी आठवणच नाही…” मोनिका म्हणाली

अनघा हसली.

“तू माझी फ्रेंड आहेस की नाही? तुला सोडून मी एकटी कशी जॉब करणार?” अनघा म्हणाली.

मोनिका हलकंसं हसली.

“आईला सांगितलं तर ती तर उड्या मारेन आनंदाने.” मोनिका म्हणाली

“मग तयार हो उद्या. रेझ्युमे घेऊन ये. वेळेवर ये हं!” अनघा म्हणाली

“हो मॅडम!” ती चिडवत म्हणाली.

दोघी हसू लागल्या.

फोन कट झाल्यावर…

अनघाच्या मनात एक समाधान होतं.
आज कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं…

आणि दुसरीकडे…

मोनिका बेडवर बसून मोबाईलकडे बघत होती…
डोळ्यात पाणी… पण यावेळी आनंदाचं होता
“थँक्यू अनघा …” ती स्वतःशीच पुटपुटली.


---


अनघाला खूप आनंद झाला होता.

फोन ठेवला तरी तिच्या चेहऱ्यावरचं हसू काही जात नव्हतं.

मन अगदी हलकं झालं होतं.

“मोनिकाला मदत करता आली… आता सगळं ठीक होईल…”
ती मनातच म्हणाली.

ती लगेच कामाला लागली.

आज तर कामही जास्त उत्साहाने करत होती.

एकेक फाईल पटकन पूर्ण करत होती.

सीमा आणि करिष्मा तिच्या केबिनमध्ये आल्या.

“काय मॅडम, आज खूप खुश दिसताय?” सीमा हसत म्हणाली.

“हो गं… थोडं personal good news आहे,” अनघा हसत म्हणाली.

“मग पार्टी पाहिजे!” करिष्मा म्हणाली.

तीघी मस्त हसल्या… थोड्या गप्पा मारल्या.

आजची मिटिंग पण खूप छान झाली होती.

रोनकने सुद्धा तिचं कौतुक केलं.

“Good work, Anagha,” तो म्हणाला.

दिवस खूप छान गेला.

त्या आनंदातच अनघा घरी आली.


---

घरी येताच…

ती मस्त फ्रेश झाली.
केस सावरले… कपडे बदलले…
किचनमध्ये जाऊन चहा ठेवला.

तेवढ्यात अनिकेतही आला.

“अगं, आज खूप खुश दिसतेस?” तो म्हणाला.

अनघा थांबलीच नाही.
तिने सगळं सांगितलं
ऑफिस, रोनक, इंटरव्ह्यू… मोनिका…

सगळं. अनिकेतच्या चेहऱ्यावरही आनंद आला.

“खरंच? हे तर खूप छान झालं! आईचाही राग कमी होईल आता.” अनिकेत म्हणाला

“हों ना,” अनघा हसली.

ती चहा घेऊन आली.

तेवढ्यात आजोबा पण आले.

दोघांकडे बघून हसत म्हणाले

“आज जोडी खूप आनंदात दिसत आहे बरं!” ते म्हणाले

अनघा लाजली.

“गोष्ट तशी आहे…” ती म्हणाली.

“अशी काय गोष्ट आहे आनंदी होण्यासारखी?” आजोबा उत्सुकतेने म्हणाले.

अनघाने सगळं नीट सांगितलं.

मोनिकासाठी इंटरव्ह्यू…
रोनकशी बोलणं…
सगळं.

आजोबांच्या चेहऱ्यावर समाधान आलं.

“खूप छान केलंस बाळा…
दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद आणणं म्हणजे मोठं पुण्य असतं.”

अनघाच्या डोळ्यात चमक आली.

मग तिघेही निवांत बसून चहा पीत गप्पा मारत बसले…

घरात छान ऊबदार वातावरण होतं.


---

दुसरीकडे…

मोनिका घरी आली होती. ती पण खुश दिसत होती.
ललिता तिच्याकडे बघत म्हणाल्या

“मोनिका, कोणाचा कॉल होता? तू आनंदी दिसते आहेस.” ललिता म्हणाल्या

मोनिका हसत म्हणाली

“आई… मला एका ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलवलं आहे.
सकाळी लवकर जावं लागेल.” अनघा म्हणाली

“व्वा! मस्त आहे!
आता तुला जॉब नक्की लागेल,” ललिता आनंदाने म्हणाल्या.

त्यांच्या आवाजात खराखुरा आनंद होता.

अशोक म्हणाले
“घाबरायचं नाही. मस्त बोलायचं. कॉन्फिडन्सने दे इंटरव्ह्यू.”

“हो बाबा,” मोनिका हसली.

घरात सगळे आनंदात होते…
बर्‍याच दिवसांनी त्या घरातही हलकंसं हसू पसरलं होतं

---

रात्री अनघाने स्वयंपाकघर आवरायला घेतलं.

भांडी धुतली…
उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवलं… ओटा नीट पुसून घेतला…

सगळं टापटीप करून ठेवायची तिची सवयच होती.

तेवढ्यात आजोबा आले.

“चल, जेवण वाढ,” ते हसत म्हणाले.

“हो, लगेच,” अनघा म्हणाली.

तीनही जण एकत्र बसून जेवायला लागले.

जेवताना मस्त गप्पा रंगल्या.

आजोबा ऑफिसच्या जुन्या गोष्टी सांगत होते…
अनिकेत मध्येच चिडवत होता… अनघा हसत ऐकत होती.

घरात खूप दिवसांनी असं निवांत, आनंदी वातावरण होतं.

अनघाने आजोबांना प्रेमाने वाढून दिलं.

“आणखी घ्या ना थोडं,” ती म्हणाली.

“अगं पोट भरलं ग… तू पण बस शांतपणे,” आजोबा हसले.

जेवण झाल्यावर तिघेही थोडावेळ हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते.

आजोबा अनघाकडे बघत म्हणाले

“उद्या तुला ऑफिस आहे ना… उशीर करू नकोस. झोपायला जा लवकर.” ते म्हणाले

“हों आजोबा,” अनघा म्हणाली.

आजोबा जास्त वेळ थांबले नाहीत.

“मी निघतो आता. तुम्ही पण लवकर झोपा.”

अनघा आणि अनिकेत दोघेही उठले.

त्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेले.

“गुडनाईट आजोबा,” दोघांनी एकत्र म्हटलं.

“गुडनाईट बाळांनो… काळजी घ्या,” ते प्रेमाने म्हणाले.

आजोबा त्यांच्या घरी निघून गेले.

अनघा आणि अनिकेत एकमेकांकडे बघून हलकंसं हसले.

घर पुन्हा शांत झालं…

निवांत… उबदार… समाधानाने भरलेलं होती.


---



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all