तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवं भाग - 69
सकाळी मोनिका खूप आनंदात उठली. ती पटापट आवरू लागली. चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. ललितांनी तिच्यासाठी नाश्ता आणि चहा बनवून दिला. तृप्ती गावाला निघून गेली होती. लग्नाला जास्त दिवस बाकी नव्हते. तिच्या बाबांसोबत तिला राहायचं होतं, त्यामुळे ती आधीच गेली होती. घरात थोडी शांतता होती, पण मोनिकाच्या इंटरव्ह्यूमुळे सगळ्यांच्या मनात हलकासा आनंद होता.
मोनिकाने नाश्ता केला. अनघाने तिला ऍड्रेस दिला होता. तो मोबाईलमध्ये नीट बघून ती तिथे जायला निघाली. मनात थोडी भीती, थोडा उत्साह, थोडी धडधड… पण आज काहीतरी चांगलं होणार, अशी भावना होती.
दुसरीकडे अनघा पण आवरत होती. तिने डब्बा, नाश्ता सगळं तयार करून घेतलं होतं. घर नीट लावून तीही ऑफिसला जाण्यासाठी निघाली.
मोनिका कंपनीजवळ पोहोचली. मोठी बिल्डिंग बघून तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती ऑफिसमध्ये जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेली. तिच्यासोबत त्याच वेळी अजून एक जण लिफ्टमध्ये आला. गडबडीत मोनिकाला थोडं लागलं.
“तुम्हाला दिसत नाही का? दोन डोळे दिले आहेत. समोर दिसत नाही का?” मोनिकाचं तोंड चालूच होतं. ती आधीच थोडी नर्व्हस होती, त्यात आता तिचा मूड ऑफ झाला होता.
“तुम्हाला मी काय गोष्ट सांगत आहे का? माझ्या तोंडाकडे बघत आहात. कधी मुलगी बघितली नाही आहे का?” मोनिका चिडून म्हणाली.
समोरचा शांतपणे म्हणाला, “मुली बघितल्या आहेत… पण तुझ्यासारखी फटका नाही बघितली.”
तो रोनक होता. रोनकही तिच्यासोबतच लिफ्टमध्ये आला होता. त्याला मोनिका एका नजरेत आवडली होती. तो नकळत तिच्याकडेच बघत होता.
मोनिका अजूनही बडबड करत होती. तेवढ्यात लिफ्ट थांबली. मोनिका लगेच बाहेर निघून गेली… अगदी हवेप्रमाणे गायब झाली.
रोनक मात्र तिच्याकडे बघतच राहिला… हलकंसं हसत.
---
मोनिकाने रिसेप्शनवर अनघाची केबिन विचारली. तिला अनघाची केबिन दाखवली. मोनिकाने “थँक्यू” म्हणत स्मित केलं आणि सरळ अनघाच्या केबिनमध्ये गेली.
दुसरीकडे रोनकही त्याच्या केबिनमध्ये गेला. तो खुर्चीवर बसला, पण त्याचं लक्ष काही कामात लागत नव्हतं. “अरे, कोण होती ती… किती छान होती. अगदी फटाका आहे. मला खूप आवडली. पण ती लगेच निघून गेली. मला परत कधी दिसेल? कोणाला भेटायला आली असेल?” तो स्वतःशीच विचार करत होता. त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं होतं.
मोनिका अनघाच्या केबिनमध्ये गेली.
“मोनिका, ये… ऑफिस लगेच भेटलं ना?” अनघा हसत म्हणाली.
“ऑफिस भेटलं गं, पण लिफ्टमध्ये एक येडपट भेटला होता. त्याने डोकंच भिरवलं,” मोनिका चिडचिड करत म्हणाली.
“ते जाऊ दे. आता इंटरव्ह्यूवर फोकस कर. आपल्याला जॉब हवा आहे. नाहीतर आई येतील आणि मला बोलून जातील,” अनघा हसत म्हणाली.
“आता आई तुला काही बोलणार नाही. तू त्याचं काहीच टेन्शन घेऊ नको,” मोनिका म्हणाली.
“बरं, मी ऑफिस बॉयला बोलावते. तो तुला इंटरव्ह्यूसाठी रोनककडे घेऊन जाईल,” अनघा म्हणाली.
“रोनक कोण आहे?” मोनिका विचारत म्हणाली.
“आजोबांचा पुतण्या आहे. जरा प्रेमाने घे, शांततेत बोल. आपल्याला जॉब हवा आहे… हा विचार कर,” अनघा समजावत म्हणाली.
“हों,” मोनिका मान हलवत म्हणाली.
अनघाने ऑफिस बॉयला बोलावलं आणि मोनिकाला रोनकच्या केबिनमध्ये घेऊन जायला सांगितलं.
---
ऑफिस बॉय मोनिकाला घेऊन रोनकच्या केबिनसमोर आला. “मॅडम, इथे इंटरव्ह्यू आहे,” असं म्हणत त्याने दार हलकंसं ठोठावलं. “सर, कॅन्डिडेट आली आहे,” तो म्हणाला. आतून रोनकचा आवाज आला, “हो, पाठवा.”
मोनिकाने खोल श्वास घेतला. “चल मोनिका… शांत राहा… नीट बोलायचं,” ती स्वतःलाच समजावत होती. तिने दार उघडलं आणि आत पाऊल टाकलं.
रोनक टेबलावर फाईल्स बघत बसला होता. “Please, come in… have a seat,” तो खाली बघतच म्हणाला.
मोनिका खुर्ची ओढून बसणार इतक्यात रोनकने वर बघितलं… आणि दोघांचे डोळे एकदम मोठे झाले.
क्षणभर दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले.
“तू…??” दोघांच्याही तोंडातून एकदम बाहेर पडलं.
मोनिकाच्या चेहऱ्याचा रंग बदलला. “हा तोच… लिफ्टमधला येडपट… अरे देवा!” ती मनात म्हणाली.
रोनकच्या ओठांवर हलकंसं स्मित आलं. “अरे वा… फटका मॅडम… इंटरव्ह्यूसाठी?” तो मनातच हसला.
मोनिका लगेच सावरली. “सॉरी सर… मला माहिती नव्हतं…” ती गोंधळून म्हणाली.
“कशासाठी सॉरी?” रोनक मुद्दाम गंभीर चेहरा करून म्हणाला.
मोनिका अडखळत म्हणाली, “म्हणजे… लिफ्टमध्ये… मी जरा… जास्त बोलले…”
रोनक खुर्चीत मागे टेकला. “हो, आठवतंय… दोन डोळे दिले आहेत… दिसत नाही का… असं काहीतरी म्हणत होती ना तुम्ही?” तो चिडवत म्हणाला.
मोनिकाला जमीन फाटून आत जावंसं वाटलं. “देवा, आजचं इंटरव्ह्यू तर गेलं…” ती मनात म्हणाली.
क्षणभर शांतता पसरली… मग रोनक हलकंसं हसला. “Relax. इंटरव्ह्यू आहे, भांडण नाही. आरामात बसा.”
त्याच्या आवाजातला मवाळपणा ऐकून मोनिकाचा ताण थोडा कमी झाला.
रोनकने तिची फाईल घेतली. “तर मिस मोनिका… स्वतःबद्दल सांगा.”
मोनिका हळूहळू कॉन्फिडन्समध्ये आली. ती नीट उत्तर देऊ लागली. तिचं बोलणं, तिचा आत्मविश्वास, तिची प्रामाणिकता रोनक शांतपणे बघत होता. मध्येच तो तिच्याकडे पाहून हसत होता.
“काम चांगलं केलंत तर ऑफिसमध्ये पण असंच भांडणार का सगळ्यांशी?” त्याने मिश्किलपणे विचारलं.
मोनिका पण आता हसली. “नाही सर… फक्त येडपट लोकांशीच.”
दोघेही नकळत हसले. केबिनमधलं वातावरण हलकं, मजेशीर झालं.
रोनक मनात म्हणाला, “ही मुलगी वेगळीच आहे… खूप खरी, खूप जिवंत…”
इंटरव्ह्यू संपताना तो म्हणाला, “ठीक आहे. आम्ही तुम्हाला कळवू… पण personally सांगतो, तुमचं performance मला आवडलं.”
मोनिकाच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. “Thank you, sir,” म्हणत ती बाहेर पडली.
रोनक मात्र तिच्याकडे जाताना बघत राहिला… आणि स्वतःशीच हसत पुटपुटला, “ही फटका पुन्हा भेटलीच पाहिजे…”
---
मोनिका केबिनच्या बाहेर आली, पण तिचं हृदय अजूनही धडधडत होतं. “देवा… काय इंटरव्ह्यू होता हा! सुरुवातीलाच त्याच्याशी भांडले… आणि तोच इंटरव्ह्यू घेणारा निघाला,” ती स्वतःशीच पुटपुटली. तरीही तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. रोनकचा शेवटचा आवाज ‘तुमचं performance मला आवडलं’ सतत कानात घुमत होता.
ती सरळ अनघाच्या केबिनमध्ये गेली.
“काय गं? कसा झाला इंटरव्ह्यू?” अनघा उत्सुकतेने उठून विचारलं.
मोनिका खुर्चीत बसली आणि दोन्ही हाताने डोकं धरत म्हणाली, “तुला सांगू? लिफ्टमधला तोच येडपट… तोच रोनक निघाला!”
“कायss?” अनघा मोठ्याने हसली. “म्हणजे तू ज्याच्याशी भांडलीस, त्याचाच इंटरव्ह्यू दिलास?”
“हो गं! आणि मी त्याला काय काय बोलले… दोन डोळे दिले आहेत का वगैरे…” मोनिका लाजत म्हणाली.
अनघा तर पोट धरून हसू लागली. “देवा, तू ना भारीच आहेस!”
“पण… तो वाईट नाही वाटला. शांतपणे बोलला… मदतच केली. शेवटी म्हणाला performance आवडलं,” मोनिका हळू आवाजात म्हणाली. तिच्या डोळ्यात नकळत चमक होती.
“मग झालं! तुझा जॉब पक्का,” अनघा आनंदाने म्हणाली.
दुपारनंतर काम चालू असतानाच ऑफिस बॉय आला. “मॅडम, रोनक सरांनी मोनिका मॅडमला बोलवलं आहे,” तो म्हणाला.
मोनिकाचं परत टेन्शन वाढलं. “आता काय झालं?”
ती परत केबिनमध्ये गेली.
रोनक टेबलवर काही कागद बघत होता. तिला पाहून तो हसला. “Congratulations, मिस मोनिका. तुम्ही select झाला आहात. उद्यापासून जॉईन करू शकता.”
क्षणभर मोनिका काही बोलूच शकली नाही. “खरंच…?”
“हो. आणि हो… लिफ्टमध्ये भांडण नाही केलंत तर अजून बरं,” तो मिश्कीलपणे म्हणाला.
मोनिका हसली. “सर, आता सांभाळून बोलेन.”
“Good. Welcome to the team,” म्हणत त्याने हात पुढे केला.
मोनिकाने त्याचा हात हातात घेतला… दोघांच्या नजरा क्षणभर भिडल्या… आणि दोघेही नकळत हसले.
बाहेर येताच ती धावतच अनघाकडे आली. “अनघाssss… मला जॉब लागला!”
अनघाने तिला घट्ट मिठी मारली. “माहित होतं मला!”
दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.
मग मोनिका घरी निघून गेली
संध्याकाळी घरी गेल्यावर मोनिकाने दार उघडताच मोठ्याने ओरडली, “आई… मला जॉब लागला!”
ललिता थबकल्या. “खरंच?”
“हो!”
ललिताने लगेच तिच्या डोक्यावरून हात फिरवला. “माझी मुलगी आहेच हुशार.”
अशोकही हसले. “वा, आज पार्टी पाहिजे मग!”
घरात पुन्हा हसू, गडबड, आनंद पसरला.
आणि दुसरीकडे रोनक त्याच्या केबिनमध्ये बसून मोबाईलकडे बघत हसत होता. “फटका मॅडम… उद्यापासून रोज भेटणार,” तो मनात म्हणाला.
---
क्रमश
मोनिका आणी रोनक याचे काय होईल? त्यांची मस्ती बघायला आवडेल का? .....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा