मधुरा खुश होती. तिचा हा वाढदिवस खूप स्पेशल होता. स्वराजने दिलेला टेडी घट्ट पकडून झोपली.
'स्वराज, वेगळाच आहे. चारचौघापेक्षा वेगळा. आधी फोन करून सांगितले येणार नाही आणी बरोबर आला. मी किती विचार करतेय. इतका विचार मी कधीच केला नाही. मधुरा, तुला तो आवडायला लागला आहे का?' तिच्या चेहऱ्यावर वेगळीच लाजेची लाली आली.
फोन वाजला.
पाहते तर काय स्वराजचा फोन.
त्याचा विचार करत होते आणि त्यांचाच कॉल आला.
त्याचा विचार करत होते आणि त्यांचाच कॉल आला.
स्मितहास्य करत तिने फोन घेतला.
"हॅलो स्वराज."
"हॅलो मधुरा. झोपली नाही?"
"आता तुझ्याशी बोलतेय ह्याचा अर्थ मी जागीच आहे." असं बोलून ती हसायला लागली.
"बोल कशासाठी फोन केला?"
"मधुरा." त्याच्या आवाजात एक शांतपणा होता.
क्षणभर शांत बसला.
"स्वराज, बोल."
"मधुरा, त्या टेडीमध्ये काहीतरी आहे."
"काय आहे?"
"तू बघ."
"अजून एक गिफ्ट आहे का?"
"हो असंच समज."
"बरं तू फोनवर थांब बघते मी."
"थांब, तू निवांत बघ. मी फोन ठेवतो." त्याने पटकन कॉल कट केला.
त्याचे हातपाय थंड पडले. श्वासांची गती वाढली.
'असं काय लहान मुलासारखा करतोय? असं काय दिलं आहे?'
तीने टेडीला चाचपडून पाहिले, टेडीच्या पोटापाशी चेन होती तिने पाहिले तर एक चिट्ठी होती.
तिला कुतूहल वाटले.
बेडवर बसली.
चिट्ठी वाचू लागली.
"प्रिय मधुरा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर हा खूप स्पेशल दिवस आहे.
खरंतर तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत होत नव्हती, म्हणून चिठ्ठी लिहिली आहे. मधुरा, मला तू खूप आवडते. अगदी मनापासून. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच तुझ्या प्रेमात पडलो."
हे वाचून मधुराचे डोळे भरून आले. श्वासाची गती वाढली. तिला हे वाचून छानच वाटलं.
तिलाही तो आवडायला लागला होता.
तिलाही तो आवडायला लागला होता.
पुढे वाचू लागली.
मधुरा, तुझ्यासाठी ज्या भावना आहेत त्या वेगळ्या आहेत. तू जेव्हा माझ्यासमोर असते तेव्हा तुझ्या डोळ्यात हरवून जातो. तुझ्यात जादू आहे आणि हे आकर्षण नाही हे प्रेम आहे. तुझ्यासोबत मला हे आयुष्य जगायला आवडेल. माझी लाईफ पार्टनर होशील का? माझ्याशी लग्न करशील का? तुझ्या उत्तराची वाट पाहतोय.
'होय स्वराज.' नकळतपणे आवाज आला.
इथे स्वराज तिच्या उत्तराची वाट पाहत होता.
'मधुरा काय विचार करत असेल? हो बोलेल का?'
त्याचं मन मधुराच्या होकाराची वाट पाहत होते.
हाजीर तो वजीर असंच झालं ना?
स्वराजने मनातल्या भावना मधुरासमोर मांडल्याही आणि केशव मात्र एक्सप्रेस करू शकला नाही.
त्याची अवस्था काय होईल? जेव्हा त्याला कळेल की स्वराजने मधुराला प्रपोज केलं आहे?
क्रमशः
अश्विनी ओगले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा