तुझ्यात जीव गुंतला भाग १५
बघता बघता वर्ष कसे निघून गेले समजले नाही.
बघता बघता वर्ष कसे निघून गेले समजले नाही.
केशव आणि विलास दोघे संपर्कात होते. परीक्षा झाल्या होत्या.
एक दिवस अर्चनाने मधूराला फोन केला आणि सगळे बाहेर फिरायला जाऊया असे सांगीतले. तिलाही कल्पना आवडली, कारण वर्षभर ते कुठेच गेले नव्हते. मधुरा तयार होती. ती तयार आहे म्हंटल्यावर स्वराज देखील तयार झाला. अर्चनाने विलासला फोन करून कल्पना दिली.
एक दिवस अर्चनाने मधूराला फोन केला आणि सगळे बाहेर फिरायला जाऊया असे सांगीतले. तिलाही कल्पना आवडली, कारण वर्षभर ते कुठेच गेले नव्हते. मधुरा तयार होती. ती तयार आहे म्हंटल्यावर स्वराज देखील तयार झाला. अर्चनाने विलासला फोन करून कल्पना दिली.
“बरं मी विचार करून सांगतो.”
त्याला माहीत होते की, केशव काही केल्या येणार नाही.
केशवला सोडून जाणे त्याला पटत नव्हते, म्हणून तो अर्चनाला काहीच बोलला नाही.
त्याला माहीत होते की, केशव काही केल्या येणार नाही.
केशवला सोडून जाणे त्याला पटत नव्हते, म्हणून तो अर्चनाला काहीच बोलला नाही.
“काय हे विलास? आता तू काय मुहूर्त बघून सांगणार आहेस का? सतत आपलं नाहीचा पाढा. एकदा सगळे बिझी झाले ना तर वेळ देखील मिळणार नाही. मला माहीत नाही, तुला यायचं आहे.”
“अर्चना तू बरोबर बोलतेय; पण आधी काही प्लॅन तर नाही ना हे बघावं लागेल.”
“मला चांगलं माहीत आहे तू असं का बोलतो आहे.”
“तुझी गर्लफ्रेंड येणार असेल तरच तू येणार.”
“काय बोलतेय? माझी कोणीही गर्लफ्रेंड नाही.”
“केशव?”
“अर्चना तू काहीही बोलते.”
“बघ काय ते ठरव आणि सांग मला.”
असं बोलून तिने फोन ठेवून दिला.
‘ही मुलगी वेडी झाली आहे, काहीही बडबड करते. बघतो केशव काय बोलतो. ’
तितक्यात केशवचा फोन आला.
“हॅलो विलास. कसा आहेस?”
“मी मस्त. तू कसा आहेस?”
“मी मस्त.”
“तुलाच फोन करणार होतो.” विलास म्हणाला.
“का काही काम होतं का?”
“अर्चनाचा फोन होता. बोलत होती की सगळे फिरायला जाऊया.”
“मग तू काय म्हणाला?”
“तिला सांगितलं विचार करतो आणि सांगतो, तर खूप चिडली. म्हणे तुझी गर्लफ्रेंड येणार असेल तर तू येशील का?
“विलास, तुझी गर्लफ्रेंड आहे आणि मला माहीत नाही.”
“केशव,काहीही काय? माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी तुला सांगतो आणि इतकी मोठी गोष्ट तुला सांगणार नाही का?”
“हम्म.”
“तीचं म्हणण आहे की, माझी गर्लफ्रेंड तू आहे. तू येणार नसशील तर मी देखील येणार नाही.”
हे ऐकुण तो जोरजोरात हसायला लागला.
“खरंच वेडी आहे ती पोरगी.” विलास.
“हो तुझ्या प्रेमात.” केशव पुटपुटला.
“केशव, काही म्हणाला?
“काही नाही.”
“बरं तू येणार आहेस का? तू जर येणार असशील तरच मी ग्रीन सिग्नल देणार.”
“हो.”
“खरंच की काय?”
“हो शंभर टक्के खरं.”
“मला वाटलं की तू येणार नाही.”
“विलास, खरंच आपले मार्ग वेगळे होणार आहेत. किती दिवस झाले मधुराला डोळे भरून पाहिले नाही. ह्या काळात खूप दूर गेलो. मनाची समजूत घातली आहे ती माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही; पण माझं तिच्यावर जिवापाड प्रेम आहे हे देखील एक सत्य आहे. पुन्हा तिचा सहवास अनुभवायचा आहे. पुन्हा तिला डोळे भरून पहायचे आहे.”
“बरोबर बोलतो आहेस. ठीक आहे मी अर्चनाला सांगतो.”
‘मधुरा, खूप दूर जात होतो. कळलं आहे मला काही केलं तरी तुझ्या पासून दूर होणं अशक्य. आता पळवाट नको.’
केशव ह्या काळात बराच स्थिरावला होता.
क्रमश:
अश्विनी ओगले
अश्विनी ओगले
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा