गुंतला तुझ्यात जीव भाग ५
दुसऱ्या दिवशी मधुरा कॉलेजला जायला तयार झाली. व्हाईट जीन्स त्यावर गुलाबी रंगाचं शर्ट. गळ्यात सोन्याची चेन जी तिच्या बाबांनी पहिल्या वाढदिवसाला गिफ्ट केली होती. ती चेन तिच्या जिवापलीकडे होते. त्यात गणपतीचे लॉकेट देखील होतं. बाबांचा आशीर्वाद होती ती चेन.
दुसऱ्या दिवशी मधुरा कॉलेजला जायला तयार झाली. व्हाईट जीन्स त्यावर गुलाबी रंगाचं शर्ट. गळ्यात सोन्याची चेन जी तिच्या बाबांनी पहिल्या वाढदिवसाला गिफ्ट केली होती. ती चेन तिच्या जिवापलीकडे होते. त्यात गणपतीचे लॉकेट देखील होतं. बाबांचा आशीर्वाद होती ती चेन.
"आई, गुड मॉर्निंग."
"गुड मॉर्निंग मधु." तिच्याकडे पहात म्हणाली.
मधुरा आज प्रसन्न दिसत होती.
"मधु, आज किती गोड दिसतेय."
"थँक्स आई."
"आज काहीतरी स्पेशल आहे? ."
"तुला कसं समजलं?"
"गळ्यात ही जी चेन घातली आहेस. जेव्हा तुझा मूड खूप छान असतो तेव्हाच ही चेन तू घालते."
"आई, फार स्मार्ट आहेस हं."
"काय स्पेशल मग आज?"
"तसं काही स्पेशल नाही पण आज छान वाटतंय. अशीच ईच्छा झाली."
"बरं, ठीक आहे. ब्रेकफास्ट करून घे."
"हम्म. करते. बरं तू केला का ब्रेकफास्ट आई?"
"नाही अजून. तुझं झालं की करेन."
"आई, कितीदा सांगितलं आहे? लवकर ब्रेकफास्ट करत जा. तुला गोळ्या खायच्या असतात."
"अगं माझी आई करते गं."
तिनेही स्वतःला प्लेट घेतली.
मधुराने स्वतःच तिला पहिला घास भरवला.
"आई, तू कधी मोठी होणार गं. फार लहान मुलीगत वागायला लागली आहेस."
"आणि तू माझ्या आईसारखं वागायला लागली आहे."
"मी आईसारखं?"
"हो, माझी आई देखील तेव्हाच जेवायची जेव्हा मी जेवायची. तू देखील तशीच आहे हट्टी. तुझं जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत तू शांत बसत नाही."
"आई, मी अशीच वागणार बरं. सरळ सांगून तू ऐकत नाही."
"बरं माझी आई ऐकते तुझे."
ती कसल्या तरी विचारात हरवली.
"काय गं मधुरा ? काय विचार करतेय."
"आई, डान्स कॉम्पिटिशन आहे तर गाणं कोणतं सिलेक्ट करू समजत नाही."
"अगं तुझा डान्स पार्टनर आहे तो त्याचं नाव काय..."
"केशव."
"हो केशव.. तू त्यालाही विचार. शेवटी तुम्हाला दोघांना परफॉर्म करायचे आहे."
"हो गं आई. तसं मी त्याच्याशी डिस्कस करत होते, तितक्यात मॅम आल्या. बघू आज गेले की, बोलते. कोणतंही काम पटकन झालं पाहिजे . अजून बरीच तयारी बाकी आहे."
"सगळं कर पण तब्येतीला जपून काय?"
"हो गं आई. तू टेंशन घेऊ नको. बरं चल निघते, नाहीतर उशीर होईल. बाय." खांद्यावर बॅग अडकवत ती म्हणाली.
"बाय."
स्टेशनवर पोहोचली. ट्रेनची वाट बघत उभी होती.
तितक्यात तिला केशव आणि विलास येताना दिसले.
दोघेही जवळ आले तसं त्या दोघांना तिने आवाज दिला.
"केशव,विलास."
पाहिले तर मधुरा होती.
छान दिसत होती.
केशव तर एकटक पहात बसला.
'आज तर किती सुंदर दिसतेय. असं वाटतंय जाऊन लगेच प्रपोस करावं. देवा हे मी काय विचार करतोय.' त्यालाच त्याच्या विचाराने कसंतरी झालं.
दोघेही तिच्या जवळ गेले.
"मधुरा, काय भारी दिसतेय." विलासने कॉम्प्लिमेंट दिली.
"अरे देवा! माझं वजन वाढलं की काय?"
"नाही." विलास.
"मग भारी का म्हणाला?" मिश्किल हसत म्हणाली.
"भारी म्हणजे छान म्हणायचे आहे मला. चुकीचा अर्थ नको काढू."
"कळलं ते मला. मी गंमत केली. थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट." डोळे मिचकावत ती म्हणाली.
"केशव, कोणतं गाणं सिलेक्ट करायचे काही विचार केला का?"
"नाही अजून."
"आपल्याला लवकर गाणं डीसाईड करावं लागणार. त्यानुसार स्टेप बसवायला आणि प्रॅक्टिस करायला."
"हो ते आहे."
"माझ्याकडे गाण्याची लिस्ट आहे. एक काम करते मी तुला पाठवते. तू ऐकून घे. मग तसं ठरवूया. चालेल?"
"हो. ठीक आहे."
"बरं तुझा नंबर दे."
तिने त्याचा नंबर डाईल केला. त्याला मिस कॉल दिला.
"माझाही नंबर सेव्ह कर."
"ठीक आहे."
तितक्यात ट्रेन आली. तिघेही ट्रेनमध्ये चढले.
केशव भलताच खुश झाला.
मधुरा स्वतःहून जवळ येत होती. त्याला चांगलं वाटत होतं.
आज चक्क कॉन्टॅक्ट नंबर दिला होता.
मधुरा स्वतःहून जवळ येत होती. त्याला चांगलं वाटत होतं.
आज चक्क कॉन्टॅक्ट नंबर दिला होता.
त्याच्या प्रेमाची गाडी सुसाट चालली होती.
ह्याच्या मनात काय चालू आहे ह्याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. जेव्हा तिला कळेल की केशवला ती आवडतेय तेव्हा काय प्रतिक्रिया असेल?
ह्याच्या मनात काय चालू आहे ह्याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. जेव्हा तिला कळेल की केशवला ती आवडतेय तेव्हा काय प्रतिक्रिया असेल?
एक एक पान नक्कीच उलटत जाणार आहे. प्रेमाचे पान. तुम्हाला वाचायला जरूर आवडेल.
(क्रमशः)
अश्विनी ओगले.
वाचकांचं मन कथेत गुंतलेलं असतं आणि आम्हा लेखकाचं मन वाचकांच्या कंमेंटमध्ये. तर जरूर कंमेंट करून सांगा आजचा भाग कसा वाटला. कथा आवडत असेल तर मला फॉलो जरूर करा.
अश्विनी ओगले.
वाचकांचं मन कथेत गुंतलेलं असतं आणि आम्हा लेखकाचं मन वाचकांच्या कंमेंटमध्ये. तर जरूर कंमेंट करून सांगा आजचा भाग कसा वाटला. कथा आवडत असेल तर मला फॉलो जरूर करा.