तुजवीन सख्या, रे
वाटे सारे जग सुने
तुजवीन असेल
जीवनात सारेच उणे
वाटे सारे जग सुने
तुजवीन असेल
जीवनात सारेच उणे
सप्तरंगी इंद्रधनूही
तुजवीन बेरंगी भासते
तुजवीन संगीत
बेसूर वाटते
तुजवीन बेरंगी भासते
तुजवीन संगीत
बेसूर वाटते
कधी जाऊ नकोस तू
माझ्यापासून दूर ?
लावून मनाला
माझ्या हूरहूर
माझ्यापासून दूर ?
लावून मनाला
माझ्या हूरहूर
जन्मोजन्मीचे
तुझे माझे नाते
तुजवीन सांग
राहू तरी कसे?
तुझे माझे नाते
तुजवीन सांग
राहू तरी कसे?