Login

तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 1

अरे मग काय म्हणणार मी, जेव्हा जेव्हा आपण भेटतो तेव्हा फक्त लग्न या विषयावर बोलतो, नाही तर भांडण करतो,


तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 1
........

राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा

विषय.. कौटुंबिक कथा

उपविषय.. तुला नक्की हवं तरी काय?

©️®️शिल्पा सुतार

नाशिक टीम
...
विकास ऑफिसला जायला तयार होत होता. सुरेखाताई अण्णा त्याच्याकडेच बघत होते. सुरेखाताईंनी डोळ्यांनी सांगितलं अण्णांना की बोला तुम्ही त्याच्याशी. अण्णांनी नाही म्हणून सांगितलं. विकास सामान घ्यायला आत मध्ये गेला.

"अहो बोला ना तुम्ही त्याच्याशी, मी काल बोलली होती, तुम्ही बघितलं ना कसा चिडला तो",.. सुरेखाताई

"तूच बोल त्याच्याशी तूच सांगून दे",.. अण्णा

"माझ्यावर जबाबदारी टाका तुम्ही सगळी",.. सुरेखाताई

विकास बाहेर आला सुरेखाताईंनी त्याला डबा दिला,.. "आज येतो आहेस ना मग तू लवकर घरी विकास?, ठरवून घेवू संध्याकाळी सगळ ",

" आई कालच रात्री आपलं बोलणं झालं आहे ना, मला जमणार नाही",.. विकास

" असं चालणार नाही विकास, तुला मी जे म्हणते ते ऐकावं लागेल",.. सुरेखा ताई

"जबरदस्ती आहे का? ",.. विकास

" हो तू तुझ्या मनाचं करत नाही तर आमच्या मनाचं तरी होऊ दे" . सुरेखाताई

"आई मी तुला मागेही सांगितलं होतं ते.. मला प्रिया आवडते",..

" मग जी आवडते तिच्याशी तरी लग्न कर",.. सुरेखाताई

" तिला अजून एक दोन वर्ष लग्न करायचं नाही ",.. विकास

" ती मुलगी मला नाही आवडत, ती फसवत आहे तुला, आता एकोणतीसचा झालास तू, कधी होणार लग्न आणि मला नाही वाटत प्रियाला तुझ्याशी लग्न करायचं आहे, आज तू माझ्यासोबत ती मुलगी बघायला आला नाही तर माझ्याहून कोणी वाईट नाही, छान घरंदाज मुलगी आहे, लग्न करून मोकळं हो, प्रियाचा नाद सोड",.. सुरेखाताई

" आई मी किती वेळा सांगितल आज परत सांगतो मी फक्त प्रियाचा बायको म्हणू विचार करू शकतो, किती वेळा तेच तेच वैताग आला आहे या घरात",.. विकास रागारागाने ऑफिसला निघून गेला.

" आता काय ग सुरेखा? ",.. अण्णा

" तुम्ही कश्याला काळजी करता आहात आता, आरामात रहा मला बघायच असत ना सगळ, करेन मी काही तरी, काय एक एक लोक आहेत या घरात",.. सुरेखाताई

" आता तू माझ्या वर का चीड चीड करते आहेस ",.. अण्णा पेपर वाचायला बसले

"वाचा अख्या जगातील बातम्या वाचा, ते जागतिक प्रश्न महत्वाचे, घरचे प्रश्न काय एवढे विशेष नाहीत",.. सुरेखाताई

सुरेखाताई कामाला लागल्या, एक ताण आहे हा, मुल छोटे असले तरी प्रॉब्लेम, मोठे झाले तरी प्रॉब्लेम, एका आईने जगायचं नाही का सुखात.

"नको त्रास करून घेवू सुरेखा एवढा",.. अण्णा

" तुम्ही मला काहीही सांगू नका",.. सुरेखाताई
...

विकास ऑफिस मध्ये आला, डोक धरून बसला होता तो, घरचे लोक मागे लागले, काय करू मी, त्याने बघितल प्रिया आली आहे का, ती आलेली होती, त्याला आनंद झाला,... "चहाला जावू या का प्रिया? ",

विकास ला बघून प्रिया वैतागली होती, हा पिछा का सोडत नाही माझा.. " नको मला खूप काम आहे विकास",..

"काय झाल? तुला चेहरा का असा झाला प्रिया?",.. विकास

काही नाही.

"थोड बोलायच होत",.विकास

बोल.

"लंच टाईम मध्ये बोलू",.. विकास

दुपारी ते भेटले,.. "आपण कधी लग्न करणार आहोत प्रिया? आता माझ्या घरचे अजिबात ऐकायला तयार नाहीत, मी अजून थांबू शकत नाही",..

"मग करून घे तू लग्न ",.. प्रिया

" काय बोलतेस तू अस प्रिया ",.. विकास

"अरे मग काय म्हणणार मी, जेव्हा जेव्हा आपण भेटतो तेव्हा फक्त लग्न या विषयावर बोलतो, नाही तर भांडण करतो, प्रेम अस राहील नाही आपल्यात, तू ही एकदा नीट विचार कर या नात्याचा विकास ",.. प्रिया

" मला रहायच आहे तुझ्यासोबत प्रिया काहीही झाल तरी",.. विकास

" मला अजून एक दोन वर्ष तरी लग्न करता येणार नाही, जो पर्यंत माझ्या बहिणीच लग्न होत नाही तो पर्यंत मी थांबणार आहे ",.. प्रिया

" पण तुझ्या बहिणीच हे दुसर लग्न ना? आपल एकदा तर होवू दे ",.. विकास

"काय बोलतो आहेस तू हे विकास? तुला तरी समजत का? मला तुझ्याशी बोलायच नाही आणि तुझ्याशी लग्न करायच नाही, कर तू काहीही माझ्या मागे येवु नकोस ",.. प्रिया

" नेहमी कटकट असते या प्रियाची, मी हिला चांगली अद्दल घडवणार आहे, घरी जावून लग्नाला होकार देतो मी",.. विकास

जरा वेळाने विकासने बघितल प्रिया जागेवर नव्हती, कुठे गेली ही? गेली घरी का?, त्याने बाजूच्या डेस्कवर बसलेल्या तिच्या फ्रेंडला विचारलं,

मला माहिती नाही कुठे गेली प्रिया

ठीक आहे

विकास घरी आला, सुरेखाताई वर्षाताई विकासच्या बहिणीशी बोलत होत्या विकास रूम मध्ये चालला गेला त्याने तिथून प्रियाला फोन केला, तिचा फोन बंद होता सुरेखा ताई आत आल्या.. हे घे ताई शी बोल

"विकास आई काय सांगते आहे",.. वर्षा

"ताई मला प्रिया सोबत रहायच आहे",.. विकास

"अरे पण तिला करायच नाही लग्न तुझ्याशी, दोन तीन वर्ष झाले हेच सुरू आहे तुमच, फिरवते आहे ती तुला, समजत नाही का",.. वर्षा

विकास गप्प..

"आज बोलला का मग तू प्रियाशी?",.. वर्षा

हो.

" काय म्हटली मग ती?",.. वर्षा

" काही नाही तिला वेळ हवा आहे",.. विकास

"बघ किती वेळ घेणार अजून ती? वय वाढत चालल आहे, काहीतरी निर्णय व्हायला हवा, तू जातो का उद्या आई बाबा सोबत मुलगी बघायला",.. वर्षा

नाही..

" अस करु नकोस विकास ",.. वर्षा

"ताई मी उद्या सकाळी सांगतो, आईला समजवून सांग तू, ती मला खूप बळजबरी करते ",.. विकास

"ठीक आहे, तु काळजी करु नकोस, मी करते उद्या फोन",.. वर्षा

आई फोन घे..

" आई तू विकासला काही बोलू नकोस तो होईल उद्या पर्यंत तयार ",.. वर्षा

ठीक आहे

आई बाबा बाहेर टीव्ही बघत होते, विकास ने दोन तीन दा प्रिया ला फोन लावून बघितल, फोन बंद होता, शेवटी त्याने तिच्या बहिणीच्या फोनवर फोन लावला, प्रिया तिथेच होती,

"काय काम आहे विकास? का सारखं फोन करतो आहेस? ",.. प्रिया

" तुझा फोन का बंद आहे आणि तू ऑफिसमधुन का निघून आली",... विकास

"मला घरी काम आहे म्हणून मी निघून आली",.. प्रिया

"तू माझ्या प्रश्नाच उत्तर देणार आहेस का? आपण कधी लग्न करणार आहोत?",.. विकास

"मी तुला दुपारी पण सांगितला आहे विकास की मला अजिबात जमणार नाही अजून दोन-तीन वर्ष तरी लग्न करायला, तू तुझे घरचे सांगतात तिथे लग्न करून घे माझ्यावर खूप जबाबदारी आहे",.. प्रिया

"आपण दोघं मिळून सांभाळू सगळी जबाबदारी तू कशाला काळजी करतेस",.. विकास

"नाही जमणार मला किती वेळा सांगितलं आहे, माझं लग्न करायचा काही विचार नाही ",.. प्रिया

" मागच्या दोन-तीन वर्षापासून पण तू हे सांगते की दोन वर्ष थांब याला काय अर्थ आहे ",.. विकास

" मग तू कशाला विचारतो सारखा आणि आम्ही गावी जायला निघत आहोत थोडं काम आहे मी पंधरा दिवसांनी येईल ",.. प्रियाने फोन ठेवून दिला

विकास खूप चिडला होता काय करावं काही समजत नव्हतं, रागारागानेच त्यांने त्याचा मित्र शिरीषला फोन लावला,

" काय झालं आहे विकास तू एवढा का चिडला आहे",.. शिरीष

त्याने शिरीषला जे सगळं काही झालं ते सांगितलं,

" अरे तुला माहिती नाही का असं ऑफिसमध्ये ती चर्चा होती की प्रियाचं लग्न जमलं आहे आणि लगेच साखरपुडा आहे त्यासाठी ती गावाला जात आहे",.. शिरीष

"काय बोलतो आहेस तू? आत्ताच तर मी दोन मिनिटांपूर्वी मी प्रियाशी बोललो ती मला काहीही बोललं नाही असं ",.. विकास

" अरे तुला कसं सांगेल ती तुला लग्न करायचं होतं ना तिच्याशी, कुणीतरी मोठा ऑफिसर नवरा मिळालेला आहे तिला, खूप श्रीमंत आहेत ते लोक, स्वतः चा बंगला गाडी नौकर चाकर सगळ आहे",.. शिरीष

बापरे विकासला खूप राग आला होता त्याने रागारागाने फोन ठेवला तो एकटाच रूममध्ये बसलेला होता, काय करावं? सगळं हातच गेल आहे, प्रियाने चांगलाच गेम खेळला माझ्यासोबत, मी तिच्या भरोशावर दोन-तीन वर्षापासून लग्न टाळत होतो मी, तिने टाईमपास करून घेतला, किती खर्च झाला माझा, मन गुंतवल होत मी तिच्यात, आता काय करू मी?