........
राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा
विषय.. कौटुंबिक कथा
उपविषय.. तुला नक्की हवं तरी काय?
©️®️शिल्पा सुतार
नाशिक टीम
...
...
वर्षा किचन मध्ये आली,.. "आई काय अस विकासच वागण? मी कसतरी राधाला समजवल, कुठे गेला विकास? सुट्टी घेतली ना त्याने मग आता काय सुरु आहे हे ऑफिस वगैरे , नक्की ऑफिसला गेला की आणखीन कुठे? ",
" मला काही माहिती नाही ग, मलाही खूप काळजी लागली आहे ",.. आई
बाबा आत आले,.." विकास कुठे गेला?",
"काही माहिती नाही ",.. वर्षा
" राधा कुठे आहे? ",.. बाबा
" आहे खोलीत",.. वर्षा
" अहो तुम्ही बोलून बघा ना विकासशी",.. आई
" हो करतो त्याला फोन लगेच",.. बाबांनी फोन लावला,.. लागला नाही फोन
विकास हॉस्पिटल मध्ये आला, प्रियाची आई काळजीत बसली होती, बर झाल तु आलास विकास, तू काल गेल्या पासून गोळ्या घेतल्या नाहीत की सकाळी काही खाल्लं नाही प्रियाने, एकदम हट्टी आहे बघ ती
" मी बघतो काकू तुम्ही काळजी करू नका ",.. विकास
आता बरी होती प्रियाची तब्येत, विकासला बघून ती खुश झाली
" नाश्ता केला का मॅडम? ",.. विकास
"नाही अजून",.. प्रिया
का?..
"तू का उशिरा आलास मग ",.. प्रिया
"चल काहीतरी खावून घे, औषध घ्यायच आहे",.. विकास
"काही खावस वाटत नाही विकास मला",.. प्रिया
"अस चालेल का? आटोप चल मी इथे समोर आहे",.. विकास
विकास बाहेर आला प्रियाची आई बाजुला जावून फोन वर बोलत होती... हो तिचा फोन घरी राहिला आज.. हो.. हो सांगते फोन करायला... हो ऑफिस मध्ये गेली ती... हो या तुम्ही...
त्या विकासला बघून दचकल्या
"कोणाचा फोन होता? ",.. विकास
" प्रियाच्या मैत्रिणीचा ", ... आई
" मग का नाही दिला प्रियाकडे? ",.. विकास
"नको डॉक्टरांनी नाही सांगितल, विकास थोडे फळ घेवून ये ना",.. आई
हो..
विकास बाहेर गेला
काकू पटकन आत गेल्या,.. "प्रिया तुझ्या नवऱ्याचा फोन आला होता ग",
"बापरे काय म्हटले ",.. प्रिया
" आज उद्या मध्ये येतं आहेत इकडे ",.. आई
"तू हॉस्पिटलच काही सांगितल नाही ना आई",.. प्रिया
" नाही ग मी मूर्ख नाही एवढी, इथून निघायला हव आपण आज संध्याकाळ पर्यंत",.. आई
"हो सांगते मी डॉक्टरांना",.. प्रिया
" हे काय चाललय तुझ? परत त्या विकासच्या मागे का लागली आहेस ",.. आई
" मला आवडतो तो, त्याची सवय झाली सोबत असायची ",.. प्रिया
" अग पण आता लग्न झालं ना ",.. आई
" असू दे.. मला माझ्या नवर्या सोबत संसार करायचा आहे, ते इकडे नसले की विकास बरा पडतो, काम करतो छान वागतो ",.. प्रिया
" काहीही कर पण जावई बापूंना हे समजता कामा नये, आधीच तुझी मोठी बहीण घरी आहे तीच लग्न करायच परत, खूप खर्च होईल, तू सांभाळून वाग, जावू दे ना पण त्या विकासला, मला नाही आवडलं तुझ वागण",.. आई
" हो आई, तू काळजी करू नकोस, मी करते बरोबर",..प्रिया
" किती श्रीमंत छान नवरा आहे तुझा, काय हे अस वागते ",.. आई
" हो ना आई तू नको लक्ष देवू, मी सांभाळेल बरोबर, यांना काही समजणार नाही, मला यांच मन सांभाळायच आहे, विकास सोबत नाही रहाणार मी, त्यात या विकासला एवढासा पगार, घर ही किती लहान त्याच, कोण करेल रोज त्याच्या घरच्यांच, मी सांगते डॉक्टरांना संध्याकाळी डिस्चार्ज घेऊ ",.. प्रिया
विकास फळ घेऊन आला,.." बरं वाटतं आहे का आता प्रिया? ",
" हो एकदम छान वाटत आहे, डॉक्टर चांगला आहे एकदम आराम पडला मला ",.. प्रिया
जरा वेळाने डॉक्टर राऊंडला आले,.." कसं वाटत आहे प्रिया तुम्हाला? ",
" एकदम चांगलं वाटत आहे डॉक्टर मला, आज संध्याकाळी घरी जाता येईल का?",.. प्रिया
"विकनेस तर नाही आहे ना? ",.. डॉक्टर
" नाही एकदम ठीक वाटत आहे ",.. प्रिया
" ठीक आहे संध्याकाळपर्यंत बघू बरं वाटलं तर तुम्ही घरी जा",.. डॉक्टर
"प्रिया अस कस लगेच घरी सोडा म्हणतेस तू, नको डॉक्टर हलगर्जीपणा नको नीट ट्रीटमेंट घे नीट प्रिया , लगेच ऑफिस घरकाम सुरू होईल हीच ",.. विकास
" मी करेन आराम, विकास तू जरा गप्प बस ",.. प्रिया
"काय हे प्रिया? ",.. विकास
" मी ठीक आहे डॉक्टर ",.. प्रिया
" ठिक आहे आपण बोलू दुपारी ",.. डॉक्टर
विकासच्या फोनवर बाबांचा फोन आला,.." कुठे आहेस तू विकास?, मी केव्हाचा फोन करतो आहे तुला?, कालपासून गायब आहेस? ",..
" थोडं बाहेर आहे बाबा कामानिमित्त",.. विकास
"घरात नवीन लग्न झालेली बायको आहे तुझी, लक्ष्यात आहे ना, ती वाट बघते आहे, लवकर घरी ये राधाला वेळ दे , आता हे काय मी तुला सांगायची गोष्ट आहे का?, दुसऱ्याची मुलगी लग्न करून आपल्या घरी आली आहे तिच्याकडे लक्ष नको द्यायला का?, व्यवस्थित नको वागायला ",.. बाबा
" येतो मी बाबा लवकर",.. विकास
दुपारी प्रियाला बऱ्यापैकी बरं वाटत होतं, तिची आई बॅग भरत होती, चार वाजता हॉस्पिटल मधून सोडलं, विकासने टॅक्सी बोलावली
" चला मी तुम्हाला घरी सोडून देतो",.. विकास
" नको आम्ही जाऊ तू जा घरी तुझी ही दोन दिवसापासून आमच्या सोबत धावपळ होते आहे विकास ",. प्रिया
" काही हरकत नाही मी येतो सोडायला",.. विकास
"नाही आम्ही जाऊ तू जा घरी",. प्रिया
"काय झालं आहे अचानक प्रियाला? आता दोन दिवस तर एकदम मी तिला तिच्याजवळ हवा होतो आज अगदीच तू जा तू जा करते आहे, मुडी आहे ही प्रिया,
ती तिची आई टॅक्सीत बसून घरी निघाल्या
"बरं झालं विकासला सोबत घेतलं नाही जावई बापू केव्हाही येतील",.. आई
"हो ना",..
" हाताच्या पट्टीचा काय सांगशील?",.. आई
"काही नाही थोडा चाकू लागला एवढं सांगून देईल, नाही तरी विशेष कट नव्हताच, आई थोड्या भाज्या आणून घे, पनीरही आण, यांना आवडतं, मी करीन भाजी यांच्यासाठी",.. प्रिया खुश होती
" हो तू जरा जावईबापूंना पैशाचा सांग",.. आई
" हो देणार आहेत ना ते दर महिन्यात तुला पैसे, सारखं नको बोलायला",.. प्रिया
" ते ताई साठी त्यांच्या मावस भावाच स्थळ आहे ते बोलून घे ",.. आई
" हो ते महत्वाचं आहे ",.. प्रिया
" ठीक आहे खुश वाटते आहेस तू आज",.. आई
" हो ग आई",.. प्रिया
दोघी घरी पोहोचल्या लगेच कामाला लागल्या, घराची साफसफाई स्वयंपाक सगळं बाकी होत,
विकास घरी आला, बराच वेळ तो पुढच्या खोलीत बसलेला होता, चहा झाला,.." राधा कुठे आहे ताई? ",
" आहे ती खोलीत ",.. वर्षा
विकास खोलीत गेला,.." काय करते आहेस तू राधा इथे नुसतं बसून? खाली सगळे एवढे कामात आहेत, जा खाली आणि मदत कर थोडी",
"मी गेली होती त्या ताई मला काम करू देत नाही काम",.. राधा
"म्हणजे तू काहीच करायचं नाही का? आणि मी थोड्या वेळ बाहेर गेलो होतो तू लगेच आई-बाबांचे कान भरले का? किती बोलले मला बाबा फोन करून, महत्त्वाचे काम असतात मला",.. विकास
" सॉरी पण मी आई बाबांना काहीही सांगितलं नाही मला नाही माहिती ते काय म्हटले तुम्हाला ",.. राधा पटकन खाली निघून गेली
विकास रूममध्येच बसलेला होता, वर्षाताई आत मध्ये आली,.." राधा आणि तू मिळून फिरून या कुठेतरी ",
" आता वेळ नाही ताई मला उद्यापासून ऑफिसला जावं लागणार आहे",.. विकास
" काय आहे एवढं अर्जंट? तू तर सुट्टी घेतली आहे ना? ",..वर्षा
" लग्नासाठी घेतली होती पण माझी सुट्टी कॅन्सल झाली आहे, नवीन पोझिशन मिळाल्यापासून खूप काम वाटलं आहे ",.. विकास
" काम तर होतच राहतील रे पण तुम्हाला पण एकमेकासाठी पण वेळ हवा ना, हीच वेळ असते एकमेकांसोबत कंफर्टेबल राहायची, ओळख करायची",..वर्षा
" मी विचार करतो ताई",.. विकास
आज रात्रीचा बराचसा स्वयंपाक राधाने केला सगळे जेवायला बसले, वर्षाताई मुद्दाम विकासला सांगत होती की भाजी खाऊन बघ राधाने केलेली आहे, मी तिला किती म्हटलं की नको करू, कर थोडे दिवस आराम कर तरी तिने स्वयंपाक केला
राधा गप्पा होती विकासने भाजी खाल्ली तो काहीही म्हटला नाही
राधाला अपेक्षा नव्हती त्याच्याकडून..
आई आणि वर्षाताईंनी आग्रह केल्यामुळे तो छान आहे एवढच फक्त म्हटला, जेवण झालं राधाने सगळं आवरून घेतलं ती जरा वेळ खालीच आई आणि वर्षाताईशी बोलत बसली
"मी पण उद्यापासून ऑफिस जॉईन करणार आहे आई, काय करू नुसतं घरी थांबून",..
"ठीक आहे जा बेटा राधा आराम कर",..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा