........
राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा
विषय.. कौटुंबिक कथा
उपविषय.. तुला नक्की हवं तरी काय?
©️®️शिल्पा सुतार
नाशिक टीम
...
...
विकासने प्रियाला तिच्या घरी सोडलं आणि तो घरी आला, आई-बाबा राधा त्याची जेवणासाठी वाट बघत होते
"तुम्ही जेवून घ्या, माझ्या ऑफिस मध्ये कार्यक्रम होता मी जेवून आलो आहे",.. विकास रूम मध्ये निघून गेला
राधाने तिघांचे ताट वाढले, त्यांनी जेवून घेतलं, जेवण झालं आणि बाहेर कार थांबली, ज्योतीताई तिचे मिस्टर आई बाबा आलेले होते, विकासचे आई बाबा आश्चर्यचकित होऊन बघत होते, हे कसे आले?
सगळे आत येऊन बसले, विकासला बोलवा, विकास बाहेर आला, तो ही आश्चर्याने सगळ्यांकडे बघत होता
"माझे आई-बाबा मला घ्यायला आले आहेत, मी माहेरी जाते आहे कायमची, तुम्ही दोघं खूप छान आहात आई बाबा , पण यापुढे मला इथे विकास सोबत रहाता येणार नाही, यांनी फसवल आहे मला, मी संध्याकाळीच बॅग भरलेली आहे",.. राधा
"असं का करतेस राधा?, काय झालं, अहो तुम्ही काही बोला ना",.. विकासच्या आई रडायला लागली
"आई तुम्ही त्रास करून घेऊ नका, बसा बर तुम्ही इथे,... तिने आतून पाणी आणल, त्यांना दिल,
तुमचा काही दोष नाही यात, हे सगळं विकास मुळे मी करते आहे, आज संध्याकाळीच मी विकास आणि एका मुलीला बाहेर फिरायला जातांना बघितलं, आता त्यांनी घरी येऊन काय सांगितलं की ऑफिसमध्ये कार्यक्रम होता, लग्न झाल्या पासून हे एकदाही माझ्याशी बोलले नाही नीट, मी खूप प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा, त्यांना नको आहेत हे संबंध, ठीक आहे मी जाते आहे यांच्या आयुष्यातुन, काहीही करा आता ",.. राधाने त्यांना फोटो दाखवले
तुमचा काही दोष नाही यात, हे सगळं विकास मुळे मी करते आहे, आज संध्याकाळीच मी विकास आणि एका मुलीला बाहेर फिरायला जातांना बघितलं, आता त्यांनी घरी येऊन काय सांगितलं की ऑफिसमध्ये कार्यक्रम होता, लग्न झाल्या पासून हे एकदाही माझ्याशी बोलले नाही नीट, मी खूप प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा, त्यांना नको आहेत हे संबंध, ठीक आहे मी जाते आहे यांच्या आयुष्यातुन, काहीही करा आता ",.. राधाने त्यांना फोटो दाखवले
बाबा विकासकडे बघत होते, ते त्याला त्याच्या वागण्याचं कारण विचारत होते,.. काय आहे हे विकास?
" तुम्हाला माहिती होतं ना यांच आधीच प्रेम प्रकरण आहे असं, तरी का लग्नाची घाई केली, का तुम्ही खोटे बोलले तुम्ही ? आमची अशी का फसवणूक केली? का आमच्या मुलीचं नुकसान केलं?, त्याच मुलीशी करायच होत ना मग लग्न, दुसर्याच्या मुली सोप्या सापडतात का त्रास द्यायला, आम्ही राधाला आता घेऊन जात आहोत, इथे राहणार नाही ती ",.. राधाचे बाबा
" तेव्हा विकासने ही होकार दिला होता, आधीच प्रेम प्रकरण संपल होत, का अस वागतोस तू विकास ",.. बाबा
" संपल होत तर मग अचानक हे अस सुरु कधी झाल?, तुमचा मुलगा आमच्या राधाशी नीट वागत नाही, बायको म्हणून तिला स्विकारल नाही, लग्न करून द्या म्हणजे नीट वागेन तो, अस वाटल का तुम्हाला? , तुम्ही यात राधाच नुकसान केल आहे ",.. जीजू
" विकास काही बोलणार का ",.. बाबा
"मला राधाशी बोलायच आहे ",.. विकास
राधा... राधा
राधा वरती गेली तिने तिची बॅग घेतली, विकास तिच्या मागे रूममध्ये आला,.." राधा थांब एक मिनिट मला बोलायचं आहे तुझ्याशी",..
" पण मला आता तुमच्याशी काहीही बोलायचं नाही, यापुढे आपल्यात बोलण्यासारखं काही नाही, दोन-तीन दिवसापासून मी इथे आहे तुम्ही एक शब्दही माझ्याशी बोलले नाहीत आणि आता मी जाते आहे तर काय बोलायचं आहे तुम्हाला ",.. राधा
" खूप महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे, पण तुला ऐकून घ्यायच आहे का? ",.. विकास
" नाही मला काहीही ऐकून घ्यायचं नाही",.. राधा
" ठीक आहे, मी आता किती जरी सांगितल तरी तुला ते खर वाटणार नाही, एवढ बोलतो मी ठीक करत होतो सगळ, मी तुला सांगणार होतो सगळ, मला तुझ्या सोबत रहायच आहे राधा, मी खूप अडचणीत सापडलो आहे, विश्वास ठेव ",.. विकास
"तस सांगितल का नाही तुम्ही मला, एकदम परक्या सारख वागताय, बोलत ही नाही माझ्याशी, सोफ्यावर झोपत आहात, काय समजायच मी?",.. राधा
" मला सुचत नव्हत राधा काही, प्रियाच टेंशन होत, विचार केला एक एक गोष्टी ठीक करू ",.. विकास
" माझ्या मनाचा विचार तुम्ही केला नाही, आता काही उपयोग नाही या गोष्टीचा" ,.. राधा बाहेर आली,
" राधा खर सांगतोय राधा प्लीज नको जावू ",.. विकास
ती सासू-सासर्यांच्या पाया पडली, काळजी घ्या आई बाबा
राधा बेटा....
" बाबा नका समजवू मला प्लीज ",.. राधा
ती तिचे आई बाबा, बहिण जिजाजी सोबत घरी निघून गेली
राधा गेल्यानंतर आई-बाबा घरात आले, ते शांत बसलेले होते, विकास आत जात होता, बाबांनी त्याला हाक मारली,.." आधी बाहेर ये विकास, तू या घरात नाही राहू शकत, तुला जर तुझं काही सामान घ्यायचं असेल तर ते घे आणि पाच मिनिटात घराबाहेर हो",
"आई बाबा मी करत होतो सगळ नीट, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, तिकडे ती प्रिया आत्महत्येची धमकी देते मी थोडं तिच्याशी बोलून तिला समजावत होतो",.. विकास
" अशा कुठल्या पद्धतीने तू तिला समजावत होता? पार गाडीवर गळ्यात गळे घालून बसले होते तुम्ही ",.. बाबा
" बाबा आहो प्रिया तशी बसली होती, मी तिला बराच वेळा सांगितले नीट बस",... विकास
" मला कुठल्याही गोष्टीवर तुझ्याशी बोलायचं नाही बऱ्याच वेळा तुला समजून सांगितलं, तुझं चांगलं वाईट तुला समजत नाही तर मी काय करणार? तुझं सामान घे आणि पाच मिनिटात चालू पड, पाच मिनिटानंतर तुला काहीही घेता येणार नाही, फार पूर्वीच मी हे सगळं करायला पाहिजे होतं, अजूनही उशीर झालेला नाही ",.. बाबा
"आहो जरा ऐका तरी",.. आई
"तू थांब मला हा कठोर निर्णय घ्यावाच लागणार आहे खूप जास्त झालं आहे आता विकासच, मला आता हा ताण सहन होत नाही, हा डोळ्यासमोरच नको आहे मला, काहीही कर म्हणा इथून जा आधी",.. बाबा
विकास आत गेला त्याचा सामान घेऊन बाहेर आला, आई बाबा मी ठीक करेन सगळ, राधाला घेवून येईन, काळजी घ्या तुम्ही, तो निघून गेला
विकास गेल्यानंतर बाबांनी दार लावून घेतलं, आई बाबा दोघं रडत होते, काय झालं हे सगळं?
आईने वर्षाला फोन लावला वर्षाला सगळं सांगितलं
" एवढं काय काय झालं दोन तासात मला तरी बोलावलं असतं मी थांबवलं असतं राधाला",.. वर्षा
"तिला थांबवून काय करणार ग, आपल्या विकासची चुकी आहे, त्या प्रिया सोबत मोटरसायकल फिरतानाचे फोटो काढले आज राधाने, त्यात तिची बहीणही सोबत होती",.. आई
"त्या दोघी काय करत होत्या विकासच्या ऑफिस जवळ? ",.. वर्षा
" विकासच्याच मागे गेल्या होत्या त्या की विकास का असं करतो, काहीतरी माहिती मिळेल ऑफिसमधून",.. आई
" बरोबर आहे ग त्यांचं, राधाशी हा नीट वागत नाही, आपलीच चुकी आहे आता काय पण पुढे? ",.. वर्षा
" आता काही माहिती नाही बाई, आम्ही तर विकासला घराबाहेर काढल आहे, तो म्हणत होता तो प्रियाला समजावत होता, काहीही कर म्हणा आता, थोडा राग दाखवायला पाहिजे, तो आणि त्याची बायको भांडतील नाहीतर राहतील नीट",.. आई
आई अग काय अस.. वर्षा काळजीत होती
"आम्हाला या वयात हा ताण सहन होत नाही, वाटल राधा चांगली आहे आता होईल सगळ नीट, पण कसल काय, एक एक सुरू याच, आम्ही दोघं आता एकमेकांना सांभाळून राहणार आहोत",.. आई
" बरोबर बोलत आहात तुम्ही आई बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ",.. वर्षा
विकास घरातुन निघाला तो त्याच्या ऑफिसच्या मित्राच्या रूमवर गेला
" काय रे इतक्या रात्री आलास तू? ",.. सुरेश
" हो मला घरच्यांनी घराबाहेर काढलं ",.. विकास
" काय झालं एवढं? तुझं तर आत्ताच लग्न झालं ना",.. सुरेश
विकास त्याला सगळं सांगत होता
" आता काय करणार आहे तू?",.. सुरेश
"पूर्ण फसलो आहे मी सुरेश, प्रिया मला सोडत नाही मी तिला भेटायला नकार दिला तर त्यात मग ती धमकी देते मला खूप भीती वाटते आहे या सगळ्या गोष्टीची, तिला भेटलं तर घरचे नाराज होतात माझी एवढी चांगली बायको घर सोडून गेली, मला या प्रियापासून सुटका हवी आहे, माझी मदत करणार का ",.. विकास
" चालेल ना मी गोड बोलून प्रिया कडून तिच्या नवऱ्याचा फोन नंबर माहिती घेतो तू तिच्या नवऱ्याला फोन करून तिच्याबद्दल सगळं सांगून दे",.. सुरेश
" तेच करावं लागणार आहे मला इतके दिवस असं वाटत होतं की नको प्रियाचं नुकसान व्हायला, पण आता त्या प्रियाला सांभाळता सांभाळता माझा संसारच टांगणीला लागला, आज सुद्धा मी सकाळी प्रियाला नाही म्हणत होतो की आपण नको असं भेटायला तर तिने मला आत्महत्येची धमकी दिली, मला भीती वाटते खरच तिने स्वतःला काही करून घेतलं तर पोलीस मला येऊन पकडतील, तिचा नवरा असताना ती मला भेटत नाही, अस दाखवते त्याला किती चांगली आहे ती आणि इतर वेळी माझ्यासोबत फिरते मला तिच्यासोबत अजिबात फिरायला आवडत नाही ",.. विकास
" करू आपण काहीतरी तू काळजी करू नको",.. सुरेश
" पण आता राधा माझ्याशी बोलेल असं मला वाटत नाही, मला इतके दिवस वाटत होतं की हे प्रियाचे प्रकरण आपण लवकर संपवून मगच राधा बरोबर संसार सुरू करू पण त्या नादात मी राधाशी जरा जास्तच दुरून आणि तुटक वागलो, आधी आयुष्यात आलेली ह्या प्रियाला बाजूला करू आणि नंतर व्यवस्थित संसार सुरू करू असा मी विचार करत होतो पण आता ते सगळं माझ्याच गळ्यात गंमत आली आहे आता",.. विकास
" पुढे काय पण ",.. सुरेश
" मला यातून मार्ग काढायलाच पाहिजे",.. विकास