........
राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा
विषय.. कौटुंबिक कथा
उपविषय.. तुला नक्की हवं तरी काय?
©️®️शिल्पा सुतार
नाशिक टीम
...
...
विकासने राधाला फोन केला, राधाने फोन उचलला नाही,
विकासने तिला मेसेज केला,.. "मला तुझ्याशी थोडसं बोलायचं आहे", त्याने फोन केला
" आता काय काम आहे",.. राधा
" प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी आत्ताच प्रियाच्या नवऱ्याला ती मला कसं त्रास देते हे सगळं सांगितलं आणि प्रियाविरुद्ध पोलिसात कंप्लेंट पण केली",.. त्याने सगळे पुरावे राधाला पाठवून दिले, मला खरच प्रिया बरोबर नाही राहायचं, मला तुझ्याबरोबर राहायचं आहे राधा, मी हळूहळू नीट करत होतो, विचार केला की एक आठवड्यात हे सगळं आधीच मिटवून टाकून तुझ्याबरोबर व्यवस्थित संसार सुरू करू, मी खर बोलतो आहे,
राधा काही म्हटली नाही,
" कोणाचा फोन होता ग , जावई बापूंचा होता का?",.. आई
हो आई..
" काय म्हणत होते ते?",.. आई
राधाने सगळं सांगितलं, आई-बाबा दोघं ऐकत होते,.. "खरं असेल का ग हे?",
"माहिती नाही आई पण त्यांनी पाठवलेले फोटो तर ओरिजनल वाटत आहेत, त्यांनी पोलिसात त्या मुली विषयी तक्रार केली आहे, ती मुलगी आत्महत्येची धमकी देते, भेटलं नाही तर मी जिवाचा काहीतरी बरं वाईट करून घेईल असं म्हणते आहे, कितपत खरं आहे ते माहिती नाही",.. राधा
" पोलिस स्टेशन मधे दिलेली तक्रार तर खरी आहे ही राधा ",.. बाबा फोटो बघत होते
राधाने ज्योतीताईला फोन करून सगळं सांगितलं काय काय झालं आहे ते,
" होईल ग हळूहळू नीट बघ आता आपण एकदा तू स्टँड घेतला आहे ना ते घाबरले, आता होतील सरळ",.. ज्योती
" मला पण ते नीट व्हायलाच हवे आहेत मला तिकडेच राहायचं आहे ",.. राधा
" हो पण आता लगेच तू हार मानू नको, थोडे दिवस जरा बघ, म्हणजे ते तिकडचं पूर्ण प्रकरण संपलं पाहिजे",.. ज्योती
हो ताई..
" त्यांनी तुला गृहीत धरलं होत, अस चालणार नाही, तुझ्याशी ते कसही वागू शकत नाहीत",... ज्योती
वर्षाताईने विकासला फोन केला,.. "काय चाललं आहे विकास?",
विकासने काय काय झालं आत्तापर्यंत ते सगळं वर्षाताईला सांगितलं
" होईल सगळं ठीक, तू राधाशी बोलला का? ",.. वर्षा
"हो ताई मी बोललो आत्ताच तिच्याशी, तू पण जरा राधाला फोन करून दे ना, तिच्याशी बोलून घे, तिला जरा समजून सांग, माझा खरच असा काही विचार नव्हता प्रिया मुळे मी जरा तिच्याशी बोलत नव्हतो, माझंही चुकलंच आहे" ,.. विकास
" ठीक आहे पण आता हे सगळं नीट झाल्यावर परत अशी चूक करू नको, तुला माहिती आहे प्रिया किती टोकाचा निर्णय घेते, तिच्याही काही अपेक्षा असतील नवर्या कडून, तिला तुझ्या सोबत आनंदात सुखी राहायच असेल, व्यवस्थित वाग आता ",.. वर्षा ताई
"हो चांगलं समजलं आहे मला हे आता ताई , आई बाबा कसे आहेत? ",.. विकास
"आई बाबा ठीक आहेत, मी फोन केला होता त्यांना , तू कधी जातो घरी ",.. वर्षा
"बाबा चिडले आहेत खूप, मी आता हे प्रकरण मिटवतो, मग राधाला घेऊनच घरी जाईल",.. विकास
वर्षाताईने राधाला फोन केला राधा तिचा आवाज ऐकून रडायला लागली,.." बघा ना ताई कस झाल हे, तुम्ही बघत होत्या ना हे कसे वागत होते माझ्याशी ",
" अगं विकास सगळं ठीक करतो आहे, त्याने मला आता सगळं सांगितलं, तू काळजी करू नकोस तो येईल तुला घ्यायला ",.. वर्षा
" हो मलाही फोन आला होता ताई, खरं आहे का हे सगळं?",.. राधा
"अगदी खरं आहे तू त्याच्यावर विश्वास ठेव",.. वर्षा
"मग त्यांनी मला हे आधी का नाही सांगितलं ",.. राधा
" माहिती नाही ग, नवीन नवीन नातं आहे कसं काय असं सांगणार लगेच गर्लफ्रेंड बद्दल, तो करतो आहे नीट विश्वास ठेव, मात्र तो जेव्हा समोरून हाक मारेल तेव्हा तू घरी जा त्याच्यासोबत रहा, जास्त ताणू नको ",.. वर्षा
" ठीक आहे ताई तुम्ही म्हणता आहात तर मी तुमच्यावर विश्वास ठेवेन",... राधा
प्रिया संध्याकाळी स्वयंपाक करत होती विशालचा फोन आला,.." कुठे होती दिवसभर प्रिया? "
"मी सांगितलं होतं ना तुम्हाला की मी शॉपिंगला गेली होती मैत्रिणी सोबत",.. प्रिया
"खूप खोटं बोलते आहेस प्रिया तू, मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल आणि विकास बद्दल, काय सुरू आहे? , आज तू संध्याकाळी त्याला भेटायला गेली होती ना? माझ्याकडे फोटो आहे तुमच्या दोघांचे, काय प्रकार आहे हा? आपले लग्न झाले आहे याचं तरी भान आहे ना तुला? आणि त्या विकासचही लग्न झाला आहे ना?, मला हे अजिबात चालणार नाही ",.. विशाल
" नाही हो असं काही नाही, ऑफिस कामानिमित्त आम्ही भेटलो होतो, आमच्या दोघांचं काही सुरू नाही ,.. प्रिया
"खोटं बोलू नको प्रिया तू त्याच्याबरोबर मोटरसायकलवर किती चिटकून बसलेली होती, तू दिवस भर त्याला फोन करत असतेस तुझे कॉल डिटेल्स आहेत माझ्याकडे आता मागवले मी ते ",.. विशाल
"तो विकासच माझ्या मागे लागला आहे, मी त्याला सांगितल की आता लग्न झालं आहे, माझ्या मागे मागे करू नकोस, तो ऐकत नाही ",.. प्रिया घाबरली होती
" तुला काय वाटतं आहे प्रिया मला काहीच माहिती नाही का? जे सुरू आहे ते मला अजिबात आवडल नाही, माझा विश्वास घात केला तू, माझ्याकडे तुमच्या दोघांचे फोटो आहेत, हाताची नस अशी कापली होती का तू?, आत्महत्येची धमकी देते ना तू त्याला ",.. विशाल
" तुम्हाला कोणी सांगितलं हे, त्या विकासने कान भरवले तुमचे, त्याला आपल लग्न मोडायच असेल ",.. प्रिया
" गप्प बस प्रिया, चुकी तुझी आहे, हे मला कोणी सांगितलं ते जास्त महत्त्वाचं नाही, तू जे वागते आहे ते अत्यंत चुकीचं आहे, तुला माझ्यासोबत राहायचं आहे का की विकास सोबत? विकासच लग्न झालं आहे तरी तू त्याच्या मागे मागे करतेस हे एकदम चुकीच आहे, तुझ्या घरी माहिती आहे का तू असं करते आहेस ते? ",.. विशाल
" मला माफ करा मला एक चान्स द्या मी यापुढे असं करणार नाही ",.. प्रिया
" तू म्हणजे माझ्या सोबत नीट राहते आणि त्याचाही संसार होऊ देत नाही, तुला एका वेळी दोन जण हवे आहेत का?",.. विशाल
" नाही माझ विकास बरोबर काहीही संबंध नाही तो एक फक्त मित्र आहे",.. प्रिया
" ते माहिती आहे मला, पण त्याने विकासच नुकसान होत आहे असं करू नकोस, तुला मी शेवटचा चान्स देतो, यापुढे जर मला काही समजलं तर मग मी जो निर्णय घ्यायचा तो घेईन, तुला आणि तुझ्या घरच्यांनाही सोडणार नाही, माझी पोहोच माझ्या ओळखी कुठपर्यंत आहे तुला माहिती आहे, पाच मिनिटे ही लागणार नाही मला, पोलिसात देईल तुला, नीट वाग जरा, आणि आता आहे ती नौकरी सोड गुपचूप इकडे ये माझ्या सोबत राहायला, या गावात बघतो मी तुझ्या साठी काम ",.. विशाल
" मला माफ करा मी यापुढे असं काही करणार नाही, पण नौकरी सोडली तर कस होईल, आईला देते मी पैसे",.. प्रिया
"मी देईन त्यांना पैसे, त्यांना घेवून ये इकडे, तुला राहायच ना माझ्या सोबत? ",.. विशाल
"हो,.. मला तुमच्या सोबतच राहायचं आहे",.. प्रिया
"ठीक आहे माझं लक्ष आहे तुझ्याकडे, राजीनामा देवून टाक ",.. विशाल
" मी आता आपल्यात जे बोलणं झालं आहे ते कोणाला सांगणार नाही, इकडे घरी समजल तर तुझी बदनामी होईल, तू विकासची माफी माग यापुढे त्याच्याशी एक शब्दही बोलता कामा नये आणि असं समजू नको मी दुसऱ्या गावात राहतो आता मला काय माहिती आहे, मला बरोबर माहिती असते तिकडे तुझं काय सुरू आहे ",.. विशाल
प्रिया खूप घाबरली होती, तिने विकासला मेसेज करून त्याची माफी मागितली, यापुढे कधीच त्या विकासशी शब्दही बोलायचं नाही असं तिने ठरवलं, तिने ऑफिस मध्ये राजीनामा दिला, एका महिन्याने ती तिच्या आई सोबत विशालच्या गावी रहायला जाणार होती, तिच्या बहीणच लग्न जमल होत लगेच होत ते लग्न गावी
प्रिया सारख्या मुली का अस वागतात काय माहिती, त्यांना काय हव असत? हातच चांगल सोडून उगीच बाकीच्यांना त्रास देत त्यांच्या मागे फिरण्यात काही अर्थ नाही,
"चला आता प्रिया प्रकरण तर संपलं, राधा आता बोलते की नाही माझ्याशी काय माहिती",.. विकास विचार करत होता
विकासने वर्षाताईला फोन करून सगळं सांगितलं,.. "तू येतेस का ताई माझ्यासोबत राधाकडे ती तुझा ऐकते",..
" हो येते मी संध्याकाळी कुठे भेटायचं ते सांग",.. वर्षा
दोघं संध्याकाळी राधाकडे गेले, वर्षाताईने राधाच्या घरच्यांना सगळं समजावून सांगितलं, पुरावे म्हणून मेसेज आणि फोटो दाखवले कसं प्रियाच्या नवऱ्याने प्रियाला रागवलं आणि आता ती मागे मागे येणार नाही, नौकरीचा राजीनामा देणार आहे ती , पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्याचं पुरावे दाखवले, राधा आता राग सोड माफी मागतो आहे विकास तुझी
" हो राधा मला माफ कर, माझं जरा चुकलं, मी तुला स्पष्टच पहिल्या दिवशी सगळ सांगायला पाहिजे होतं, पण आपलं अरेंज मॅरेज लगेच ठरलं आणि लगेच लग्न झालं, मला तुझा स्वभाव कसा आहे हे समजलच नाही, मला वाटलं तुला असं सांगितलं की माझं आणि प्रियाचं आधी प्रेम प्रकरण होतं तर तू चिडशील म्हणून वाटलं की परस्परस प्रियाचं प्रकरण मिटवू आणि मग आपलं नातं सुरू करून ",.. विकास
" पण मग तुम्ही माझ्याशी अजिबातच का बोलत नव्हते",.. राधा
" मला नाही समजल काही, माझी चुकी झाली आहे माझा स्वभाव नाही असं यापुढे माझ्याकडून मी अस करणार नाही, मला एक चान्स दे ",.. विकास
" मला विचार करायला वेळ हवा आहे",.. राधा
" नको ना राधा आता ताणु, चल घरी, तुला माहिती आई बाबांना तूच आवडते, त्यांनी घराबाहेर काढल आहे मला, तू आली तर ते घरात घेतील मला , मला ही तुझ्या सोबत रहायच आहे ",.. विकास
ज्योती ताई जिजाजी आले, ते बराच वेळ बोलत होते विकासशी,... राधा बॅग भर, जा विकास सोबत
विकास राधा वर्षा ताई घरी आले, बाबांनी दार उघडल राधाला बघून ते खुश होते, आईंनी राधाला आत नेल
विकास अजूनही दारात उभा होता,.." ये आत विकास वेगळ सांगायच का आता तुला ",
विकास खुश झाला येवून बाबांना भेटला
"ठीक आहे या पुढे अजिबात तक्रार नको, राधाला त्रास होता कामा नये",.. बाबा
राधा वर्षा ताईने स्वयंपाक केला, जेवण झाल मी निघते आता, विकास जावून तिला सोडून आला
राधा खोलीत बसली होती विकास आला, त्याने राधाला मिठीत घेतल,.. "मला खरच माफ कर राधा, या पुढे मी अजिबात अस वागणार नाही, मला समजत होत तुझा त्रास, तुझ मन दुखावल मी, या पुढे आपण दोघ खूप समजुतीने सुखात राहू",..
राधा खुश होती खूप, तिला तीच घर आनंद मिळाला होता, थोडक्यात वाचला होता तिचा संसार, मी आता विकासची आई बाबांची काळजी घेणार आहे,
राधा सुट्टी टाक आठ दिवस आपण फिरायला जाणार आहोत, उद्या निघतोय आपण, बॅग भरायला घे
राधा लाजली होती, तिने ऑफिसला ईमेल करायला घेतला..