तुला पाहते रे - भाग 11
मिहीर आणि सई आपल्या गाडीने खंडाळ्याला जायला निघाले. मुंबईतून बाहेर पडण्याआधी बाकीच्या फ़्रेंडसच्या गाड्या देखील त्यांना येऊन मिळाल्या. सगळे जण खंड्याळाला रवाना झाले. मिहिरच्या एका मित्राने आधीच सगळ्यांचं बुकिंग केलं होतं. कारण न्यू इयर म्हटल्यावर हॉटेल्स, रिसॉर्ट फुल होतात त्यामुळे थोडं आधीच बुकिंग केलेलं सोयीस्कर असतं. सगळेजण संध्याकाळच्या सुमारास खंड्याळाला रिसॉर्टवर पोहचले.
"Wow.....!!!! " सगळ्यांच्या तोंडून एकदमच शब्द बाहेर पडले.
रिसॉर्ट कमालीचं छान होतं. पार्कींग पासून हॉटेल पर्यंत असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा छान फुलंझाडं लावली होती. पुढे आल्यावर हॉटेलचा मोठा इन्ट्रान्स लक्ष वेधून घेत होता. थर्टी फस्ट साठी हॉटेल सजवलं जात होतं. सगळेजण आत गेले. फर्निशिंग केलेल्या पॉश अफव्हाईट टाईल्स...कोरिडॉर मध्ये मोठी झुंबरे... त्यात लावलेले सतरंगी लाईट्स....बघत सगळे आपापल्या बॅग्स घेऊन रिसेप्शन जवळ आले.
" Welcome sir , welcome mam....How can I help you..." रिसेप्शन वर असलेल्या सुंदर मुलीने तिची पाठ केलेली वाक्य फेकली.
" आमचं बुकिंग आहे इथे 5 रुम्सचं...." मिहीरचा मित्र केदार म्हणाला.
" ok... मी चेक करते..." असं म्हणून तिने कम्प्युटरची बटन्स दाबून रूम नंबर बघून घेतले. " येस सर....या तुमच्या कीज...सगळ्या रूम्स सर थर्ड फ्लोअर वरती आहेत..." असं म्हणून तिने प्रत्येकाच्या नावानुसार रुम्सच्या कीज दिल्या.
सगळेजण आपल्या कीज घेऊन वरच्या फ्लोअर वरती आले. येतानाही त्यांची थट्टा मस्करी चालू होती. मिहिरचे तीन मित्र त्यांच्या पूर्ण फॅमिली सोबत आले होते. मिहीर आणि केदार मात्र आपल्या बायको सोबत आले होते. सगळेजण आपापल्या रूम्स मध्ये गेले. तोपर्यंत रूम सर्व्हिसवाल्या बॉयने त्यांच्या बॅग्सही आणून दिल्या. रात्री डिनर साठी सगळ्यांनी खाली जायचं ठरवून सगळे रूम मध्ये गेले. एक दोन तासांनी सगळं आटपून सगळे डिनर साठी खाली येतात. त्यांच्या ग्रुपमध्ये केदार आणि ऋचाचं नवीन नवीन लग्न झालं होतं. त्यामुळे सगळे त्यांना चिडवत होते. सगळ्यांनी मिळून दोन तीन टेबल्स एकत्र जोडली आणि एकत्र जेवायला बसले. प्रत्येकाने आपापल्या आवडीचा मेनू मागवला.
" काय मग केदार.....बायकोशी आमची ओळख तरी करून दे...." एक मित्र म्हणाला.
त्यावर केदारने ऋचाशी सगळ्यांची ओळख करून दिली. टेबलच्या एका साईडला सगळे मित्र बसले आणि समोर त्याच्या बायका बसल्या होत्या. छान हसत खेळत त्यांचं जेवण चालू होतं.
" आजच्या आपल्या ह्या ट्रीपचं क्रेडिट जातं ते मिहिरला. कारण परवा संडे आहे पण उद्याची थर्टी फस्टची सुट्टी त्याने बॉस कडून सँक्शन करून घेतली सो आज आपण सगळे इथे आहोत. So credit goes to Mihir..." राहुल म्हणाला. तशा सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या.
" पण मिहीर मी काय म्हणतो बॉसला पटवलस तरी कसं....?? " ओंकारने जेवता जेवता विचारलं.
" अरे त्याला सवय असेल बायकोला पटवायची...काय मिहीर...." कोणतरी म्हणालं आणि एकच हशा पिकला. मिहिरने हसून सईकडे बघितलं पण सईने मात्र लाजून मान खाली घातली..
अशाच त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. केदार आणि ऋचाचं मात्र बाकीच्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्यांच्या काहीतरी खाणाखुणा सुरू होत्या. तेवढ्यात राहुलच्या बायकोचं स्वातीचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. तसं तिनं बाजूला बसलेल्या सईला कोपराने खुणावल . तीही मग त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसू लागली. टेबलावर खूप सारे पदार्थ मांडले होते. प्रत्येकजण आपल्याला हवे नको ते घेत होता. तेवढ्यात स्वातीच्या पायाला काहीतरी जाणवलं. तिने समोर पाहीलं तर केदार ऋचाकडे बघून हसत होता. तिने मग टेबलखाली वाकून पाहिलं तर केदार ऋचा समजून तिच्या पायाला पाय मारत होता. तिला हसू आलं. ती पुन्हा खुर्चीवरती नीट बसली आणि थोडा वेळ असाच गेला.
" केदार...." स्वातीने त्याला हाक मारली. तरी त्याचं लक्ष नव्हतं.
"केदार....." स्वातीने पुन्हा हाक मारली तेव्हा कुठे केदार जागा झाला.
" काय काय....!!! " तो पटकन म्हणाला.
" काही नाही....म्हटलं मगापासून तू ऋचा समजून माझ्या पायाला पाय मारतोयस..." स्वाती म्हणाली आणि एकच हशा पिकला.
" ओहह....सॉरी..." असं म्हणून त्याने मान खाली घातली. ऋचा मात्र तिथून लाजून पळाली होती. सगळेजण खुप हसत होते. मिहीर आणि राहुलने तर त्याला चिडवायची संधीच सोडली नाही...जेऊन झाल्यावर सगळे जण लवकर झोपले कारण एवढा लांबचा प्रवास करून सगळेचजण थकले होते.
....................................
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी न्यू इयरची पार्टी होती. संपुर्ण हॉटेल बुक झालं होतं. त्यामुळे माणसांची वर्दळही वाढली होती. हॉटेल छान सजवलं होतं. हॉटेलच्या मोठ्या लॉनवरती पार्टी होती. सगळीकडे लायटिंग करून माळा सोडल्या होत्या. ख्रिसमस ट्रि जागोजागी सजवले होते. सगळ्या जेन्ट्सना कोट किंवा ब्लेझर अशी थीम होती तर लेडीजना वन पिसची थीम दिली होती. मिहिरने नेव्ही ब्ल्यू कलरचा कोट...आत व्हाईट कलरचा शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू कलरची पॅन्ट....घातली होती. खूप हॅन्डसम दिसत होता मिहीर....!!! मिहीर आणि त्याच्या फ्रेंड्सना त्यांच्या बायकांनी त्यांची तयारी झाल्यावर बाहेर पिटाळलं होतं.
" मिहीर....हँडसम दिसतोयस...." राहूल म्हणाला. तसा मिहिरने केसांवरून हात फिरवला आणि तो हसला.
" तू ही....." तो म्हणाला. तोपर्यंत त्यांचे बाकीचे फ्रेंडही त्यांना येऊन जॉईन झाले.
" यार....या बायका किती वेळ लावतात तयार व्हायला..." केदार राहुलच्या पाठीवर थाप मारत म्हणाला.
" हो का..... लवकर कळलं तुला..." असं म्हणून राहुल आणि बाकीचे फ्रेंड्स मोठ्याने हसले. राहुल त्याला घेऊन जरा बाजूला गेला. आणि हळूच त्याच्या कानात म्हणाला.. " अरे अजून तुझी सुरवात आहे...आगे आगे देखो होता है क्या..." असं म्हणून त्याच्या पाठीवर हळूच थोपटलं.
" काय रे....काय सांगतोयस त्याला एवढं..." विश्वासने विचारलं.
" सुखी संसाराचे मंत्र......" असं म्हणून राहुल मोठ्याने हसला आणि बाकीचेही...!!
" हो....स्वातीच्या पुढे राहुल काय बोलणार...म्हणून त्यांचा संसार सुखीचं चाललाय..." मिहीर विश्वासला टाळी देत म्हणाला.
" हो हो....हे खरंच आहे हा...." विश्वास म्हणाला.
" हो का....थांबा सई आणि मेघना येउदेत त्यांना सांगतो तुम्ही काय म्हणत होतात ते...म्हणजे मग तुमचेही सुखी संसाराचे फंडे कळतील आम्हाला...." राहुल म्हणाला.
" काय कसले मंत्र सांगताय आपल्या भक्तांना एवढं...." स्वाती मागून येत म्हणाली.
तिने छान पिंक आणि चंदेरी कलरची नेटेड साडी नेसली होती. त्यावर सिल्वर ज्वेलरी ...कानातले घातले होते. राहुल तर तिच्याकडेच बघत होता. तेवढ्यात तिच्या हातावून हात सोडवून त्याच्या दोन्ही मुलांनी राहुलकडे धाव घेतली. तेव्हा तो भानावर आला. तिच्या मागून बाकीच्यांच्या बायकाही आल्या. सगळ्याच जणी खूप छान दिसत होत्या. सगळ्यात शेवटी सई खाली आली. मिहिरची तिच्यावरून नजरच हटेना. ब्लॅक कलरचा थ्रि फोर्थ वाजवली तसा तो जागा झाला.
" हॅलो लक्ष कुठाय....? " सईने हसत विचारलं.
" तुझ्याकडेच....!!! You are looking so beautiful...!!! " मिहीर तिला जवळ घेत म्हणाला.
त्याने मग बाजूच्याच पॅसेंजच्या खांबाच्या आडोशाला तिला ओढून घेतलं.
" काय चाललंय....चल सगळे आपली वाट बघत असतील. " ती म्हणाली.
" असुदे....आपण काही व्ही आय पी माणसं नाही.. आपली वाट बघायला..मला माझ्या बायकोकडे जरा बघू तर दे...." त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या गळ्यात टाकले.
" हो का.....रोज बघतोसच की..." ती म्हणाली.
" हो पण आज तू जास्त सुंदर दिसतेयस...." तो तिला जवळ ओढत म्हणाला. हळुहळू तो तिच्या जवळ जाऊ लागला तेवढ्यात त्याला विश्वासची हाक ऐकू आली आणि सई जोरात हसली. सगळा मुड घालवला म्हणत मिहीर बाहेर आला. पाठोपाठ सई देखील आली.
" अरे काय.... कुठे गायब झालात दोघेही..." तो मिहिरला चिडवत म्हणाला.
" नाही.....ते...ते इथेच होतो.....आईचा फोन आलेला सो बोलत होतो..चल जाऊया. " त्याने वेळ मारून नेली.
सई मात्र गालातल्या गालात हसत होती. दोघेही मग सगळ्यांसोबत जॉईन झाले. हॉटेल मधले बाकीचे गेस्टही आता आले होते. हळूहळू पार्टीला रंग चढत होता. सगळे जण छान ड्रिंक्स एन्जॉय करत होते. मग कोणीतरी कपल्स डान्सला सुरवात केली आणि सगळेच नाचू लागले. थोड्या वेळाने फाईव्ह लेव्हलचा मोठा केक आणण्यात आला. बारा वाजायला काहीच वेळ बाकी होता. मॅनेजरने सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांना एकत्र काऊंट डाऊन करायला सांगितलं. सगळ्यानी मग एका सुरात फाईव्ह.... फोर.... थ्रि....टू.... वन....!!!! असं म्हटलं आणि बारा वाजल्याचे ठोके घड्याळात पडले आणि सगळ्यांनी... एकच जल्लोष करत " हॅप्पी न्यू इयर " म्हटलं. सगळ्या आसमंतात तो घोष दुमदुमला. फटाके फोडण्यात आले. आतषबाजी करण्यात आली. सगळ्यांनीच त्याचा आनंद लुटला. मग मॅनेजरने त्यांच्या सगळ्या स्टाफला एकत्र केलं आणि त्यांच्या हातून केक कट केला. त्यामुळे सगळ्यांनाच फार छान वाटलं. रात्री खूप उशीरा पार्टी संपली...आणि सगळे दमून भागून आपल्या रूम मध्ये येऊन झोपले.
..................................
..................................
दुसऱ्या दिवशी दुपारी सगळ्यांनी पटापट आवरलं आणि काही फूड पार्सल घेतलं. कारण नंतर प्रवासात सगळ्यांनाच भुका लागल्या असत्या. मिहीर आणि त्याच्या फ्रेंड्सनी चेक आउट केलं आणि ते बाहेर आले. प्रत्येकजण आपापली गाडी घेऊन आले होते. त्यामुळे घरी कसं जायचं हा प्रश्न नव्हता. दोन दिवस सगळ्यांनी खूप धमाल केली होती त्यामुळे त्यांचा कोणाचाच तिथून पाय निघत नव्हता. पण कधीतरी घरी जावंच लागणार होतं ना. त्यामुळे सगळे आपापल्या गाडीत बसले. एकेक करून सगळ्यांच्या गाड्या हॉटेलबाहेर पडल्या. सगळ्यात शेवटी मिहीर आणि सईची गाडी होती. सगळे मुंबईकडे जायला रवाना झाले. मिहीर बाकीच्या गाड्यांपासून थोडं अंतर राखून गाडी चालवत होता. त्यामुळे बाकीच्या गाड्या तशा बऱ्याच पुढे गेल्या होत्या. मिहीर आणि सई मात्र आजूबाजूचा परिसर बघत जात होते. आता संध्याकाळ होत आली होती. त्यांनी जवळजवळ अर्ध अंतर पार केलं होतं. मिहीर ड्रायव्हिंग करता करता सईला त्रास देत होता. तिला खरतर गाडी चालवताना तिकडे लक्ष द्यावं असं वाटत होतं. पण त्याचं असं छळणं तिला सुखावतही होतं. आता बाजूला काळोख दाट होऊ लागला होता. पुढे गेलेल्या गाड्या धाब्यावर एका ठिकाणी नाश्त्याला थांबल्या होत्या. राहुलने फोन करून मिहिरला लवकर यायला सांगितलं. मिहीर सईला त्रास देत हळूहळू गाडी चालवत होता. अचानक एका वळणावर त्याचं लक्ष नसताना मोठ्या गाडीचे हेडलाईट्स त्यांच्या जवळ येत असलेले सईला जाणवले आणि ती मोठ्याने ओरडली...
"मिहीर.............."
क्रमशः....
काही कारणांमुळे कधीकधी भाग पोस्ट करायला उशीर होतो तरीही वाचकांना वेळेत भाग उपलब्ध करून देण्याकडे आमचा कटाक्ष असतो. काही जणींना असं वाटत की ईरा वरच्या लेखिका या गृहिणी आहेत काही जॉब वाल्या आहेत .लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळात त्या लिखाण करत असतात आणि भाग वेळेवर पोस्ट करतात. हे जरी खरं असलं तरी इथे पोस्ट होणाऱ्या सगळ्याच कथा या आशयपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि तितक्याच जीव ओतून लिहलेल्या असतात. त्याही आपल्या लेखनासाठी तितकाच वेळ देत असतात जितके बाकीचे लेखक देत असतात. उलट आपली कामं सांभाळून , आपला जॉब सांभाळून लिहणाऱ्या लेखकांचं मला कौतुक वाटतं. आपल्याला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या आपल्या वाचक वर्गासाठी आपण वेळेत भाग पोस्ट करणं हे लेखक म्हणून आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. त्यासाठी बाकीच्यांच्या कथा कधी पोस्ट होतात कधी संपतात या पेक्षाही काही वेळेला फेसबुक पेजवरती भाग पोस्ट झाल्याशिवाय नवीन भाग पोस्ट न करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करावा. सर्वचजण आपलं काम सांभाळून पार्ट टाइम किंवा फुल टाइम लिखाण हे करत असतो. पण लेखक किती वेळ लिहतो आणि किती वेळ नाही याहीपेक्षा त्यांच्या लेखणीला, प्रतिभेला अधिक महत्व दिलं जातं. काही कारणामुळे भाग वेळेवर पोस्ट करणं जमत नसेल तर आपलं हक्काने आपल्या वाचकांना सांगू शकतो...कारण ते आपल्याला समजून घेतील ही खात्री असते आणि हीच ईराच्या वाचकांची खासियत आहे.
धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा