तुला पाहते रे - भाग 7
पुढे काय होईल या भीतीने तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तो तिच्या समोर भिंतीला एक हात टेकवून उभा होता. तिच्या अशा घाबरण्याचं त्याला हसू आलं. तो हळूहळू तिच्या जवळ येऊ लागला... पण मग लगेचच तो मागे फिरला. मिहिरची काही हालचाल तिला जाणवली नाही तसे तिने डोळे उघडले. पाठमोऱ्या मिहिरला पाहून तिला जरा वेगळं वाटलं.
" मिहीर... काय झालं...?? " तिनं काहीच न कळून विचारलं
" अं..... काही नाही सई. मी जवळ आलेलं तुला चालणार नसेल तर....." त्याला पुढे बोलवेना
" मिहीर असं काहीं नाहीये प्लिज....." तिने मागून जाऊन त्याला मिठी मारली.
तसा तोही विरघळला. तो तिच्याकडे वळला आणि त्याने तिला मिठीत घेतलं..त्याने एका हाताने तिची हनुवटी वर करून तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याने हलकेच तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले..!!! ती शांत झाली. ती रात्र सई आणि मिहिरच्या प्रेमाने न्हाऊन निघाली होती..
.................................
दुसऱ्या दिवशी दोघेही लवकरच तयार होऊन बाहेर पडले. सईने यलो कलरचा टॉप...त्यावर ब्लॅक कलरची एम्ब्रॉडरी ...व्हाईट कलरची लेगीन..सिल्वर कलरचे मोठे कानातले... गळ्यात स्कार्फ आणि डोळ्याला गॉगल घातला होता...मिहीर तिच्याकडे पाहतच राहिला. तो तिच्या आधीच तयार होऊन गाडीजवळ उभा होता. त्यानेही व्हाईट कलरचा शर्ट....डार्क नेव्ही ब्ल्यू कलरची पॅन्ट....हातात घड्याळ...घालून रेडी होता...त्यात तो नेहमीसारखाच हँडसम दिसत होता. ती हळुहळु चालत त्याच्या जवळ आली.
" कुठे चाललोय आपण.....?? " त्याने फ़क्त सकाळी लवकर तयार हो एवढंच तिला सांगितलं होतं. त्यामुळे रूम मधून बाहेर आल्यावर तिने त्याला विचारलं.
" चल तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे..." तो छान हसून म्हणाला आणि त्याने तिच्यासाठी गाडीचं दार उघडलं.
ती गाडीत बसली. दुसऱ्या बाजूने येऊन तोही तिच्या बाजूला बसला. ड्रायव्हरने गाडी चालू केली. प्रवास तसा लांबचा होता. पण मिहिरने सईला काहीच सांगितलं नाही. सगळ्या प्रवासात तिने जवळजवळ दहा वेळा तरी त्याला कुठे जातोय ते विचारलं असेल...पण तो सांगायला तयार नाही..त्यामुळे तिला राग आला आणि रागातच तिला जरा झोप लागली. त्याने हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि थोपटलं. चार ते साडेचार तासांचा प्रवास करून ते ' अल्पुझा ' इथे पोहचले.. त्याला ' अल्लपी ' सुद्धा म्हणतात. त्यांची गाडी आता अल्लपी गावात शिरली होती. मिहिरने झोपलेल्या सईला हळूच जागं केलं आणि समोरच दृश्य दाखवलं. अल्लपी गाव लांबून छान दिसत होतं.. छोटी छोटी घर....नारळाची झाडं... आणि त्यांच्या मधून जाणारं खाडीचं शांत पाणी....!!!! खाडीच्या दोन्ही किनाऱ्यांवर छोटी छोटी घरं होती. थोड्याच वेळात त्यांची गाडी गावात आली. ड्रायव्हरने त्यांना घरांच्या बाजूच्या वाटेने खादीपर्यंत आणलं. आपल्या इकडे घरांसमोर गाडी उभी असते तशी तिकडे प्रत्येक घरासमोर एक छोटी नाव बांधलेली सईला दिसली..तिला खूप गंमत वाटली. एखाद्या समोरच्या घरी जायचे झाले तरी त्या लोकांना होडीतून जावे लागे... ते जसे किनाऱ्यावर येऊ लागले तसा मिहिरने सईच्या डोळ्यांवर आपला हात ठेवून तिचे डोळे झाकले..आणि तसाच तिला तो चालवत घेऊन गेला.
" अरे......अरे काय करतोयस हे....सोड ना " सई त्याचे डोळ्यांवरचे हात चाचपडत म्हणाली.
" शहशहशह......सरप्राईज....!!!! " तो तिच्या कानात कुजबुजला. मग ती शांतपणे चालत राहिली.
थोडं पुढे गेल्यावर त्याने तिला वरती चढायला लावलं...पण तिच्या डोळ्यांवरचे हात त्याने बाजूला केले नाहीत. पण आपण कुठेतरी दुसरीकडे अहोत हे तिला जाणवलं.. कारण मगाशी असलेली दगड मातीची वाट जाऊन पायाला काहीतरी सपाट भाग जाणवला तिला. त्याने तिला तसच हळुहळु थोडं पुढे आणलं आणि तिच्या डोळ्यांवरचे हात बाजूला केले. तिनं पाहिलं तर समोर लांबवर पसरलेली खाडी आणि त्या खाडीच्या शांत पाण्यामध्ये असलेल्या होऊसबोट हळूहळू पुढर सरकत होत्या...ते दोघेही एका हाऊस बोट मध्ये होते...त्या बोटीला बाहेरून छान सजवलं होतं. रंगीबेरंगी बलुन्स....त्याच्या बाजूने उडणाऱ्या कागदी माळा बघून ती खुश झाली. मिहीर तिला घेऊन आतल्या खोलीत आला. ती रुमही छान फुलांनी आणि बलून्सने सजवली होती. मध्ये एक मोठा बेड होता..त्यावर फुलांच्या पाकळ्या....खिडकीत सुगंधी कॅन्डल्स....हे सगळं बघून ती खूप हरखली...!!!! ती हाऊस बोट मिहिरने तिच्यासाठी पूर्ण दिवसभरासाठी बुक केली होती...!!!!! मिहिरने तिला हे सांगितल्यावर तिने धावत येऊन त्याला घट्ट मिठी मारली. तिने त्याच्या कानात ' i love you Mihir ' म्हणून गालावर एक किस दिला आणि ती बाहेर डेकवर आली..मिहिरलाही खूप छान वाटलं..सई आता जरा मोकळी होतं होती...तोही तिच्या अशा वागण्याने तिच्या अजूनच प्रेमात पडत होता..!!!!
............................................
थोड्या वेळाने त्यांची हाऊस बोट दुसऱ्या किनाऱ्याला पोहचली. त्या नाव चालवणाऱ्या माणसाने एका ठिकाणी नावेचा नांगर पाण्यात टाकला आणि नाव एका झाडाला बांधून ठेवली आणि तो दुसऱ्या बाजूला त्यांच्यासाठी जेवण तयार करायला गेला..सईला हे तरंगत पाण्यावरच घर ...सजवलेली बोट....बघून खूप भारी वाटत होतं..!! डेकवर ती शांत उभी होती. समोरचं असणार शांत पाणी .... त्यावर तरंगणारी त्यांच्यासारखीच चार पाच घर ...बाजूला हिरव्या रंगांची उधळण करत उभी असलेली झाडं....हे सगळं ती डोळ्यात साठवून घेत होती.....!!!! त्यांनी मग तिथे खूप सारे फोटोज काढले..थोड्या वेळाने त्या बोटीवरच्या माणसाने त्यांना जेवायला बोलावलं...त्यांनी ते जेवण तिथेच बोटीवरती केलं होतं.. जेवण खूपच छान होतं. दोघेही पोटभर जेवले आणि रूम मध्ये येऊन झोपले..पण मिहिरने सईला झोपू दिले नाही.. तो तिच्या काही ना काही खोड्या काढुन तिला सतवत होता.. त्यावर तीही गाल फुगवून बसायची...त्याने तिला सॉरी म्हटल्यावर पुन्हा हसायची.. त्यांच्या अशाच मजा मस्तीतून .....एकेमेकांना समजून घेत त्यांचं नातं फुलत होतं.....!!!!
...................................
रात्री साधारण आठच्या दरम्यान ते मुन्नारला हॉटेल वरती परतले..पण दोघेही इतके दमले होते की त्यांना बेडवर पडल्या पडल्या झोप लागली. त्यानंतर दोन दिवस मुन्नार मध्येच राहून त्यांनी इतर पॉईंट्स बघितले. सगळीकडे फिरले.. घरच्यांसाठी आणि पूजा , सईच्या आई बाबांसाठी ही त्यांनी खरेदी केली. जाताना नेलेल्या दोन बॅग्सच्या ऐवजी आता त्यांच्याकडे मोठ्या चार बॅगा दिसत होत्या..निघण्या आधी त्यांनी कारखानीस काका आणि काकूंना वाकून नमस्कार केला. त्यांनी ही सई आणि मिहिरला तोंड भरून आशीर्वाद दिले. दोघेही आता परतीच्या प्रवासाला लागले...कधी एकदा घरी जाऊन पूजा आणि आईला सगळं सांगतेय असं सईला झालं होतं...!!! परत येतानाचा त्यांचा प्रवास ट्रेनने होता. त्यामुळे येताना देखील त्यांना केरळच्या सौन्दर्यात भर टाकणाऱ्या अनेक गोष्टी बघता आल्या. दोन्ही बाजूला भरभरून पसरलेलं निसर्ग सोंदर्य बघताना आपलेच डोळे थकतील असं त्यांना वाटलं....!!!
......................
सई आणि मिहिरला परत येऊन आता जवळजवळ आठ दहा दिवस होऊन गेले. केरळहुन आल्यानंतर सई एकदा घरी जाऊन आली. तिने सगळ्यांसाठी आणलेल्या वस्तू त्यांना दिल्या. पण आई, बाबा आणि पूजा तिघांनीही तिला चिडवून भंडावून सोडलं होतं. मिहिरची देखील काय वेगळी अवस्था नव्हती. घरी त्या दोघांनाही आई बाबा चिडवत होतेच पण ते कमी म्हणून की काय मिहिरला सगळ्यांनी ऑफिसमध्येही टार्गेट केलं होतं....दिवस असेच हसत खेळत पुढे सरकत होते.. तो ऑफिसला असतांना एकदा त्याला सईचा फोन आला..ती खूप घाबरली होती. बोलताना तिला जरा धापही लागली होती. पलीकडून सई त्याला काहीतरी सांगत होती.
" काय....???..." म्हणून मिहीर मोठ्याने ओरडला..
क्रमशः.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा