शेजारी रित्या झोक्यास रे, झोंबतो तुझाच वारा;
तुला शोधतो येथे ,आसुसलेला स्तब्ध किनारा.

उसळतील लाटा इथल्या,थेंबथेंब माखून शहारा;
माझ्या रुक्ष वाळूला , गोठवतो तुझा रे पहारा.

प्रेमवेडी रोजच रे झुरते,चेतवून प्राण सारा;
आठवांच्या व्याकुळ धरेला, स्पर्शून घे मेघमल्हारा.

श्वास हो भास हो तू, प्रसन्न देहाचा हो निवारा;
तुझ्या अस्तित्वाचे छप्पर ,नी तुझा वावर साजरा.

नसला जरी आसपास तू,भेटू ओलांडून भवसागरा;
रम्य स्वप्नात दरवळू दे ,तुझ्या सहवासाचा मोगरा.

पुन्हा भेटूया तिथे जिथे, मावळतो तो मित्र सागरा;
साथ माधवी देऊ दे, भरतीचा हो तू शशी पांढरा.

©®पूनम तावडे लोखंडे