डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. २२
©अनुप्रिया
©अनुप्रिया
नंदिनी तुळशीमाई आणि देवघरातल्या देवापाशी दिवा लावला. छान साग्रसंगीत पूजा आटोपली आणि सर्वांसाठी नाष्टा बनवण्यासाठी किचनमध्ये आली. इतक्यात आत्याबाई तिथे आल्या.
“आज सकाळच्या न्याहारीत काय बनवताय? की आज सर्वांना उपवास घडवायचाय? सांगा पटकन.. शून्य मिनिटात निकाल लावतो की नाही ते बघाच.”
“तुम्ही सांगाल ते बनवते आत्याबाई.. काय बनवू?”
“कांदेपोहे जमतील का? की तिथेही..”
“जमेल आत्याबाई.. बनवते पटकन..”
“हं.. आवरा पटकन.. माधव आणि स्वराजला नाष्टा लवकर लागतो. त्यांना भूक लागली असेल. चटचट हात चालवा..
मदतीला आपल्या घरकाम करणाऱ्या सुमनला घ्या.. आणि हो.. आता शालिनी येईल, तिला दुपारच्या जेवणाचा मेन्यू विचारून घ्या.. समजून घ्या.. समजलं? नसेल समजलं तर आम्ही समजावून सांगतो आणि शून्य मिनिटात निकाल लावतो. सांगावं का?”
मदतीला आपल्या घरकाम करणाऱ्या सुमनला घ्या.. आणि हो.. आता शालिनी येईल, तिला दुपारच्या जेवणाचा मेन्यू विचारून घ्या.. समजून घ्या.. समजलं? नसेल समजलं तर आम्ही समजावून सांगतो आणि शून्य मिनिटात निकाल लावतो. सांगावं का?”
नंदिनीने नको म्हणत मान हलवली. आत्याबाईंनी सुमनला
आवाज दिला आणि तिला कांदेपोहे करण्याचं साहित्य काढून ओट्यावर ठेवायला सांगितलं आणि त्या डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीत जाऊन वर्तमानपत्र वाचत बसल्या. सुमनने पोहे धुवून एका भांड्यात काढून ठेवले आणि नंदिनी कांदेपोहेसाठी कांदे चिरू लागली. तेवढ्यात मागून मीराचा आवाज आला.
आवाज दिला आणि तिला कांदेपोहे करण्याचं साहित्य काढून ओट्यावर ठेवायला सांगितलं आणि त्या डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीत जाऊन वर्तमानपत्र वाचत बसल्या. सुमनने पोहे धुवून एका भांड्यात काढून ठेवले आणि नंदिनी कांदेपोहेसाठी कांदे चिरू लागली. तेवढ्यात मागून मीराचा आवाज आला.
“नंदिनी…”
नंदिनीने दचकून मागे वळून पाहिलं. मीरा अगदी सहज स्वयंपाक घरात आली असंच भासवत होती. गोड गोड बोलून नंदिनीच्या मनापर्यंत जाण्याची, मी तुझ्या बाजूने आहे हे भासवण्याची तिची ही चाल यशस्वी करण्याचा ती प्रयत्न करत होती. चेहऱ्यावर तिच्या नेहमीचा हलकासा मेकअप होता. आवाजातल्या त्याच मधाळ जादूचा प्रयोग करत मीराने नंदिनीला विचारलं.,
“मी काही मदत करू का?”
“नाही.. नको.. मी करेन.. तू बस मी नाष्टा घेऊन आलेच.”
मीराचं लक्ष सुमनकडे गेलं. तिला तिथून हाकलून देण्यासाठी मीरा म्हणाली,
“सुमन जा.. शालिनी मामी उठली का बघ.. आणि तिचं आवरून तिला इकडेच हॉलमध्ये घेऊन ये. जा पटकन..”
पण मीराताई ते.. आत्याबाईंनी वहिनींना मदत करायला..”
“मी करेन मदत तिला.. तू जा बरं.. जा म्हणते ना..”
तिच्या दरडवण्याला घाबरून सुमन निमूटपणे तिथून निघून थेट शालिनीताईंच्या खोलीच्या दिशेने चालू लागली. मीरासाठी ही आयती संधीच चालून आली होती. स्वयंपाकघरात आता मीरा आणि नंदिनीच होत्या.
“मला माहिती आहे, तू सगळं स्वतःच करायला बघतेस.”
क्षणभर शांतता पसरली. मीरा हळू आवाजात म्हणाली,
“नंदिनी, एक विचारू का? राग मानू नकोस.”
नंदिनीने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत मान हलवली.
“विचार.”
“तुला इथे या घरात खरंच बरं वाटतंय का?”
चाकू क्षणभर थांबला.
“म्हणजे?”
नंदिनीने विचारलं. मीरा जवळच्या खुर्चीत बसली आणि म्हणाली,
“बाहेर लोक काय काय बोलतात माहिती आहे का? मी ऐकते… ऐकावंच लागतं.”
“माझ्याबद्दल?”
नंदिनीने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.
“नाही… तुझ्याबद्दल नाही.. स्वराजबद्दल.. लोक म्हणतात, तो फार गोंधळलेला आहे. लग्नाचं दडपण, त्यात शालिनी मामी आजारी पडल्या. मायनर अटॅक येऊन गेला त्यांना. मामीच्या काळजीपोटी, तिने विनवण्या केल्या म्हणून त्याने तुझ्याशी लग्न केलं. पण सगळं एकदम एका पाठोपाठ आलं ना त्यामुळे तोही थोडा भांबावून गेलाय.”
मीरा क्षणभर थांबली जणू ती शब्द शब्द जपून वापरत होती.
“कधी कधी माणसं काही गोष्टी लपवतात. वाईट हेतूने नाही तर समोरच्याला दुखावू नये म्हणून.आपण समजून घ्यायचं.”
नंदिनी पटकन म्हणाली. मीरा तिच्याकडे पाहून हसली. आता मात्र नंदिनीला तिचा रागच आला होता.
“तुम्हाला काय म्हणायचंय?”
“तुम्हाला काय म्हणायचंय?”
तिने थेट विचारलं. मीरा पुन्हा हलकंसं हसली.
“काही नाही गं.फक्त इतकंच…तू फार समजूतदार आहेस.
कदाचित म्हणूनच तुला गृहीत धरलं जात असावं आणि तुझं माहेर खूप साधं आहे ना? माहेरची माणसं साधी भोळी आहेत म्हणूनच कदाचित लोकांना वाटतं, तू सगळं निमूटपणे सहन करशील.”
कदाचित म्हणूनच तुला गृहीत धरलं जात असावं आणि तुझं माहेर खूप साधं आहे ना? माहेरची माणसं साधी भोळी आहेत म्हणूनच कदाचित लोकांना वाटतं, तू सगळं निमूटपणे सहन करशील.”
‘गृहीत’ हा शब्द नंदिनीच्या मनाला फार खटकला पण तरीही ती शांतच होती. ती काहीच बोलली नाही. ती पोहे बनवण्यात व्यस्त झाली. इतक्यात मीरा खुर्चीतून उठली आणि निघताना अगदी सहज म्हणाली,
“आजकाल काही लग्नं फक्त वेळ काढण्यासाठीही केली जातात. सहा महिने… वर्ष… दोन वर्ष आणि एकदाचा फारकतीचा निर्णय.. इट इज जस्ट लाइक ए कॉन्ट्रॅक्ट.. तुमची मैत्री छान आहे. पण कधी कधी मैत्री ही खरं प्रेम लपवण्यासाठी वापरली जाते.”
इतकं बोलून मीरा बाहेर निघून गेली. स्वयंपाकघरात पुन्हा शांतता पसरली. पण आता ती शांतता नंदिनीच्या मनाला अस्ताव्यस्त करत होती.
“सहा महिने…”
हा आकडा पुन्हा मनात घुमत होता. तो माझ्यावर विश्वास ठेवतोय का? की फक्त निभावतोय? मी खरंच इथे फक्त थांबलेली आहे का?” तुळशीपाशी उभी असलेली सकाळची नंदिनी आणि ही आतून हादरलेली नंदिनी…
या दोन वेगळ्या होऊ लागल्या होत्या.
या दोन वेगळ्या होऊ लागल्या होत्या.
हळूहळू घरातले बाकीचे सारेजण डायनिंग टेबलापाशी येऊन बसले. नंदिनीने सर्वांपुढे चहा आणि पोह्यांची डिश ठेवली. इतक्यात सुमन शालिनीताईना बाहेर घेऊन आली. त्यांनाही चहा आणि पोहे दिले. कांदेपोहे अप्रतिम झाले होते. सर्वांनी तिच्या कांद्या पोह्यांचं कौतुक केलं. सर्वांनी नाष्टा केला आणि आपापल्या कामाला निघून गेले.
नंदिनी मात्र विचारात पडली. मीराची चाल यशस्वी झाली होती. नंदिनीच्या डोक्यात संशयाचा भुंगा सोडण्यात मीराला यश मिळालं होतं. नंदिनीच्या समोर स्वतःची प्रतिमा बिघडू न देता, स्वराजबद्दल एकही शब्द वाईट न बोलता मीराने अगदी शांतपणे तिचा प्लॅन घडवून आणला होता. मीराने जसा विचार केला होता त्याहीपेक्षा जास्त प्रभावी परिणाम या प्लॅनमुळे झाले होते. जे फक्त मीराच्या नजरेला दिसत होते.
क्रमशः
©अनुप्रिया
क्रमशः
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा