डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. २६
©अनुप्रिया
©अनुप्रिया
मीरा सुडाने पेटून उठली होती. सारी रात्र ती तशीच बिछान्यात तळमळत पडली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टाच्या वेळीस तिने तिचा डाव टाकला. माधवराव शालिनीताई, सार्थक, अर्पिता आणि प्रभावती सारेजण शांतपणे नाष्टा करत होते. नंदिनी सर्वांच्या पुढे चहा आणून ठेवत होती. इतक्यात मीरा तिथे आली आणि खुर्चीत बसत स्वराजकडे पाहत शांतपणे म्हणाली,
“मी घरी जायचं ठरवलंय.”
“घरी? म्हणजे… अचानक?”
स्वराजने चहाचा कप खाली ठेवत विचारलं.
“अचानक नाही. खूप दिवसांपासून ठरवत होते.”
“का?”
तो नकळत विचारून गेला. मीराने क्षणभर थांबून त्याच्याकडे हसून पाहिलं. ते हसू त्याला ओळखीचं होतं; पण त्यात पूर्वीसारखी हुरहूर नव्हती. त्याच्या प्रश्न विचारण्याचे नंदिनीचंही लक्ष त्याच्याकडे गेलं.
“म्हणजे त्यालाही वाटतंय, मीराने जाऊ नये..”
तिला क्षणभर अस्वस्थ वाटलं; पण ती काहीच बोलली नाही. तिची अस्वस्थता पाहून मीरा मनातून खूप खुष झाली. तिने टाकलेला डाव यशस्वी होताना दिसत होता. स्वराजच्या प्रश्न विचारण्याचे सर्वांचे लक्ष मीराच्या उत्तराकडे होतं. प्रभावतीबाईंकडे पाहत मीरा पुढे म्हणाली,
“आई, तुला राहायचं तर राहू शकतेस पण मी जाणार आहे.”
“अगं पण का? कोणी काही बोललं का तुला? आम्हाला सांग. शून्य मिनिटात निकाल लावून टाकतो. आणि तू निघणार असशील तर आम्ही इथे कशासाठी थांबू? आम्हीही तुझ्याबरोबर येतो.”
प्रभावतीबाईंनी लगेच आपली तलवार काढली.
“आई, तसं काही नाही. मला कोणीच काही म्हटलेलं नाहीये. मला जायचंय कारण आता माझी इथे गरज नाही.”
स्वराज भुवया उंचावून तिच्याकडे पाहू लागला.
अरे म्हणजे मला असं म्हणायचं होतं की, आता नंदिनी आहे ना? ती सगळं मॅनेज करतेय. घर, आई, ऑफिस… तुलाही.”
मीरा त्याच्याकडे थेट पाहत होती. ती त्याला दोष देत नव्हती. तिच्या नजरेत स्वराजबद्दल राग दिसत नव्हता. कसलीही तक्रार नव्हती.
“स्वराज, मी पूर्वीसारखी राहिले असते तर कदाचित मला थांबायला कारणं सापडली असती. मी पूर्वीची तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी, तुझ्या मागे मागे फिरणारी, तुझं हवंनको ते पाहणारी, तुझ्या आवडीनिवडी जपणारी मीरा राहिले नाही. स्वराज मी आता बदललेय. ”
“म्हणजे?”
स्वराजचा आवाज थोडा दबलेला होता. मीरा जागेवरून उठत म्हणाली,
स्वराजचा आवाज थोडा दबलेला होता. मीरा जागेवरून उठत म्हणाली,
“म्हणजे, स्वराज, मी कोणाच्या आयुष्यात रिकामी जागा भरायला थांबणार नाही. जिथे माझी गरज आहे तिथेच मी असेन. चल बॅग भरायला घेते.”
असं म्हणून ती पर्स खांद्यावर घेत निघायला वळली. तिच्या पाठोपाठ प्रभावतीबाईही उठून उभ्या राहिल्या. माधवराव आणि शालिनीताई एकमेकांकडे बघत राहिले. एकदम अचानक काय झालं की, मीराने त्यांच्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला ते त्यांनाही समजत नव्हतं. स्वराजने पहिल्यांदाच मीराला थांबवलं.
“मीरा..”
“मीरा..”
तिने मागे वळून पाहिलं.
“आपण संपर्कात राहू ना?”
“हो.. नक्कीच जर तुला गरज वाटली तर..”
मीरा आणि प्रभावतीबाई तिथून त्यांच्या खोलीच्या दिशेने निघून गेली. स्वराज मात्र तिथेच बसून राहिला. आज पहिल्यांदाच कोणी तरी त्याला सोडून जातंय; तो निवड कोणाचीतरी करणारा नाही, तर दुसऱ्या कोणी त्याची निवड करेल याची भीती स्वराज अनुभवत होता. थोड्या वेळाने मीरा आणि प्रभावतीबाई सर्वांचा निरोप घेऊन त्यांच्या घरी निघून गेल्या. माधवराव आणि शालिनीताईंनी त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघी थांबल्या नाहीत.
“ती गेली म्हणजे काहीतरी संपलं की काहीतरी सुरू होणार आहे?”
नंदिनीच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला.
रात्रीचे अकरा वाजले होते. नंदिनी स्वयंपाकघर आवरत होती. स्वराज हॉलमध्ये बसून मोबाईल बघत होता. इतक्यात त्याचा फोन वाजला आणि मोबाईल स्क्रिनवर मीराचं नाव झळकलं. स्वराज क्षणभर थांबला आणि त्याने नंदिनीकडे पाहिलं. नंदिनीने काही विचारलं नाही. तिने मानही वळवली नाही. स्वराजने कॉल घेतला आणि बोलायला सुरुवात केली,
“हॅलो?”
मीराचा आवाज फार शांत होता.
“सॉरी उशीर झाला. पण मला तुझ्याशी बोलणं गरजेचं होतं.”
“सगळं ठीक आहे ना?”
स्वराजने नकळत विचारलं.
“हो… नाही… म्हणजे…”
मीरा बोलता बोलता थांबली.
“मी आज घरी पोहोचले.”
“ओह… ठीक आहे.”
तो काय बोलावं हे शोधत होता.
“नंदिनी आहे ना तिथे?”
मीराने अगदी सहज विचारलं. स्वराजची नजर किचनकडे गेली.
“हो.”
“छान.. मग ठीक आहे. मी फोन ठेवते.”
“इतक्यासाठी फोन केला होतास?”
तो नकळत विचारून गेला.मीराचा आवाज बदलला नाही.
“नाही.. मी फक्तहे सांगायला कॉल केलाय की, मी तुझ्या घरातून निघून आलेय म्हणजे पळून आलेले नाही. मी तुला दोष दिला नाही. नंदिनीला कमी लेखलं नाही. फक्त स्वतःला वाचवण्यासाठी मी त्या घरातून बाहेर पडलेय.”
फोन कट झाला. स्वराज अस्वस्थ झाला. नंदिनीने त्याच्याकडे पाहिलं आणि ती काहीही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली. नंदिनी फक्त तो सहा महिन्यांचा करार पाळण्याचा प्रयत्न करत होती. मनात अनेक प्रश्न होते.
“स्वराज असं का वागला असेल? मी माहेरी जाऊ का? मीरा खरंच पुढे गेली असेल का? स्वराज व्यक्ती म्हणून कसा असेल?”
इतक्यात दार वाजल्याचा आवाज आला. स्वराज आत येऊन सोफ्यावर बसला. स्वराजच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. नंदिनीने स्वराजला विचारलं,
“आज उशीर झाला?”
“आज उशीर झाला?”
स्वराजने फक्त मान हलवली. पूर्वीसारखा प्रश्न नाही. चौकशी नाही. हेच तिला थोडं विचित्र वाटलं. ती पाणी प्यायला उठून बसली. तेवढ्यात स्वराजला कोणाचातरी कॉल आला.
“नाही काका, अजिबात लाजायचं नाही. तुम्ही उद्या या. मी बोलतो मॅनेजरशी. नोकरी गेली म्हणून माणूस संपत नाही.”
नंदिनी थबकली. स्वराजचा आवाज थरथरत नव्हता. त्याच्या आवाजात ठामपणा आणि काळजी होती.
“पैशाची चिंता करू नका. तोवर मी पाहतो.”
फोन ठेवताना स्वराजने एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभर त्याचा चेहरा थकलेला, एकाकी वाटला. त्याच्याकडे पाहताना नंदिनीच्या मनात नकळत विचार आला.
“हा माणूस वाईट असता, तर इतका जबाबदारीने बोलला असता का? एवढ्या आपुलकीने कोणासाठी तरी उभा राहतोय. प्रेमाने चौकशी करतोय. त्याला आर्थिक मदत करायलाही तत्पर वाटला. आतापर्यंतच्या त्याच्या वागण्या बोलण्यावरून तर मला वाटतो तितका स्वराज वाईट नसावा.”
“तिच्या मनात स्वराजबद्दल निर्माण झालेली कणव हीच तर त्यांच्या नात्याची नवी रुजवात तर नसावी?”
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
