डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. २५
©अनुप्रिया
©अनुप्रिया
शालिनीताईंनी नंदिनीला पुन्हा नोकरीवर रुजू होण्याची परवानगी दिली. त्यातच नंदिनी खुश होती. नंदिनीने ऑफिसमध्ये एच आर डिपार्टमेंटला आणि डायरेक्टरांना कळवलं. त्यांनी तिला लवकरात लवकर जॉईन करायला सांगितलं होतं. त्यामुळे फक्त तिच्या सासूबाईंना, शालिनीताईना सांगून उपयोग नव्हता तर घरातल्या इतर मंडळींनाही सांगणं गरजेचं होतं. एक दिवस रात्रीच्या वेळी जेवणाच्या टेबलवर शालिनीताईंनी विषय काढला. माधवरावांकडे पाहत त्या म्हणाल्या,
“अहो, ऐकलंत का? नंदिनी पुन्हा तिचं ऑफीस जॉईन करायचं म्हणतेय आणि मलाही तिचं म्हणणं पटतंय.”
“शालिनी, काय बोलतेस तू हे? सरपोतदारांची सुन ऑफिसमध्ये जाऊन काम करणार? शोभतं तरी का?”
आत्याबाईंचा घास जणू घशातच अडकला. मीरा तर आश्चर्याने उडालीच.
“नंदिनी नोकरी करायचं म्हणतेय म्हणजे तिला कशाचाच काही फरक पडत नाही असं नाही. स्वराज पासून अंतर ठेवण्यासाठी ती दूर राहतेय. ती बदलतेय. हा बदल माझ्यासाठी घातक ठरू शकतो. नाही.. नाही मला काहीतरी केलं पाहिजे. ती ऑफिसला गेली नाही पाहिजे. ती घरातच असायला हवी.”
मीराच्या डोक्यातल्या विचारांनी तिला अस्वस्थ केलं.
“बरोबर आहे आईचं.. अगं मामी, तू आजारी पडलीस. म्हणून तर स्वराजने इतक्या घाईने लग्न केलं. आणि आता तूच तिला नोकरीवर जायला सांगतेय. मग तुझ्याकडे कोण असेल? तुझी औषधं, पथ्यपाणी हे कोण पाहिल? तुझी काळजी कोण घेईल?”
मीराने तिच्या आईच्या बोलण्याला दुजोरा दिला. अर्पितानेही लगेच तिचीच ‘री’ ओढली.
“पण मुळात सरपोतदारांच्या सुनेला नोकरीची गरज तरी काय? ईश्वराच्या कृपेने देवाने आपल्याला भरभरून दिलंय. कशाचीही कमतरता नाहीये. मग कशासाठी हे भिकेचे डोहाळे?”
“आई अजून लग्न होऊन महिना पण नाही झाला आणि लगेच नोकरीला पाठवून द्यायची? लोक काय म्हणतील सरपोतदारांवर इतकी वाईट वेळ आलीय की त्यांना घरच्या लेकीसुनांना नोकरीवर पाठवण्याची वेळ आली?”
स्वरालीही शालिनीताईंकडे पाहत म्हणाली. शालिनीताई शांतच बसून होत्या. त्यांचं लक्ष आता माधवराव आणि स्वराजच्या बोलण्याकडे लागलं होतं.
“पण हा विषय तिच्या नवऱ्याने हाताळला पाहिजे ना? त्याचं काय मत आहे?”
माधवरावांनी स्वराजकडे पाहते विचारलं तसा स्वराज कुत्सितपणे हसला आणि म्हणाला,
“आता तुम्हाला माझं मत विचारावंसं वाटतंय? कमाल आहे! म्हणजे माझं मत तितकं महत्वाचं आहे? आणि जर असेल तर मग लग्नाच्यावेळी कुठे गेलं होतं? लग्न ठरवताना तर मला…”
“स्वराज.. जुने विषय उकरून काढण्यात काय अर्थ? विचारलं तेवढ्या प्रश्नाचं उत्तर देशील का?”
शालिनीताई स्वराजकडे पाहून म्हणाल्या.
“तिला नोकरी करायची आहे. ती सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकते तर कशाला कोणाची हरकत असेल? आणि ती तिच्या मर्जीने तिचे निर्णय घ्यायला मोकळी आहे. मी कोण ठरवणार?”
त्याचं चिडून दिलेलं उत्तर ऐकून मीराच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. इतक्यात माधवराव म्हणाले,
“तुम्हा सर्वांचं बोलून झालं असेल तर आम्ही बोलू का थोडं?”
त्यांचं वाक्य ऐकताच नंदिनीला पक्की खात्री पटली की, माधवराव तिला विरोध करतील. नोकरी करू नको असं म्हणतील पण तिच्या अपेक्षेपेक्षा वेगळंच घडलं. सर्वांनी माना डोलावल्या तसं माधवरावांनी बोलायला सुरुवात केली.
“सरपोतदारांच्या लेकीसुनांना आपल्या या घरी काही कमी आहे म्हणून त्या नोकरी करतात असं नाही. प्रत्येक मुलीने आर्थिकदृष्ट्या सबळ, स्वावलंबी असायला हवं. स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. स्वतःचे निर्णय स्वतःला घेता यायला हवेत म्हणून नोकरी करावी. आमचा नंदिनीच्या नोकरी करण्याला कसलाच विरोध नाही. आमची परवानगी आहे. त्यांनी फक्त वेळेचं बंधन पाळावं, वेळेत घरी यावं इतकचं..”
माधवरावांच्या बोलण्याने नंदिनीला खूप आश्चर्य आणि आनंदही वाटलं. जे स्वतःसाठी तिने मागितलं होतं ते तिला मिळालं होतं. नंदिनीसकट सर्वांनाच माधवरावांच्या निर्णयाने धक्का बसला होता. शालिनीताई नंदिनीसाठी खुष होत्या.
नंदिनीचा दिनक्रम सुरू झाला. ती रोज लवकर उठायची. स्वतःचं आवरून सगळ्यांसाठी नाष्टा, जेवण बनवायची. नोकरांना साफसफाईच्या सूचना द्यायची. त्या नंतर मात्र ती ऑफिसच्या कामावर फोकस करायची. दहा ते सहा काम केल्यावर लॉग आऊट झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी सर्वांसाठी चहापाणी करायची रात्रीच्या जेवणात थोडी फार मदत करायची. पुढे काही दिवसांनी तिने अर्पिताला सांगून ठेवलं, ‘सकाळचा नाष्टा आणि दुपारचा स्वयंपाक ती करेल आणि संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण अर्पिता करेल आणि स्वराली तिला मदत करेल.’ आता तिच्या वागण्याबोलण्यात बदल झाला होता. स्पष्टता आली होती.
पण स्वराजला हा बदल खटकायला लागला. ती त्याला आधीसारखे प्रश्न विचारत नव्हती. त्याची वाट पाहत नव्हती. तो उशिरा आला तरी ती विचारायची नाही. उशीर का झाला म्हणून विचारत नव्हती. एके संध्याकाळी न राहून स्वराजने तिला विचारलंच,
नंदिनीचा दिनक्रम सुरू झाला. ती रोज लवकर उठायची. स्वतःचं आवरून सगळ्यांसाठी नाष्टा, जेवण बनवायची. नोकरांना साफसफाईच्या सूचना द्यायची. त्या नंतर मात्र ती ऑफिसच्या कामावर फोकस करायची. दहा ते सहा काम केल्यावर लॉग आऊट झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी सर्वांसाठी चहापाणी करायची रात्रीच्या जेवणात थोडी फार मदत करायची. पुढे काही दिवसांनी तिने अर्पिताला सांगून ठेवलं, ‘सकाळचा नाष्टा आणि दुपारचा स्वयंपाक ती करेल आणि संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण अर्पिता करेल आणि स्वराली तिला मदत करेल.’ आता तिच्या वागण्याबोलण्यात बदल झाला होता. स्पष्टता आली होती.
पण स्वराजला हा बदल खटकायला लागला. ती त्याला आधीसारखे प्रश्न विचारत नव्हती. त्याची वाट पाहत नव्हती. तो उशिरा आला तरी ती विचारायची नाही. उशीर का झाला म्हणून विचारत नव्हती. एके संध्याकाळी न राहून स्वराजने तिला विचारलंच,
“आजकाल तू काही विचारत नाहीस.”
नंदिनीने अगदी सहज उत्तर दिलं,
“कारण सगळे प्रश्न विचारायचे नसतात. काहींची उत्तरं आपोआप त्या वेळीच मिळतात.”
त्या वाक्याने तो गप्प झाला. त्या रात्री नंदिनी झोपताना विचार करत होती.
“मी अजून इथे आहे. मी अजून थांबलेय; पण मी हरवलेली नाही. तो वेळ काढतोय ना? ठीक आहे. एकाच घरात, एकाच खोलीत राहून मी त्याच्यापासून अलिप्त राहीन.”
इकडे मीरा कॉफीशॉपमध्ये समोरच्या खुर्चीत पाय गुंडाळून बसली होती. मोबाईल हातात होता; पण स्क्रीनकडे लक्ष नव्हतं. समोर ठेवलेली कॉफी थंड झाली होती.
इकडे मीरा कॉफीशॉपमध्ये समोरच्या खुर्चीत पाय गुंडाळून बसली होती. मोबाईल हातात होता; पण स्क्रीनकडे लक्ष नव्हतं. समोर ठेवलेली कॉफी थंड झाली होती.
“तो बदललाय,”
तिने स्वतःशीच पुटपुटली.
ती स्वराजच्या मेसेजेस स्क्रोल करत होती.
“पूर्वी तू कशी आहेस? आज थोडा उशीर होईल., आज प्लॅन काय आहे? बाहेर जेवायला जावूयात? किंवा मी घरी येतोय, माझ्यासाठी मस्त नॉनव्हेज बनव., मला आज तुझी आठवण येतेय.’ असे मेसेज असायचे आणि आता इतक्या दिवसांत एकही मेसेज नाही?”
फरक छोटा होता पण मीरा इतकी भोळी नव्हती. तिला नंदिनीचा चेहरा आठवला. शांत. नीटनेटकी. प्रश्न न विचारणारी. आधी हीच शांतता तिला सुरक्षित वाटायची. ही बाई भांडत नाही. चिकटत नाही. मागे लागणार नाही. पण आता? आता ती अजिबातच मागे नाही. मीरा अचानक उठली.
“नाही. मला जास्त विचार करायचा नाही. काय फरक पडतो नंदिनीच्या असण्यानसण्याने?
तिने स्वतःलाच बजावलं; पण मन ऐकत नव्हतं.
“ती स्वराजच्या मागे लागत नाही. बदलली तर स्वराज बदलेल. आणि स्वराज बदलला तर?”
तिने कॉफीचा घोट घेतला. कडू लागला. त्या संध्याकाळी मीराने स्वराजला कॉल केला.
“आज भेटूया?”
तिचा आवाज नेहमीसारखाच हलका होता.
“आज नाही जमणार.. आईचं रूटीन चेकअप आहे. डॉक्टर घरी येणार आहेत.”
मीराने काही क्षण थांबून विचारलं,
“नंदिनी आहे ना तिथे?”
स्वराज गडबडला.
“हो… म्हणजे… हो आहे.”
“छान,”
मीरा हसली.
“मग तुला टेन्शन नको.”
तिने फोन ठेवला गेला. पण मीरा मात्र थांबली नाही.
‘मी आहे ना मग तुला टेन्शन नको’ हे मी आधी म्हणायचे. आता ती म्हणतेय… न बोलता..”
रात्री मीराने आरशासमोर उभं राहून स्वतःकडे पाहिलं. नेहमी आत्मविश्वास देणारी तीच नजर आज थोडी डगमगत होती.
“मी त्याची निवड आहे,”
तिने स्वतःला सांगितलं. पण लगेचच दुसरा विचार आला.
“की फक्त सवय?”
पहिल्यांदाच मीराला नंदिनीचा राग आला नाही. भीती वाटली. ती शांत आहे. ती मागे नाही. आणि अशी माणसं सोडताना पुरुष अडखळतात. मीरा मेसेज टाइप करू लागली. ‘आज खूप दिवसांनी मला तुझी आठवण येतेय.’ पण ती थांबली आणि तिने मेसेज डिलीट केला.
“नाही. मला आधीसारखी दिसायचं नाही. मला त्याला माझ्या प्रेमात ओढायचं आहे, प्रेमाची भीक मागायची नाही. त्याला माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी तरसावयचं. आता मी डाव टाकेन. थेट वार करणार नाही पण सावकाशपणे तिच्यावर वार करेन. नंदिनी जसं बदलतेय तसं मलाही बदलावं लागेल.”
आणि तिच्या डोक्यात खरा खेळ सुरू झाला.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा