डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
तुम दे ना साथ मेरा.. ११
©अनुप्रिया
©अनुप्रिया
“कधी? तुला कधी कॉल आला होता? म्हणजे नेमकी तारीख काय होती?”
स्वराजने नंदिनीला प्रश्न केला. नंदिनी आठवण्याचा प्रयत्न करत होती. थोडं डोक्याला ताण दिल्यावर तिला आठवलं,
“त्या दिवशी मी माझ्या आबांना कॉल करायला सांगितलं होतं. त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून तुम्हाला कॉलही केला पण दुसऱ्या क्षणाला तो कॉल कट झाला आणि मोबाईलच्या मेसेजबॉक्समध्ये एक मेसेज आला.”
“काय मेसेज? आणि तारीख?”
स्वराजचीही उत्सुकता ताणली जात होती.
“कॉल यू लॅटर.. असा मेसेज आला. तारीख आठ दिवसांपूर्वी म्हणजे दहा तारीख.. मी मेसेज वाचत होते, इतक्यात काही वेळात मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्याने स्वतःचं नाव स्वराज सांगितलं म्हणून मला वाटलं ते तुम्हीच आहात. मी माझ्या मोबाईलमध्ये तो नंबर तुमच्याच नावाने सेव्ह केलाय. थांबा दाखवते तुम्हाला.”
“कॉल यू लॅटर.. असा मेसेज आला. तारीख आठ दिवसांपूर्वी म्हणजे दहा तारीख.. मी मेसेज वाचत होते, इतक्यात काही वेळात मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्याने स्वतःचं नाव स्वराज सांगितलं म्हणून मला वाटलं ते तुम्हीच आहात. मी माझ्या मोबाईलमध्ये तो नंबर तुमच्याच नावाने सेव्ह केलाय. थांबा दाखवते तुम्हाला.”
असं म्हणत नंदिनी तिच्या पलंगाजवळ गेली आणि टेबलवर ठेवलेला तिचा मोबाईल उचलून तिने मोबाईलमधला तो नंबर स्वराजला दाखवला. त्याने तो नंबर डायल करून पाहिला. एक रिंग झाल्यानंतर तो लगेच बिझी दाखवत होता.
“बहुतेक हिचा नंबर रिजेक्ट लिस्टला टाकला असावा. पण हा कोणाचा नंबर आहे, ज्यावरून त्याने स्वतःचं नाव स्वराज सांगितलं आणि लग्नाला होकार दिला? कोणी केलं असेल हे आणि का?”
स्वराज स्वतःशीच पुटपुटला. नंदिनीकडे पाहून म्हणाला,
“ज्या नंबरवरून तुला कॉल आला तो नंबर माझा नाहीये. नाहीतर आता माझ्या मोबाईलची रिंग झाली असती ना? हे बघ..”
असं म्हणत त्याने पुन्हा तो नंबर डायल केला. स्वराजचा फोन वाजला नाही.
“अरे खरंच की! स्वराजच्या फोनची रिंग झालीच नाही. मग मला कॉल कोणी केला होता?”
नंदिनी विचारात पडली. आपण फसले गेलोय आणि चुकून विवाह बंधनात अडकलोय याची तिला जाणीव झाली. इतक्यात त्याला एक कल्पना सुचली.
“थांब, तुझा नंबर जर ब्लॉक केला असेल तर माझ्या मोबाईलवरून हा नंबर डायल करून पाहुयात. कोणाचा आहे ते समजेल. सांग बरं एकदा नंबर..”
असं म्हणत स्वराजने त्याच्या मोबाईलवरून तो नंबर डायल केला आणि मोबाईल स्क्रीनवर नाव आलं. ते नाव वाचून त्याच्या तोंडून आश्चर्याने आपसूकच शब्द बाहेर पडले.
असं म्हणत स्वराजने त्याच्या मोबाईलवरून तो नंबर डायल केला आणि मोबाईल स्क्रीनवर नाव आलं. ते नाव वाचून त्याच्या तोंडून आश्चर्याने आपसूकच शब्द बाहेर पडले.
“ओह्ह माय गॉड! चैतन्य? चैतन्यने तुला कॉल केला होता? पण का?”
स्वराजच्या चेहऱ्यावर आश्चर्य तर नंदिनीच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया पसरली.
“त्या कॉलवरून आपण लग्नाला तयार झालो. बोहल्यावर चढलो. आपण पुरते फसलोय. पण कोणी का असं केलं?”
दोघांच्या मनात पसरलेली ती अस्वस्थ शांतता अजूनच भयानक वाटत होती. आणि त्या शांततेतच त्या दोघांच्याही मनात एक नाव चमकून गेलं. नंदिनीचं हृदय पुन्हा धडधडू लागलं.
“माधवकाका?”
“माझे डॅड?”
दोघांनीही एकमेकांकडें चमकून पाहिलं. स्वराज थोडा विचारात पडला.
“नाही… नाही ते असं काही करणार नाहीत. इतक्या खालच्या थराला जाणार नाहीत.”
“मग तुमच्या मित्राने असं का कॉल केला असेल?”
तिच्या प्रश्नावर स्वराज काहीही बोलला नाही. तो सोफ्यावरून उठला आणि बाहेर बाल्कनीत येऊन उभा राहिला. त्याने चैतन्यला कॉल केला.
“हॅलो मित्रा, हे काय आजच्या रात्री कोणी मित्राला कॉल करत का? बरं, बोल काय झालं? काय मदत, माहिती हवीय का तुला?”
चैतन्य मिश्किलपणे म्हणाला.
“मी मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाहीये. मला तुझ्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवयं.”
स्वराज गंभीरपणे म्हणाला. चैतन्य शांत झाला.
“बरं. सॉरी.. बोल, इतक्या रात्री का कॉल केलास?”
चैतन्यने गंभीरपणे विचारलं,
“तू नंदिनीला कॉल केला होतास?”
नाही.. नाही ते म्हणजे.. मी.. कॉल. काय संबंध?”
चैतन्य बोलताना गोंधळला. त्याला गांगरून गेलेलं पाहून स्वराजने करड्या स्वरात विचारलं,
“चैतन्य, आता लपवण्यात काहीच अर्थ नाही. मला माहित आहे तो कॉल तूच केला आहेस. तुझ्या नंबरवरून तिला कॉल आलाय. आता मला इतकंच सांग तू असं का केलंस? तुला तर माझ्याबद्दल, आमच्या नात्याबद्दल सगळं माहित आहे. तर मग असा खोटेपणा तू का केलास? माझा जिवलग मित्र म्हणवतोस ना, मग का चैतन्य? हीच का आपली मैत्री?”
अचानकपणे झालेल्या शाब्दिक हल्ल्यामुळे चैतन्य गांगरून गेला. आपण आपल्या मित्राशीच चुकीचं वागलो असा विचार मनात आल्याने अपराधीपणाची भावना दाटून आली. अखेर खूपदा विचारल्यावर त्याने त्याची चूक मान्य केली.
“हो.. मीच नंदिनीला कॉल केला होता. मी तुझं नाव सांगून बोललो. मीच तिला लग्नासाठी होकार कळवला.”
“अरे पण का?”
“मला तसं करायला माधवकाकांनी सांगितलं होतं. नंदिनीला बघून आल्यानंतर त्यांनी मला कॉल करून सांगितलं की, नंदिनीला त्यांनी माझा नंबर दिलाय आणि तिचा फोन आला तर मला स्वराज म्हणून बोलायचंय. स्वराज बनून तिला लग्नाला होकार द्यायचा. जेणेकरून तिच्या मनात कसली शंका राहणार नाही.”
“काय डॅडने सांगितलं? इट इज व्हेरी शॉकिंग यार.. माझा तर विश्वासच बसत नाहीये. पण तू असं करायला नको होतं. निदान एकदा तरी माझ्याशी बोलायला हवं होतंस. एका निष्पाप मुलीचं आयुष्य पणाला लागलं आता.. चैतन्य, कारण काहीही असो, तू चुकीचं वागलायस. या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही.”
स्वराजने रागाने कॉल कट केला आणि तो आत आला. नंदिनी पलंगावर विचार करत बसली होती. हे सगळं त्याच्याच वडिलांनी केलंय हे तिला सांगण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं. तो गुपचूपपणे सोफ्यावर येऊन आडवा झाला. दोघांच्याही मनात विचारांचं द्वंद्व सुरू होतं. दोघंही मनातल्या मनात त्यांच्या परीने ते एकच कोडं सोडवत होते. त्या रात्री दोघांनाही नीट झोप लागली नाही. या कुशीवरून त्या कुशीवर वळण्यात सारी रात्र निघून गेली.
आज रात्रीच्या अंधाराच्या गर्भात दडलेल्या गोष्टींमुळे उद्या कोणत्या सत्याचा उलगडा होणार होता देवालाच ठाऊक!
नंदिनीने मनाशी पक्का निर्णय घेतला. त्या निर्णयाचे पडसाद सर्वांच्याच आयुष्यावर उमटणार होते.
क्रमशः
©अनुप्रिया
©अनुप्रिया
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा