तुम जो आए जिंदगी मे भाग 1

कहाणी एका अनोख्या प्रेमाची.

________
सुंदर सुरवात...!
(भाग एक )
......
जवाहर हॉस्पिटल..(मुंबई)
.......
जवाहर हॉस्पिटल मुंबई मधील एकमेव नामांकित हॉस्पिटल बावीस ताळाची ती हॉस्पिटलची भव्य इमारत अगदी शुभ्र रंगाची.
बाहेर सगळा पार्किंग एरिया आणि तो ऍम्ब्युलन्स व इतर गाड्यांनी गजबजलेला.
ऍम्ब्युलन्सचे आवाज,वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण,हॉस्पिटल मध्ये वेगवेगळे विभाग, वेगवेगळे ऑपरेशन थेटर आणी अश्याच एका ऑपरेशन थेटर मधून बाहेर येणारी डॉक्टर नियती.
मधेच एक पंचावन वर्षातील व्यक्ती तिला बोलतो.
"डॉक्टर माझी मुलगी ठीक तर आहे ना...!"

"हो हो तुमची मुलगी आणी बाळ एकदम सुखरूप आहें..तुम्ही काळजी करू नका."
म्हणत डॉक्टर नियती तिच्या केबिन मध्ये जात असते.
कॅबिन मध्ये जाता नियती अंगावरची ऑपरेशन किट काढायला लागते.
अगोदर तोंडारील मास्क नंतर अप्रोन,हॅन्ड ग्लोज काढत डोक्याला घातलेली ती कॅप नियती काढते.
तसा तिच्या केसांचा बन निसटतो आणी तिचे केस खांद्यावर येतात.
केस मागे सावरत नियती वॉशरूमकडे जाऊन हात स्वच्छ धूत बेसिनच्या आरशात स्वतःला न्याहाळायला लागते.

[नेमकीच तारुण्य ओलांडलेली 25 वर्षाची गौरवर्णी नियती तिचे ते हरीणी सारखे डोळे, गुलाबी टपोरी ओठ, सरळ नाक दिसायला तशी ती खुपच सुंदर.]
हात स्वच्छ धूत केबिन मध्ये येत खुर्चीवर बसून नियती टेबल वरचा मोबाईल हातात घेत एक कॉल लावते.
..
[कॉल कनेक्ट होता.]
...
नियती : हॅलो देव..!

[ डॉक्टर देव नियतीचा पती वय वर्ष 27 रंगाने तसा थोडा सावळा आणी शरीराने एकदम फिट आणी फाईन देवची स्माईल खुपच मनमोहक कुणीही तरुणी त्याच्या प्रेमात पडावी अशी. पेशाने तो सुद्धा डॉक्टर तसा देव चाईल्ड स्पेशालिस्ट तर नियती गायनोकोजालिस्ट.]
...
देव : हॅलो माय देवी...!
आणी दोघे कॉल वर बोलायला लागतात.
देव : नियु मि सांगतोय तसं ऐक ना..तुझ्या सातव्या महिण्याच्या डोहळे जेवणाच्या कार्यक्रमा नंतर आपण ग्रॅण्ड फोटो शूट करूयात ना.
नियती : मला फोटो शूट नको आहें देव...प्लिज सगळेच लोक जे करतात ते आपण ही करावं असं काही लिहलेलं आहें का.
....
देव : जा म्हणजे तु माझ ऐकणार नाही हे ठरवलं आहेस.
आणी देव फोन ठेवतो.
तशी नियती त्याला परत कॉल लावते.
आणी त्याच क्षणी हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ नियतीच्या केबिन मध्ये येतो.
....
"मॅम आज तुमचा हॉस्पिटल मधला शेवटचा दिवस लवकरच तुम्ही एका छानश्या बेबीला जन्म दयाल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.."...एक नर्स बोलते.
त्या नंतर स्टाफ मधील एक एक व्यक्ती बुके,चॉकलेट देत नियतीला शुभेच्छा देत असतात.
आज शुभेच्छाचा वर्षाव नियती वर होत असतो.
सर्वांच प्रेम पाहून नियती तर खूप आनंदी होते सगळ्यांना धन्यवाद देता.
सायंकाळचे सहा वाजत आलेले असतात आणी देव कार घेऊन हॉस्पिटल बाहेर येऊन थांबलेला असतो.
....
नियतीला कॉल करत..आपली पर्स हातात घेत हॉस्पिटल बाहेर येते.
दोघे कार मध्ये बसतात आणी सीट बेल्ट लावत त्यांच्या बंगल्याच्या दिशेने जायला लागतात.
हॉस्पिटल पासून त्यांचा बंगला तसा पाच किलोमीटर अंतरावर असतो आणी रस्त्यातच नियतीला पाणीपुरी खाण्याची इच्छा होते.
....
"देव पाणीपुरीचा ठेला पाहून कार थांबवशील का..?"- नियती.
....
"नाही नियु प्लिज हे बाहेरच खाणं नको ना...मला हायजिनिक वाटत नाही." -देव.
...
"मला इच्छा झाली आहें आणी असं म्हणतात गरोदरपणात एखादी इच्छा झाली आणी ती पूर्ण नाही केली तर बाळाचा कान फुटतो."- नियती गंभीर होत मस्करीत बोलते.
....
आणी हे ऐकता देव हसायला लागतो.
"छान बहाणा आहें...पण तुझ्या माहिती साठी आपण दोघेही डॉक्टर आहोत. अश्या गोष्टीवर माझा तर किंचित सुद्धा विश्वास नाही." - देव.
ओके नको थांबवूस कार जाऊदे म्हणत नियती नाक मुरडते.
आणी कार थोडी समोर जाता देव कार बाजूला घेत ब्रेक लावतो.
...
ब्रेक लावता नियती देवकडे पाहत हसायला लागते.
"ओहो म्हणजे कान फुटलेला बेबी नको आहें हो ना.' - नियती हसत बोलायला लागते.
...
तसा देव तिच्या ओठांवार बोट टेकवत..
"नियु बाळा साठी एकही अपशब्द नको..आपलं बाळ एकदम सुदृढ आणी निरोगी असेल." देव भावुक होत बोलतो.
आणी दोघे कार बाहेर उतरतात.
...
बाजूलाच पाणीपुरीचा ठेला असतो त्या जवळ जात दोघे मस्त पाणीपुरीचा आनंद घेत असतात.
एकमेकांना सुकी पुरी चारता देव फोन पे ने बील करतो आणी दोघे कार मध्ये येऊन बसतात.
...
कार त्यांच्या बंगल्याच्या दिशेने जायला लागते.
आणी दोन किलोमीटर अंतर पार करता त्यांचा तो बंगला येतो.
"प्रेम कनिष्क"
प्रेम कनिष्क बंगला अगदी मोठ्या राजवाड्या सारखा.
पण बंगल्यात राहणारी दोघेच आणी बाकी नोकर.
कारण कोरोना काळात देवच्या आई वडीलांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला होता.
...
कार बंगल्या बाहेर पोहचता सेक्युरिटी गार्ड गेट उघडतो.
कार गेटच्या आत येता दोघे कार बाहेर उतरतात.
आणी कारच्या आवाजाने उचकी त्याच्याकडें येते उचकी नियतीची स्पेशल मोलकरीण असते.
[ उचकी वय एकवीस वर्ष तिची उंची तशी थोडी बारीक
पण नियतीचे सगळे कामे इमानदारीने करत असते.]
...
नियती दिसता उचकी तिच्या हातातून पर्स घेते.
आणी सोबत चालायला लागते.
"मालकीण आज रात्रीं जेवणात पुरणपोळी सांगितली होती ना. " -उचकी.
"हो आज जरा गोड खायचं मन होतं बघ." - नियती.
आणी देव,नियती दोघे बंगल्याच्या दरवाजाच्या आत पाऊल टाकतात.
....
ओहो काय तो बंगला काय तो मोठा संगिन हॉल,हॉल मधील तो चमचम चमकणारा झुमर, राज सोफे बाजूलाच मोठं किचन डायनिंग टेबल.
हॉलच्या मधोमध तो जीना आणी वरच्या तळाला त्या खोल्या.
बाजूच्या भिंतीवर देवच्या आई वडिलांचे चंदन हार घातलेले फोटो.
...
देव आणी नियती आत येता सोफ्यावर बसतात.
तशी नियती पोटाला हात लावत बोलते.
"देवा अजून चार महिने हा बेबी बम घेऊन मला वावरायचं आहें." -नियती.
...
तसा देव तिच्याकडे पाहत.
"फक्त चार महिने नियु काश हे सुख आमच्या पुरुषांना मिळाल असतं आम्हाला बेबी बम घेऊन वावरायचं असतं तर..!"-देव.
...
आणी देवचे शब्द ऐकता नियती हसायला लागते.
किचन मधून उचकी ग्लास मध्ये पाणी घेऊन येत त्यांच बोलणं ऐकता हसत बोलायला लागते.
"हा हा मालक असं असतं तर पुरुषांची खूप पंचायत झाली असती बघा.' -उचकी बोलत नियतीला पाणी देते.
....
आणी देव उचकीकडें पहात.
"हो हो जास्तीची पंचायत झाली असती..पण आम्हाला मस्त घरात बसून राहता आलं असतं मस्त खायला प्यायला भेटलं असतं."
...
हे ऐकता तर नियती हसायला लागते.
"ओह म्हणजे खाण्या पिण्यामुळे तुला बेबी बम हवा आहें शी.. असं कुठं असते का..? गरोदरपणात किती त्रास सहन करावा लागतो.  तो त्रास या खाण्या पिण्या आणी आराम समोर फिका आहें." - नियती.
...
आणी दोघांच्या गप्पा चालू असताना देवला कॉल येतो.
देव कॉल उचलतो..
...
देव : हॅलो..
शिवांश : हॅलो सर डॉक्टर देव बोलताय का..?
....
तो गोड आवाज ऐकता देव.
देव : बोला मॅम हो मी डॉक्टर देव बोलतोय.
...
शिवांश : सॉरी सर पण मी मॅम नाही.. आयमीन आय एम शिवांश फोटोग्राफर शिवांश तूमचा मेल मला आला होता.
....
देव : सॉरी...सॉरी तूम्ही आहात का.. हो मला पुढच्या महिन्यात माझा आणी माझ्या वायफीचा फोटोशूट करायचा आहें.
मी तुमचे इन्स्टा अकाउंट चेक केले.
प्लिज मला डेस्टिनेँशन आणी तुमची फिस डिटेल माझ्या व्हाट्स ऍप नंबर वर शेअर करा मी तुम्हाला दोन दिवसात कॉन्टॅक्ट करतो.
आणी होकार भरत शिवांश कॉल ठेवतो.
...
नियती जींना चढत आपल्या बेडरूम मध्ये जाते.
बेडरूम मध्ये जाता पर्स बाजूच्या टेबल वर ठेवत बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन येते.
आणी स्वतःला आरशात न्याहाळत पोटावर हात ठेवून बोलायला लागते.
"बेबी मी खूप अतुर आहें तुझ्या भेटीला आता अजून काही महिने."
तसा देव बेडरूम मध्ये चोरी छुपे येतं तिला मागणं मीठी मारत बोलतो.
"आतुर तर मी तुझ्या पेक्षा जास्त आहें आणी आज फायनली आपला फोटोशूट मी फिक्स केला आहें."
मला ना तुझा होकार हवा आहें ना नकार.
आणी नियती गालातल्या गालात हसत ओके तू जिंकलास मी हारले करू आपण फोटोशूट बोलते.
...
एका नंतर एक महिना जात असतो दोन महिन्या नंतर नियतीला सातवा महिना लागतो.
आणी तिचं डोहळे जेवण खूप थाटामाताट केल्या जाते.
अनाथ आश्रम मध्ये या निम्मित अन्नदान केल्या जाते.
नियतीचे आई वडील हे सगळं पाहून खूप आनंदी होत असतात.
....
आणी दुसऱ्याच दिवशी ठरल्याप्रमाणे फोटोशूट साठी दोघे मुंबई सोडून कोकणा साठी निघतात.
एकदम कोकणी स्टाइल मध्ये फोटो शूट करायचा हा विचार देवचा असतो.
...
सकाळी आठ वाजता बंगल्यातुन निघालेले नियती,देव अकरा दरम्यान ठरलेल्या जागी पोहचतात.
"हॉटेल मंजूळा" या ठिकाणी थांबता.
...
फोटोग्राहपर शिवांश सुद्धा तिथे येऊन पोहचलेला असतो.
फोन वर कॉन्टॅक्ट होता देव आणी शिवांश समोरा समोर येतात.
ओहो काय ते शिवांशच चालणं डोळ्यावर येणारे त्याचे ते मोठे केस आणी राहणं ते स्टायलिश मॉडेल सारखं.
शिवांश तर एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याला लाजवेल असा.
...
देव त्याला हात मिळवतो आणी शिवांश स्मित हास्य करत बोलतो.
"ड्रेसअप सगळं काही रेडी आहें मॅमला हॉटेलच्या रूम नंबर 21 मध्ये पाठवा मेकअप आर्टिस्ट तिथंच आहें."
तो गोड आवाज ऐकता देव तर काहीसा बिचकतो आणी शिवांश चं ते सौंदर्य पाहता तो काही सेकंदासाठी भारावून जातो.
तसा शिवांश "हॅलो सर रूम नंबर 21"
आणी देव शिवांशचा तो कापसा सारखा मऊ हात हातातून विलग करत शिवांशला होकार भरत  नियतीला रूम नंबर 21 मध्ये घेऊन जातो.
.....
कसा होईल देव आणी नियतीचा फोटोशूट..?
काय फोटो शूट मागे आहें काही ट्विस्ट...?
....
© सुनिध सोहमे.


🎭 Series Post

View all