तुम जो आए जिंदगी मे भाग 2

कथा अनोख्या प्रेमाची.
_____
(भाग दोन )
..........
रूम मध्ये जाता मेकअप आर्टिस्ट नियतीला तयार करत असते.
तर बाजूच्या रूम मध्ये देव सुद्धा तयार व्हायला लागतो.
शिवांश बाहेर त्यांची वाट पहात उभा असतो.
...
अर्ध्या तासा नंतर नियती आणी देव रूम बाहेर येता त्याच्या कार मध्ये बसतात तर शिवांश मेकअप आर्टिसट सोबत कार मध्ये बसता दोन्ही कार फोटो शूट साठी सेटअप केलेल्या जागी जायला लागतात.
...
'हॉटेल मंजुळा' पासून दोन किलोमीटर अंतरावर असणारे एक खेडे गाव आणी त्या खेडे गावातून वाहणारी लहानशी नदी बाजूला एका शेत मालकाचा असणारा मळा आणी त्याच ठिकाणी फोटो शूट करायचा असतो.
...
शेवटी दोन्ही कार नदी जवळ येऊन थांबतात आणी नियती देव कार मधून उतरतात.
ओय होय ग्रीन कलरच्या डिजाइनर साडी मध्ये नियती तर अप्सरा भासत असते.
केसांची समोरून केलेली सुंदर हेअर स्टाईल मागे बांधलेला बन आणी त्याला लावलेला तो शुभ्र मोगऱ्याचा गजरा.
डोळ्याच्या पापण्यावर केलेला तो हिरवा चमकी मेकअप..वा वा ओठ तर लिपस्टिकने लाल अगदी गुलाबाच्या पाकळ्या सारखे दिसत असतात.
....
देव तिचं सौंदर्य पहाता वेडा होतो आणी नदीकाठचं ते नैसर्गिक सौंदर्य त्याला नियतीच्या सौंदर्यापलीकडे फिक वाटायला लागतं.
देव नियतीच्या जवळ जात तिचा हात हातात घेत बोलायला लागतो.
"नियु तुझं हे सौंदर्य मला घायाळ करत आहें गं..!" -देव.
....
तशी नियती देवकडें पहाते.
देवने घातलेला तो रेड क्रॉस बटन कुर्ता पांढरी धोती आणी खांद्यावर घेतलेला तो सोनेरी लॉंग रुमाल त्याला तर भारीच जचत असतो.
बारीक मिश्याला दिलेला पीळ आणी कानातील ती बाळी देवच्या पुरुषी सौंदर्याला चार चांद लावत असते.
..
"ओहो घायाळ तर मी होत आहे तुला पाहून साजना"  म्हणत नियती आपल्या हाताने देवच्या मिशीला पीळ दयायला लागते.
...
आणी दोघांना अश्या प्रकारे पाहता शिवांश लपून त्यांचा एक फोटो क्लिक करतो.
फोटो क्लिक करता शिवांश त्यांच्या जवळ येत.
...
"सॉरी फॉर डिस्टर्ब पण आता आपल्या शूटचा वेळ झाला आहें..!" -शिवांश.
...
आणी देव नियती ठीक आहें बोलता फोटो शूट सुरु होतो.
...
नदी काठी एका नंतर एक फोटो क्लिक सुरु होतात.
एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणं असो, कि बेबी बमला देव कान लावून स्माईल करून कॅमेरा कडे पाहणं असो.
...
देव आणी नियती फोटोशूटचा आनंद घेत असतात.
नदीकाठचा शेवटचा फोटो क्लिक होता शिवांश त्यांना शेत मळ्याकडे घेऊन जातो.
दोघांचे ड्रेसिंग चेंज करायचे असतात आणी बाजूला असणाऱ्या एका खोलीत नियती मेकअप आर्टिस्ट सोबत जाते.
तर देव शिवांशला बोलत चेंज करण्यासाठी जातो.
...
नेक्स्ट शूट साठी दोघे महाराष्ट्रीयन लुक करणार असतात.
नियती नऊवारी घालणार असते.
तर देव बंडी धोतर वाला पोशाख परिधान करणार असतो.
...
अर्ध्या तासा नंतर नियती त्या खोली बाहेर येते देव तसा पंधरा मिनिटात तयार झालेला असतो.
नियती नऊवारी मध्ये खुपच सुंदर दिसत असते.
तर देव बंडी धोतर मध्ये अगदी रांगडा गडी टाईप दिसत असतो.
बंडी घातल्या मुळे त्याचे ते पिळदार शरीर ते दंड त्याच्या लूकला वेगळाच न्याय देत असतात.
सोबतीला दोघांनी स्पेशल कोल्हापुरी चप्पल पायात घातलेल्या असतात.
...
दोघांना पाहता शिवांश कॉम्प्लिमेंट देत पहिला पोज समजावून सांगतो त्या नंतर एक एक पोज सांगत फोटो क्लिक व्हायला लागतात.
कधी दोघे बैलगाडी जवळ उभे राहून तर कधी चुली जवळ बसून.
नियतीला तर तो लूक आणी क्लिक करण्यात मज्जा येत असते.
...
खूप साऱ्या क्लिक नंतर शेवटी शिवांश लास्ट क्लिक साठी
दोघांना शेत मळ्यात असणाऱ्या आंब्याच्या झाडाकडे घेऊन जायला लागतो.
बाजूच्या शेतात असणारं आंब्याच झाड तस खुपचं विशाल असतं मोठ मोठया फांदया आणी नुकताच त्याला लागलेला मोहोर.
...
नियती देवच्या हातात हात देत शेताच्या पांधने चालत असते.
पांधच्या रस्त्याला बाजूला काटेरी कुंपण असते नियती आणी देव हळूहळू चालत जात असतात.
आंब्याच्या झाडाकडे येता नियती पाहते तर त्या आंब्याच्या झाडाला एक मोठ्ठा झोका बांधलेला असतो.
आणी तो झोका पाहता तर नियतीला तिचं बालपण आठवतं.
...
"देव शेवटचे फोटो क्लिक झोक्यावर बसून करायचे आहेत का..?"
-नियती देवला विचारते.
"हो वाटतं नियु" म्हणत देव स्मित हास्य करतो.
...
तसा शिवांश नियतीकडे पाहत.
"मॅम तूम्ही फोटो क्लिक करताना एकशे एक पोज देत आहात. मी आता पर्यत केलेल्या शूट पैकी तुमच्या शूट मध्ये मला खूपच कमी गोष्टी सांगायला लागल्या तूमचे एक्स्प्रेशन आणी स्माईल कडक आ..!" - शिवांश.
"ओहो थँक्स यार शिवांश" म्हणत नियती देवकडें पाहत देवला डोळा मारते.
...
"ओह पोज एकशे एक पण या मॅडम तर शूट साठी सक्त नकार देत होत्या खूप मनवलं तेव्हा कुठं शूट करताय...!"-देव शिवांशकडें पहात बोलतो.
...
"अरे असं काही नाही शिवांश हा देव मस्करी करतोय." -नियती.
....
शिवांश सगळं सेट अप करत असतो.
...
नियती तिचा चेहरा आरशात पाहत असते तर देव त्याचे केस व्यवस्तिथ करत असतो.
सेट अप पूर्ण होता शिवांश त्यांना पहिला पोज सांगतो.
...
नंतर झोक्या जवळ थांबून त्यावर बसून मोजके फोटो क्लिक केल्या जातात.
शिवांश डन बोलत शेवटचा फोटो क्लिक करतो.
आणी आपलं शूटचं सामान आवरायला लागतो.
...
नियती शेत मळा पाहत तिच्या फोन मध्ये सेल्फी घेत असते.
आणी अचानक तिला झोक्यावर बसून दोन तीन झोके घ्यावे अशी इच्छा होते.
आणी नियती देवला बोलते.
"देव मला झोक्यावर बसण्याची इच्छा झाली आहें मला दोन तीन झोके देणार का..!" -नियती.
....
"काय झोके..?"  -देव भुवया उडवत विचारतो.
...
"हो मी झोक्यावर बसेल मला झोके देशील काय...?" -नियती.
...
"काय मस्करी नियु तू सद्या सेव्हन मन्थने प्रेग्नेंट आहेस...लक्षात असू देत...!" - देव गंभीर स्वारत बोलतो.
...
लाडात येतं नियती..' इच्छा झाली आहें बोलतेय ना..मी झोक्यावर बसतेय बोल झोका देणार ना बोल...? "
...
आणी देव रागात येतो.
"नियु काय लावलंय तू हे या अवस्थेत तुझं झोक्यावर बसणं योग्य नाही...!"
'ओके काही हरकत नाही ' म्हणत नियती झोक्या पासून बाजूला होतं पांधकडें जायला लागते.
देव नियतीच्या मागे मागे चालत असतो दोघां मध्ये दोन पाऊलाचे अंतर असते.
...
"नियु तुला शूट आणी ड्रेसिंग सगळं आवडलं ना..?" - देव विचारतो.
पण नियती काहीच बोलत नाही.
...
"ये नियु बहेरी झालीयेस का.. बोल शूट कसा वाटला..?"
देव पुन्हा विचारतो पण नियती काहीच उत्तर देत नाही.
...
"ओह म्हणजे माझ्या देवीला राग आलाय हो..!" म्हणत देव समोर जातं सोबत चालायला लागतो.
....
नियती मात्र एकही शब्द तोंडून काढत नाही.
दोन पाऊल समोर जाता देव तिचा हात पकडतो आणी बोलतो.
"तुला खरच झोका खेळायची इच्छा झाली होती का तसं असेल तर चल मागे तुझी इच्छा पूर्ण करू."
...
पण नियती काहीच उत्तर न देता आपला हात देवच्या हातातून सोडवायला लागते.
"नाकावरचा राग कधी जाणार...!" देव चिडवत तिला बोलायला लागतो.
...
मात्र नियती काहीच रिऍक्ट करत नसते.
शेवटी देव बोलतो "ये नियु सॉरी काहीतरी बोल ना..!"
...
आणी नियती देवकडे पहात जोरात तिचा हात झटकते.
"मी तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करू... तू म्हणालास आणी मी शूट साठी रेडी झाले..!
पण मला दोन झोके खेळण्याची झालेली इच्छा आणी तुझा त्याला नकार..!" -नियती रागात बोलते.
...
"अरे नियु तुला इतका राग आला..."..म्हणत देव नियतीचा हात पुन्हा हातात घेणार तशी नियती तिथून झपझप पावले टाकत समोर जायला लागते.
....
देव तिला थांबवत असतो "नियु ऐकून तर घे ना"
पण नियती देवचं काही ऐकत नाही.
....
आणी झपझप पाऊले टाकत जात असताना नियतीला सूद राहत नाही.
ती चालत असणाऱ्या त्या पांधच्या रस्त्यात समोर एक शेणाचा पौटा असतो.
नियतीने शूट साठी पायात घातलेली ती कोल्हापुरी चप्पल खालूच्या बाजूने खुपच चोपडी असते.
नियतीला देव आवाज लावत थांबवत असतो.
पण नियती गरबडीत चालत जात असते.
देव "नियु नियु थांब" आवाज लावत असतो.. देवला त्या धोतरा मुळे लवकर लवकर चालता येतं नसतं.
....
आणी शेवटी नियती चालत असताना समोर न पाहता त्या शेणाच्या पौट्यात पाय टाकते.
आणी त्या चोपड्या चपलेमुळे तिचा पाय निसटतो.
"देवsssssss....!"
असा आवाज नियती जोरात लावते.
आणी आवाज ऐकता देव नियतीकडें पाहतो तर..!
.....
काय झाल असणार नियती सोबत...?
Stay tuned for next..!
....
© सुनिध सोहमे.

🎭 Series Post

View all