तुमच तुम्ही बघा आता .. भाग 3 अंतिम
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
विषय... सांग कधी कळणार तुला
जलद कथालेखन स्पर्धा
....
....
दुसऱ्या दिवशी सकाळी आरती ताई माधव रावांसोबत फिरायला गेल्या, यावेळी आरती ताईंनी लवकरच पोहे करून ठेवले होते ,
इतर वेळी पोहे कोणाला ही आवडत नव्हते, पण आज राहुलने काही न म्हणता स्वतःच्या हाताने पोहे घेऊन खाऊन घेतले, जरा वेळाने प्रिया आली,.. "पोहे घेते का ग प्रिया थोडेसे? केले आहेत",
इतर वेळी नाही दुसर काही तरी दे म्हणणारी प्रियाने थोडेसे पोहे घेतले आणि खाऊन घेतले,
"आज संध्याकाळी आहात का तुम्ही दोघं घरी? का आज कुठे जायचा कार्यक्रम आहे",.. प्रिया.
" तसं ठरलं नाही आमचं अजून तरी ",.. माधव राव.
"म्हणजे मला वापस येताना भाजी आणायला बरी",.. प्रिया.
" तू घेऊन ये तुझी भाजी आणि तु तुझ्या स्वयंपाकाच प्लॅनिंग तू कर, उगाच तू आमच्या भरोशावर राहायची आणि नेमका आम्हाला कुठे जायचं असलं तर, त्यापेक्षा तुझं तू आवर",.. माधव राव.
दोघं मुलं ऑफिसला गेले, आहो काय असं? जरा प्रेमाने बोला,
" बरोबरच आहे, बोलु दे मला थोड, तिचं लग्न झालं आहे, तिचं घर सेपरेट आहे, तिने तिची जबाबदारी घ्यायला नको का? आणि मी आता राहुलवर पण घरची काम टाकणार आहे, जेव्हा मी त्याला काम सांगेल तेव्हा तू मध्ये मध्ये करायचं नाही",.. माधव राव.
ठीक आहे
संध्याकाळी दोघेजण छान फिरून आले, प्रिया आज आलीच नाही, थोडा स्वयंपाक होता तिघांचा, तो आरती ताईंनी केला, राहुल आला.
" राहुल चल पाट पाणी हे घे आणि यापुढे घरात मदत करत जा, लाईट बिल या घराचं टॅक्स घरपट्टी इतर काम तू करायचे आहेत",.. माधव राव.
"केव्हा करणार मी हे काम बाबा मला वेळ तरी असतो का? ",.. राहुल.
"शनिवारी वेळ असतो ना, तेव्हा तू नुसता लोळलेला असतो तेव्हा करत जा, जर आम्ही तुझ्यासोबत नसतो राहत तर हे सगळे काम तू केलेच असते ना? तुला काहीही जबाबदारी नको असते, ऑनलाइन सुद्धा करू शकतो हे काम, सदोतीत लॅपटॉप समोर घेऊन बसलेला असतो की तु आणि पंधरा दिवसाचा किराणा भरत जा जरा घरात, तुझा पगार तू नुसताच मौज मजेत उडवतो, काही जबाबदारी म्हणून नाही त्याला ",.. माधव राव.
रिटायर झाल्यापासून माधवराव बघत होते की दोघे मुलांना शिस्त म्हणून अजिबातच नाही, मोठ्यांना जुमानत नाहीत ते,
लग्न झालेली प्रिया काही जबाबदारीच घ्यायला तयार नव्हती, तीच सगळ काम ती आरती ताईंना देत होती.
राहुल त्याचा पगार असंच पार्टी इकडे तिकडे उडवत होता, त्याला सेविंगच महत्व कधी कळेल? ,घरात किती खर्च असतो हे तो जाणून घ्यायला तयार नव्हता.
सारखं आपलं जाऊ दे जाऊ दे आणि आरती ताई पण मुलांचीच बाजू घ्यायच्या त्यामुळे जास्त झालं होतं मुलांना, आई बाबा सगळं सांभाळून घेतात वेळेवर आयतं खायला मिळतं, काही सामान आणायला नको, काही खर्च नको, वेळेवर लाईट बिल भरलं नाही तर लाईट जातात हे माहितीच नाही, कारण अतिशय पर्टिक्युलर रित्या माधवराव नेहमी सगळी काम वेळेवर करत होते,
कधी स्वयंपाक रेडी नसला तर काय वाटतं हे मुलांना माहितीच नव्हतं , कारण आरती ताई नेहमी निरनिराळे पदार्थ करून मुलांची वाट बघतच असायच्या, स्वतः सगळं करायच्या.
मुलांना माहितीच नाही आई बाबा किती करतात आपल्या साठी ते, उलट केलेल्या गोष्टीत नेहमी चुका काढणे हेच काम होत त्यांच, आपल्या आई बाबांचं वय न बघता त्यांना बोलणे सुरू होतं त्यांचं.
राहुलने बऱ्यापैकी जबाबदारी अंगावर घेतली होती आणि तो घरकामही बऱ्यापैकी करत होता, या शनिवारी त्याने पूर्ण गार्डन साफ करून काढला, इतर वेळी तो आरती ताईंना मदत करायचा.
प्रिया पण येते संध्याकाळी, आता काही दिल तिला तर पदार्थांना नाव ठेवत नाही, तिने सकाळचा डबा इकडुन नेणं बंद केलं आहे, उलट तिच्या कडे काही केल की घेवुन येते आई बाबां साठी.
आरती ताईंनाही आता बऱ्यापैकी स्वतःसाठी वेळ मिळू लागला आहे, त्यांनी यापुढे माधवराव जे म्हणतील तेच ऐकायचं ठरवलं आहे,
"बघ मी तुला पूर्वीपासूनच म्हणत होतो की माझं ऐक तुझा फायदा होईल",.. दोघेजण हसत फिरायला निघाले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा