तुमची माणसं जिंकली
भाग 1
"आई तुम्ही हव्या होतात पूजेला.." तृप्ती सासुबाईला फोन वर बोलत होती
सासूबाई तिच्या प्रश्नावर थोडा विचार करून बोलणार होत्या..
"तसे माझे जरा गुढगे मला चालू देत नाहीत ग.."
"अहो आई आधी सांगायचे ना आम्हाला.." सून
"का सांगून तुम्हाला त्रास देऊ.." सासूबाई
"थोडा त्रास घेतोच की आम्ही तुमचा नेहमीच ,तरी करतोच तुमची सेवा आई.." सून सासूबाईला काहीतरी ऐकवण्याच्या तयारीत होती
"अग म्हणूनच ठरवलं आज नको हा त्रास द्यायला.." सासूने वेळ मारून नेत सबब सांगितले
"म्हणजे नक्कीच काही तरी मोठे झाले असेल आई, त्यासाठी वर्षातून येणारी पूजा चुकवलीत तुम्ही...तुम्ही !! तुम्ही..ज्यांनी मला ह्या पूजेचे महत्व सांगितले त्या सासूबाईने ही पूजा चुकवणे योग्य नव्हते.."
सून ही खोचक पणे बोलली आणि इतक्या सहज तिने सासूच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता त्यांना खोदून खोदून बोलत राहिली..
"मला काही दिवसांपासून क्रिटिकल त्रास होतोय..उठता येत नाही ,बसता येत नाही ,आमच्या पायऱ्या ही चढ उतार होत नाही..मग कशी येणार मी एकटी.."
"मी तयारच होते तुम्हाला आणायला ,सांगून तर बघायचे..हे ही पुण्य मला हाती लागू दिले नाही..इतकी काय परकी वाटले का मी तुम्हाला..? त्यात ताई आणि सगळ्या ननंद बाई आल्या आल्या माझ्यावरच भडकल्या तुमच्या मुळे.. आमची आई ,आमची काकी..माझी बहिण ही एकटीच पडली, तुला जाऊन आणता ही नाही आले का तिला...पूजा तशी पूर्ण होत नाही ,तीच सर्वात मोठी आहे,त्यात बाबा राजस्थान ला गेले आणि तुम्ही साफ दुर्लक्ष केले म्हणत होत्या."
सून पुन्हा त्याच विषयावर सासूबाईने केलेली चूक त्यांना खरे सांगून मान्य करायला लावणार होती हे ठरवले होते..
"काही बिघडलं का तुझं मी आले नाही म्हणून ?"
सासूबाई ही तिला प्रश्न करत होत्या.
"तुमचे नातेवाई तुमची खूपच आठवण काढत होते ,तुम्हाला विसरलो आम्ही हा त्यांनी गैरसमज करून घेतला ,आणि पूजा सोडून चर्चा करत बसले आहेत..त्यांना वाटते की तुम्हाला मी कळवले नाही..आणि तुमच्या परस्पर पूजा नियोजिली..."
सासूने मुद्दाम नाटक रचले ,अन पुजाची तयारी अचानक सुनेवर येऊन पडली..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा