Login

तुमची माणसं भाग 3

Tumchi
तुमची माणसं

भाग 3

पण त्यातर खूपच मनमिळाऊ आहेत,इथे सगळ्यांशी मस्त मन जुळले त्यांचे, काय शिरा बनवला होता त्यांनी..मस्तचsss.." सून मुद्दाम

"अजून काय असेल तर सांगून टाक..मला त्रास होईल असे सांग" सासूला राग आला ,सून बाजूच्या सासूचे किती कौतुक करते हे ऐकून.


तृप्ती साने काकूंनी कशी ऐनवेळी मदत केली हे सांगत होती ,माझे कसे सगळे बिघडलेले त्यांनी सावरले..त्या नसत्या तर कल्पना ही करू शकत नाही काय झाले असते..

"आणि हो आम्हाला चौघांना नऊवारी नेसून दिली..आई काकू,मी आणि सीमा..तुमची भाची सीमा..ती जिला असेच तुम्ही माझ्या जवळ जाऊ नकोस सांगितले होते..मी खडूस आहे ,कुचकी आहे सांगितले होते ती...खूप बोलकी आहे..मनात काही नसते..म्हणून एकदम प्रांजळपणे सांगून गेली तुम्ही काय संगीतले होते ते सगळे.."

इकडे हे सांगताच आता तर चेहरा पिवळा पडला ,निदान यांची भट्टी आणि बट्टी जमायला नको म्हणून तरी मी पूजेला जायला हवे होते..आता ही माझ्या सगळ्या नातेवाईकांचे सहज मन वळून घेईल.. आणि त्यांना मी जे जे खोटे सांगितले ते ते खोटे होते..मी खोटी आहे मीच कुचकी आहे हे सत्य कळेल..देवा काय केलं हे..


"आई काय हो कसलं टेन्शन घेताय..तुम्ही काळजी घ्या तुमचे गुढगे त्यावर जोर देऊ नका ,त्यात तुमच्या डोक्यावर ही आणि टेन्शन वर ही जोर देऊ नका..नाही आलात ते एक तर्फी बरंच झालं..नाहीतर तुमच्या माणसांच्या मनातील काही गोष्टी भरवल्या गेल्या आहेत ते कसे कळले असते मला.."

" तू माझ्यावर आळ घालू नकोस ,मी तुझ्या बद्दल काही ही सांगितले नाही.."