टर्निंग पॉइंट भाग ५

अनपेक्षित वळणावर तिची कहाणी
भाग ५


काय होईल पुढे... राजन तिच्या स्वप्नातला राजकुमार होईल का तिचं स्वप्न पूर्ण...


"तुझे बाबा गेले सगळा भार माझ्या एकटिवर पडला. मी अशी साधी भोळी, व्यवहार कळलाच नाही मला कधी.  खूप उमेद होती मला आणि तूझ्या बाबांना तूझ्या दादाकडून. तसा तो ही खरा उतरला. प्रयत्न केले, नोकरीवर लागला. जबाबदार झाला आनंदाने आपली जबाबदारी स्वीकारली त्याने ही वडिलांचं छत्र हरवलं तरी हिमतीने सारा डोलारा सांभाळला."


"तु लहान होतीस. तुझ्यावर त्याच लक्ष असायचं. बाहेरच जग मुलींसाठी सुरक्षित नाही तो जाणून होता.  काळजीपोटी तूझ्या सुरक्षेच्या दृष्टीने थोडी बंधन लादली त्याने तुझ्यावर. भावाची भूमिका निभावत तो खऱ्या अर्थाने तुझा बाप झाला."


"तो म्हणेल तीच आता पूर्व दिशा, त्याचा शब्द अंतिम आपल्या घरासाठी" भिंतीवर लटकलेल्या हार घातलेल्या फोटोकडे बघून... सीमाताई कसल्याशा विचारात गुंतल्या. 


"आई अगं काय झालं? कशाला एव्हढा विचार करतेस.. सगळ छान होणारे.."


"तु एकटी नाहीस.. मी आहे ना!" स्निग्धाने आईचा हात हाती घेतला... 


"पोरी चांगला अभ्यास कर, मोठी हो.. नोकरी कर.. सेटल हो.. मग चांगले निरोप येतील. एकदा का?  तू तूझ्या संसाराला लागली की मी माझ्या जबाबदाऱ्यातून मोकळी." सीमाताईंच्या डोळ्यातलं पाणी गालावर ओघळत होतं... 


दिवे लावण्याची वेळ झाली होती. सीमाताई उठल्या त्यांनी देवासमोर दिवा लावला. हात जोडून देवापुढे डोळे मिटून फक्त उभ्या राहिल्या.


"चल काय बनवू खायला? आज दोघीच आहोत जेवायला." सीमा ताईंनी पदर कसला.


"पिठलं भात..." स्निग्धा जोरात ओरडली.


"आई अगं गरमागरम, पिठलं आणि भात बनवू..  दादा वहिनीला आवडतं नाही म्हणून हल्ली बनवल्याच जात नाही. आणि ते ही मी बनवणार तिने हट्टाने सांगितलं." 


तांदूळ स्वच्छ धुवून तिने कूकरला लावले. दही घालून छान आंबट पिठलं बनवलं.. 


आजकाल लेक आणि सुनेच्या कौतुक सोहळ्यात, त्यांच्या नव्या नवलाईत, सन समारंभात आपण एवढं मग्न झालोय, एव्हढ गुंतवून घेतल स्वतःला की पोटच्या पोरीच्या साध्या आवडीनिवडी ही जपायला होत नाही. जेवता जेवता, पिठलं भातावर ताव मारणाऱ्या स्निग्धाकडे त्या एकटक बघत राहिल्या. दोघींनी छान एकत्र बसून जेवण केलं होतं. बऱ्याच दिवसानंतर असं मांडी घालून खाली बसल्या होत्या दोघी.


**

 दारावरची बेल वाजली, राजन ने दरवाजा उघडला.


"अरे वाह!! असे अचानक तुम्ही इथे..." अपूर्वा आणि समीरला असं अचानक दारात उभ बघून राजन अवाक् झाला.


"का? येऊ शकत नाही का आम्ही?" अपूर्वाच्या तिरकस नजरेने कटाक्ष टाकला.


"हा प्रश्न झाला का? कधीही येऊ शकतेस. तुझं च घर आहे." मी कोण तुला, नाही म्हणणार. पण अशी यावेळी.. अपेक्षित वाटलं म्हणून म्हटल." राजन हसत हसत बोलला.


"पुढच्या आठवड्यात आईचा वाढदिवस आहे. किती कमी दिवस राहिलेत बघ, त्यासाठी प्लॅनिंग करायची नाही का?" तुला तर काहीच पडलेलं नसतं. तू भला तुझं कॉलेज आणि तुझी मित्र... " अपूर्वा ने टोमणा मारला. 


"म्हटलं, आपणच जावून करावी तयारी." त्यासाठी मुद्दाम अपूर्वा आली होती. 


"तुमचं तुम्ही चालू द्या मी येतो उद्या घ्यायला." समीर अपूर्वाला माहेरी सोडून गेला होता.


"गेस्टची लिस्ट तयार झाली.. तिने ती राजन समोर धरली.


"अगं ताई काय हे? तू काय पाहुणी आहेस का? आणि जीजुंच नाव ही...!" राजन लिस्ट मधली नाव एक एक करून वाचत होता. 


"अगं तूझ्या घरातल्यांचीच नाव नाही यात, विसरलीस की काय त्यांना?" राजन उत्तरला.


"विसरेन कशी? डोक्यावर नाचणाऱ्या भूतांना विसरत का कोणी कधी?"


"त्यांना कशाला बोलवायचं".. अपूर्वाची धुसपूस सुरू होती.


"काहीच काय ताई तुझ.. अगं जीजुंना वाईट वाटेल". त्यांची लोक आहेत ती."  राजनच्या बोलण्यावर, वसुधाताईंनी म्हणजे अपूर्वाच्या आईने सुद्धा मान डोलावली. 


"माझी सासू एकवेळ ठीक.. पण ती अवदसा या घरात कधी पाऊल ठेवणार नाही." अपूर्वाचा चेहरा रागाने लाल झाला होता.


"अवदसा.. कोण अवदसा!" न राहवून राजन ने विचारलं.


"ती आमच्या घरातली महाराणी..... नणंद माझी." अपूर्वा ने राग व्यक्त केला.


"काही काय बोलतेस ग? अवदसा वगैरे".. राजन चिडला.


"पण एक लक्षात ठेव.. खबरदार त्या पोरीच्या भानगडीत पडलास तर... माझ्यासारखी वाईट कोणीच नसेन." 


"लायकी तरी आहे का तिची आपल्या घरातली सून व्हायची." स्निग्धा च बोलणं राजन ला खटकलं.


"अगं तुझं घर आहे ना ते.. तुझी नणंद आहे ती? तूझ्या  नवऱ्याची बहिण तरी अशी बोलतेस? तिचा तुला राग येतो हे मी समजू शकते पण एव्हढा दुस्वास नाही ग करू कुणाचा. अपुर्वाची आई वसुधाताई समजावण्याचा सुरात बोलल्या.


ते मला माहिती नाही, मला मुळीच आवडणार नाही. ती आपल्या घरात आलेली. तुमच्यात काय ते गु लू गु लू चाललयं ते पहिले बंद करा. नाहीतर माझ्यासारखी वाईट दुसरी कुणीच नसेन. अपूर्वाने धमकीच दिली.


"हो ... हो.... मला आवडते स्निग्धा...!" 


 "मी ही तिला, आवडतो." काय करशील. राजन ओरडून बोलत होता.


"एका चांगल्या संधीची वाट बघतोय, बघ... प्रपोज च करतो की नाही, बघच तू.. लग्न च करायचं आहे मला तिच्याशी." राजन ने स्पष्ट च सांगितलं. 


"हे मी बरं होऊ देईन." अपूर्वा चिडून बोलत होती.


"बघ च तू..." अपूर्वा ला दम देत, तावातावात तो बाहेर निघून गेला होता. 


"आई अगं, ते कुठे आणि आपण कुठे? त्यांची बरोबरी आपल्याशी होऊ शकते का?" 


"आपण कुठे आणि ते कुठे?" आणि बाबांना आणि तुला तरी हे पटणार आहे का? 


"बाबांचं काय म्हणा... एकुलत्या एका मुलासाठी तर काहीही करतील पण आई तू.... तू मुळीच त्याच ऐकू नको." अपूर्वा आईला समजावत होती.


"समीर शिकला होता. सरकारी चांगली नोकरी होती त्याला. दिसायला रुबाबदार आणि सुस्वभावी. होतकरू बाबांना त्याच्या ह्याच स्वभावाची भुरळ पडली आणि सोयरिक जोडली आपण त्यांच्याशी."


"समीर तसा चांगला च आहे ग, जपतो तो मला खूप. पण ती मात्र माझ्या पार डोक्यात जाते." अपूर्वा पुन्हा चिडली.


"ती बया, या घरची सून...  कधीच नाही... कधीचं नाही, मला तर विचार ही करवत नाहीये."


"आमच्या घरची लोक अतिशय साधारण. मिडल क्लास मेंटॅलिटी ची, उठाबसायची अक्कल नाही, काही मॅनर्स नाही. चार काम घरातली, तेवढंच जमतं त्यांना." अपूर्वा आईला समजावत होती.


"नवऱ्याने घरासाठी कर्ज घेतल. म्हणून तो घराचा डोलारा उभा राहिलाय. एक साधी कार नव्हती आतापर्यंत त्यांच्या घरी. नोकरी लागल्यानंतर, बिचारा कार घेणार होता तर आल्या गेल्या पाहुण्यांसाठी घर छोट पडतेय म्हणून माझ्या सासूने घराच बांधकाम करायचं म्हणून त्याच्या डोक्यावर कर्जाचा भार दिला. कर्ज, फिटवण्यात जातात आहेत आता दिवस. नाही तर, राजा राणीचा, दोघांचा छान संसार असता आमचा... एखादा फ्लॅट घेतला असता आणि राहिलो असतो या सासू आणि नणंदे पासून लांब...!"


ती आणि राजन... मला विचार ही करवत नाहीये.


"सासरी आल्याआल्या ही मस्त कार मध्ये फिरणार...." लायकी आहे का तिची? 


"एवढा मोठा बंगला आपला, नोकरचाकर हाताशी. ही मॅडम राज्य करणार....!" अपूर्वाचा जळफळाट होत होता. 


"ते काही नाही? मला काहीच माहिती नाही. त्याला सांग, दूर राहा तिच्यापासून".... ती मला या घरात आलेली मुळीच चालणार नाही.  


"अगं, पण!"....वसुधाताईंचा, एक ही शब्द न ऐकता ती रूम मध्ये तावातावात निघून गेली होती.


जरा उशिराच, राजन घरी परतला. 


दुसऱ्या दिवशी.... त्याच डोक जरा शांत झाल्यासारखं वाटलं. तसं, वसुधा ताईंनी खरं काय ते पुन्हा एकदा राजन ला विचारलं.


"आई अगं! ती मला आवडते." 


"पण अजून तरी आमच्यात असं काही नाही."


"छान आहे ग ती.. ताई म्हणते तशी ती मुळीच नाही."


"आम्हाला आमचे मित्र मैत्रिणी एकमेकांच्या नावावरून चिडवतात. Made for each other Jodi कॉलेज मध्ये म्हणून सगळे आम्हाला ओळखतात." 


"मला तर छानच वाटत, तिचं नाव माझ्या नावाबरोबर जोडलं तर.  ती ही कधीच चिडत नाही, उलट... तिच्या गालावरची खळी खुलते ग." मित्र मैत्रिणी चिडवतात तेव्हा आम्ही दोघे ही विरोध करत नाही उलट मी तर एन्जॉय करतो. 


"अरे तुमचं नातं आहे.. ती  तूझ्या ताईची ननंद त्यामुळे ते  तुला चिडवतात..."


"असो, तू जास्त मनावर घेऊ नको.. थांबावं आता हे इथेच"


"झालं ते झालं यापुढे लक्षात ठेव दुर रहा, त्या पोरीपासून. प्रपोज का काय ते नाही ना केलंस ना अजून?"..


राजन ने, नकारार्थी मान डोलावली..  


"आता यापुढे तिला उगाच भाव देवू नको. रोज कॉलेज मध्ये भेटताच.. रोज बोललं पाहिजेच असं काही नाही. तू  तुझ्या कामाशी काम ठेव... दोन दिवस वाईट वाटेल नंतर होईल सगळं सुरळीत."


"ऐक ना रे राजा, ताई नाही म्हणतेय तर नको ना या सगळ्यात पडू." राजन ने हलकेच मान डोलावली.


"आई अगं, निश्चल तरल पाण्यासारखी, स्वच्छ आहे ग ती. मनात एक आणि ओठात एक असं नसतं कधीच."


"माझ्या मताला या घरात काहीच अर्थ नाहीये का? महत्वाच म्हणजे मला आवडते ती.. या नात्याला पुढे न्यायचं की नाही हे ठेवण्याचा ही अधिकार नाही का मला?"


"ताई कोण ठेरवणारी.. माझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार तिला कोणी दिला." राजन  चिडला होता.


"राजन.. मोठ्या बहिणीविषयी बोलतोयस तू.. विसरू नको, लक्षात ठेव.. मोठी बहिण आहे ती तुझी, तूझ्या भल्याचाच विचार करणार ना." वसुधा ताई पण चिडल्या.


"आजपर्यंत, ताई विषयी तिने एक ही अवाक्षर वाईट काढलेल नाहीये आणि ताईने तर त्या बिचारीची इज्जतच काढली. राजन चा संताप संताप झाला होता.


"छान आहे ग स्निग्धा खूप.. मी माझं आयुष्य तिच्याशिवाय इमॅजिन च नाही करू शकत. दिसायला आहे तेवढं सुंदर तिचं मन ही आहे." राजन काकुळतीने बोलत होता.


"गप्प बस... चाटायची आहे का ती सुंदरता....!"


"एक सांगते राज तुला, दूर राहा तिच्यापासून. उगाच तपत्या आगीत तेल नको."


"ताईने सांगितलंय ना तुला दूर रहा.. तर राहा तीच्या पासून दूर."  वसुधा ताईंनी, राजनला दम दिला.


"तुझ्या लग्नासाठी मुलींच्या रांगा लागतील. नको रे राजा एवढी घाई करू? कृपा करून ऐक." 


"अभ्यास करायला जातोस कॉलेज मध्ये तर अभ्यास कर.. करियर आहे पुढे तुझं त्याकडे लक्ष दे." प्लीज, दोन्ही हात जोडत, वसुधाताई विनंती करायला लागल्या.  


तावातावत राजन रूम मध्ये निघून गेला होता.
क्रमशः


🎭 Series Post

View all