भाग ७
वर्ष सरत आलेलं होतं. कॅम्पस इंटरव्ह्यू साठी आज राजन कॉलेज मध्ये आला होता. फॉर्मल ड्रेस व्यवस्थित तयार होऊन तो आला होता. आज मुद्दाम त्याची आणि आपली भेट हुकायला नको म्हणून स्निग्धा क्लास मध्ये गेलीच नव्हती. तो दिसता क्षणी ती धावत राजन च्या दिशेने धावली.
"ऑल द बेस्ट राजन" आज इंटरव्ह्यू आहे ना तुझा. तू तयारी केलीच असणार माहिती आहे. छान होणार तुझा इंटरव्ह्यू." "स्निग्धा ने हात समोर केला."
"थँक्यू, उशीर होतोय.. येतो मी!" म्हणत राजन तिथून निघून गेला.
तिला वाईट वाटलं. तिने इकडे तिकडे बघत, हात मागे केला.
तिला त्याच्या वागण्याचा प्रचंड त्रास होत होता. तिची घुसमट आता तिला असह्य होत होती.
'असचं वागायचं होतं, तुसड्यासारखं माझ्याशी तर मग पूर्वी कशाला एवढी जवळीक साधली. माझ्यावर हक्क असल्यासारखा, माझी काळजी असल्याचा आव आणला.' तिला ओरडून मनातल्या खलबताला उजागिर करायचं होतं. पण ती गप्पच राहिली.
राजन चा इंटरव्ह्यू चांगला गेला होता. त्याच्या चेहऱ्यावर खुशी झळकली. कॅम्पस सिलेक्शन होऊन राजनला मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली होती.
"आज पार्टी पाहिजेच तुझ्याकडून.. मित्रा तुला नोकरी लागली. सगळे त्याला शुभेच्छा देत होते. पार्टी साठी सगळ्या मित्रांनी त्याला गळ घातली.
कॉलेज बाहेर असलेल्या, टर्निंग पॉइंट रेस्टॉरंटमध्ये.. पार्टी... सगळे एकत्र जमले.
"अरे, स्निग्धा, साक्षी, समिधा ह्यांना कळवा रे कुणीतरी." ग्रूप मधलं कुणी तरी बोललं.
"त्यांचा क्लास असावा बहुतेक, थांब स्निग्धा आणि साक्षीला मेसेज टाकतो. येतील त्या क्लास बंक करून. त्यांच्यातलं च एक कुणीतरी बोललं.
"नको, ज्युनिअर्सला नको!" राजन पटकन बोलला, सगळे आश्चर्यचकित होऊन राजनकडे बघत राहिले.
"ज्युनिअर्स... अस काय बोलतोयस तू... स्निग्धा, समिधा, साक्षी.... नकोत का तुला पार्टीत!" राजन काय झालाय नक्की तुला.. खांद्यावर हात ठेवत साकेतने विचारलं.
"काही नाही झालेलं." ज्युनिअर्स नको म्हटल तर नको.. प्लीज!" राजन शांतपणे बोलला.
"काय बिनसलंय.. सांगशील तर आम्ही काही तरी करू" काही प्रोब्लेम आहे का? प्रथमने विचारलं.
"नाही, काही प्रॉब्लेम नाही. सगळ ठीके"
"काही ठीक नाहीये, बघितलंस स्वत:कडे... कुठे गेला तुझा उत्साह, तुझा चार्म. कॉलेजची जान होतास तू." स्निग्धा ग्रुप मध्ये सामील झाली तेव्हापासून, किती बदलला होतास तू. खरं सांगू, सक्रत तूझ्या या यशाचं अंशी टक्के तरी श्रेय, स्निग्धा ला जातं. नाहीतर उनाडक्या करण्या पलीकडे आपल्या ग्रूपने केलं तरी काय होतं." साकेत बोलला.
"हो ना.. किती छान ग्रुप होता आपला. कॉलेज सुटलं तरी, आयुष्यभर भेटत राहू, ही मैत्री तुटायची नाय म्हणून किती कॉन्फिडन्ट असायचो आपण.. पण सगळंच उलट झालं." स्नेहा बोलली."
"बरं असो....!" सगळ्यांनी आपल्या साठी ऑर्डर दिल्या. काय हवं ते सगळं मागवून.. सगळ्यांच उदर भरण झालं होतं.
स्निग्धा, साक्षी, समिधा क्लास संपवून बाहेर आल्या. घरी जाण्यासाठी त्यांनी आपापल्या गाड्या काढल्या.
अरे, हे सगळे इथेच आहेत... टर्निंग पॉइंट समोर . साक्षी च लक्ष गेलं तसं, सगळ्यांना उभ बघून त्यांच्या गाड्यांची स्पीड हळू झाली.
राजनने नोकरी लागल्याची पार्टी दिली हे लपवण्याचा सगळे आटोकाट प्रयत्न करत होते. तेवढ्यात, राजन बिल देवून बाहेर आला.
"हे साक्षी, समिधा.....!" राजन ने, हात उडवत दोघींना टाळी दिली.
"तुमची पार्टी बाकी आहे बरं का! नेक्स्ट टाईम नक्की..... आणि तुम्हा सर्वांना पण त्याने चौफेर मित्रांकडे बघत म्हटलं. स्निग्धा कडे त्याने जरा ही लक्ष दिलं नव्हतं.
अरे पार्टी कशाची? नोकरी लागली मित्राला.. बंगलोर च्या एका मोठ्या कंपनीत.. शाबाशी देत मित्राने पाठ थोपटली.
"वाव यार!! काँग्रेट्स" समिधा, साक्षी ने अभिनंदन केलं.
"काँग्रेट्स...!" स्निग्धा ने ही शुभेच्छा दिल्या..
चेहऱ्यावर कोरडेपणा दाखवत त्याने स्निग्धाला "थँक्यू यू!" म्हटलं.
"चला निघतो मी आता. ही न्युज घरी सांगायची आहे.... सर्वांशी गळाभेट घेतली. स्निग्धाला जरा ही भाव न देता तिच्याकडे दुर्लक्ष करून तो लगबगीने निघून गेला होता.
"हे काय होतेय!" च्या आविर्भावात एकमेकांकडे बघत राहिले.
राजन निघून गेला होता. स्निग्धाला दाटून आलं.
"बघितलंत का सर्वांनी. कसा वागला माझ्याशी? माझ्याविषयी किती कोरडेपणा आलाय त्याच्या वागण्यात. त्याने जरा ही लक्ष ही दिलं नाही माझ्याकडे."
"अरे काय झालं? माझं काय चुकलं, ते तरी मला कळायला हवंय का नको? स्निग्धा चिडल्याच तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत.
बटन स्टार्ट करून.. ती गाडी सुरू करायचा प्रयत्न करायला लागली. गाडी सुरू होईना. तिच्या डोळ्यात दाटून आलं. गाडीच्या एकावर एक किक मारल्या. सगळे तिच्याकडे बघत स्तब्ध उभे होते. तेवढ्यात करण पुढे आला..
"थांब.... थांब....!" मी करून देतो, करणने एका किक मध्ये गाडी स्टार्ट केली होती. कुणाकडेही न बघता, स्निग्धा निघून गेली.
"प्रेम करतात रे दोघे एकमेकांवर खूप, पण सांगायला घाबरतात...!"
"बिचारी स्निग्धा, मला तिची दया च येते".. स्नेहा पुटपुटली.
"हो ना!" राजनचा च काही तरी प्रॉब्लेम झालाय, एव्हढ मात्र खरं."
"दोघांना आपण चिडवायचो तेव्हा छान एन्जॉय करायचे रे दोघे. त्यांच्या मनात काहीच नसतं तर, ते ओरडले असते आपल्यावर. पण तसं नाही झालं कधीच."
"मध्यंतरी त्याच्या आईचा वाढदिवस झाला.. तेव्हापासून काही तरी बिनसलंय." कदाचित त्यांच्या या प्रेमप्रकरणाची कुणकुण घरी कळली असवी असं दिसतेय..
आणि राजनची आई आणि बहिण म्हणजे... माहिती आहेच आपल्याला. साकेत, अमेय, करण, स्नेहा आणि बाकी मित्रमंडळीत कुजबुज सुरु होती.
"बघितलंस कसा वागला माझ्याशी?" स्निग्धाला भरून आलं होतं.
"स्निग्धा, मला माहिती आहे.. मला च काय आपल्या ग्रुपमधल्या सर्वांना माहिती आहे."
"तुम्ही गुंतलात एकमेकांमध्ये. प्रेम करता एकमेकांवर. एकमेकांना मनातलं आजवर सांगितलं नसेल ही पण काही गोष्टी न सांगता ही कळतात अगं."
"तू तुझ्या मनातलं सांगून का टाकत नाहीस त्याला. की मी सांगू त्याला तूझ्या मनातलं."
असे किती दिवस तुम्ही असे, झुरणार आहात यार!"
"कुणी तरी, पाऊल उचलावं लागणार च ना ग स्निग्धा. मला तुझी ही अशी अवस्था बघवत नाहीये." साक्षी स्पष्टच बोलली.
"साक्षी, तुझ्यापासून काय लपवू मी. शाळेपासूनच्या आपण मैत्रिणी. स्वतःपेक्षा एकमेकींना जास्ती ओळखतो. तू जाणलंस माझ्या मनातलं... त्याला कळू नये का ग."
"एक मुलगी... त्याच्या बहिणीची नणंद. आमच्यातल्या एका नात्याने माझे हात बांधलेत. कसं सांगू मी त्याला माझ्या मनातलं? स्निग्धाच्या टपोऱ्या डोळ्यांतुन आसवांचा एक एक थेंब तिच्या मनातलं दुःख होऊन बाहेर पडत होता.
"मी कॉल करू का त्याला? बोलवून घेऊ का इथे?"
"तो तुझ्याशी का असा वागतोय? आज विचारतेच त्याला, आज सोक्षमोक्षच लावू या." साक्षीने कॉल करण्यासाठी मोबाईल काढला.
"नको, काही गरज नाहीये ह्या सगळ्याची." त्याला नाही ना गरज.. तर मला ही नाहीये.."
"माझंच चुकलं.. माझाच गैरसमज झाला, मी च... त्याच्या वागण्यातल्या बदलला, त्याच्या माझ्याविषयीच्या संवेदनांना प्रेम समजले. चुकलं माझं" स्निग्धा खूप वेळ रडत होती.