टर्निंग पॉइंट भाग १२

अनपेक्षित वळणावर कहाणी तिची
भाग १२


स्निग्धाला काही केल्या झोप येईना.. खूप उशीरा तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी जरा उशिराच तिला जाग आली. घड्याळाकडे बघितला नऊ वाजून गेले होते. तिला धडकी भरली.


तिने पटापटा सगळं आवरून घेतलं. बॅगमधली सुंदर नाजूक किनार असलेली, हलकी शिफॉन ची तिने साडी नेसली. स्वतःला आरशात न्याहळलं. मेक अप नंतर ही, हळदीचा रंग तिच्या चेहऱ्यावर अजून हि तसाच, उमटला होता. खूप सुंदर दिसत होती ती. 


"वहिनी... वहिनी..." वंदनाने दरवाजा ठोठावला. 


स्निग्धाने दरवाजा खोलला... 


"अंघोळ आटोपली असल तर, बाईसाहेब खाली बोलवत हाय जी तुम्हाले." वंदना ने निरोप दिला.


वंदनाच्या मागेच, स्निग्धा खाली आली. समोरच मोठ्या प्रशस्त देवघरात निरंजन जळत होता.


'देवा आज या घरात माझा पहिला दिवस, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी नित्य असू दे.' 


'या घरातली माणसं आजपासून माझी आहेत, मला त्यांना आपलंसं करून घेता येईल, त्यांच्या मनात जागा मिळवता येईल शक्ती दे'  तिने खाली झुकून देवाला नमस्कार केला.


डायनिंग एरिया मध्ये सगळे नाष्टा करायला बसले होते. पोहे, उपमा, इडली, उत्तप्पा... निरनिराळे पदार्थ नाश्त्यात होते. सर्वांच्या आवडी निवडीचा विचार करून नाष्टा बनवल्या गेला होता. नाष्टा सर्व्ह करायला, काही हवं नको ते बघायला, दिमतीला चार नोकर हि होती अवतीभोवती.


"स्निग्धा ने सासूबाईंना खाली वाकून नमस्कार केला. सासऱ्याना नमस्कार करण्यासाठी ती खाली झुकली. तिचं निरंजनकडे स्निग्धाच लक्ष गेलं. 


निरंजनने नजर वर करून स्निग्धाकडे बघितलं नव्हतं.


"छान दिसते आहेस"... पण एवढ्या हलक्या साड्या नका घालत जावू. जरा काही दिवस तरी भरजरी साड्या नेसत जावा रोज. सासूबाईंच्या बोलण्याने स्निग्धला टेन्शनच आलं होतं.


"आता काय? शोकेशमध्ये मांडून ठेवायचं आहे का? भरजरी साडी नेसवून" निरंजन चिडून बोलला.


निरंजन जवळ असलेल्या रिकाम्या खुर्चीत, सासूबाईंनी स्निग्धाला बसायला सांगितलं. 


दोन घास, कसेबसे घाईघाईत पोटात ढकलून निरंजन लगेच टेबल वरून उठला. स्निग्धा ला जरा वेगळं च वाटलं.


 वंदना... नेस्निग्धा समोर प्लेट ठेवली. 


नास्त्याला काय वाढू म्हणून विचारलं. 


सांभार आणि दोन इडल्या तेवढ्या तिने चटणी सोबत खालल्या.  


"अरे, कुठे निघालास?"  


"नवीन लग्न झालंय ना तुझं?" घरात राहा घडीभर. आज दुपारी सत्यनारायण  पूजा आहे, लक्षात असू द्या. आणि ही नंतर लगेच कुलस्वामिनीच्या दर्शनाला घेऊन जा सूनबाईस्नी" अप्पासाहेब बोलले..


"झालं ना तूमच्या मनासारखं... या घराला सून हवी होती. मिळाली ना तुला. आता अजून काय अपेक्षा आहेत माझ्याकडून तुमच्या.  खूप काम आहेत मला. आणि ह्या सगळ्यासाठी वेळ नाही माझ्याकडे. 


"निरांजन राजे.. असे कसे तुम्ही?" आशाबाई बोलतच होत्या तर निरंजन तावातावात निघून गेला.


"येईल ते, तुम्ही पूजेच्या तयारीला लागा. आमदाराच्या घरातला बाजार असा चव्हाट्यावर यायला नको, कळलं का?"


"बोलताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वागत चला, कळलं का!"आमदार अप्पासाहेब सरदेसाईचा बंगला आहे, हे विसरू नका." अप्पासाहेबांच बोलणं आशाबाई, मान खाली घालून ऐकत होत्या.


"आज दुपारी सत्यनारायण पूजा आहे. सगळी तयारी वेळेत  करा. चला, तोंड काय बघत बसलात, आवरा लवकर लवकर." आशा बाईंनी सगळ्या नोकरांना त्यांची काम सांगितली.


"बाईसाहेब, निरंजन राजे!"... सखूबाई चिंतेच्या सुरात बोलल्या.


"येतील ते, साहेबांनी सांगितलंय ना.. म्हणजे येतील." पूजा व्यवस्थित आणि विधिवत झाली पाहिजे. आशाबाईं सगळ्या नोकर  चाकरांना सूचना देत होत्या. 


"नैवेद्य आणि पाहुण्या राहुळ्यांच्या जेवणासाठी सखूबाई कामाला लागली. वंदना तू स्निग्धाच्या सोबत रहा, तिला काय हवं नको ते बघ." 


"हो बाईसाहेब",  म्हणत वंदना ने मान डोलावली.


"जा आराम करा तुम्ही".... स्निग्धा चा नाश्ता झाला होता ती ही रूम मध्ये निघून गेली.


'काय वातावरण आहे या घरातलं.... घर आहे की जेल... तिला दडपण आलं होतं. 


'एकंदर, कठीण आहे हे सगळं.. नवऱ्याला काम काम आणि काम त्याशिवाय काहीच दिसत नाही वाटतं.'


'काम करावं पण.. लग्न करून बायकोला घेऊन आलोय ते ही विसरून जावं?' असो.... स्निग्धा पलंगावर पहुडली. 


काय ग काय शिकलियेस. स्निग्धाने वंदनाला विचारलं.


"नववी पास, आमच्यात मुली शिकत नाय. शिकल्यावर लग्न होत नाहीत ना म्हणुन. वंदना ने सांगितलं.  


'इथे किती वर्षापासून आहेस.' स्निग्धाने विचारलं.


'मी होय... चारच दिवस झाले आले इकड. बाप नाही, आई चार घरी काम करून माझा सांभाळ करायची. तुमच्या बंगल्यात कामाला लागली तेव्हापासून मले माह्या आजाकड धाडलं होतं.'


' लग्न होत म्हणून आले मी,' वंदना बोलत होती.


थोडया वेळ ती डोळे मिटून शांत पडून राहिली. 


सुंदर हिरव्या रंगाची भरजरी साडी नेसून, अंगावर सोन्या मोत्याचे दागदागिने चढवून स्निग्धा तयार झाली होती. 


निरंजन घरी आलाच नव्हता. आप्पा साहेबांनी एकदे तिकडे चार फोन फिरवले. खूप उशिरा निरंजन घरी आला होता. 


पूजा त्यांनंतर जेवण ही आटोपली. आले गेले पाहुणे निघून गेले होते.


"निरंजन घरी आहात की जाताय कुठं ? "अप्पा साहेबांनी  विचारलं.


"घरीच थांबा, जरा काम बाजूला ठेवून.. आप्पासाहेब बोलत होते. 


"गावदेवी च्या दर्शनाला घेऊन जा सून बाईस्नी " निरंजनने हलकेच मान डोलावली.


"आमच्या रूममध्ये या बोलायचंय जरास तुमच्याशी? वडीलांच्या मागोमाग निरंजन त्यांच्या रूममध्ये शिरला.


"हे बघा, काल उशिरा आलात तुम्ही?"


"आम्हाला माहिती नाही असं वाटतेय का तुम्हाला?"


 "लग्न झालंय तुमचं. कसं वागायला हवं तुम्ही?  सुज्ञ आहात तुम्ही, तुम्हाला आम्ही काय सांगणार? पण एक लक्षात ठेवा सरदेसायांच घर आहे हे."


"अप्पा साहेब, आम्ही केलंय ना तुमच्या मनासारखं. तुमच्या इच्छेप्रमाणे लग्न केलं. आता आणखी काय करायला हवंय? निरंजनच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता.


"काय ते माहिती आहे तुम्हाला? आम्ही नव्याने सांगायला हवंय का आता तुम्हाला?" अप्पासाहेब चिडून बोलले.


"सुधरा राजे सुधरा... आता पूर्वीसारखं वागून चालणार नाही. संसाराकडे लक्ष द्या जरास" 


"एकुलते एक वारसदार आहात तुम्ही, आपल्या सरदेसाई घराण्याची भिस्त आता तुमच्या हाती आहे. कळलं का?" समजावण्याच्या सुरात दीपकराव बोलत होते.


आशाताई आल्या तशा, दोघे ही गप्प झाले. 


"सूनबाई कडे लक्ष द्या. नवीन आहेत त्या, एकटं वाटायला नको त्यांना." अप्पा साहेबांनी, आशाताईना सुद्धा सूचना दिल्या. त्यांनी ही हो म्हणत मान डोलावली.
क्रमशः