टर्निंग पॉइंट भाग १३

अनपेक्षित वळणावर कहाणी तिची
भाग १३.


गाव देवीचं दर्शन घेऊन स्निग्धा आणि निरंजन घरी परतले. स्निग्धा रूम मध्ये आली. मागोमाग निरंजन ही, रूम मध्ये आला होता. पहिल्यांदाच तो रूममध्ये आला होता. स्निग्धा ला धडकीच भरली. 


भरगच्च भरलेल्या कपाटातले त्याने कपडे हुस्कटले. 'वेळेत काही सापडत नाही बडबडत, कपडे शोधताना जरासा चिडलाच तो स्वतःवर.' तिरकस नजरेने त्याने स्निग्धाकडे बघितलं आणि बाथरूममध्ये निघून गेला. 


स्निग्धाची छाती जोरजोरात धडधडायला लागली होती. अंघोळ करून तो बाहेर आला, ओल्या केसातलं पाणी त्याच्या मानेवरून पाठीवर आणि उघड्या छातीवर ओघळत होतं. अंग पुसून त्याने टॉवेल तसाच बेडवर फेकून दिला. रीमोटच्या बटणा खचाखचा दाबून त्याने एसी सुरू केला. पलांगाच्या एका कडेला जावून झोपला. 


स्निग्धा तिथेच सेटीवर हातातल्या बांगड्या चाळत बसली होती. तिच्याकडे त्याने जराही लक्ष दिलं नव्हतं किंवा साधं बोलण्याचा प्रयत्न ही केला नव्हता. 


 ती थोड्या वेळ तशीच बसून राहिली. 


"झोपायचं नाही का?" लाईट बंद करायचा आहे!" कणखर आवाजात तो फक्त एवढंच बोलला.


स्निग्धा लगेच उठली. पलांगवर पडलेला ओला टॉवेल उचलून तिने वाळत घातला. पलंगाच्या एका कडेला पाय पोटाशी घेऊन तिने उशीवर डोक टेकवलं. 


पलंगावर काहीशी चुळबुळ जाणवली.. तिने अंग चोरून घेतलं. उष्ण श्वास आता तिच्या मानेवर आणि पाठीवर रेंगाळू लागले होते. स्निग्धाच्या छातीत धस्स झालं.


तिच्या सर्वांगावरून आता तिचे हात फीरु लागले होते. तिचं अंग अंग शहारलं. तिचं संपूर्ण शरीर त्याच्या उष्ण श्वासाच्या हवाले झालं होतं. आपल्याकडे त्याने तिला ओढून छातीशी घट्ट कवटाळून घेतलं. पकड जराशी ढीली करून त्याने, रूम मधला लाईट बंद केला. 


"मिठीतून सुटण्याचा ती प्रयत्न करायला लागली. लग्न झालंय. आजची आपली, पहिली रात्र. तो तिच्या कानाशी पुटपुटला."


"वेळ देवूया ना जरा या नात्याला. घाई काय आहे एवढी" तिने हळूच स्वतःची बाजू मांडली. 


"घाई, काही नाहीये.. पण शेजारी एवढी, सुंदर बायको असताना.. असं शांत राहणं म्हणजे.. माझ्या पुरुषत्वावर अन्यायच नाही का? संपूर्ण शरीर आता त्याच्या काबीज झालं होतं.


पत्नी म्हणून स्निग्धा  कर्तव्याला चुकली नाही. तन मन धन अर्पण करून स्निग्धाने पहिली रात्र, त्याच्या नावावर केली होती. आपला पुरुषार्थ गाजवून तो हि शांत झोपी गेला होता. 


'पहिले ओळख होईल.. नंतर मैत्री मगच संसाराला सुरुवात करायची." तिने त्याला सांगायचा प्रयत्न केला होता. आजची रात्र, खूप बोलायचं होतं तिला त्याच्याशी. मनातलं बोलायचं होतं. त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं होतं. थोड तुझं थोड माझं म्हणत.. या नात्यात विश्वासाचं खतपाणी घालायचं होतं.' पण असं काहीच घडलं नव्हतं. 


लग्न करून आणलेल्या पत्नीला, काय हवंय ह्याची साधी दखल ही त्याने घेतली नव्हती. उलट, नवरा म्हणून त्याने वर्चस्व गाजवलं होतं. 


'आता यापुढे या नात्यात.. मैत्र सापडेन का कधी?' तिच्या डोक्यात विचारांनी गर्दी केली. थकलेला त्याचा देह मात्र निर्धास्त होऊन पडला होता. रात्रभर स्निग्धाच्या डोळ्याला डोळा मात्र नव्हता. 


इलेक्शन ची काम आहेत म्हणून निरंजन जास्तीत जास्त बाहेरचं राहायचा. तिच्या मताला, त्याच्या लेखी काही अर्थ नव्हताच. शारीरिक भूक शमवणारी हक्काची बायको म्हणून फक्त तो तिच्या जवळ येत होता.


घरात नोकरचाकर होते. पैसा अडका होता. श्रीमंत घराणं होतं धन संपत्ती पैसा ज्याप्रमाणे तिजोरीत ठेवला जातो त्याप्रमाणे सरदेसाई घरातल्या स्त्रीया म्हणजे घराच्या चार भिंतीत शोभेची वस्तू प्रमाणेच होत्या. 


निरंजन बाहेर गेला की वंदना येऊन जावून असायची रूममध्ये. काहीचं दिवसात ती ही गावी निघून गेली. आता स्निग्धा एकटी पडली.


"आई... बसून बसून कंटाळा आलाय, मी स्वयंपाकात तुम्हाला मदत करू का?" एक दिवस रूममधून बाहेर येऊन स्निग्धाने सासूबाईंना विचारलं.


"नोकर चाकर आहेत घरात.. तेच करतात सगळं." आठवड्याभराचा मेनू आधीच ठरलेला असतो त्याप्रमाणे नोकर सगळं करतात. आम्ही आहोत तोपर्यंत, तुम्हाला या सगळ्याकडे लक्ष देण्याची गरज नाही." तुम्ही आराम करा. स्वतः कडे लक्ष द्या. स्निग्धाच्या सासूबाईं गोड बोलत होत्या. 


"कंटाळा येतो बसून बसून" तिला सांगायचं होतं पण तिचं ऐकून घ्यायला त्या क्षणभर ही थांबल्या नव्हत्या. 


लग्नाला महिना दीड महिना झाला होता,  एवढ्या दिवसात ती जणू काही मोकळेपणाने श्वास घ्यायलाच विसरली होती.


कसल्याशा कोंदट वासाने, तिला कसस झालं. मळमळ ल्या सारखं वाटलं. ती प्रचंड घाबरली पण सांगणार तरी कुणाला. आणि एक दिवस अचानक स्निग्धाला चक्कर आली. 


"काय झालं म्हणून," तपासायला डॉक्टर आले. स्निग्धाला दिवस गेले होते... 


सरदेसाई घराण्याला आता वारस मिळणार होता.  सगळेच खूप खूश होते. निरंजन तर स्निग्धाला खूप जपत होता. घरातले नोरकचाकर सगळे सदा तिच्या दिमतीला हजर राहत होते.


बाळाची वाढ व्यवस्थित  होतेय ना रेगुलर चेक अप करायला स्निग्धा तेव्हढी निरंजन सोबत बाहेर पडत होती. आज सोनोग्राफी करायची होती. स्निग्धा निरंजन सोबत हॉस्पिटल मध्ये गेली होती.


"डॉक्टर, व्यवस्थित तपासा.. आणि सांगा" नोटांची गड्डी, त्याने डॉक्टरासमोर सरकवली. 


"काय आहे हे!" हे पैसे कशासाठी? स्निग्धा चिडली.


"तू लक्ष नको देवूस." आमच्यातला व्यवहार आहे तो? निरंजन ने तिला समजावलं.


समोरच्या स्क्रीन वर पोटातला छोटासा तो कोमल जीव जीवाच्या आकांताने... बाहेर येण्यासाठी धडपडतोय असं च तिला वाटलं. 


'असेल ना तो सुरक्षित... प्रश्नांची गर्दी तिच्या मनात उसळली होती. 


डॉक्टरांनी.. अंगठा वर केला, तसा निरंजन च्या चेहऱ्यावर आनंद झळकला होता.


बाळ एकदम व्यवस्थित आहे. बाळाची वाढ अगदी व्यवस्थित आहे. काळजी घ्या आता यापुढे तुम्हाला अजून जपावे लागणार. डॉक्टरांनी बाळाच्या वाढीसाठी म्हणून काही सूचना ही स्निग्धा ला दिल्या. 


"ही नोटांची गड्डी, कशासाठी?" स्निग्धा च्या मनात नाही नाही ते विचार यायला लागले. 


"ते पैसे कशासाठी" घरी परतताना तिने निरंजनला विचारलं. सरदेसाई घराण्याचा वारस आहे तूझ्या पोटात.. आपण डॉक्टर काय अख्खं हॉस्पिटल विकत घेऊ शकतो. त्याने स्निग्धाच्या हातच हलकेच चुंबन घेतलं.


एका मोठ्या ज्वेलरी शॉप समोर त्याने त्याची महागडी कार थांबवली. आज तो खूप खूश होता. त्याने स्निग्धा च्या पसंतीचा एक सुंदर हार तिला गिफ्ट म्हणून दिला...
क्रमशः



🎭 Series Post

View all