टर्निंग पॉइंट भाग १४

अनपेक्षित वळणावर कहाणी तिची
टर्निंग पॉइंट भाग १४


आता सतत ती रूम मध्येच बसून राहायची. वर रूम मध्ये च तिला हवं नको ते बघितलं जात होतं. 


बसून बसून तिला ही कंटाळा आला होता. निरजन च्या विस्कटलेल्या कपड्यांच्या घड्या घालाव्या, म्हणून तिने निरंजनच कपाट उघडल. 


घड्या करून, एक एक शर्ट पँट ती व्यवस्थित एकावर एक ठेवत होती. सगळ कपाट आवरून झालं होतं. कसलंस एक एनव्हंलप तिच्या नजरेत पडलं. 


निरंजनसोबत एका मुलीचा फोटो..  फोटो बघून तिला धक्का च बसला!


निरंजन आला तसा तिने विषय काढला. सरळ त्याच्यासमोर तो फोटो ठेवला. 


"कोण आहे ही?" स्निग्धाने विचारलं.


तो शांतपणे बसून राहिला.


"तुला अशा पद्धतीने नव्हत माहिती व्हायला पाहिजे. मीच पहिले सांगायला हवं होतं तुला. पण वेळच नाही मिळाला ग, महिन्याभरात बाळाची चाहूल लागली कधी सांगितलं असतं तुला?" निरंजन स्वत:ला दोष देत बोलला.


खूप दिवसांपासून मला तुला हेच सांगायचं होतं. माझं एका मुलीवर खूप प्रेम होतं, रुही तिचं नाव... खूप प्रेम करत होतो आम्ही एकमेकांवर.  एकाच कॉलेजमध्ये होतो आम्ही." निरंजन च बोलणं, स्निग्धा शांतपणे ऐकत होती.


"मग लग्न का नाही केलं?" 


"तिचं ही लग्न झालं का? स्निग्धा ने विचारलं.


त्याने नाही म्हणत.. हलकेच मान डोलावली.


"का?" स्निग्धा शांतपणे विचारत होती.


"वाट बघतेय ती अजून हि ती माझी"... निरंजन च ऐकून तिला धक्का च बसला. 


"वेडाबाई.. आता तिचा माझा काहीच संबंध नाही."

ती काय करते? कुठे राहते? मला काहीच माहिती नाही. बहुतेक हे शहर सोडून गेलीय, मध्यंतरी कळलं मला. निरंजन बोलत होता.


"मला माहितीय पहिलं प्रेम असं विसरता येणं शक्य नाही. पण आता तुमच्यात नाही ना कुठलेच संबंध.. मला सगळं खरं खरं माहिती असायला हवं बरं का?" स्निग्धा ला रडू कोसळलं. 


"ये वेडाबाई," तसं काही नाहीये.. निरंजनने तिला  छातीशी घट्ट कवटाळून घेतलं.


"हा घे.. पुरावा!" त्याने दोन हातात तो फोटो पकडुन, दुसऱ्या क्षणी फाडून फेकला. घे पुरावा!" म्हणत मिश्किल हसला.


"किती घाबरले होते मी हा फोटो पाहून." स्निग्धाच्या डोळ्यात दाटून आलं होतं. 


"मला वाटलं तू आकांततांडव करशील चिडशिल.. तो फोटो बघून" निरंजन संथपण बोलत होता.


"उगाच गैरसमजाला खतपाणी कशाला?  बरं झालं फाडून टाकला." स्निग्धाला फोटोंचे दोन तुकडे बघून हायस वाटलं. 


"तू तुझ्या मनातल्या, वहिनीच्या भावा विषयीच्या तूझ्या भावना एकदा माझ्या समोर बोलून दाखवल्या होत्या. म्हणाली होतीस कधीकाळी, उगाच तो आणि मी आमोरा समोर आलो की गचपटायला नको." आता पटतय मला तर तुझ म्हणणं.


"चु.....त्या होता तो. एवढी सुंदर, समंजस बायको हुकवली त्याने" बरच झालं!! राजन साहेब थँक्यू बर का! निरंजन हसतहसत बोलत होता.


"पहिलं प्रेम विसरता येणं शक्य नाही?" 


"नातं कोणतं का असेना, नात्यात विश्वास महत्वाचा.. तो नसेल तर मग.. सगळ च अशक्य होऊन जातं!" स्निग्धा मनातलं बोलत होती. बोलणं ऐकून निरंजन बोलता बोलता अडखळला.


"खूप प्रेम करयचो आम्ही एकमेकांवर" पण हा समाज आडवा आला. या समजाला, आमचा धर्म जास्ती महत्वाचा वाटला. थांबवावं लागलं." निरंजन बोलत होता. 


"शंकेची पाल चुकचुकली की सगळं कठीण होऊन जातं. मग ती काही केल्या पिच्छा सोडत नाही. खरं बोलताय ना तुम्ही. आता नाही ना तुमच्यात आणि रूही मध्ये काहीच!" स्निग्धा ने शंका बोलून दाखवली.


आता काय हे हृदय तुझ्यासमोर ठेऊ का? काय पुरावा हवाय तुला सांग.. रूही च्या फोटोंला त्याने पुन्हा चार तुकड्यात फाडल. 


"माझ्या बाळाची आई होणार आहेस तू, तुला बरं फसवेन मी.. आता तर मला माझी ही सुंदर बायकोच जिकडे तिकडे दिसते" बोलता बोलता निरंजन ने तिच्या पोटावरून हळूवार हात फिरवला. 

 

तो, हळूवार स्पर्श तिला हवाहवासा वाटला. आज पहिल्यांदाच  त्याने एवढ्या अलवार तिच्या बाळाशी संवाद साधला होता. येणारं बाळ आपल्या नात्याला अर्थ देणारं असणारं ही भावना तिला सुखावून गेली. 


निरंजनच्या डोळयात अश्रू दाटून आले होते. प्रेमात हरवलेला, दुखावलेला निरंजन.. निरंजनच हे रूप स्निग्धासाठी नवख होतं. स्निग्धाला ही निरंजन च्या बाबतीत घडलेलं, तिला ही वाईट वाटलं... 


पहिलं प्रेम विसरण्यासारखं दुःख नाही. ते कधीच विसरता येत नाही जाणीवेने स्निग्धाला ही गहिवरून आलं. 


"माफ करशील मला?" निरंजनने स्निग्धा ला विचारलं. 


दोन्ही हात घट्ट पकडुन तिने ..  त्याच्यावर विश्वास ठेवला.

आजपासून आपलं नातं अगदी ह्या आरशासारख. स्वच्छ असणार.. सगळं कसं ना, स्वच्छ स्वच्छ वाटतेय. माझ्या मनावर ह्या सगळ्याच किती दडपण होतं माहिती य का तुला.. आज मी शांत झोपणारे.. निरंजन पलंगावर उताणा पडला.

स्निग्धा ही त्याच्या बाजूला जावून शांतपणे जावून झोपली. त्याने तिच्या पोटावरून पुन्हा अलगद हात फिरवला.

बाळा... तू आमच्या नात्याला नवा अर्थ देणार आहेस... आई बाबा म्हणून नवीन ओळख देणार आहेस.. दोघे ही बाळाशी बोलण्यात, आणि नव्या येत्या आयुष्याची स्वप्न बघण्यात मग्न झाले.
क्रमशः