टर्निंग पॉइंट भाग १५ अंतिम

ती उभी... एका अपेक्षित वळणावर
भाग १५.


रुही चे बोलके डोळे.... तिला वारंवार आठवत होते. 


तिला कुठे तरी बघितल्या सारखं का वाटतेय... स्निग्धा खूप विचार करत होती. अधूनमधून विचारांनी ती प्रचंड बेचैन होत होती. पण तिला आठवतच नव्हतं.


आज पुन्हा, स्निग्धाला रूटीन चेकअप साठी हॉस्पिटल मध्ये जायचं होतं. सोनोग्राफी रूममध्ये, बुरखा घातलेली एक सिस्टर.... आणि तिला, रूही आठवली...

"निरंजन ही रूही... "


"रुही इथे कशी असेन?" निरंजन ने तिला खोट्यात पाडलं.


"नाही ही रूही च आहे." तू रुही आहेस ना," स्निग्धा ने चिडून विचारलं.


तेवढ्यात... कुणी तरी, रुहि असा आवाज दिला.. आणि तिला सगळं च स्पष्ट झालं.


"मी म्हटलं ना!"


"ही इथे काय करतेय?" स्निग्धा पुन्हा चिडली.


"ती ना, माझ्या बाळाला भेटायला आलीय!" निरंजन उत्तरला.

"माझ्या म्हणजे काय? बाळ आपलं आहे ना?" बाळाशी हीचा काय संबंध? स्निग्धा चा हात अलगद तिच्या पोटावर गेला. 


"हो बाळ आपलं आहे... माझं ही आहे, तेवढं च तिचं ही आहे." घराण्याला ती वारीस देऊ शकत नव्हती म्हणून तर तुला लग्न करून आणायची गरज भासली." निरंजन अतिशय कोरडेपणाने बोलत होता.


"म्हणजे तुम्ही अजूनही भेटता एकमेकांना, तुमच्यात आज ही. शीSS.. खोटं बोललात तुम्ही माझ्याशी?" स्निग्धा ने चिडून निरंजन ची कॉलर पकडली.

रुही तिथून निघून गेली होती.


"रुही थांब." आपलं प्रेम आहे एकमेकांवर. आज सांगूनच टाकतो हिला.. हो भेटतो आम्ही अजून हि भेटतो." आपला कट्टर दुश्मन हा समाज आहेच त्यात अजून एक ही? काय फरक पडणार आहे!" तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो."


"थांब निरंजन.. थांब!"  ती फक्त तुझी बायको नाही एक आई आहे. तिची काळजी महत्वाची." या नाजूक दिवसांमध्ये तिची काळजी घेणे गरजेची." रूही ने निरंजन ला गप्प बसवलं.


"स्निग्धा समजून घे ना आम्हाला.  मी तुझी मनापासून माफी मागते हवी तर, पण तू या परिस्थितीत नको ना चिंता करू. आम्ही नाही विसरू शकत एकमेकांना तेही तितकच खरं." रुही हात जोडून उभी होती.


स्निग्धा ला खोटेपणा चा प्रचंड राग आला होता. 


तिला निरंजन शी काहीच बोलायची इच्छा नव्हती. एका क्षणात तिचं आयुष्य बदलून गेलं होतं. आयुष्य अंधारात सापडल्याची फिलिंग तिला आली.


"मला घरी जायचंय...!" ती तडकाफडकी तिथून निघून आली होती.


तिने आल्या आल्या सगळं तिच्या सासूबाईंना सांगितलं. त्या फक्तच ऐकत बसल्या.


"आई तुम्हाला माहिती होतं हे". त्यांनी मान खाली टाकली.


"अरे मुर्खा... एवढी काय घाई होती. अप्पासाहेब निरंजन वर जोरात चिडले.


"स्निग्धा..मी रूही ला कधीच विसरू शकत नाही. रूही मध्ये अजून हि गुंतलोय मी. खूप प्रयत्न केला तिला विसरण्याचा पण जेवढा तिच्या दूर जातो तेवढाच मी माझा उरत नाही." 


"आपल्या लग्नानंतर तुम्ही भेटत  होतात का एकमेकांना? तुम्ही आजही एकमेकांच्या संपर्कात आहात विचारलं होत मी?" खोटं का बोललात माझ्याशी स्निग्धा प्रचंड चिडली होती.


"कामानिमित्त बाहेर असता तेव्हा.... तिच्यासोबत..  शीSS.."  निरंजन ला तिने दूर ढकललं. तिला विचार ही करवला जात नव्हता. तिला किळस वाटली.


"तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही माझी. जा तुम्ही प्लीज जा तुम्ही" स्निग्धा सर्वांवर चिडली.


"का फसवल तुम्ही मला?" 


"का?"


"का माझी फसवणूक केली?" स्निग्धा किंचाळत होती.


मी जातेय माझ्या माहेरी.. आता मी इथे एक क्षण ही थांबणार नाही. ती पायऱ्या उतरत होती.  अचानक तिच्या पोटात जोरात दुखायला लागलं.. जोरात कळ उठली आणि तीला गरग रायला लागलं. आणि ती पायऱ्यांवरून खाली  कोसळली. 


निरंजन ने तिला उचलून  हॉस्पिटलमध्ये नेलं. मानसिक आघात  आणि पायऱ्यांवरून कोसळल्याने पोटातल्या बाळाच्या मेंदूला जबर दुखापत झाली होती. पोटातल्या बाळाने, या जगात येण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला होता.

निगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या, स्निग्धा ला अचानक रक्त द्यावं लागलं होतं. रूहि ने तिचं रक्त देवून स्निग्धाला वाचवलं होतं. 


"स्निग्धा ने तिचं बाळ गमावलं होतं.. तिचं आभाळ एवढं दुःख कुणीच कमी करू शकत नव्हतं. सध्यातरी कुणाशी च काही बोलायचं नव्हतं. समीर, अपूर्वा, आणि सीमाताई ना अप्पा साहेबांनी बोलवून घेतलं होतं.. 

समीर ने ... आमदार सरदेसाई आणि निरंजन वर फसवणुकीचा आरोप लावून त्यांना कोर्टात खेचायचं ठरवलं होतं. तशी पोलीस केस ही झाली होतीच.


मला कुणाशी च काही बोलायची इच्छा नाही. मला कुणाशी काही तक्रार नाही... डिव्होर्स पेपर वर सही करून , आपल्या आयुष्यातून निरांजन नावाचा अध्याय मिटवून टाकायचा तिने निर्णय घेतला होता. हे एक वाईट स्वप्न समजून स्निग्धा, निघून गेली होती. कायमची....


स्निग्धा ची आई.. स्निग्धा ला माहेरी घेऊन आली. स्निग्धाने नुकतच स्वत:च बाळ गमावलं होतं... स्निग्धाच लग्न झाल्यापासून अपूर्वा ने ही तिचं स्वतःच माहेर गमावलं होतं.


आज... स्निग्धा ला भेटायला राजन आला होता... तिचं दुःख वाटून घ्यायला... "मला कुणाशी, भेटायची इच्छा नाहीये... बंद रूम मध्ये स्निग्धा ने स्वतःला कोंडून घेतलं होतं. आणि राजन शी भेटायचं तिने टाळलं होतं"


राजन अपूर्वा ला ही न भेटता गेला होता. अपूर्वा आणि राजन आपल्यामुळे एकमेकांपासून दूर गेले. त्यांच्या या परिस्थितीला आपण जबाबदार आहोत अपूर्वाला कळून चुकलं होतं.

आता आपल्या भावाला आणि आपल्या ननंदेला कुठल्याही परिस्थितीत एकत्र आणायचं. प्रेमात अडसर आपल्यामुळे आला आता, आपल्यामुळे त्यांचं प्रेम अर्धवट राहिलं आता मात्र... त्यांना एकत्र आणायचं. अपूर्वाने मनाशी ठामपणे ठरवून टाकलं होतं....


स्निग्धा च्या आयुष्यात येणाऱ्या नव्या "टर्निंग पॉईंट" ची सगळे च  आतुरतेने वाट बघण्यास उत्सुक होते......
समाप्त....