Login

टर्निंग पाँईट

आयुष्यातील नविन वळण
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट येत असतो आणि त्यामुळे आयुष्यामध्ये मोठे बदल घडत असतात आणि कधी ते सुखावह असतात, तर कधी नाईलाजाने स्वीकारलेले असतात .पण टर्निंग पॉइंट बदल घडण्यासाठी महत्त्वाचा असतो हे मात्र नक्की. असंच काहीसं घडलं सायलीच्या आयुष्यामध्ये 25 मुलांना नकार दिल्यानंतर सायलीला मनासारखा जोडीदार सापडला साहिल .त्याच्यामध्ये नाही करण्यासारखं काहीच तिला दिसलं नाही ,आणि तिने आई-बाबांना आपला होकार सांगितला. आणि हा हा म्हणता लग्नाचा दिवस येऊन ठेपला .सायली आणि साहिल यांचे शुभमंगल झाले. लग्नाआधी सायली पुण्याला नोकरी करत होती, साहिल मुंबईला असल्यामुळे तिला पुण्याची नोकरी सोडून मुंबईला यावे लागले .मुंबईसारख्या महानगरांमध्ये आपल्याला आपल्या आवडीची नोकरी सहज मिळेल याविषयी सायलीला खात्री होती, आणि तिने नोकरी शोधायला सुरुवात केली पण.... हा पणच मोठा होता आणि सहा महिने उलटले तरी सायलीला मनासारखी नोकरी मिळत नव्हती.अशावेळी साहिलने तू हवे तर पुण्याला जाऊन नोकरी कर ,असा समजूतदारपणा दाखवला पण सायलीला तेही मान्य नव्हते तिचे म्हणणे होते की आपण दोघं जिथे असू तिथे सोबत असून ते महत्त्वाचं आहे. साहिलचा ती घेईल त्या निर्णयाला पाठिंबा असणार होता तिला करिअर करायचेच होते. अशा वेळेला तिला नीरजा भेटली तिची बालपणीची मैत्रीण दोघीजणी गप्पा मारायला भेटल्या.

नीरजा सायलीच्या क्षेत्रांमध्ये काम करत होती ,आता ती आई होणार असल्यामुळे आपला जॉब सोडणार होती. आणि तिच्या बॉसने तिच्या जागी तिच्याच सारख्या, एखाद्या मुलीला शोधण्याची जबाबदारी सोपवली होती. सायली ही नोकरी शोधत होती, त्यामुळे नीरजाने तिला माझ्या जागी काम करशील का असे विचारले सायली साठी तर आंधळा मागतो एक डोळा अशी परिस्थिती झाली होती. त्याच वेळेला फक्त एकच अडचण मोठी होती ती चा जॉब हा हैदराबादला होता .
सायलीने नीरजाला साहिलशी बोलून सांगते अस म्हणून दोन दिवसांची मुदत मागून घेतली .घरी येऊन ती साहिलशी बोलली, तेव्हा आईने तिला पाठिंबाच दिला त्याचं म्हणणं असं होतं की तो जॉब नक्की स्वीकार तुझ्या आवडीचं काम आहे ना ,आपला संसार काय छानच चाललेला आहे कधी सुट्टी घेऊन तू ये ,कधी मी सुट्टी घेऊन येईन,आणि आपण एंजॉय करत राहू. तुझ्या साठी तुझ्या बुद्धीला चालना मिळत राहणं गरजेचं आहे .साहिल कडून ग्रीन सिग्नल मिळताच तिला हैद्राराबादला जाण्यामध्ये काहीच अडचण वाटली नाही .आणि तिने नीरजाला त्या नोकरीसाठी होकार कळवला. एक तारखेपासून सायली हैदराबादला जॉईन झाली .आणि नोकरी चालू झाली मनासारखं काम केल्यामुळे ,तिचं मन प्रसन्न राहत होतं. साहिलची आठवण यायची पण ठीक आहे थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे नंतर ,आपण मुंबईला बदली करून ठेवू किंवा हा जॉब चालू असताना मुंबईला दुसरा जॉब शोधणे सोप्पे होईल असा विचार ती करत होती .अशातच एक दिवस साहिल आजारी पडल्याचे तिला कळले खरंतर धावत त्याच्याजवळ जावं ,आणि त्याची काळजी घ्यावी असं तिला वाटायला लागलं पण ऑफिसमधल्या कमिटमेंट मुळे ती अडकली होती, पण अशावेळी साहिलने तिला धीर दिला. त्याने त्याच्या आईला बोलावून घेतले त्याची आई आली आणि तिने साहिलचा आजार पण निभावून दिलं .नंतर सुट्टी मिळाली तशी सायली लगेच मुंबईला आली आणि साहिलला भेटल्यावर तिला बरे वाटले ,आणि त्याच क्षणी तिने साहिलला विचारले" अरे सोडू का मी नोकरी अशी खूप धावपळ होते तुझी काळजी वाटत राहते आणि तिकडे नोकरीही करावीशी वाटत राहते काय करावे बरे" साहिलने मात्र तिला धीर दिला आणि सांगितले "अग चालू ठेव तुझ्या मनाला आनंद आहे ना, तुझ्या करिअरचा त्यामुळे तू हे चालू ठेव "आणि त्याच वेळेला साहिलने मात्र एक निर्णय घेतला होता. त्याने हैदराबादला नोकरी शोधायला सुरुवात केली होती पण ही गोष्ट त्याने सायलीला सांगितली नव्हती त्याला तिला सरप्राईज द्यायचे होते. सायली हैदराबादला परत केली खरं तर मन उदास होतं, नोकरीचा राजीनामा द्यावा हे विचार वारंवार मनात येत होते अशा एका दिवशीच्या कातरवेळेला ती उदास होऊन साहिलची आठवण करत बसली होती.खरे तर आत्ताच्या आत्ता त्याच्या मिठीत शिरण्याची उर्मी दाटून आली होती, त्याच वेळी दारावर बेल वाजली तिने दार उघडलं आणि समोर बघते तर काय साहिल उभा होता ,आणि तेही चांगले चार पाच बॅगा घेऊन तिला काही कळेच ना ,तो म्हणाला "अगं सरप्राईज मला पण हैद्राराबादला नोकरी मिळाली आहे आता आपण दोघं इथेच सोबत राहू शकतो मी विचार केला कीथोडा बदल अनुभवावा, इथे हैदराबादला राहिलो तरी मला फार मोठा फरक पडणार नाहिये ,थोडा पगार कमी आहे ,पण आपण सोबत राहू हे महत्वाचे.थोडा बदल हा हवाच असतो नाही का फक्त या बदलांमध्ये आपण दोघांनी एकमेकांच्या सोबत असणं ,एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचं असतं नाही का ?

भाग्यश्री मुधोळकर
0