तुटलेली साखळी...भाग 3 अंतिम
माधुरीचं कार्य वाढत गेलं.
जिल्हा स्तरावर तिला सन्मान मिळाले, तिच्या केंद्रात शासनाची मदतही मिळू लागली. अनेक बायकांनी तिच्या पावलावर पाऊल ठेवत नवीन आयुष्याला सुरुवात केली.

आता माधुरी एका मोठ्या व्यासपीठावर उभी होती —
"महिला सशक्तीकरण परिषद."
"महिला सशक्तीकरण परिषद."
ती म्हणाली –
“मी कोणत्याही मोठ्या पदावर नव्हते. मी केवळ एक सामान्य बाई होते – एका छोट्याशा गावातून आलेली. पण जेव्हा आयुष्याने मला तोडायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला जोडण्याचं ठरवलं.
आज मी इथे आहे, कारण मी स्वतःवर विश्वास ठेवला... आणि आता इतरांनाही तोच विश्वास देणं हे माझं कर्तव्य आहे.”

संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं.
कालांतराने ‘माधुरी आधार केंद्र’ फक्त एक आश्रयगृह नव्हतं...
ते एक संकल्प झालं होतं — स्वतःसाठी उभं राहण्याचा, पुन्हा एकदा आयुष्याला मिठी मारण्याचा.

स्वरा, रुक्मिणी, आशा, रजनी… एकेक करून अनेक स्त्रिया इथे आल्या, त्यांच्या आयुष्यातली राख घेऊन. पण इथे त्यांना भेटली माधुरी, जी त्यांच्या आयुष्याचं नवीन चांदणं बनली.
एक दिवस माधुरीच्या आधार केंद्राला एक मोठं आमंत्रण आलं —
राज्य महिला आयोगाच्या ‘सशक्त नारी गौरव’ पुरस्कारासाठी तिचं नाव निवडलं गेलं होतं.

त्या सन्मानाच्या कार्यक्रमात, संपूर्ण सभागृहात माधुरी उभी होती. तिच्या पाठीमागे तिच्या आधार केंद्रातल्या बायका, चेहऱ्यावर तेज, डोळ्यांत आत्मविश्वास.
मुख्यमंत्री बोलले —
"माधुरी म्हणजे आपल्या राज्यातील प्रत्येक संघर्ष करणाऱ्या स्त्रीचं प्रतीक आहे. तिनं स्वतःच्या वेदना मागं टाकून, इतरांचं आयुष्य उजळवायचं व्रत घेतलं."

टाळ्यांचा कडकडाट झाला.
माधुरीचं डोळ्यांत पाणी आलं, पण चेहऱ्यावर हसू होतं.
ती म्हणाली —
"मी घरात फार काही हरवलं... पण स्वतःला सापडलं.
आता माझ्या झोळीत ‘घर’ नाही, पण अनेक जीवांची आशा आहे."
काही वर्षांनी...

माधुरी आता वयाने थोडी वृद्ध झाली होती. पण तिची ऊर्जा, तिचा उत्साह पूर्वीसारखाच होता. एका लहानशा मुलीला ती शिकवत होती —
"हे बघ गं, जेव्हा साखळी आपल्याला बांधून ठेवते, तेव्हा ती तोडायची… कारण माणूस पंखांचं आहे, साखळ्यांचं नाही."

मुलगी हसली.
"माधुरी"चं नाव आता शाळेच्या पुस्तकांत होतं –
“एक सशक्त स्त्री – जिनं स्वतःचं आयुष्य घडवलं आणि इतरांचंही उजळवलं.”

साखळी तुटली होती… पण त्या तुकड्यांतून एक सुंदर हार बनवला गेला होता —
स्वाभिमानाचा, प्रेमाचा आणि पुनर्जन्माचा.
"ती एकटी होती, पण मोडली नाही. कारण तिच्या आत असलेली शक्ती कोणत्याही छळापेक्षा मोठी होती."

एक सुंदर संदेश-
“सहन करण्यापेक्षा, बाहेर पडणं हे कधी कधी जगण्यासाठी गरजेचं असतं. तुमचं अस्तित्व, तुमचं स्वप्न कुणाच्या छळाच्या सावलीखाली गमावू नका.”
समाप्त:
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा