तुज संग प्रीत लगाई सजना भाग 2
मागील भागात आपण पाहिले की मेघा घरी पोहोचत नाही म्हणून तिचे आईवडील बेचैन आहेत . नंतर पोलिसांचा फोन येतो आणि मेघावर अत्याचार झाल्याचे समजते . श्रीरंग तिला दवाखान्यात पाहून घरी यायला निघतो आणि त्याला सगळे आठवत राहते . आता पाहूया पुढे .
श्रीरंगचे बाबा पुण्यात बदलून आले आणि आता गाण्याचा क्लास कोणाकडे लावायचा ? हा पहिला प्रश्न उभा राहिला . आजवर त्याला आजोबांच्या मित्राने त्याला शिकवले होते . परंतु आता कॉलेज करण्यासाठी शहरात येणे आवश्यक होते .
" रंगा,गाणे थांबवू नकोस . "
आजोबांनी आवर्जून सांगितले होते .
पहिले दोन तीन महिने इथे स्थिर होण्यात गेले आणि नंतर मग गाणे शिकण्यासाठी गुरू शोधणे सुरू झाले . शेवटी घरापासून जवळच असलेल्या पंडित भास्कर यांच्यापाशी हा शोध थांबला . पहिलाच दिवस होता .
घरापासून जवळ असल्याने श्रीरंग चालतच गेला होता . आजूबाजूला बघत बंगल्याच्या प्रवेशद्वारातून आत जात असताना धाडकन आदळून आई ग ! असा एक गोड नाजूक आवाज कानावर आल्याने त्याने वर पाहिले .
खांद्यापर्यंत रुळणारे केस , गुलाबी ओठ ,टपोरे डोळे , राग आल्याने लाल झालेले चाफेकळी नाक . नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेला श्रीरंग तिच्याकडे बघतच राहिला .
" बावळट !"
ती नाक उडवत आत निघून गेली .
ती नाक उडवत आत निघून गेली .
गाण्याचा क्लास आटोपून श्रीरंग घरी आला .
" कर हा करी धरिला शुभांगी . "
श्रीरंग मोठ्याने गाणे म्हणत बाहेर आला .
श्रीरंग मोठ्याने गाणे म्हणत बाहेर आला .
आईने दिलेला नाष्टा काहीच कुरकुर न करता खाल्ला आणि तो कॉलेजला निघून गेला . आज तीन महिन्यांनी तो खऱ्या अर्थाने कॉलेज लाइफ सुरू करणार होता .
कॅन्टीनमध्ये जाऊन तो निरीक्षण करत असतानाच अचानक त्याने समोर पाहिले . सकाळी दिसलेली मुलगी ? त्याने स्वतःच्या डोक्यात टपली मारली .
आपल्याला भास झाला असे समजून तो वर्गात जायला निघाला . उशिरा ऍडमिशन झाल्याने त्याची ओळख नव्हती कोणाशी . श्रीरंग सरळ मागच्या बाकावर जाऊन बसला . तेवढ्यात मुलींचा एक घोळका त्याच्या दिशेने येताना दिसला .
" काय रे मुलींचा पाठलाग करतो काय ? "
एक मुलगी मोठ्या आवाजात म्हणाली .
" पाठलाग ? कोणाचा ? "
तो बोलायचा प्रयत्न करू लागला .
तो बोलायचा प्रयत्न करू लागला .
" कोणाचा म्हणजे ? तू कॉलेजात कसा पोहोचला ? चला याला प्रिन्सिपल सरांकडे नेऊन पोलिसात देऊ ."
दुसरी एकजण म्हणाली .
दुसरी एकजण म्हणाली .
" अरे पण मी केलेय काय ? " श्रीरंग म्हणाला .
" काय म्हणजे ? आमच्या मेघाचा पाठलाग करत तू इथे आलास ."
तिसरीने मेघाला पुढे ओढत सांगितले .
" चला याला घेऊन . "
तिसरी मुलगी पुढे आली .
तिसरी मुलगी पुढे आली .
तितक्यात प्राध्यापक आत आले .
" श्रीरंग साने ?" त्यांनी विचारले .
" येस सर . " श्रीरंग म्हणाला .
" वेलकम टू पुणे यंग मॅन . "
असे म्हणत ते त्याला सोबत घेऊन गेले .
असे म्हणत ते त्याला सोबत घेऊन गेले .
त्यानंतर कॉलेज रूटीन सुरू झाले . श्रीरंग त्याच्या बोलक्या स्वभावाने लवकरच फेमस झाला . कॉलेजचा सांस्कृतिक महोत्सव सुरू झाला . मेघा आणि तिच्या ग्रुपचा एक मुलगा मिळून एक प्रेमगीत गाणार होते .
मेघा कधीच तिचा ग्रुप सोडून कोणाशी बोलत नसे . कार्यक्रमाची जोरदार तयारी चालू होती .
" शुक, शुक ."
अचानक आवाज आल्याने श्रीरंग मागे वळला .
अचानक आवाज आल्याने श्रीरंग मागे वळला .
कोणीच नव्हते .
" ओ शुक शुक . "
परत आवाज आला आणि त्याला झाडाच्या जवळ मेघा दिसली .
परत आवाज आला आणि त्याला झाडाच्या जवळ मेघा दिसली .
" इकडे कोणी शुक शुक नाही बरं का ."
त्याने उत्तर दिले .
त्याने उत्तर दिले .
ती रागाने जायला निघणार इतक्यात तिला मैत्रिणींनी मागून ढकलले .
" मला ,म्हणजे आम्हाला एक मदत हवी आहे . "
जरा रागात ती म्हणाली .
जरा रागात ती म्हणाली .
" आम्हाला ? तुम्ही संस्थानिक आहात का काय ?"
श्रीरंग खो खो हसत म्हणाला .
श्रीरंग खो खो हसत म्हणाला .
मग मात्र सगळया बाहेर आल्या . त्याचा गायक आजारी असल्याने त्यांना नवीन गायक हवा असल्याचे त्यांनी एका दमात सांगून टाकले .
" मी तयार आहे . पण मिस मेघा तयार आहेत का ? "
त्याने विचारले .
मेघाने होकार दिला .
त्याने विचारले .
मेघाने होकार दिला .
त्या कार्यक्रमात त्यांनी गायलेले गाणे इतके झक्कास झाले की त्यानंतर कॉलेजने त्यांना अनेक स्पर्धांना पाठवायला सुरुवात केली . दोघांना एकमेकांचा स्वभाव आवडू लागला . गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले .
दोघांनीही ह्याच क्षेत्रात पुढे जायचे ठरवले आणि आणखी सहवास घडू लागला . गेले पाच वर्षे ते एकत्र मैफिली गाजवत होते . कित्येकदा श्रीरंग तिला घरी सोडायला जात असे .
ते दोघे एकमेकांसाठीच आहेत हे सहज लक्षात यायचे . कालची मैफिल झाल्यावर त्यांना सवाई गंधर्व महोत्सवाचे आमंत्रण मिळाले होते . आता मेघाला आपल्या मनातले सांगायचे असे ठरवून काल श्रीरंग घरी आला होता .
हॉर्नचा कर्कश आवाज घुमला आणि विचारांची तंद्री तुटली . श्रीरंग नशिबाने वाचला होता .
त्याने यांत्रिकपणे गाडी पार्क केली . सकाळचे सहा वाजले होते . आईने दरवाजा उघडला . परंतु एकही शब्द न बोलता श्रीरंग सरळ खोलीत आला . दरवाजा बंद केला आणि आतापर्यंत रोखून धरलेला बांध फुटला .
साधी फुलाची पाकळी न खुडणारी मेघा आणि आज तिला कुस्करून टाकले .
आजवर कितीवेळा एकांत लाभूनही तिची सभ्य वागणूक पाहून कधीच मनाचा तोल ढळला नाही . त्या मेघाच्या आयुष्यात पहिला पुरुषी स्पर्श असा रानटी यावा ?
मेघा शरीराने बरी होईलच पण मनाचे काय ? हा प्रश्न समोर येताच श्रीरंग दचकला .
योनीसुचिता आणि स्त्रीचे चारित्र्य जोडणारा समाज तिला जगू देईल ?
आईदेखील म्हणाली पत्रकारांशी बोलू नकोस . जर घरच्यांनी आमचे नाते नाकारले तर ? मुळात मेघा आता मनाने आणि शरीराने माझ्याशी एकरूप होईल ?
असा प्रश्न येताच श्रीरंग थांबला . काळ आणि प्रेम प्रत्येक जखम भरून काढते . मी माझ्या मेघाला परत उभी करेल . माझे प्रेम फक्त तिच्या दिसण्यावर नाही तर असण्यावर आहे .
विचारांच्या तंद्रीत त्याचा डोळा लागला.
विचारांच्या तंद्रीत त्याचा डोळा लागला.
" सुयोग , चमत्कार झाला . मेघा शुद्धीत आलीय . पण अजून चोवीस तास तिला.भेटता येणार नाही . "
डॉक्टर विवेक म्हणाले .
सारिका आणि सुयोग सुन्न मनाने बसून होते . मुलगी वाचली हे समजल्यावर त्यांना जरा बरे वाटले .
" सारिका , जेवण मागवतो . कालपासून काही खाल्ले नाहीस . " सुयोग म्हणाला .
" माझी सोन्यासारखी पोर तिचा पार चोळामोळा केला राक्षसांनी . माझ्या मेघाचे आता काय होईल सुयोग ? "
सारिका त्याला मिठी मारून रडत होती .
सारिका त्याला मिठी मारून रडत होती .
सुयोग शांतपणे तिला समजावत उभा होता.
मेघा पुन्हा उभी राहील .
श्री आणि तिचे नाते पूर्ववत होईल ?
वाचत रहा .
तुज संग प्रीत लगाई सजना
©® प्रशांत कुंजीर.
अष्टपैलू 2025 स्पर्धा
श्री आणि तिचे नाते पूर्ववत होईल ?
वाचत रहा .
तुज संग प्रीत लगाई सजना
©® प्रशांत कुंजीर.
अष्टपैलू 2025 स्पर्धा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा