४७) तूझ्या आठवणींचा विरह

......
दोघांची जेवण झाली.शतपावली सुद्धा झाल. त्यानंतर प्रणव तीला कुशीत घेऊन झोपला आणि तिला झोप येत पर्यंत लहान बाळां सारख़ थोपटत राहिला.

ती झोपणार नाही तोपर्यंत प्रणव झोपणार नाही हे सुद्धा ती चांगलच जाणून होती. म्हणून मग तीने काही वेळातच डोळे बंद करत त्याचाही नकळत घेतलं झोपेच सोंग"...

तसं प्रणवने तीच्या बंद डोळ्यांवर नजर टाकली.पापण्यांची उघड झाप काही झाली नाही.म्हणून तो सुद्धा ती झोपली असा समज करून झोपी गेला.

थोड्यावेळातच त्याचे श्वास तीच्या चेहर्यावर जाणवले.आणि तो झोपल्याची खात्री झाली.तसं तीने तीच झोपेच सोंग थांबवलं आणि डोळे उघडून एक नजर त्याचाकडे बघितलं.

बिचारा किती त्रास सहन करतो.पण एका शब्दांने बोलत नाही.आज जरा जास्तच वैतागून बोलला माझ्याशी पण नंतर मात्र त्याची चूकी नाही हे माहिती असून सुद्धा वाईट वाटून घेतलं.माझ्यासाठी त्याने आश्रमात असल्यापासून खूप काही केलंय सगळ्यांत महत्वाचं जीव लावतो तो  मला खूप आणि मी" प्रत्येक वेळी दुखावलंय त्याला "...

यापुढे नाही देणार तूला त्रास प्रणव माझी सगळी काम मी"तू न सांगता करेन एवढचं बोलून तीने त्याचा गालावरून अलगदपणे हात फिरवला तशी प्रणवला तिच्या स्पर्शाची झोपेत ही जाणीव झाली.

प्रिया जागा आहे मी"काय? झालंय तूला माझ्या गालावरून हात फिरवतेस म्हणजे?कसला विचार करतेस तू हाच ना" की, तू मला खूप त्रास देतेस वैगेरे हे सुद्धा म्हणाली असशील ना" की, उद्यापासून नाही देणारं प्रणव तूला त्रास माझी स्वत:ची काम स्वत:करेन म्हणून,बंद डोळ्यांने त्याचा गालावर तीचा फिरणारा हात त्याने पकडला.आणि तो तसाच ओठां जवळ नेला.आणि त्याचावर ओठांची मोहर उमटवत म्हणाला"

प्रणवच्या तोंडून तसंच्या तसं ऐकून तीला गलबलून आलं आणि तीने तीचा चेहरा त्याचा कुशीत कुपसला.

ये वेडा बाई रडतेस का? अशी  मनातलं ओळखलं.म्हणून कुणी रडत का?

मनातलं ओळखलं म्हणून नाही रे....रडले पण तू अगदीच बरोबर ओळखल़सं कसं काय? नाही तर....मी"

प्रिया मी" उगाच नाही राहात तूझ्या सोबत मला तूला वाचायची गरज नाही तूझ्या मनातलं ओळखायला मला एक स्पर्श सुद्धा पुरेसा आहे.

हो म्हणून तर... तू माझ्या नजरेत परफेक्ट आहेस

हे ते तर मी "आहेच पण तू सुद्धा माझ्यासाठी परफेक्ट आहेस.
आणि हा ग...कसला विचार करतेस मनात  वेड्यासारखा"
मला नाही होत कसला त्रास तूझा खबरदार स्वत:ची काम स्वत: केलीस तर ....मी "आहे ना ,मग काय? गरज नाही.तसं काही करायची मला माहित आहे मी" ओरडलो म्हणून सहाजिकच आहे.मनात तसा विचार येणं.पण प्रिया तूला ही माहित आहे ना" " की मी ते जाणून बुजून नाही केलं म्हणून,प्रिया थोडी मचमच झाली होती ग...कामाच्या ठिकाणी ती तूझ्या वर निघाली.

ठिक आहे प्रणव नाही करत मी" कसला विचार नको काळजी करूस आणि हे रे ....काय? तू तर झोपला होतास ना" मग लगेच कसा उठलास"

मी "झोपलो कोण? म्हटलं बरं "तूला मी "झोपलो नव्हतोचं ग....तू सोंग घेऊ शकतेस झोपेच मग मी"नाही का? घेऊ शकत

सोंग" म्हणजे ?तू झोपला नव्हतास,  बोलता बोलता प्रियाने डोक्यावर हात मारला.

मग आहे की, नाही मी" तूझ्यांही पेक्षा नौटंकी प्रणवने पुन्हा एकदा विचारलं.

हो तसचं काही तरी वाटतंय बाबा मला"आता पर्यंत तूला मी....बिचारा समजायचे पण ....आता वाटतंय मीच बिचारी झाले बघ"

ओ ग.. माझी बिचारी बायको झोप बरं आता लवकर या अवस्थेत जास्त जागणं चांगलं नाही.डाँक्टरांनी सांगितलंयं माहित आहे ना, त्याने पुन्हा  एकदा समजून सांगितलं तशी तीने मान हलवून डोळे मिटले.

झोपायचं आहे झोपेच सोंग नाही घ्यायचं प्रिया तो पुन्हा म्हणाला तसे तीने पापण्यांची उघडझाप करत पुन्हा डोळे घट्ट मिटले.

दुसरा दिवस सकाळ रात्री उशीरा झोपल्याने प्रिया शांत झोपली होती. प्रणव मात्र कधीच आवरायला निघून गेला.

प्रिया, अग उठतेस ना"आज डाॅक्टर कडे जायचं आहे, ना लक्षात की, विसरलीस" स्वत:च आवरून होताच तो प्रियाला आवाज देत म्हणाला.

प्रणव नाही विसरले रे....पण मला आज खुप कंटाळा आलाय आपण नद्या जाऊ या ना ....

नाही प्रिया हे दिवस खूप नाजूक असतात वेळच्या वेळी झालेलं बरं नाही का? तसंही उद्यावर ढकलं तर मला परत सुट्टी नाही मिळणार"

काय? यार प्रणव मला बाहेर जायचा खूप कंटाळा आलाय,आणि तू आहेस की, त्याच गोष्टी वर आडून राहातोस.

प्रिया तूझी परिस्थिती मला समजत नाही असं नाही ना ग....हे करणं महत्वाचं आहे की, नाही आणि गेल्या वेळेस डाॅक्टर काय? म्हणाली जसं जसे महिने जातील तसं तसे बाळांत बदल दिसतील हो की, नाही.आणि काल बघितलंस ना" कसा लाथा मारत होता लबाड मग त्याचा तो उत्साहं आपण सोनोग्राफी मध्ये बघू शकतो ना"

तुझं काय? बाबा त्याचा उत्साह तूला लाथा मारल्या की, जाणवतात पण माझा विचार कर ना ग, प्रिया मलाही त्याचा उत्साह अनुभवायचं असेलचं ना"आता तो काही तूझ्या पोटातून माझ्या पोटात लाथा मारणार आहे का? नाही ना"त्यामुळे मला सोनोग्राफी करतानाच बघावं लागेल ना"तो म्हणाला आणि प्रिया विचारात मग्न झाली.

इकडे प्रणव ती काही तरी बोलेल याची वाट बघत होता.

प्रणव आपण जायला हव कितीला निघायचं आहे तशी मी" तयारी करते प्रिया काही तरी विचार करतचं म्हणाली.

तयारी झाली की, निघू ना प्रिया"

ठिक आहे मी" जाते  आवरून आलेच एवढच बोलून तीने त्याला हात दिला आणि त्याचा मदतीने उठली आणि त्याचा हातातून हात काढून घेत हळूहळू पावलं टाकत बाथरूमच्या दिशेने चालू लीगली.

हळू "मी येऊ का? सोबत प्रिया त्याने जाणार्या  प्रियाला आवाज देत विचारलं.

जाईन रे .... मी किती काळजी करतोस"

जाशील तू मला माहित आहे पण प्रिया सावकाश पाऊल टाक
एवढचं म्हणायचं होतं मला तो म्हणाला आणि तीला त्याचा
बोलण्यांत  नाराजी जाणवली.

प्रणव काय? झालं नाराज का? आहेस काय? झालंय प्रिया मागे वळतं म्हणाली.

नाही काहीच, नाही मी" कुठे? नाराज आहे तू जातेस ना "आवर

काहीच नाही का? मग हेच मला डोळ्यात बघून सांग बघू ती  म्हणाली आणि प्रणवने नजर चोरली.

प्रणव तूला माझ्या मनातलं जसं एका स्पर्शाने कळतं तसं मला तूझ्यां मनातलं तूझ्या आवाजा वरून कळतं समजलं तूझ्या या नाराजीच कारण ही मला माहित आहे.पण तरीही मला तूझ्या तोंडून ऐकायचं आहे बोलं ना"काय? झालंयं,

नाराज होऊ नको तर...काय? करू मी" म्हणालो, ना, मी येतो म्हणून पण तू नको म्हणांलीस का? ग....मी सर्व विसरतो पण तू सर्व  मनात धरून ठेवतेस हो ना" म्हणून तू कालच्या गोष्टी वर ठाम आहेस मनाशी पक्क केलं होतस  ना" मला त्रास देणार नाहीस म्हणून माझा आधारा शिवाय जातेस स्वत:च स्वत: करतेस पण हे सर्व करून तू मला खूप त्रास देतेस प्रिया मला तूझ्या मागेपुढे करण्यात आनंद मिळतो ग....  हे का? कळत नाही तूला,

प्रणव अरे काय? हे असला कसला गैरसमज तूझा तूझा आधार घेतला नाही कसं म्हणतोस तूझ्या लक्षात आलं की, नाही माहित नाही पण ....आता सुद्धा तू माझी कामच करतोस मला झोपेतून कुणी उठवलं तू....मला आधार देऊन उभ कुणी केलं तू....

पण मग सोबत येण्यासाठी नाही का? म्हणांलीस प्रणव म्हणाला तसा प्रियाने मनातच डोक्यावर हात मारला.

प्रणव अरे... तू पण ना "काहीही विचार करतोस हुँ म्हणंत़ प्रियाने तीचा हात प्रणव समोर केला प्रणव मात्र काहीच न समजल्या सारखा तीच्या कडे बघत होता.

अरे बघतो काय? असा हात पकड माझा प्रिया पुन्हा एकदा म्हणाली .तसा त्याने न कळून तीचा हात पकडला.

चल आता घेऊन मला तसंही बाथरूम मध्ये मला चालते वेळी थोडी भितीच वाटते.


🎭 Series Post

View all