५९) तूझ्या आठवणींचा विरह

.....
साक्षी".....स्वत:शीच पुटपुटला आणि तसेच.... खाडकन डोळे उघडले आणि बेड वर उठून बसला.आजूबाजूला बघितलं तर....तो एकटाच होता.तेव्हा कुठे? त्याला स्वप्न असल्याचं समजलं.आणि एवढ्या वयातही तो स्वत:वरच हसला.त्याच बरोबर किती तरी वेळ तो साक्षीचा चेहरा आठवून आठवून हसत होता. तसचं त्याचं लक्ष हातावरच्या राखीवर गेलं बराच वेळ तो त्या राखीकडेच बघत होता.

शाळेतला रक्षाबंधन संपला पण आज कॅलेंडर प्रमाणे रक्षाबंधन होता.म्हणून तीला घरी जाऊन भेटायचं तो मनाशी पक्क करतो. आणि प्रियाला आवाज देतो.

आई "....आई"....कुठे? आहेस तू.... मी"साक्षीकडे जाऊन येतो.

नीरज साक्षीकडे कशाला रे....काय? झालं ,

असच जातो ते आज रक्षाबंधन आहे ना"म्हणून,

अरे हो पण मग थोड्या उशिराने जा ....सकाळी सकाळी कुठे? चाललास तीला तरी झोपेतून उठू दे....

अग त्यासाठी वाट कशाला बघायची मी"जाऊन उठवतो ना,

असं म्हणतोस मग जाऊन ये ...पण लवकर ये,मी"आंघोळीच पाणी काढते.

हो आई लवकरच येतो.म्हणत तो पळतच साक्षी राहात असलेल्या समोरच्या बिल्डींगच्या दिशेने गेला.साक्षीचा दारात जाऊन उभा राहातोच  ना" राहातो तर .....दरवाजाला बाहेरून कुलूप दिसलं तसा नीरजने दोन पावलं मागे केली.

आता मोठ्या मुलांनसारखी विचार करायची बुद्धी नव्हती म्हणा" त्याची पण ही गोष्ट त्याला आता जाऊन आईला सांगावी, वाटली.म्हणून तो तसाच घरी परतला.प्रियाला तो थोडा नाराज वाटला.

काय? रे.... साक्षीच्या घरी गेला होतास ना" मग रे.... लगेच का? आलास काय? झालं उठली नाही का? सांगत होते ना, थोड्या उशिराने जा....पण आमच बछडं आईच ऐकेल तर.... ना

आई ती साक्षी सकाळी सकाळी कुठे? गेली असेल.

म्हणजे? ती घरी नाहीय का?

हो आई कुणीच, नाही घराला कुलूप आहे म्हणजे? ते स्वप्न नव्हतं ते खरचं होतं स्वत;शीच पुटपुटला.

काय? बडबडतोस कसलं स्वप्न,

आई मगाशी साक्षी आली होती माझ्या रुम मध्ये पण हसली. आणि बाय करून निघून गेली.मला वाटलं स्वप्न असेल पण...आता जाऊन बघतोय तर....दाराला कुलूप,

नीरज अरे ....ते स्वप्न होतं असं काय करतोस बरं मला सांग साक्षी तूझ्या रूम मध्ये आली असती तर....ती दरवाजातून आली असती ना"म्हणजे? आधी ती आल्याच मला समजलं असत की, नाही.प्रियाने त्याला समजवल तसा तो काही तरी विचार करावा असाच चेहरा करून उभा होता तसं पुन्हा त्याला काही तरी आठवल .

मग आई ती कुठे? गेली असेल इतक्या सकाळी पुन्हा त्याने मनातला तयार प्रश्न विचारलाच"....

अरे.... बापरे हा प्रश्न आहेच का? ठिक आहे आपण एक काम करू या मी "आंघोळीसाठी पाणी काढलंय त्यामूळे तू आधी आंघोळीला जा"मी ....बघून येते साक्षी कुठे? गेलीय ते प्रिया लहानग्यां नीरजच्या कळाने घेत होती.

प्रियाचा वाक्यावर तो हसला सर्वात आधी आईलाचं जाऊन सांगाव हा विचार त्याचा मनात ज्या विश्वासाने आला तो विश्वास प्रियाचा बोलण्यातून नीरजाला धीर देऊन गेला. आणि प्रिया ला हसचचं मिठी मारली.

काय?  रे....असा हसतोस काय? खुदुखुदू

काही नाही तू माझी बेस्ट आई आहेस मी "अजून खूप लहान आहे मी" मोठ्या माणसांसारखा बोलत जरी असलो ना" तरी खोलवर मला काही कळत नाही.पण आई जेव्हा मी"
साक्षीचा  घराला कुलूप बघितल तेव्हा कोणता विचार नाही आला पण ....मला आधी हे तूला येऊन सांगाव असचं आलं होतं म्हणून हसलो की, माझी आई किती ओळखते तीच्या बछड्यांला"

ओ रे.. माझं बछडं ते इतका विश्वास आता तर...मला साक्षी कुठे?आहे हे बघायला जावंच लागेल तू जा....बघू पाणी गार होईल.इतकच म्हणाली तशी नीरजने मान हलवली आणि निघून गेला.

प्रिया मात्र साक्षीच्या घरी गेली.अजुन ही दाराला कुलूप होतच तसं तीने आजूबाजूला विचारायचा प्रयत्न केला. तसा तीला धक्का बसला त्याला पडलेल ते जरी स्वप्न असलं तरी ते किंबहुना खरच ठरलं साक्षीचे घरचे कायमसाठी हे घर विकून निघून गेले.

आता प्रिया समोर एकच प्रश्न आता हे नीरजला कसं समजवायचं तीचं इथून जाण्याचं कारण तर ...माहित नाही.पण खोटं का? असे ना" पण नीरजच्या बुद्धीला पटणार खोट त्याच्यांशी बोलावं लागेल.

आई आली का? साक्षी मी "लगेच येतो  प्रियाला आलेलं बघताच नीरज म्हणाला.

नीरज अरे ....थांब काय? करतोस एकदा आलास ना" जाऊन हे असं सारख सारख कुणाच्या दारात जाणं चांगलं नाही मी" आले जाऊन, आजूबाजूला विचारलं तर" त्यांना कुणाला माहितच नाही.

पण तू काळजी नको करूस येईल ती  कुठे? तरी गेली असेल दोन दिवस सुट्टीवर आहे ना"

पण आई ती न सांगता का? गेली.रक्षाबंधनच्या दिवशी ती मुलं जे काही बोलत होते त्यामुळे तर ...नाही ना" ती गेली नीरज नाराज होत म्हणाला.

नीरज जास्त विचार नको करू असं काहीच नसणार् आहे ती सुद्धा तुझ्या इतकीच लहान बाळं आहे मला तर वाटतं तीला त्या मुलांच बोलणं समजल नसेल ही जसं की, तूलाही समजलं नाही कसं बसं खोटं नाट सांगून प्रियाने नीरजच्या बाळ मनाची समजूत घातली.

नीरज मात्र नाराज चेहर्याने तिथून निघून गेला. प्रिया मात्र समजायचं ते समजली.आणि जाणाऱ्या नीरज कडे बघत राहिली.

बरेचं दिवस असेचं जात होते नीरज रोज साक्षीचा रूम कडे ये जा ....करत होता.आणि खांद्यावर दप्पर अडकवत तो नकळत साक्षीचा दारात पोहोचला आणि त्याची निराशा झाली.

बरेच दिवस त्याचं हे असचं चालू होत तीच्या घरापर्यंत येण, आाणि दारावरचं कुलूप बघून उदास म्हणाने निघून जातो.

एक महिना होत आला अजूनही तीच्या दाराला कुलूप तसचं होतं.अखेर नीरज च्या बाळ मनाने हृदयाच्या एका कोपर्यात साक्षीची एक गोड आठवण तशीच जपून ठेवली.आणि ती आता कधीच परत येणार नाही असा समज करून त्याच निरागस मनाने तितकचं साक्षीसाठी असणारं हळव, मन सावरण्याचा प्रयत्न करत मोठा होत होता.

त्यातंच एक वर्ष कसं बस उलटून गेलं आज पुन्हा एकदा शाळेत रक्षाबंधन साजरी होणार होता आज एका वर्षानंतर पुन्हा एकदा त्याला त्याची आठवण आली.आणि खांद्यावर दप्पर अडकवत तो नकळत साक्षीचा दारात पोहोचला.आणि त्याची निराशा झाली.

तो तसाच तिथून शाळेच्या दिशेने चालू लागला.थोड्याचं वेळात तो शाळेत पोहचला आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू झाला. नीरज त्याचा जागेवर हनुवटी वर हात ठेऊन शांत बसला होता.

नेहमी या दिवशी त्याचा बाजूला बसणार्या सा़क्षीची त्याला खूपच
आठवण येत होती. पण ती जागा आज गेली एक वर्षे रिकामी होती. पण ती रिकामी जागा आज त्याला   मनातून खूप त्रास देत होती न, राहून आज त्याला सतत तो दिवस आठवला.
ज्या दिवशी साक्षीने त्याला पहिल्यांदा राखी बांधली होती.

रक्षाबंधन नेहमी प्रमाणे सुरू होता तर....नीरज जुन्या आठवणीत  रमला होता. गोड आठवण असूनही त्याचे डोळे पाणावले आाणि एक थेंब गालावरून ओघळला.
.
शाळेची घंट्टा वाजली आणि शाळा सुटली.तो तसीचं जागेवरून उठला. आाणि खाल मानेने, वर्गा बाहेर पडला.

तो बघा मागच्या वर्षी तर फक्त हातावरच्या राखीकडे बघत हसत चालला होता रस्त्यांने आणि आज बघितलं का? रे....

आज त्याचा हात पण रिकामी आणि  त्याचा सोबत चालणारी ती चिमणी सुद्धा नाही दिसत. एका घोळक्यांत चालणारा एक मुलगा म्हणाला.

हो रे.... ती चिमणी तर...  अक वर्षे झाली उडून गेली  त्या घोळक्यांतून दुसरा मुलगा म्हणाला आणि त्याचा सोबतचे जोरजोरात हसू लागले.

नीरज मात्र भरल्या डोळ्यांने झपाझप पावलं टाकत चालत होता.

कसाबसा तो घरी पोचला आणि प्रियाला त्याचा चेहर्यावर उदासी जाणवली तसं प्रियाचं मन खट्टू झालं.

नीरज अरे.... काय? झालं तूझ्या डोळ्यात पाणी न राहुन तीने त्याला विचारलं.

तसं त्याला भरून, आलं आाणि त्याने तशीच तीला घट्ट मिठी मारली.आणि बोलू लागला.


🎭 Series Post

View all