Login

तुझं घर आता हेच आहे भाग 1

तुझं घर आता हेच आहे. तुला इथे रहायचं आहे
तुझं घर आता हेच आहे भाग 1

©️®️शिल्पा सुतार

ईरा चॅम्पियन ट्रॉफी 2025

नीता सकाळ पासून कामात होती. तिचा छोटासा शिवम किरकिर करत होता. त्याला घ्यायला ही तिला जमलं नाही. ती जिथे जाईल तिथे तो रांगत तिच्या मागे जात होता. मोठे दीर, त्यांचे दोन मुलं, सचिन, सासरे सगळे डबा नेत होते. करणारी ही एकटी. जाऊबाई प्रेरणा तोपर्यंत मुलांना तयार करत होती.

"डबा झाला का? " सचिनने आवाज दिला.

" हो दोन मिनिट. " तिने शिवमला कडेवर घेऊन डबा भरला. पुढे दिला. लगेच चहा दिला.

" आईचा चहा झाला का?" सचिनने विचारलं.

" हो त्यांना चहा दिला. " तिने सांगितलं. तो ऑफिसला गेला. शिवम त्याच्यासोबत जाण्यासाठी रडत होता. त्याने त्याला घेतलं नाही.

'यांनी मला चहा घेतला का? विचारलं नाही. शिवमला ही असच करता. आमच्याकडे बघत नाही. त्यांच्यासाठी त्यांचे आई, बाबा खुप महत्वाचे आहेत. मग यांनी लग्न का केलं? एवढं मोठ आयुष्य पडलं आहे. पुढे कस होईल?' ती काळजी करत होती. तिला वाईट वाटतं होतं. पण काय करणार? जे आहे ते ठीक आहे.

मावशीने स्थळ सुचवलं. सासरी मोठा बंगला होता. सचिनची नोकरी चांगली होती. कसली कमी नाही. लगेच लग्न जमलं. लग्नात ही तिला खूप दागिने केले. साड्यांची कमी नव्हती. पण भौतिक गोष्टींनी सुख मिळत अस नाही ना. तिला हवं होत सचिनच प्रेम, थोडा आधार समजून घेणारा नवरा.

'लग्नाला तीन वर्ष झाले एक दिवस ही तिच्या वाटेला प्रेमाचे दोन शब्द आले नव्हते. सचिन अतिशय प्रॅक्टिकल मुलगा होता. तिला कधी कधी वाटत होतं यांना माझी गरज नाही. मलाच ऐडजेस्ट करावं लागतं. परत घरच्यांबद्दल काही बोलता येत नाही. यांच्याकडे काही तक्रार करता येत नाही. एकतर यांना ते आवडत नाही. ते मलाच बोलतात. '

घरात सहा मोठी माणसं, तीन मुलं होती. एवढ्यांच करता करता नीताची पुरेवाट होत होती. प्रेरणा फक्त तिच्या मुलाचं करत होती. सासुबाई सविता ताई फक्त बघत असायच्या. काही म्हणायच्या नाहीत. त्या ही मदत करायच्या नाही. त्यांनी निदान शिवमला तरी सांभाळावं. पण नाही. त्यांना काय बोलणार? नीता कंटाळली होती.

नीता लग्न होवुन आली तस प्रेरणा, सविताताईंनी सांगून दिलं या पुढे तुला घरात बघायचं आहे. तिने ही जबाबदारी नीट उचलली. आता शिवम लहान असल्यामुळे तिची धावपळ होत होती. कोणाचा सपोर्ट नव्हता.

संध्याकाळी ही असच प्रेरणा मुलांना अभ्यासाला घेवून बसायची. त्यामुळे नीताला स्वयंपाक करावा लागायचा. सचिन घरच्यांच्या पुढे काही बोलायचा नाही. तेच मोठे दीर नेहमी प्रेरणाच्या बाजूने असायचे. त्यामुळे ती सुखात होती. नीता बिचारी दबून असायची.

आज संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाजी नव्हती. नीता बाहेर आली. सविताताई बसल्या होत्या.

"आई काय करायचं आहे? भाजी नाहीये."

"तुला काय करायचं ते कर." सविताताई म्हणाल्या.

तिने खिचडी केली. दोन-चार बटाटे होते ते सकाळी डब्यासाठी कामाला येतील असा तिने विचार केला.

सचिन घरी आला. तो आवरून पुढे टीव्ही बघत होता.

"स्वयंपाक झाला असेल तर जेवायला वाढ." त्याने आवाज दिला. तिने ताट वाढले. सगळे खिचडीकडे बघत होते.

" बस फक्त खिचडीच केली आहे का?" सचिन विचारत होता.

"हो, घरात भाजी नाहीये. मी सासूबाईंना सांगितलं होतं." नीता सांगत होती.

"तू बाजारात जायचं ना. तू दिवस भर काय करतेस?" सचिन चिडला.

" ती काही करत नाही. नुसती आपली पोराला घेवून बसली असते. " सविताताई म्हणाल्या.

" मी कशी भाजी आणणार? शिवमला धरू की पिशव्या पकडू. जरा तरी समजून घ्या आणि अहो तुम्ही मलाच काय बोलताय? बाकीचे लोक काय करतात? प्रेरणा वहिनी दिवस भर नुसत्या बसलेल्या असतात. आई ही तसच करतात. याच्याशी बोल त्याच्याशी बोल. घरात एक काम काही करत नाही." नीता चिडली होती.


0

🎭 Series Post

View all