Login

तुझा वेळ ही महत्वाचा... भाग 3 अंतिम

बरोबर बोलता आहात तुम्ही सचिन, एवढं करते मी ते नाही दिसत, आज काल रोज आई मला बोलत असतात, शेजारी पाजारी नातेवाईकांना सांगतात मी काही करत नाही


तुझा वेळ ही महत्वाचा... भाग 3 अंतिम 

©️®️शिल्पा सुतार
.........

" मनीषा राग सोड आता, मी म्हटलं होतं तुला नेहमी अति गरम पोळ्या तव्यावरनं ताटात देते तू, सगळ्यांना तशीच सवय झाली आहे, एखाद दिवशी गार जेवण सुद्धा त्यांना आवडलं नाही, म्हणून म्हणतो मी अशा सवयी नको लावून ठेवु",.. सचिन.

"बरोबर बोलता आहात तुम्ही सचिन, एवढं करते मी ते नाही दिसत, आज काल रोज आई मला बोलत असतात, शेजारी पाजारी नातेवाईकांना सांगतात मी काही करत नाही , इतके वर्ष केलेली सेवा त्या विसरल्या, वर्षभर गरम पोळ्या दिल्या, एका दिवस परीक्षेमुळे आधी स्वयंपाक केला तर ते ही त्यांना चालल नाही, इतके दिवस मी काही बोलत नव्हते, पण आता बास, मी मुलांकडे लक्ष देणार आहे, मुलांना या वयात माझी गरज आहे",.. मनीषा.

" हो बरोबर आहे तुझ तू नीट रहा, त्रास करून घेवू नकोस, आपले ही वय होत चालले आहेत, आपल मानसिक स्वास्थ्य नीट असण ही खूप महत्वाच आहे, बाकीच्यां कडे लक्ष देत जावू नको, तुला जे करायच ते कर",.. सचिन.

" हो आपण जात जावू सकाळी फिरायला, तुम्ही म्हणताय ते पटल मला आता, कोणाची गैरसोय होवू नये म्हणून मी नेहमी सगळ्यांना आवडत ते करत आली, माझ्या मनाचा ते विचार करत नाही, चान्स मिळाला की लगेच मला बोलतात अपमान करतात",.. मनीषा.

" सदोदित अति सगळ्यांची काळजी घेण बंद कर,लहान नाहीत ते, तू नेहमी अति काम करत बसते त्यामुळे एखाद्या वेळी जरी नीट नाही झाल तर राग येतो सगळ्यांना",.. सचिन.

" हो आता तेच करणार मला माझा वेळ हवा, संध्याकाळचा पूर्ण वेळ किचन मधे असते मी, पण आता मी तो वेळ मुलांना देणार, स्वतः काही तरी करणार फिरायला जाणार, माझ कर्तव्य करेन मी, पण आता फाईव्ह स्टार ट्रीटमेंट बंद, मला पण माझा वेळ गरजेचा आहे आणि मी त्याचा सदुपयोग करणार आहे"...मनीषा.

" खूप छान. तुझा वेळ तुझ आयुष्य तू आमच्या सेवेसाठी वापरावं याला काही अर्थ नाही, तू पण आनंदाने जग, तुला हव ते कर, तुझा हक्क आहे तो",.. सचिन .

सचिन आई बाबांच्या रूम मधे आला,
" आई बाबा इकडे मुलांच्या परीक्षा सुरू आहेत तुम्ही दोघ थोडे दिवस सौरभ कडे जावून या, तुम्हाला हव तस पथ्य पाणी होणार नाही, उगीच तुमची धावपळ होते",..

" तू कोण आहेस आम्हाला अस सांगणारा आम्ही आम्हाला आवडेल तिथे राहू आणि हे आमच घर आहे ",.. आई.

" ठीक आहे, विसरलो होतो मी, आम्ही आता आमची सोय बघतो मग लक्ष्यात नव्हत यात तुमचा इगो आहे, आम्ही तुमच्यात रहातो कस ही वागा यांच्याशी... मनिषा शी, आहे घेतलेल मी घर, तिकडे जावू आम्ही ",.. सचिन.

"काय झाल एवढ, मनीषा काही बोलली का ",.. आई.

" काही नाही, ती कधी काही बोलते का कोणाला, तीच तीच काम करत रहाते हेच चुकत तीच, ती आवडत नाही तुम्हाला, जे कोणी काही करत नाही ते लोक आवडतात, तर मग त्यांच्या अनुभव घ्या जरा, आणि तुम्ही मनीषा सोबत वागतात ते मला आवडत नाही, तिला काही तुमच्या सेवेसाठी आणल नाही मी घरात, पुरे झाल बरेच वर्ष झाले लग्नाला माझ्या आम्ही बाजूच्या आमच्या स्वतः च्या फ्लॅट मधे शिफ्ट होतोय",..सचिन.

"नको रहा तुम्ही इथे, आम्ही थोडे दिवस सौरभ कडे जावून येतो",.. आई.

" थोडे दिवस नाही आता इकडे अर्धे तिकडे अर्धे दिवस रहात चला, तयार व्हा मी सोडून येतो तुम्हाला तुमच्या आवडत्या सुने कडे, त्यांना ही घेवू द्या थोडी जबाबदारी, तुम्हाला समजू द्या कोण कस आहे ",.. सचिन.

दोघ नाईलाजाने तयार झाले, येवू दे जरा अनुभव त्या शिवाय आपल्या जवळ काय चांगल आहे हे समजत नाही यांना.

सचिन मनीषा आता स्वतःच्या घरात शिफ्ट झाले होते, आई बाबा कधी सचिन कडे कधी सौरभ कडे तर कधी स्वतःच्या घरात रहात होते, त्यांना समजल होत कोण चांगल कोण वाईट.

मनीषा सचिन खुश होते, त्यांना त्यांचा वेळ मिळाला होता. कोणासाठी किती केल तरी कमी असत.

0

🎭 Series Post

View all