Login

तुझा सहवास

सहवासात असल्यास व नसल्यास काय वाटते हे सांगणारी कविता

तुझा सहवास
वाटे मला भारी
तुझ्यामुळे सुख
आले माझ्या दारी

तुझ्याविना नसे
अर्थ या जीवनी
तुझे प्रतिबिंब
असे या नयनी

तुझा सहवास
फुलवे चांदणे
आयुष्यात आले
सुखाचे नांदणे

तुझ्याविना वाटे
सारे काही उणे
तू नसता भासे
सारे जग सुने